दर वर्षी वाढणारे स्वयंभू शिवलिंग वृद्धेश्वर मंदिर घाटशिरस ता पाथर्डी जि अहमदनगर

Vrudheshwar Temple Ahmednagar वृद्धेश्वर मंदिर घाटशिरस ता पाथर्डी जि अहमदनगर ‎@Gauravshali Etihas दर वर्षी वाढणारे स्वयंभू शिवलिंग वृद्धेश्वर मंदिर घाटशिरस ता पाथर्डी जि अहमदनगर @Gauravshali Etihas
वृद्धेश्वर महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे.
अहमदनगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला जातो. वृद्धेश्वर हे गाव ब्रह्मपुराणामध्ये उल्लेख असलेल्या वृद्धा नदीकाठी वसले आहे. अत्यंत रम्य ठिकाण असलेल्या या गावी एक पुरातन शिव मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे गर्भगिरी डोंगर आहे. पार्वतीने इथे तपश्चर्या केल्यावर सर्व देवांना भोजन दिले. त्या प्रसंगी शंकर भगवान एका म्हातार्‍याचे रूप घेऊन आले आणि त्यांनी सर्व देवतांना भोजन वाढले. त्यामुळे इथला देव हा म्हातारदेव अशी सुंदर आख्यायिका ग्रामस्थ सांगतात. तसेच नवनाथ भक्तिसारामध्ये म्हातारदेव असा उल्लेख आहे
वृद्धेश्वर शब्दाची उत्पत्ती सांगताना इथे असे सांगतात की दर वर्षी महाशिवरात्रीला इथली शिविपिंडी गव्हाच्या एका दाण्याएवढी वृद्धिंगत होते म्हणून हा वृद्धेश्वर. शिविपडीवर एक खळगा असून त्यात कायम पाणी असते. काशीची गंगा इथे प्रकट झाली आहे अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे. मंदिराचा पेशवेकाळात जीर्णोद्धार झाला असावा. पश्चिमाभिमुख असलेल्या मंदिराला सूर्यप्रकाश थेट पिंडीवर पाडण्यासाठी तीन मोठे झरोके ठेवलेले आहेत. अतिशय रम्य परिसरामध्ये एक बारव, ज्ञानेश्वर मंदिर, कपिलमुनी मंदिर अशी छोटी देवळे इथे आहेत. मंदिरात एक पंचधातूची घंटा आहे. मूळच्या घंटेची ही प्रतिकृती असून मूळ घंटेवरील शिलालेख या घंटेवरही कोरला आहे. त्यानुसार ही घंटा बाराव्या शतकातील कोणा प्राणदेवराजाने मंदिराला दान दिल्याचा उल्लेख दिसतो. श्री शंकरमहाराज या सत्पुरुषांचे वास्तव्य या ठिकाणी झाले होते असे ग्रामस्थ सांगतात.
Google Map: g.co/kgs/Mkh1tV
Please Subscribe and follow for more
KZread:
Instagram:
gauravshalietih...
Facebook:
groups/24061...

Пікірлер: 19

  • @gahininathbade1965
    @gahininathbade19653 ай бұрын

    खूप खूप छान माहिती दिली आहे

  • @shetkarimitra123
    @shetkarimitra123 Жыл бұрын

    Nice

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 Жыл бұрын

    हर हर महादेव 🙏🙏🙏

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 Жыл бұрын

    जय श्री ॐ बाबा केदारनाथ 🙏🙏🙏

  • @ajaypawar4391
    @ajaypawar43912 жыл бұрын

    Khup chan Satish. Next time will go

  • @prashantwalke4520
    @prashantwalke45202 жыл бұрын

    Website :shrivridheshwar.in/ श्री वृद्धेश्वर परिसर हा एक दिवसाच्या सहलीसाठी एक उत्तम परिसर आहे. सुंदर असा अत्यंत निरर्गरम्य गर्भगिरी डोंगर आहे. पाणायचे झरे, शांत असा मंदिर परिसर ध्यान, योग साठी भाविकांचे आकर्षण आहे. मंदिर परिसर हा मनाला ऊर्जा देणारा आहे. हे ठिकाण “आयुर्वेदिक” वनस्पतींसाठी देखील प्रसिद्ध आहे.​ श्रद्धा वृद्धेश्वर शब्दाची उत्पत्ती सांगताना इथे असे सांगतात की दर वर्षी महाशिवरात्रीला इथली शिविपिंडी गव्हाच्या एका दाण्याएवढी वृद्धिंगत होते म्हणुन “वृध्देश्वर” नावाने ओळखले जाते. शिविपडीवर एक खळगा असून त्यात कायम पाणी असते. काशीची गंगा इथे प्रकट झाली आहे अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे उत्सव महाशिवरात्रीचे व सोमवार चे औचित्य साधून हजारो भाविक तालुक्यातील श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथील महादेवाच्या पिंडीच्या दर्शनाचा लाभ घेतात. अहमदनगर जिल्‍ह्‍यातील घाटशिरस येथील श्री क्षेत्र वृद्‍धेश्वर हे नाथ पंथाचे आद्‍य शक्तीपीठ आहे. हे स्थान अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात आहे कसे पोहोचायचे अहमदनगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला (घाटशिरस) जातो. घाटशिरस हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. हे अहमदनगर पासुन ४० कि.मी. तर पाथर्डीपासून २९ किमी अंतरावर आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे

  • @mayurijaybhaye5941
    @mayurijaybhaye59412 жыл бұрын

    Khup chan👍

  • @govindkshirsagar1005
    @govindkshirsagar100528 күн бұрын

    भंडारा कधी असतो

  • @hassainarkc1068
    @hassainarkc10682 жыл бұрын

    Very Fantastic construction

  • @darshan_palve_0775
    @darshan_palve_07752 жыл бұрын

    👌🙏

  • @sambhajijaybhaye8531
    @sambhajijaybhaye85312 жыл бұрын

    मंदिराचं बांधकाम छान आहे...

  • @rohangadekar7013
    @rohangadekar70132 жыл бұрын

    छान माहिती!!

  • @ambadaskhade6165
    @ambadaskhade61652 жыл бұрын

    खुप छान माहिती.धन्यवाद 🙏

  • @-guru-g9152
    @-guru-g91522 жыл бұрын

    💐💐💐💐💐🙏👌💐👍

  • @sohamshinde7978
    @sohamshinde79782 жыл бұрын

    Ekhada mandir kiti juna ahe he kasa kalel aplyala Ani marathi mandir shaili kashi olkhavi he pan sangave Dhanyavad

  • @GauravshaliEtihas

    @GauravshaliEtihas

    2 жыл бұрын

    जेव्हा मंदिर बांधलं जातं तेव्हा त्याला कुणितरी दाता म्हणजे दानकरता पण असतो तो राजाही असू शकतो किंवा एखादा सरदार,पाटील असा कुणीही. आता त्या राज्याने त्याच्या कारकिर्दीत ज्या काही वास्तू बांधलेल्या असतात त्याचा काळ तिथून ग्राह्य धरला जातो. शैली म्हंटल तर बांधकाम करताना वापरात असलेली पध्दत किंवा डिझाईन ही वेगवेगळ्या राज्याची, काळाची,प्रदेशाची वेगळी ओळख असते

  • @sohamshinde7978

    @sohamshinde7978

    2 жыл бұрын

    @@GauravshaliEtihas dhanyawad

  • @AdinathPalve-sz3xf
    @AdinathPalve-sz3xf2 ай бұрын

    फारछानफोटोवमाहीतीदेतात

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 Жыл бұрын

    हर हर महादेव 🙏🙏🙏

Келесі