भाजपच्या पाठिंब्यावर ठाकरेंचे Milind Narvekar जिंकतील ? | Legislative Assembly Election maharashtra

भाजपच्या पाठिंब्यावर ठाकरेंचे Milind Narvekar जिंकतील ? | Legislative Assembly Election maharashtra
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अशाच विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर त्याचं रात्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवला आणि शिवसेनेत उभी फूट पडून तेंव्हा राज्यात सत्तांतर झालं होतं. दरम्यान, मागच्या दोन वर्षांत मात्र बरंच काही घडून गेलं आहे. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांचा दारुण पराभव झालाय. तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारलीय. त्यामुळे आता अगदी तीन चार महिन्यांवर आलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणामध्ये पुन्हा एकदा काही उलथापालथी होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच याची सर्व व्युहरचना ही १२ जुलै रोजी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतून होणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या निवडणुकीचं महत्त्व आणखीनच वाढलं आहे. त्यात लोकसभा निवडणुकीनंतर बदलेल्या समिकरणांमुळे राज्याच्या राजकारणात भाजपा नेते आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक वाढताना दिसत आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधान भवनाच्या आवारात भेट झाली होती. तसेच दोन्ही नेत्यांनी एकाच लिफ्टमधून प्रवासही केला होता. तेव्हापासून या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यानंतरही अधिवेशनादरम्यान, ठाकरे गट आणि भाजपाच्या नेत्यांच्या भेटीगाठी चालूच होत्या. आता याबाबत दोन्हीकडचे नेते काहीही बोलत नसले तरी पडद्याआड काहीतरी घडतंय, असे तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यात विधान परिषदेत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी हाती आवश्यक तेवढं संख्याबळ नसतानाही उद्धव ठाकरे यांनी त्यांचे निकटवर्तीय असलेल्या मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देऊन या निवडणुकीत रंगत आणली आहे. आता ठाकरेंसोबत वाढत असलेली जवळीक आणखी दृढ करण्यासाठी भाजपा मतांची जुळवाजुळव करून मिलिंद नार्वेकर यांना विजयी करणार का? याबाबतची चर्चाही आता त्यानिमित्ताने सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील समिकरणं आणि भाजपा आणि ठाकरे गटातील जवळीक याबाबत घेतलेला हा आढावा.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#LegislativeAssemblyElectionmaharashtra
#legislativeassemblyelection2023
#LegislativeAssemblyElection
#milindnarvekar
#maharashtraassembly
#maharashtranews
#marathinews
#latestmarathinews

Пікірлер: 15

  • @patil__p__124
    @patil__p__12411 күн бұрын

    अजित पवार game होईल असं वॉटतंय

  • @ratankumarchoithani2438
    @ratankumarchoithani243811 күн бұрын

    अजित पवार गटाचे आमदार क्रास मतदान करतील व नार्वेकर यांना निवडुन आणतील अजित पवारांचा एक उमेदवार विजयी होईल.

  • @user-du3xe3oh2z
    @user-du3xe3oh2z10 күн бұрын

    Ubt 15. Ncp sp 12 con 37 mim 2mkp 1 sp 2 skp 1 total 70

  • @kailasdeshmukh8845
    @kailasdeshmukh884511 күн бұрын

    फडणवीस हे करू शेकत नाही असे झाले तर मुंडे धोका आहेत

  • @sakharammore4981
    @sakharammore498110 күн бұрын

    काहीही सांगता सेटिंग तुम्हाला आधीच माहिती असल्यासारखं तोंडावर आपटलं bjp कधीच आपली मत waste करणार नाहीत त्यांचे ही उम्मीदवार आहेत शिवाय युती चे ही आहेत मग शिवसेनेच्या उम्मीदवार याला मत का देतील? युतीचे सर्व उमीदवार निवडून येतील विधानसभा जवळ आहे धोका नाही करणार bjp

  • @sanjaysaraf4821
    @sanjaysaraf48219 күн бұрын

    मिलिंद नार्वेकर हे निवडणुकीत पडतील. शरद पवार त्यांना padatil. हा चमत्कार असेल. हे नक्की.

  • @pushkarvaishampayan4763
    @pushkarvaishampayan476310 күн бұрын

    बास जुळवा जुळव करत रहा.मतदार जेव्हा दुसऱ्या बरोबर जुळवून घेतील ना ? तेव्हा समजेल काय होत ते.आत्ता लोकसभेला समलच असेल

  • @mohittaur8799
    @mohittaur87999 күн бұрын

    अजित पवार यांचे दोन्ही उमेदवार व शिदेचे दोन उमेदवार जिंकणार भाजप चा एक उमेदवार पडणार.

  • @user-im1zn5xs7h
    @user-im1zn5xs7h11 күн бұрын

    1st comment

  • @shriramkulkarni6489
    @shriramkulkarni648911 күн бұрын

    राजीनामा दिलेल्या आमदारांची मत कमी होणार ना

  • @avinashdhanavade1549
    @avinashdhanavade154911 күн бұрын

    Bjp cha samplay sahaib aata

  • @ruchipalyekar3439
    @ruchipalyekar343911 күн бұрын

    kahihi bolta.

Келесі