महाराष्ट्राची ग्रामीण जीवनशैली सातासमुद्रापार नेणाऱ्या जोडप्याची गोष्ट Ft.

Ойын-сауық

ही गोष्ट आहे एका अशा जोडप्याची ज्यांनी आपल्या मातीत काहीतरी नवीन घडवण्यासाठी मुंबईहुन गावाकडे स्थलांतर केले. शहरातली lifestyle सोडून गावातील पारंपारिक जीवन, महाराष्ट्रीयन पाककृती, इथली समृद्ध संस्कृती, स्थानिक कला यांना जगासमोर वेगळ्या पद्धतीने मांडणे या उद्देशाने सुरू केलेलं एक आगळं वेगळं KZread channel... @RedSoilStories म्हणजेच लाल मातीतल्या गोष्टी.... शाश्वत जीवनाच्या शोधात एक कलात्मक रित्या केलेला प्रवास; शहरी जीवनाच्या गर्दीपासून दूर. आधुनिकीकरणाच्या मागे लागलेल्या पिढीला पुन्हा ग्रामीण भागातील शाश्‍वत जगण्‍याचा मार्ग दाखवण्‍याचे, इथल्या culinary art ला asthetically सुंदर दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न...
कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्य, इथल्या नद्या, डोंगर , दऱ्या, धबधबे, इथली माती, त्यात उगणारी पिके हे सगळेच एक कथा सांगतात... आणि ह्याच कथा आपल्यासाठी घेऊन हे जोडपं दर आठवड्याला भेटायला येत...
"Red Soil Stories" हे फक्त एक you tube channel नसुन ग्रामीण जीवन आणि हे न अनुभवता येणाऱ्या शहरातल्या तमाम लोकांसाठी बनवलेला साकव आहे... मी सुद्धा शिरिष आणि पूजा ला भेट देऊन त्यांच्या ह्या आगळ्या वेगळ्या venture बद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय. आणि विशेष म्हणजे त्यांच्या सोबत Red Soil Stories channel साठी एक व्हिडिओ सुध्दा शूट केलाय... जो तुम्ही त्यांच्या चॅनेल वर पाहू शकता... Red Soil Stories channel ला भेट देऊन नक्की तुमचा अनुभव कळवा🙏❤️
/ redsoilstories
redsoilstories?...
Instagram👆🏼
profile.php?...
Facebook
Email id - mail.redsoilstories@gmail.com

Пікірлер: 783

  • @savitakubal3732
    @savitakubal3732 Жыл бұрын

    खूप आवडलं मी पण जन्मापासून 25 वर्ष अगदी सुखासमाधानाने मुंबईत राहिली आहे पण 31 वर्षांपूर्वी लग्न होऊन गावात,सिंधुदुर्ग मध्ये आली,अगदी पहिल्यांदा शेणात हात घालून जमीन सारवली,विहिरी चं पाणी काढल,मातीच्या घरात राहिली, पूर्णपणे ह्या जीवनात समरस झाली,पण वाईट वाटतं की इकडे त्याच कोणाला काही पडलं नाही,30 वर्षात खूप बदललं सगळं,सगळ्यांना स्लॅब ची,सिमेंट ची घरं पाहिजेत,प्रत्येक घरात अगदी tv, फ्रीज पासून , मॉडर्न kitchen पर्यंत सगळ्या सुविधा हव्यात,आणि आहेत मी अजूनही ह्या सगळ्या पासून लांब राहिले,म्हणून मला गावढंळ समजतात गावातली माणसं, आपलं असलेलं 50% मातीचं घर वाचवायचा प्रयत्न आहे ,no support

  • @ManoharMorajkar

    @ManoharMorajkar

    2 ай бұрын

    खरे आहे, स्थानिक पातळीवर पाठिंबा मिळत नाही.

  • @HimmatBhoir

    @HimmatBhoir

    18 күн бұрын

    {मातीचं घर वाचवायचा प्रयत्न आहे} .... Matichya gharacha video asel tar link share kara. Baghayla avdel mala

  • @bharatpagire2117
    @bharatpagire2117 Жыл бұрын

    🌻कोकणा सारखे सूख कुठेच नाही,,,,! असे सर्वच म्हणतात...! 🌻मग कोकणात लोकं थांबायला का मागत नाहीत? 🌻 कोकणी माणूस खूप मेहनती आहे...! 🌻 मग तीच मेहनत तो गावी का करत नाही...? 🌻 शहरात जाऊन मेहनत करून काहीच साध्य झाले नाही की मग गावी जातो... तेव्हा ताकत व वय संपून गेलेले असते... 🌻 मुंबईची आयुषयभराची कमाई म्हणजे ४ भिंतीची खोली... या पेक्षा काही नाही.. पण त्या खोलीत फक्त रात्री ९ ते सकाळी ६ एवढा वेळच आपण राहतो.. बाकी वेळ आपला ट्रेन व ऑफिस यामधेच जातो ... 🌻 गावी राहण्यासाठी पुढची पिढी कदापी तयार होणार नाही ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे कारण.. त्यांना गावी राहण्यासाठी काहीच आपण करून ठेवलेले नाही 🌻 कोकणातली मुख्य समस्या.. १) पाणी, (उन्हाळी शेतीसाठी पाणी नाही) २) पाऊस खुप आहे पण ते पाणी सगळे समुद्रात वाहून जात असल्याने त्याचा काहीच उपयोग होत नाही... ज्या दिवशी ते पाणी आपण साठऊन उन्हाळी शेतीसाठी ठेऊ त्या दिवशी कोकण खरे सुखी होईल... ३) त्या पाण्यावर पैसा येईल अशी शेती करावी पारंपरिक शेती नको तर त्यातून आपल्याला लाखो रुपयांची रक्कम हातात येईल अशी शेती करावी... आणि हे शक्य आहे.. फक्त पाणी पाहिजे व योग्य नियोजन... 🌻 एकदा सर्वांनी अवश्य विचार करून बघावा वेळ अजून ही निघून गेलेली नाही.. काही लिखाणात चूक असल्यास क्षमा असावी..💚💚

  • @amitkharat07

    @amitkharat07

    Жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @rupalikadam3551

    @rupalikadam3551

    Жыл бұрын

    तुमचा शब्द न शब्द खरा आहे 👍👍

  • @Maheshshetye02

    @Maheshshetye02

    Жыл бұрын

    खूप सुंदर बोललात. अगदी खरे आहे.

  • @sushamaporwar6674

    @sushamaporwar6674

    Жыл бұрын

    अभ्यासपूर्ण विवेचन आहे 👍

  • @rahulmalekar252

    @rahulmalekar252

    Жыл бұрын

    ❤️

  • @pravinbhosale2807
    @pravinbhosale2807 Жыл бұрын

    खरंच ग्रेट ..... तुम्ही तिघेही आदर्शवत आहात ..... आणि ही बेटी जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्सची विद्यार्थिनी आहे हे खरंच वेगळेपण आहे ...... तुम्ही सर्व एकत्र आलात तर आपला निसर्ग पुन्हा पूर्वीसारखा मोहराने बहरून जाईल ......

  • @matoshrialloyspvtltd6023

    @matoshrialloyspvtltd6023

    Жыл бұрын

    खूप छान काम करताय आपल्यासाठी व आपल्या माती साठी ग्रेट सर्वांना खूप खूप शुभेच्छा असेच निरंतर प्रगती करत रहा आपला गाव आपला तालुका जिल्हा राज्य देश खूप खूप शुभेच्छा

  • @LotusArtnDesign

    @LotusArtnDesign

    Жыл бұрын

    आर्टिस्ट आहे म्हणूनच एवढे क्रिएटिव्ह व्हिडिओज आहेत 👌🏻👌🏻👌🏻शुभेच्छा!

  • @priyaulhassalvi2140

    @priyaulhassalvi2140

    Жыл бұрын

    Villege name please

  • @chanchalsherekar3708

    @chanchalsherekar3708

    Жыл бұрын

    @@matoshrialloyspvtltd6023 j

  • @chanchalsherekar3708

    @chanchalsherekar3708

    Жыл бұрын

    @@matoshrialloyspvtltd6023 ppl

  • @umanatu2825
    @umanatu2825 Жыл бұрын

    धन्यवाद प्रसाद 🙏 शहरी जीवन सोडून तरुण वयातच ग्रामीण जीवनाला आपलंसं करुन हे शिवधनुष्य सक्षमपणे पेलु इच्छिणारी पूजा खरंच दूर्मिळ. God bless you dear Pooja!!

  • @rajanlad6476
    @rajanlad6476 Жыл бұрын

    लाल मातीतील गोष्ट....वां, मी प्रथमच म्हणजे रानमाणूस नंतर प्रथमच कोकणांतील युट्यूब चॅनलचं अगदी मनापासून समर्थन करतोय, रानमाणूस आणि रेड साॅईल स्टोरी या दोन्हीं चॅनल्सला अगदी मनापासून शुभेच्छा.

  • @dnyandagawas3678
    @dnyandagawas36782 ай бұрын

    तुमचे Red soil stories channel मी बघते,ते खुपच inspiring आहे .मी आणि माझे पती आम्ही पण कोकणात 2000 सालापासून राहतो.आम्ही मुंबई त 20 वर्षे नोकरी केली.तरीपण कोकणात आल्यावर मनःशांती मिळाली.

  • @miparab
    @miparab Жыл бұрын

    प्रसाद कोकण सन्मान तुला भेटावा अशी मना पासून इच्छा होती.... असो तुझं कोकणा प्रती प्रेम हाच कोकण सन्मान....

  • @sudhirgawade6196
    @sudhirgawade6196 Жыл бұрын

    मीत्रा तुझ नाव प्रसाद आहे हा प्रसाद तू सगळ्यांना देवाचा प्रसाद समजून वाटून देवा सर्वानाच सुखी ठेव अस तू तुझ्या कृतीतून तू लोकांपर्यंत पोहचवत आहे खुपच सुंदर 🙏👌✌️👍

  • @sairmaharashtrachi
    @sairmaharashtrachi Жыл бұрын

    आपल्या मातीशी नाते जोडणाऱ्या माणसांना प्रकाश झोतात आणण्याचे खुप छान काम करत आहेस तू भावा त्यासाठी तुझे मनपुर्वक आभार🙏🙏

  • @vinayakmone3790
    @vinayakmone3790Ай бұрын

    खरच निसर्ग भरभरून देतो घेणाऱ्यान कस घ्याव याच उत्तम उदाहरण आहे रेड सॉईल स्टोरी गावाला येऊन राहण हा त्यांनी घेतलेला निर्णय त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 Жыл бұрын

    प्रसाद तुझं अभिनंदन की तुझ्या माध्यमातून आम्हाला या उभयतां चे नविन व्हिडिओ बघायला मिळाले जे कोकणात येवुन आपल्या मातीतील जीवन शैली अनुभवत आहेत.. खरोखर तुम्ही आदर्श ठेवला आहे आपल्या कोकणातल्या पिढी समोर.. जीवन जगणे ही एक कला आहे.. आणि ते कसे जगावे हे ज्यांनी त्यांनी ठरवावे... भौतिक सुखाच्या पाठी आपण धावुन आपण आपल्या आयुष्यातले मोलाचे क्षण च विसरून जातो, अनुभवत नाहि... छान तुमच्या या नवीन वाटचाली साठी आमच्या कडून तुम्हाला शुभेच्छा..

  • @satishbelekar4991
    @satishbelekar4991 Жыл бұрын

    प्रसाद तू खूपच सुसंस्कृत सुंदर आणि प्रेमळ माणूस आहेस, कोकण विषयी असणारी तळमळ आणि मातीशी असलेली नाळ ह्याचा एक संगम आहेस तू , proud of you brother 🙏❤️,

  • @user-it1lo5of8o
    @user-it1lo5of8o Жыл бұрын

    Thanks prasad tuze kokanavarche prem pahun abhiman vatat0

  • @vandanasutavane5736
    @vandanasutavane573610 ай бұрын

    तुम्हा दोघांचे खूप कौतुक व अभिनंदन

  • @shwetathakur4652
    @shwetathakur465220 күн бұрын

    खुप छान आहे कल्पना तुमच्या भविष्यातील सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे हिच सदिच्छा

  • @pravinmayekar6169
    @pravinmayekar6169Ай бұрын

    अगदी खरं आहे... आज खरोखर आम्ही विचार करतो आहे गावी जाऊन settle ह्यायचं.... Thanks to प्रसाद आणि ह्या couple..

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar222411 ай бұрын

    खूपच छान,तुमचे विचार ऐकून खूप खूप आनंद वाटला,ऐव्हढी शिक्षण घेतलेली मुलगी सर्व सोडून गावात येते ही खूप कौतुकाची बाब आहे,तुमचे इतरही व्हिडिओ मी पाहिले आहेत, तुम्ही जेवण खूप छान करता, तुम्ही या चालू केलेल्या उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा,keep it up

  • @madhukarmithbavkar1546
    @madhukarmithbavkar1546 Жыл бұрын

    छान. देव आपणास सदैव सुखी ठेवो , अशी प्रार्थना करतो धन्यवाद.

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 Жыл бұрын

    वा.फारच छान वेगळेपण जपणारा व्हिडिओ.तुझं तसंच या कपलचं खुप/ खुप कौतुक.अशा लोकांना खुप प्रसिध्दी मिळाली पाहिजे.यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.बाळांनो खुप छान काम करताय.तुमचं अभिनंदन.तुमच्याकडे भेट द्यायची झाली,तर कसं यायचं? कळेल कां?

  • @sudhakarwate7294

    @sudhakarwate7294

    Жыл бұрын

    Excellent unique turn in life by enjoying kokan stay instead of routine boring life hearty congrats to their wo rk,,Sudhakar Wate,Architect

  • @cricketworld4894
    @cricketworld4894 Жыл бұрын

    अभिमान आहे यांचा।कोंकणाला आशा लोकांची गरज आहे।

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Жыл бұрын

    प्रसाद मस्तच आपल्याला जे आवडतं ते मनापासून केलं की त्यात आनंद मिळतो हे या जोडप्याने दाखवून दिल तू त्यांना हायलाईट केलंस त्याबद्दल तुझे आभार धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @madhu_soso
    @madhu_soso Жыл бұрын

    There story is very inspiring. खूप शहरी माणसांची स्वप्ने अशी असतात, पण ती खरे होण्यासाठी शहर सोडण्याची हिम्मत नसते. तुम्हाला hats off.... आणि, त्या सगळ्याला adapt करणे हे absolutely commendable आहे

  • @madhurimhatre1023
    @madhurimhatre1023Ай бұрын

    ताई मला तुमचा चैनल बघायला खूप आवडतं आणि सतत मी तुमच्या रेसिपीज बघत असते पण मी स्मार्ट टीव्ही वरती बघत असते ते मला लाईक करायला येत नाही तुमचं चैनल बघितले की मी कोकणातच आहे असे मला वाटते खूप आवड आहे माझा स्वतःचा आयुर्वेदिक मेडिकल आहे मी अशी सगळीकडे फिरत असते औषध गोळा करण्यासाठी जुन्या सगळ्या आठवणी जाग्या होतात त्याबद्दल धन्यवाद

  • @nehabagwe6887
    @nehabagwe6887 Жыл бұрын

    अगदी खर बोललात तुम्ही,तुमचे व्हिडिओ बघून खरंच गावी असल्याचा अनुभव,आनंद मिळतो

  • @SudhirRasal-qo5hq
    @SudhirRasal-qo5hq Жыл бұрын

    कोकण आपले स्वर्ग आहे जगाचा पाठीवर

  • @mahendramane299
    @mahendramane29911 ай бұрын

    खुप छान असा उपक्रम आहे. मी दुबई मधुन तुमचा प्रोग्राम पाहतो आहे. मला तुमचा अभिमान आहे. असेच व्हिडिओ अपलोड करा. धन्यवाद.

  • @sanjayghone6624
    @sanjayghone6624 Жыл бұрын

    खरोखर आपण दोघंही उच्च शिक्षित असून कोकणात जाऊन लोकांन पुढे आदर्श आहात. आपले कौतुक करावे तेवढे कमी आहे. आपण करत असलेल्या उदयोगास आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा. 💐👍

  • @geetasakpal3910
    @geetasakpal3910 Жыл бұрын

    प्रसाद ह्या red soil stories साठी मी प्रतिक्रिया तर दिल्याचं आहेत परंतु तुझं सुद्धा कोकणी रानमाणूस ह्या चॅनल वर तुझं कोकणाविषयीचं प्रेम आणि त्याविषयी अतिशय प्रगल्भ ज्ञान, जाण आणि माहिती असणारा प्रसाद गावडे बारसु बद्दल बोलताना ऐकून मी थक्कच आणि कोकण प्रेम पाहून भावूकही झाले. तुझ्याही येणाऱ्या प्रत्येक एपिसोडसाठी आणि कामासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @nandanasalvi
    @nandanasalvi Жыл бұрын

    खुप खुप छान! हे असे contents आहेत सगळ्या पुरस्कारांच्या लायकीचे! तू आमच्या साठी, भविष्य पिढीसाठी जे काही करत आहेस, त्यासाठी तुला आजन्म पुरस्कार दिले, तरी हे ऋण उतरू शकणार नाही आम्ही🙏

  • @kishoreesaitawadekar1132
    @kishoreesaitawadekar1132 Жыл бұрын

    तुम्ही खूप ग्रेट आहात कारण तुम्ही जो गावी राहण्याचा विचार केलात तो खूप सुंदर आहे, तुम्ही हया मुंबईच्या धावापलीतुन बाहेर पडू न एक छान आयुष्य जगत आहात आणि असच प्रत्येक कोंकणी माणसाने आपल्या मातिला धरूंन राहिल पाहिजे तरच आपल्या येनार्या पीढ़ीला आपल्या मातीची ओलख राहिल आणि आपल्या मातीची आवाड ही होई, आणि त्याना आपल्या पणजी आजी लोक कस जगत होते त्यांच्या कालात हे जवलून बघाता येईल

  • @jyotsnadhuri6754
    @jyotsnadhuri6754 Жыл бұрын

    मला तुमचा हा निर्णय आवडला आणि छानच जीवनशैली दाखवतात येणाऱ्या काळाला तुमचा सारख्याची आवश्यकता आहे

  • @priyakadam
    @priyakadam Жыл бұрын

    खूप अभिमान वाटतो आहे तुम्हा दोघांचे, मलाही असेच जगायला आवडेल. All the very best to your work

  • @tausifpathan2957
    @tausifpathan2957 Жыл бұрын

    आपण सर्वांचे आभार ... निसर्ग जतन ठेवण्यासाठी तुमची धडपड दिसून येते . इतिहास लक्षात ठेवेन. 🇮🇳🙏

  • @malatighorpade2939
    @malatighorpade2939 Жыл бұрын

    पूजा आणि शिरिष , तुमचं खरंच कौतुक वाटतं...!! तुमच्या भावी आयुष्याच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा..!!!

  • @jyotizore4350
    @jyotizore4350 Жыл бұрын

    तुम्ही ,खरं आयुष्य जगताय👌👌तुमच्या निर्णयाचा हेवा वाटला, प्रेरणा मिळाली,😊😊

  • @shailaapte6136
    @shailaapte6136 Жыл бұрын

    तरीच म्हटलं... हे ज्या पद्धतीने बनवलंय👌👍.रानमाणूस लाल पण सलाम...दुसर्याच्या चांगल्या कामाची दाद देणं याला मोठं मन लागतं

  • @user-le6ct5zu3v
    @user-le6ct5zu3v Жыл бұрын

    आज समाज्याला तुम्हच्या सारख्या माणसांचा आदर्श 🙏

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743Ай бұрын

    प्रसाद दादासाहेब तर खूपच लाडका आहे.कोकणाचा जीव की प्राण आहेस. कोकणाबद्दल तुला खूपच आपुलकी आहे हे तुझ्या विचारातून समजतेय. मी दापोलीतील कोकणाचीच एक कन्या आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि तुम्ही तिघेही कोकणातील संस्कृती जपत आहेत याचा खूप आनंद झालाय. पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छापत्र...!! असेच तुमच्याकडून सुंदर प्रेरणादायक कार्य घडत राहुदे .....!!

  • @sforbhosale
    @sforbhosale Жыл бұрын

    खूप खूप छान आहे मी गावला गेलं नैसर्गिक वातावरणात जे सामाधन मिळेल तेवढे कोठे नाही आपण नैसर्गिक साधनसंपत्ती जवळ येत आयुष्यात कोठे धावपळ नाही आयुष्य एकदम समाधान मिळतं निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासारखं सुख कुठे आहे का . मुंबईमध्ये रंगबिरंगी आयुष्य आहे. त्यामध्ये पैसा पैसा फक्त दिसतो दिसतच नाही त्या पैशाच्या पाठीमागे पळता पळता आयुष्य निघून जातात काही मिळत नाही सुखाची जेव्हा आनंद मिळतो तेव्हा खूप खूप आजार लागलेले असतात. जेव्हा आजार होतात तेव्हा कळतं की आपण काय मिळालं पैसा करून आणि काय सुख मिळालं

  • @raghunathsabale4932
    @raghunathsabale4932 Жыл бұрын

    तुमचे आपल्या गावाविषयी विचार फार great आहेत best luck ताई for your redsoilstories ☺️

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 Жыл бұрын

    👌👌खरच खुप प्रभावित केलेत. वाईटातून चांगलेच होते याचे ऊदाहरण तुम्ही दाखवून देत आहात. कोरोना कालखंड वाईटच होता पण त्यातुन तुम्हास नवीन दिशा मिळाली. आणि हेही खरे आहे कि गावात रहायची आवड असायला हवी ओढुन ताणुन नाईलाज म्हणून गावी आलो यात अर्थ नाही. आवड तुम्हास इथवर घेऊन आली. यामुळे इतर सुशिक्षित तरुणांना inspiration नक्कीच मिळेल तेही अक्षरशा गाव घर विसरलेत त्याना ओढ लागेल. आणि तसे झाले तर कोकण परत सुजलाम सुफलाम होईल. तुमच्या प्रयत्नास भरघोस यश लाभो अशा शुभेच्छा व आशीर्वाद. 👌👍🙏🙏

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 Жыл бұрын

    आम्हाला अभिमान आहे तुमच्या सारख्यान मुळे आम्हा शहरवासीयांना आमच्या लाल मातीची ओढ लागत आहे...... शुभेच्छा

  • @sundertambe269
    @sundertambe269 Жыл бұрын

    आज समाज्याला तुम्हच्या सारख्या माणसांचा आदर्श

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha Жыл бұрын

    खुप छान काम करंत आहेत हे दोघे. त्यांना आणि त्यांच्या कार्याला खुप खुप शुभेच्छा

  • @varshakarekarsadgurudhanya3193
    @varshakarekarsadgurudhanya3193 Жыл бұрын

    Sundar jivanshaylee.🙏💐👌

  • @nehadesai5525
    @nehadesai5525 Жыл бұрын

    खुप छान... कोकण सुंदर आहेच... कोकणच्या मातीशी नाते जोडायचे आणि व्यवसाय कोकणात करायचा ह्या decision बद्दल तुमचे कौतुक .... तुम्हां दोघांना खुप खुप आशीर्वाद आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा.... शहरातले धकाधकीचे जीवन सोडून कोकणा सारख्या ठिकाणी व्यवसाय करण्याची इच्छा चांगली आहे... हल्ली कोकण पण खूप सुधारत आहे आणि शहराकडचे बरेच लोक ग्रामीण जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी कोकणात येतातच... याचा फायदा तुम्ही तुमच्या व्यवसायात करून घ्यालच....

  • @shradhagaonkar2474
    @shradhagaonkar2474 Жыл бұрын

    निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणाऱ्याआणि मातीशी नाळ जोडून अपार कष्ट करणाऱ्याया जोडप्यासाठीतुझा मोलाचं मार्गदर्शन देऊनआणि कौतुक करूनतुझ्या मनाचा खूप मोठेपणा दिसून आलानवीन लोकांच्या प्रवासासाठीतुझा मदतीचा हात नेहमीच पुढे असतोत्याबद्दल धन्यवादअसेच चांगले कार्य तुझ्या हस्ते नेहमी घडत राहोआणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @vikasdabir
    @vikasdabir Жыл бұрын

    ह्यांना जीवन कळले हो.आजच्या तरुणाईला तुम्ही जोडप्याने आदर्शवत जीवन दाखवित आहात.ब्रह्मचैतन्य सदिच्छा.

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 Жыл бұрын

    Thank you so much Prasad , कारण या जोडप्याबद्दल फार उत्सुकता होती. खूप चांगलं काम करत आहेत. त्यांना खूप शुभेच्छा त्यांच्या भावी वाटचालीसाठी.तुला सुद्धा खूप शुभेच्छा. तु़झे ब्लॉग पण मला आवडतात.

  • @sharwarimhatre4389
    @sharwarimhatre438911 ай бұрын

    हॅलो प्रसाद, पूजा आणि शिरीष, तुमचा हा व्हिडीओ खूपच आवडला, प्रसाद तुझे तर सगळेच व्हिडिओ आम्ही बघतो, ज्या तळमळतेने तू कोकणासाठी काम करतोयस, कोकणातलं निसर्ग सौंदर्य लोकांसमोर आणतोयस, तिथल्या दुर्मिळ वनस्पती जपण्याचा प्रयत्न करतोयस ते खरंच कौतुकास्पद आहे, आणि आता पूजा आणि शिरीष तुझ्या जोडीला आहेत, खरंच खूप छान वाटतंय, पूजा तुझं स्वयंपाकघर तर इतकं सुंदर आहे, साधं स्वच्छ आणि नीटनेटकं, ती सारवलेली चूल, मातीची भांडी, फडताळातल्या बरण्या अगदी बघत राहावंसं वाटतं, राजा आणि मोगलीही आम्हाला खूप आवडतात, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा

  • @kalpanashilwane668
    @kalpanashilwane66811 ай бұрын

    खरच तुम्ही दोघं दोघं मला खूप आवडते दोघं छान आहेत एवढं खेडेगावात राहता तुम्ही

  • @sandhyashah9374
    @sandhyashah9374 Жыл бұрын

    All the best wishes to both of you !! God bless you ! Proud of you as I am also from Konkan 👍keep it up

  • @user-tn2qy2mw4f
    @user-tn2qy2mw4f11 ай бұрын

    Khup sunder video v khup changle vichar

  • @vijaysunkale9921
    @vijaysunkale9921 Жыл бұрын

    तुम्हा उभयतांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

  • @rajraje58
    @rajraje58 Жыл бұрын

    आदर्श जीवन अशी माणसं देखील असतात आज आपल्या चॅनल वर बघितले फारच आनंद झाला हा आदर्श जोडप्याला मनापासून धन्यवाद आज मुली मध्ये शहरी आकर्षण आहे लोक गावाकडून शहरात जात आहेत पण ताई तुमच्या आदर्श घेतील अशी आशा करतो आपल्याला मनापासून शुभेच्छा पुढील वाटचालीस

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 Жыл бұрын

    तुम्ही खरं आणि सुखी आयुष्य जगत आहात.. खुप खुप.शुभेच्छा

  • @priyankakadam83
    @priyankakadam83 Жыл бұрын

    Shirish ani pooja very proud of u both....khup inspire aahat tumhi new generations la...long way to go....keep doing more videos....my best wishes are always with u...

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Жыл бұрын

    नमस्कार पुजा,शिशिर.....कोकण संस्कृती, परंपरा, चालीरीती, व्रतवैकल्ये उपवास तापास,रूढी....सुंदर आविष्कारच पहायला मिळतो या वैभवशाली, गौरवशाली, निसर्ग संपन्न कोकणचा.....कोकणाचे मनुष्याला भरभरून दिले आहे पण काळाच्या ओघात , पैशाच्या लोभापायी कोकणी माणूस हे वैभव हळुहळू सिमेंटच्या जंगलात रूपांतरीत करणार्यांना पाठीशी घालताना दिसत आहे....हा स्वर्ग जगाच्या पाठीवर कुठेही नाही म्हणून कोकणी बांधवांनो आपल्या जमिनी कोणालाही विकु नका हो.......

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 Жыл бұрын

    अतिशय सुंदर व्हिडीओ छान माहिती दिली आहे सर्वांचे मनापासून स्वागत आहे 👌👌

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 Жыл бұрын

    प्रथम मी निर्णयाचे स्वागत करते अभिनंदन अतिशय उत्तम निर्णय घेतला आहे खरच अभिमान वाटतो तुमचा सगळ्याच कोकणवासीयांना अभिमान वाटला पाहिजे तुमच्या सारखा अजून काही नी मनावर घेतले तर आपल्या कोकणाचे सोन होईल समृद्ध होइल कोकण आपले तुमच्या या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद 👍👍👍

  • @udayadhatrao6304
    @udayadhatrao6304 Жыл бұрын

    खरच तुम्ही खुप असामान्य अहात उत्तरोत्तर उत्तरोत्तर आपली तिघांची प्रगती होवो ही देवाकडे प्रार्थना

  • @rajag3049
    @rajag3049 Жыл бұрын

    All of you doing best for yourself, for community and for environment. You are best couple and our best wishes to you. Happiness in life is more important than carries of life.

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 Жыл бұрын

    खरच ऊतम आज जे जिवन व्यतीत करत आहेत ते ऊतम मार्गदर्शन आहे तरून पिढीतील लोकांवर मनापासून प्रेम करून विडीओ बनवावेत

  • @vivekthakare6734
    @vivekthakare6734 Жыл бұрын

    खुप छान वीडियो आणि स्टोरी 💐💐👌👍👍

  • @jyotitergaonkar6224
    @jyotitergaonkar6224 Жыл бұрын

    खूप छान उपक्रम राबवत आहात पूजा ताई आणि दादा..तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Жыл бұрын

    फारच छान , शहरातून कोकणात येणं हे फार मोठं धारिष्ट्य आहे ,ते तुम्ही दाखवलं या बद्दल तुमचं अभिनंदन, असेच छान छान व्हिडिओ पाठवत जा ,आम्हाला कोकणात येणं शक्य नसलं तरी आम्ही आमच्या कोकणातील घरी जाऊन आल्या सारखं वाटतं .आपले पुन्हा एकदा आभार, आणि उभयतांना शुभेछ्या!

  • @sforbhosale
    @sforbhosale Жыл бұрын

    खूप सुंदर व्हिडिओ ग्राफी केली आहे तुला घेऊन जाईल तो खूप छान जेवण बनवात असं आयुष्य जागचा प्रयत्न केला पाहिजे नैसर्गिक वातावरणात माती भाडीत जेवण बनवायला वेगवेगळ्या टेस्ट येत असेल माझ्या आयुष्यात असं जगणार मी एकटाच आयुष्य

  • @kasturimogarkar4721
    @kasturimogarkar4721 Жыл бұрын

    खरच खूप छान आहे Red Soil Stories. मनापासून शुभेच्छा धन्यवाद या चेनलसाठी. जी सामग्री English मध्ये दाखवता तसंच मराठी ही मध्ये दाखवा ना Please.🙏👍👍

  • @rajanbhope7178
    @rajanbhope717810 ай бұрын

    Enjoy of Life, Good luck

  • @ashasaarang6720
    @ashasaarang6720 Жыл бұрын

    नक्की.फुल सपोर्ट.काय सुंदर जागा आहे..वा!

  • @sonalijadhav7184
    @sonalijadhav7184 Жыл бұрын

    प्रसाद दा तुझ्यामुळे आणि अश्या लोकांमुळे कोकणातलं असल्याचे अभिमान आहे.great

  • @sneharasal8429
    @sneharasal8429 Жыл бұрын

    खूपच छान....तुमचे vedios मलाही माझ्या आजोळ ची आठवण येते...आई ची आठवण येते ती अशीच साधी सुधी होती ...असेच मालवणी पदार्थ आम्हाला बनवून खायला घालायची..त्यामुळे मी खूपच आभारी आहे....मला vedio पाहताना खूप आनंद होतो....गावचा निसर्ग,त्याचे photography अवर्णनीय....शहरी ,sushikshit तुमचा साधेपणा भावतो. त्यामुळे आपलेपणा जाणवतो....कोकणातील काही youtuber आहेत पण कधी कधी ते फकत इरसाल भाषा दाखवतात पण तुमच्या vediomadhe मालवणी भाषा गोड pure वाटते.....खूप खूप छान...आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @urmiladixit17
    @urmiladixit17 Жыл бұрын

    त्रिवार अभिनंदन तुम्हां उभयतांचे आणि अनेक उत्तम आशिर्वाद, तुम्ही माझ्या मुलांच्याच वयाचे आहात, म्हणून कुठे एकेरी शब्द आला तर समजून घ्या, की मी आईच्या बोलाने बोलतेय म्ह्णून, मी आता जस्ट सबस्क्रिब केलाय तुमचा चॅनल, खूपच भावला आणि जास्त शेयर पण केलाय ,ग्रे8 आहेत दोघंही, स्वामी सदैव पाठीशी आहेतच तुमच्या, दोघांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 Жыл бұрын

    पूजा जी आणि त्यांचे पती दोघा उभयतांना खुप खुप शुभेच्छा.जे.जे.स्कुल ऑफ आर्ट ची विद्यार्थिनी असुन तीचे पती ग्राज्युएट आहेत तरी देखील मुंबई सोडून गावी राहतात.ग्रेट जोडी.तरुण आहेत.खुप खुप शुभेच्छा.

  • @kunalpawar3921
    @kunalpawar3921 Жыл бұрын

    @ Red Soil Stories - You guys are awesome !! Keep up the good work !! And Prasad u too doing great work.

  • @kumudinikhatavkar1793
    @kumudinikhatavkar1793 Жыл бұрын

    Hi. Prasad me aani family tuze khup fan aahot. Khup aavdtat tuze vlogs. Aavdnyapeksha te informative jast astat mhanun aavdtat. Tuzyamule aamhi kantarapahila Red soil stories baghtoy. Tu young generation sathi inspiration aahes. Khup chan vatat tuze vlog baghtana.

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 Жыл бұрын

    अप्रतिम,खुप खुप शुभेच्छा तुम्हाला

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Жыл бұрын

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि कोटी मोलाचा संदेश मिळाला

  • @suhasgosavi1310
    @suhasgosavi1310 Жыл бұрын

    खूप छान........ तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा........

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 Жыл бұрын

    आवड असली कि सवड मिळते. 👍साधी राहणी खूप सुंदर उच्चं विचार सरणी 👌👆 येवा कोकण आपलाचं आसा 🌴 तो आपणांकंच वाचवचो आसा 🌴🥭

  • @kmolyaamol
    @kmolyaamol Жыл бұрын

    Sarvat mahatvach tujha abhinandan Mitra. Ek swataha travel blogger asun suddha dusrya konacha channel la prasiddhi milavi mhanun agraha karna hi kharrach kautukaspad baab ahe. Tu atishay pramaniknpane he kelas tyabaddal hatss off. Mulat tujha blog baghna mha je netrasukh tar miltach pan tujha sunder bass aslela awaj aikun to blog eka veglyach unchiwar jato.

  • @sushilapadigela-wn1dz
    @sushilapadigela-wn1dz Жыл бұрын

    Super mem God bless both of you

  • @nikiteshraut8861
    @nikiteshraut8861 Жыл бұрын

    @ Red Soil Stories ,,.ते जे काही करतायेत प्रसाद...ते अगदी तुझ्यासारखच निरपेक्ष भावने ने तुमचा त्यांच्या सोबतचा पहिला vlog पाहिला तेव्हाच सबस्क्राइब केलं चॕनेल ....खरंच खूप अप्रतिम ....तुझे मनःपूर्वक धन्यवाद ....

  • @sanjivanisawant1307
    @sanjivanisawant1307 Жыл бұрын

    Great. God bless you. Ajun pragati hou de tumchi. Khup mothe vha.

  • @kokanvaibhav2264
    @kokanvaibhav2264 Жыл бұрын

    अरे,काय हे ,यू आर ग्रेट कोकणी माणूस, आम्हां शहरातील लोकांना सुध्दा असेच काही तरी करावे असे वाटत असते,मात्र अनेक अडचणी असतात.मात्र तुम्ही खूप धाडस केलं, तुमचं खरंच अभिनंदन ! आम्ही तू तुमच्यात आम्ही पाहतो .

  • @nehamohite8549
    @nehamohite8549 Жыл бұрын

    Great 👍watching beautiful nature with Pooja & Shirish 😘😘

  • @sachinthakur-ex8yi
    @sachinthakur-ex8yi Жыл бұрын

    प्रसाद तुला follow करता करता मलापण अचानक pop up आला होता पण त्यांच्या लोकल receipe bhagat गेलो आणि फार पूर्वी पासून follow करत आहे प्रसाद u all r doing great job

  • @amolghadigaonkar8656
    @amolghadigaonkar8656 Жыл бұрын

    तुझ्या ह्या व्हिडीओ चा रेड सॉईल स्टोरीज चॅनेल ला खूप चांगला फायदा झाला .. Subscriber 15k varun 52k झाले . असेच एकमेकाला पुढे आणा ...all the best

  • @preetigaonkar9320
    @preetigaonkar9320 Жыл бұрын

    खूपच छान रानमाणूस आणि Red soil stories both channels too good. really nostalgic ओढ लाल मातीची

  • @ShreyJoil
    @ShreyJoil Жыл бұрын

    होय हे खर आहे! कोकणाच्या प्रेमात पडण्या सारख सुंदर आहे कोकण .

  • @MsBlueshark
    @MsBlueshark Жыл бұрын

    Kiti sunder!!!

  • @vijaymore5807
    @vijaymore5807 Жыл бұрын

    Prasad and Pooja u are great to join nativ to develop nature and residing in nature and to show khadya snnskriti to all people of Maharashtra. Kokan mazhya sudhha avdicha asa . So pl arrange place for stay with u God bless u Prasad ana Pooja Have a nice day for ever

  • @sachinkhambe113
    @sachinkhambe113 Жыл бұрын

    खरचं great channel red soil

  • @jayprakashnarkar9012
    @jayprakashnarkar9012 Жыл бұрын

    छान.सुंदर.साधं.निसर्गाचा सुंगध.आणि रंग आहे.

  • @motivationshortsvalavj792
    @motivationshortsvalavj792 Жыл бұрын

    Khup Chan video ahe

  • @sonu9359
    @sonu9359 Жыл бұрын

    हेवा वाटतोय तुमचा खरच खूपच सुंदर 👌🏻 खरच गाव खूप सुंदर आहे हे तुम्ही कळून दिल 😘🙏👏🏻💐

  • @sainitawde8659
    @sainitawde8659 Жыл бұрын

    Hat's off ❤️.... तुम्ही मराठी आहात हे पाहुन खूप आनंद झाला प्रथम दर्शनी मला साऊथ इंडियन आहात असे वाटले .. great 👍👍

  • @prachigurav3553
    @prachigurav3553 Жыл бұрын

    Amazing concept , you both are living the best chapters of your lives ...👍

  • @sugandhabait3751
    @sugandhabait375111 ай бұрын

    लाल माती..... कोकण ऐकुन मन प्रसन्न झाले अशाच छान छान गोष्टी सांगा

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Жыл бұрын

    Wa ..Prasad...🙏.Tuje video he konkanche tourism promote karnyasathi asatatch...pan tuzya vediotun Konkanashi asalela apulkipana..prem..kalji...Konkan vachvnyasathiche efforts disun yetat..🙏..Love you Prasad..Amka tuzo abhiman asa..🙏🙏

Келесі