Kavita 03 - Har Ek Mitti Apni Hai - Shreyasee Vaze-Mantrawadi

१४ सप्टेंबरला हिंदी भाषा दिवस आपण साजरा करतो. २०२० साली (माझा मुलगा) आदिनाथला शाळेत हिंदी भाषा दिनानिमित्त एक स्पर्धा होती. ज्यामध्ये त्यांना पर्यावरण, मानवता, स्वातंत्र्य असे काही विषय दिले होते. यापैकी एका विषयावर आधारित हिंदी कविता सादर करायची होती. शोधाशोध करूनही हवी तशी कविता मिळाली नाही आणि विषय तर मनात घोळत होते. यातून या तीनही विषयांचा समावेश असलेली कविता माझ्याकडूनच लिहिली गेली ज्यात आदिनाथला पहिलं बक्षीस मिळालं. या बक्षिसाचा तर आनंद होताच पण त्याहीपेक्षा जास्त एक छान कविता हातून लिहिली गेली याचा आनंद होता.
सागर पटवर्धन या आमच्या कल्पक एडिटर मित्राने अतिशय समर्पक आणि सुंदर video या कवितेसाठी केला आहे. अनिकेत दामले या तरुण संगीत संयोजकाने कवितेला साजेसं पार्श्वसंगीत दिलं आहे.
पुढच्या २ दिवसात आपण आपला स्वातंत्र्यदिन साजरा करू, या पार्श्वभूमीवर मला मात्र नेहमीच ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान आठवत राहतं. त्याचाही काही अंश माझ्या या कवितेत माझ्याही नकळत उतरला असावा. ही कविता केवळ आपल्या भारतीयांचं मनोगत असू नये तर संपूर्ण विश्वाचं हे मनोगत व्हावं हीच माझी सदिच्छा आहे...
या एकजुटीचं स्वप्न मनात ठेवून ही कविता तुम्हा सगळ्यांसाठी...!!!
आमच्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!
जय हिंद...
#india #independenceday #humanity #स्वातंत्र्यदिन #15august #unity #unityindiversity #shreyasee

Пікірлер: 7

  • @vireshkambli6366
    @vireshkambli636611 ай бұрын

    सध्या साठी तर खूप छान कविता लिहिलीस तू तुझं अभिनंदन तुझ्या मुलाच अभिनंदन आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.

  • @sujitachandan9639
    @sujitachandan963911 ай бұрын

    श्रेयसी अतिशय सुंदर कविता आहे . तुझे खूप अभिनंदन आणि आदिनाथचेही खूप अभिनंदन...🌹🌹

  • @neetapendse7569
    @neetapendse756911 ай бұрын

    अप्रतिम लिखाण व सुंदर presentation

  • @vaishalichitale8728
    @vaishalichitale872811 ай бұрын

    खूप सुंदर विचार ❤

  • @ajitpendharkar5957
    @ajitpendharkar595711 ай бұрын

    very nice poem. Most relevant for Today's India.

  • @anjalimarathe6849
    @anjalimarathe684911 ай бұрын

    सुंदर ❤

  • @shrutipadhye4564
    @shrutipadhye456411 ай бұрын

    सुंदर

Келесі