दरवर्षी वाढणारे स्वयंभू शिवलिंग

दरवर्षी वाढणारे स्वयंभू शिवलिंग
#वृध्देश्वर महादेव ता.पाथर्डी जि.अहमदनगर
#33कोटीदेवतायेथेभोजनासआलेहोते
#म्हतारबा महादेव, आदिनाथ महादेव घाटशिरस पाथर्डी तालुका
श्री वृद्धेश्वर मंदिराचा
इतिहास
अहमदनगर जिल्हातील पाथर्डी तालुक्यातील गर्भागिरीच्या कुशीत असलेले हे स्वयंभु श्री वृद्धेश्वर मंदिर. या स्थानाचे महात्म्य असे कि हे जागृत शिवलिंग असुन ते दरवर्षी महाशिवरात्रीला गव्हाच्या आकाराएवढे वाढते म्हणजेच वृध्दींगत होते म्हणुन "वृध्देश्वर" नावाने ओळखले जाते.
वृद्धेश्वराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी मच्छींद्रनाथांच्या समाधानासाठी गुरू आज्ञा म्हणून येथे खूप मोठा भंडारा झाला होता. त्या निमित्ताने मच्छींद्रनाथ व गोरक्षनाथांनी नाथ पंथाचा मेळा जमवला आणि गहिनीनाथांना उपदेश केला. गोरक्षनाथांनी गहिनीनाथास अनुग्रह दिला, त्यावेळी त्रिभुवनातील सर्व देवता ऋषीमुनी, संन्यासी सर्व एकत्र जमले. या ठिकाणी गर्भगिरी पर्वत आहे.
गोरक्षनाथांनी सुर्वण सिद्ध मंत्राचा वापर करत संपूर्ण गर्भगिरी डोंगर सोन्याचा केला. गुरू मच्छीद्रनाथांनी सुवर्ण डोंगर कुबेराला अर्पण करत वृद्धेश्वर येथे ३३ कोटी देव साधू, संत-महंत ऋषीमुनी आदी सर्व देवदिकांना महाप्रसाद देण्याची इच्छा प्रकट केली. त्यानुसार महाप्रसाद भंडारा होऊन महादेव-पार्वतीने ब्राम्हण वेषात प्रकट होऊन पंगती वाढल्या. देवराईपर्यंत देवाच्या रांगा जेवायला बसल्या म्हणून तेथील स्थानाला देवराई हे नाव पडले देवाच्या पंगतीत महादेव वृद्ध म्हताऱ्याचे रूप घेऊन जेवत होते. सर्व देवानी विनंती केली की, हे महादेवा आता हे रूप घेतले, आम्हाला याच रुपात दर्शन दिले; तुम्ही याच रूपात विश्व कल्याणासाठी येथेच राहावे, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. नाथांनी व सर्व देवांनी विंनती केल्यावर महादेव वृद्ध रूपात राहीले म्हणून त्यांना म्हतारदेव (वृद्धेश्वर) म्हणू लागले. वृद्धेश्वरचे शिवलिंग स्वयंभू असून शिवलिंगाजवळ १२ ज्योतिर्लिंग गुप्त रूपात असल्याचे म्हटले जाते.
महाशिवरात्रीला हे शिवलिंग वृद्धींगत (वाढते) होते, असे म्हटले जाते. राजा रामदेवराय यांनी अकराव्या शतकात मंदिराला मोठी पितळी घंटा अर्पण केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
संत ज्ञानेश्वर, साईबाबा यासारख्या महान संतांनी येथे भेट दिल्याचा उल्लेख विविध धर्मग्रंथात आहे. 'साद देती हिमशिखरे' या हिमालयातील प्रवास वर्णनावर अधारित ग्रंथामध्ये या स्थानाचे महात्म्य दिलेले आहे.
तर मित्रांनो विडिओ पहा. आनंद घ्या. विडिओला लाईक करा. चॅनलला सबक्राईब जरूर करा. धन्यवाद
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा व आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ साठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
Hope you will like the video. Do share and subscribe the channel
My channel👇
RANJANA'S campaign vlogs
@ranjanasvlogs

Пікірлер: 3

  • @rajendrakumarnaikwadi7268
    @rajendrakumarnaikwadi72686 ай бұрын

    🙏🙏👍👌

  • @jayeshnaikwadi1574
    @jayeshnaikwadi15748 ай бұрын

    Nice video😊😊

  • @dattuugale7455
    @dattuugale74558 ай бұрын

    Good afternoon chotu. Nice video.🥰💝🥳🤗👍

Келесі