विखे - शहा भेटीचं राम शिंदेंना टेन्शन ! पत्ता कट संपला वट ?

निवडणूक कोणतीही असो, नगर जिल्ह्यात ती हलक्यात घेतली जात नाही. अगदी ग्रामपंचायतीपासून थेट लोकसभेपर्यंत येथे गल्ली-गल्लीत चुरस पहायला मिळते. सहकाराचा जिल्हा असल्याने येथे व्यक्तीकेंद्रीत राजकारण चालतं. साखर सम्राटांकडे जसं आदबीनं पाहिलं जातं तसं समाजकारण्यांनाही डोक्यावर घेतलं जातं. त्यामुळेच आगामी विधानसभेचे पडघम आत्तापासूनच वाजायला लागलेत. विखे पिता-पुत्रांनी काल थेट दिल्लीत जात गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. आता या भेटीचे निरनिराळे तर्क काढले जात असले तरी, भाजपने जिल्ह्यातील विधानसभेची मोठी जबाबदारी विखे कुटुंबाकडे दिलीय हे मात्र नक्की... आता विधानसभेचे बाराही आमदार निवडून आणायचे, तर विखेंना नव्या सोंगट्या फिरवाव्या लागणार आहेत. विखे जेव्हा-जेव्हा अमित शहांना भेटतात तेव्हा-तेव्हा राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकतात. हाच इतिहास पाहता विखेंच्या कालच्या भेटीत बरंच धक्कातंत्र दिसतंय. मंत्री अमित शहा जसे मुरब्बी राजकारणी आहेत तसेच विखेही आहेत. त्यामुळे कालच्या भेटीने काय होऊ शकतं, हा अहमदनगर लाईव्ह २४ चा अंदाज...

Пікірлер: 13

  • @user-zl6to4hf2w
    @user-zl6to4hf2w9 күн бұрын

    रोहित दादांनी अडीच वर्षे सत्ता असताना कामाचा डोंगर उभा केला जामखेड मध्ये एसटी स्टँड सरकारी पाच मजली दवाखाना सुंदर रस्ते 4000 विहिरी दोन मजली पंचायत समिती इमारत त्यामुळे जनतेला फक्त रोहितदादा निवडून देणार

  • @shivajiberad1162
    @shivajiberad116223 сағат бұрын

    विखे आता कोणत्या मतदार संघात पडतात हे ठरवायला गेलेत

  • @user-dq7vj3qm6y
    @user-dq7vj3qm6y7 күн бұрын

    अफवा पसरवून नका

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk9 күн бұрын

    Rohit pawar will win in vidhansabha 24election

  • @tatyashinde5879
    @tatyashinde58799 күн бұрын

    Only rohitdada

  • @DnyaneshyerMane
    @DnyaneshyerMane9 күн бұрын

    राम शिदे

  • @vishalahire2251
    @vishalahire22518 күн бұрын

    12मतीचं पार्सल परत पाठवलं पाहिजे only Ram Shinde

  • @ravirajdande3586
    @ravirajdande35867 күн бұрын

    Only ram shinde saheb💪💪💪

Келесі