वैजापूर विधानसभेच्या रिंगणात कोण कुठल्या Downloads लढणार ? Ramesh Bornare Vs Dinesh Pardeshi war

मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या वैजापूर तालुक्यात यावेळेला विधानसभा लढतित वेगळेच चिञ ऊभे राहणार आहे.
तीस वर्षात दिर्घकाळ हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात राहीला आहे.
यातच मा आमदार आर एम वाणी यांच्या काळातील त्यांचा दबदबा आजही जनमाणसात कायम आहे.
त्यानंतर राष्ट्रवादीकडून भाऊसाहेब तात्यांनी हा मतदारसंघ जनतेची सहानुभुती मिळवत आपल्या ताब्यात घेतला .पुढे चालून आर एम वाणी यांच्या तालमीत तयार झालेले प्रा रमेश बोरनारे यांनी या मतदार संघावर अधिराज्य गाजवायचे ठरविले आणि सेनेन वाणी यांच्या शब्दाला मानत बोरनारे यांना ऊमेदवारी दिली. त्यावेळी सुद्धा सेना भाजप महायुति असल्यामुळे जनतेने ताकदीने बोरनारे यांना आमदार केल.
माञ यावेळचे चिञ काय असेल हे जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये
नमस्कार मी प्रविण पाटील आणि तुम्ही पहाताय बिंदास बातम्यांच निर्भीड व्यासपीठ MH बिंदास...
भाजप शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवारांची ,यांची महायुती असल्याने राज्यात अनेक ठीकाणी इच्छूकांच्या राजकीय करीअर वर पाणी फेरल्या गेलय. माञ लोकसभा निकालानंतर ही युती आता टिकणार नाही अशा चर्चा होण्यास सुरूवात झाली आहे.यातच वैजापूर हा मतदार संघ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार असलेल्या प्रा बोरनारे यांच्या ताब्यात असल्याने पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले आहे. यांमुळे महायुतीत भाजप पक्षाकडून विधानसभा लढविण्यास इच्छूक असलेले डॉ दिनेशभाऊ परदेशि व एकनाथ जाधव, राष्ट्रवादीचे पंकज ठोंबरे यांच्या नजरा ऊमेदवारीवर खिळून आहे. पण युती राहीली तर माञ प्रा बोरनारे यांच तिकीट फीक्स राहून पुढे या तीन बड्या नेत्यांवर बोरनारेंचा प्रचार करण्याची वेळ येऊ नये यासाठी तीघांनी ही आपपल्या पातळीवर विधानसभेच्या रणधूमाळीत अबकी बार हम आमदार म्हणत वैयक्तिक कार्यकर्ते बांधणी सुरू केली आहे. यातच वैजापूर शहराच्या विकासपर्वावर ज्यांच नांव कोरल गेलय ...ते डॉ दिनेशभाऊ परदेशि हे पुन्हा विधानसभा लढवावी म्हणून कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच देव पाण्यात ठेवायला सुरूवात केलीय.
त्यामुळे यावेळी डॉ दिनेशभाऊ परदेशि आणि प्रा रमेश बोरनारे यांच्यात धुमशान आणि धुवांधार लढत होणार असल्याचे बोलले जातेय. आमदार नसतानाही डॉ दिनेश परदेशि यांनी तालुक्यातील बहुसंख्य गावात विकासकांमांसाठी निधी पोहचवला आहे तर कार्यकर्त्यांची मोट ते आज ही सांभाळून आहेत . यापलिकडे प्रा बोरनारे हे विद्यमान आमदार असल्याने त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना कामे देऊन विवीध भागात वेगवेगळी विकासकामे दिली आहे. त्यामुळे परदेशि आणि बोरनारे या दोघांची ही जय म्हणनारांची संख्या तालुक्यात दोन्ही बाजुंनी सेम सेम म्हणजेच सारखीच आहे.
पण डॉ दिनेशभाऊ परदेशि यांच्या नावाला चिन्ह कोणते आणि पक्ष कोणता हे येणारा काळच सांगेन
डॉ दिनेशभाऊ परदेशि आणि एकनाथ जाधव म्हणजे एका म्यानातील दोन तलवारी
त्यामुळे भाजपने जर स्वबळावर निवडणूक लढविण्याचे ठरविल तर वैजापूर विधानसभेचा ऊमेदवार
नेमका कोण ? हा यक्षप्रश्न ठरेल.
आणि दोघांतून एकास कुनाला तरी माघार घेत अपक्ष लढावे लागेल हे माञ निश्चितच !
याशिवाय मातोश्रीवर एक बडा नेता ऊद्धव ठाकरेंच्या हस्ते पक्षप्रवेश करणार अशा खुमासदार चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहेत. यातच सर्वांच्या भुवया डॉ दिनेशभाऊ परदेशि यांच्याकडे जरी ऊंचावलेल्या असल्या तरी कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी कुठलाच निर्णय घेणार नाही आणि पक्षप्रवेशाच अजून ठरल नाही असे त्यांनी सांगितलय.
यातच अगोदरच मातोश्रीकडे नजर लावून प्रवेश करून बसलेले मा आमदार भाऊसाहेब तात्या यांनाही एवड्यांदा आमदार व्हायची इच्छा आहे.त्यामुळे तात्या आणि भाऊ जर शिवसेना ऊबाठात एकञ आले तर पुन्हा एका म्यानात दोन तलवारीचा इतिहास पुनरावलोकीत होईल.
याशिवाय जुन्या शिवसेनेत वाणीपुञ तालुकाप्रमुख सचिन वाणी ,संजय निकम ,अविनाश गलांडे यांच्यासारखे असंख्य नेतेमंडळी पुन्हा रींगणात येण्यासाठी प्रयत्न करू शकतात.
राष्ट्रवादी कडून पंकज ठोंबरेही ऊत्साहीत असल्याने हमरा टाइम कब आएगा अस म्हणत ते सुद्धा ऊमेदवारी मागू शकतात.
त्यामुळे प्रा रमेश बोरनारे हे जरी आज विद्यमान आमदार असले तरी ऊद्या च्या विधानसभा लढतित त्यांना विधानसभा पदावरून पायऊतार करण्यासाठी मिञपक्षातील लोक बंड करू शकतात हे माञ तितकच खरं ..कदाचित त्यामुळेच बोरनारे यांनी आपली स्वतंञ फळी कामाला लावलीय कारण मिञपक्षाने जर दगा केला तर आपल्या खुर्चीला कुणीच धक्का लावू शकणार नाही अशी व्यवस्था त्यांनी अगोदरच करून ठेवल्याचे चिञ दिसतयं
विधानसभा कोण कोण लढतय त्यांची संभाव्य पक्ष आणि नांवे यावर नजर टाकूयात.
#mhbindass #rameshbornare #drDineshPardeshi #BhaudahebTatya #vidhansabha #vaiajpur

Пікірлер: 8

  • @NarayanKhillari1
    @NarayanKhillari127 күн бұрын

    दिनेश भाऊ परदेशी आम दार बोरणारे सर यांच्यात सरळ लढत होईल

  • @annasahebdharble3496
    @annasahebdharble349620 күн бұрын

    एकच भाऊ दिनेश भाऊ

  • @akashhume2873
    @akashhume287321 күн бұрын

    "मशाल...🚩🔥✌️

  • @nitinsuryawansh9861
    @nitinsuryawansh986127 күн бұрын

    Mashal

  • @goorakhkale3345
    @goorakhkale334524 күн бұрын

    सर

  • @user-uy9hh3sl3q
    @user-uy9hh3sl3q23 күн бұрын

    Dinesh bhau pardeshi 👑

  • @sukhdevkale1271
    @sukhdevkale127125 күн бұрын

    मशाल🔥

  • @poojakayastha7616
    @poojakayastha761626 күн бұрын

    Only eknath jadhav

Келесі