No video

विधानसभेच्या या ७ जागांवरून शिंदे विरूद्ध भाजप कसं फाटतंय ? | Eknath Shinde | Vishaych Bhari

विधानसभेच्या या ७ जागांवरून शिंदे विरूद्ध भाजप कसं फाटतंय ? | Eknath Shinde | Vishaych Bhari
लोकसभा निवडणुकीनंतर या निवडणुकीत झालेल्या राजकीय फायद्या तोट्याचा हिशोब सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. त्यात राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीला या निवडणुकीत जबरदस्त नुकसानीचा सामना करावा लागला आहे. एकीकडे केंद्रातील मोदी सरकार कसंबसं वाचलं असलं तरी या सरकारचं भवितव्य मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीची दाणादाण उडालेली असल्याने चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमधील घटक पक्षांसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. पण पराभवाची योग्य समीक्षा करून समोर आलेल्या त्रुटी दूर करून विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्याऐवजी महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप आणि विधानसभेच्या जागांवरून वादावादीला तोंड फुटलेलंय. त्यात महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी विधानसभा निवडणुकीत ८० ते १०० पर्यंत जागांची मागणी केल्याने युतीमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाचं टेन्शन वाढलंय. नुकत्याच झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात रामदास कदम यांनी शिवसेनेसाठी १०० जागांची मागणी केली होती. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीचं आव्हान परतवण्यासाठी युती करून लढणं भाजपासाठी अपरिहार्य झालेलं आहे. पण विधानसभेच्या अनेक जागांवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये रस्खीखेच होत असल्याने महायुतीमध्ये वाद होणं अपरिहार्य आहे. विधानसभेच्या जागावाटपामध्ये भाजपा आणि शिंदे गटामध्ये काही जागांवरून वाद होणं निश्चित आहे. दोन्ही पक्षांमध्ये वादाचं केंद्र ठरतील, अशा काही वादग्रस्त जागांचा आढावा आपण या व्हिडीओतून घेणार आहोत....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#eknathshinde
#marathinews
#विषयचभारी

Пікірлер: 4

  • @chandrakantpund9700
    @chandrakantpund9700Ай бұрын

    Chandrakant patil yancha photo chukicha ahe

  • @Ashutoshtilak

    @Ashutoshtilak

    Ай бұрын

    त्यांना कुणाचे फोटो नीट टाकता येत नाहित

  • @sagarahire4200
    @sagarahire4200Ай бұрын

    Bjp ला पाडणार.. जय शिवराय

Келесі