अहमदनगर जिल्ह्यात इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग, विधानसभेत काटे की टक्कर Ahmednagarlive24

नवीन विधानसभा येत्या 3 नोव्हेंबरच्या आसपास अस्तित्वात येईल. त्यासाठी 20 ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणुका होतील. ही प्रक्रिया 45 दिवस अगोदरच सुरू होते. म्हणजेच 5 सप्टेंबरच्या आसपास निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या त्यासाठी बैठका सुरु झाल्यात. लोकसभेत महायुतीचं पानिपत झालं. तेव्हाचा अपेक्षाभंग पचवून महायुती, तर नव्या अपेक्षा घेऊन महाविकास आघाडी रिंगणात उतरेल. नगर जिल्ह्यात बाराही विधानसभेचे सध्या विधानसभेचं जोरदार वारं वाहतंय. पक्षाचे तिकीट मिळो न मिळो, अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून कामही सुरु केलंय. महायुतीत अजितदादा गटाबाबत उन्नीस-बीस असलं तरी महाविकास आघाडी मात्र एकत्र लढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षातील दिग्गजांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. याच हिरमोडामुळे नगर जिल्ह्यात विक्रमी बंडखोर उभे राहण्याची शक्यताही वाढली आहे. नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभेतील चर्चेचे चेहरे, व बंडखोरीची शक्यता असणार्‍या उमेदवारांचा अहमदनगर लाईव्ह २४ चा हा धावता आढावा...

Пікірлер: 11

  • @sachingawari
    @sachingawariКүн бұрын

    19 जुलै ला शरद पवार साहेब अमित भांगरे ची उमेदवार जाहीर करणार आहेत.

  • @sachingawari
    @sachingawariКүн бұрын

    अकोले विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अमित भांगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे

  • @user-ih8fq6qu1c
    @user-ih8fq6qu1c5 сағат бұрын

    नगर मध्ये फ्कत संग्राम भैय्या निवडून येतील आज लिहून ठेवा

  • @shamraopardhi9024
    @shamraopardhi90242 күн бұрын

    अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार मारुती मेंगाळ साहेब 2024❤

  • @user-dq4gl9uu5c
    @user-dq4gl9uu5c22 сағат бұрын

    Only a kalamkar

  • @nitinkedari9145
    @nitinkedari91452 күн бұрын

    नेवासा तालुका किसनराव गडाख

  • @vishallabade2121
    @vishallabade21212 күн бұрын

    Kalamkar Ticket bhetla fix nivdun yetil ,

  • @sonujagtap9723

    @sonujagtap9723

    Күн бұрын

    Shet 😂😂😂

Келесі