श्री क्षेत्र ॐमच्छिंद्रनाथ संजीवन समाधी मंदिर मायंबा

मायंबा मच्छिंद्रनाथ महाराज संजीवन समाधी
मच्छिंद्रनाथ महाराज उत्सव
नाथसंप्रदायाचे पहिले गुरू
#श्री क्षेत्र ॐमच्छिंद्रनाथ संजीवन समाधी मंदिर मायंबा #मच्छिंद्रनाथगड संपूर्ण माहिती
#Machindranathgad
नवनाथांपैकी आद्यगुरु बडेबाबा श्री मच्छिंद्रनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर मायंबा (सावरगाव, ता. आष्टी, जि. बीड) या ठिकाणी आहे. नाथांचा जन्मोत्सव ऋषी पंचमीला साजरा केला जातो. नाथ संप्रदायी मच्छिंद्रनाथांना महाविष्णूचा अवतार मानतात. तरी सांप्रदायिक नाव मच्छिंद्र किंवा मीन हे प्रसिद्ध आहे. श्री मच्छिंद्रनाथांच्या जयंतीनिमित्त श्री मच्छिंद्रनाथ गड म्हणजेच सावरगांव मायंबा येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. श्रीक्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथ गडावर नाथांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. त्यामुळे येथील वातावरणात एक वेगळेच चैतन्य अनुभवता येते. याशिवाय हे स्थान गर्भगिरीच्या माथ्यावर असल्यामुळे सभोवतालचा निसर्ग मंदिराच्या सुंदरतेत आणखीनच भर टाकून नाथांच्या चरणी आपली सेवाच रुजू करीत आहे असे वाटते. भक्तांच्या उत्साहाच्या आणि भावभक्तिच्या सुगंधाने परिसर अगदी उल्हासित होतो. गडावर श्री मच्छिंद्रनाथांची चैतन्य समाधी आहे. तेथून जवळच पाठीमागे धोंडाई देवीचे मंदिर आहे.
. धोंडाई देवीच्या डोंगराखाली एक तलाव आहे. त्याला 'देव तळे' (तलाव) म्हणतात. गडावर जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत आणि आता तर मढी ते मायंबा नवीन रस्ता झालेला आहे. मायंबा (सावरगाव) येथे मच्छिंद्रनाथांच्या समाधी दर्शनासाठी दर गुरुवारी, अमावस्या पौर्णिमेनंतर राज्यातून व राज्याबाहेरून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तर मच्छिंद्रनाथ जयंती उत्सवानिमित्त व पाडव्याच्या यात्रेनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येतात. गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री मच्छिंद्रनाथांची समाधी उघडली जाते. आदल्या दिवशी गंगेहून कावडीने आणलेल्या पाण्याने समाधीला अंघोळ घातली जाते. त्यानंतर चंदनाचा लेप लावला जातो. या चंदनाचा सुगंध परिसरात दरवळतो. समाधी उघडी असल्याने पाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री महिलांना दर्शनासाठी बंदी असते. पुरुषांनाही स्नान करुनच समाधी दर्शन दिले जाते. कावडीने पाणी घातल्यानंतर रात्री बारा वाजेनंतर समाधी दर्शनासाठी खुली केली जाते. त्यानंतर पाडव्याच्या पहाटे पाच वाजता आरतीनंतर समाधी पुन्हा झाकली जाते. ती पुन्हा पुढच्या पाडव्याला उघडली जाते.
तर मित्रांनो विडिओ पहा. आनंद घ्या. विडिओला लाईक करा. चॅनलला सबक्राईब जरूर करा. धन्यवाद
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा व आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ साठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
Hope you will like the video. Do share and subscribe the channel
My channel👇
RANJANA'S campaign vlogs
‪@ranjanas07vlogs‬

Пікірлер: 3

  • @dattuugale7455
    @dattuugale74558 ай бұрын

    G00d night chotu. Nice video.❤🥰💝🥳🤗👍

  • @rajendrakumarnaikwadi7268
    @rajendrakumarnaikwadi72688 ай бұрын

    अलखनिरंजन आदेश 🙏🙏👏👏

  • @jayeshnaikwadi1574
    @jayeshnaikwadi15748 ай бұрын

    Alakhniranjan 🙏🙏👏

Келесі