कन्नड विधानसभेत तिरंगी | Sanjana jadhav, harshvardhan jadhav आणि udaysing rajput सामना रंगणार जोरात

कन्नड विधानसभा म्हटल की आक्रमक बाणा असलेल्या व्यक्तिमत्वाचे नांव समोर येते. हे नांव म्हणजे हर्षवर्धन जाधव सध्या हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणूक लढवलेली असताना त्यांना कसा प्रतिसाद जनतेने दिलाय हे जवळपास सर्वांनाच माहीतेय..
लोकसभा निडवडणूक संपलीय माञ आता सध्या जोरदार तयारी सुरू आहे ती म्हणजे विधानसभा निवडणूकीची. यातच या मतदारसंघातून इच्छूक कोण ? आणि पक्ष कुठला चिन्ह कुठले ? आणि समिकरण काय असेल हे जाणून घेऊया mh bindass च्या या स्पेशल रिपोर्टमध्ये...
नमस्कार मी प्रविण पाटील आणि तुम्ही पहाताय बिंदास बातम्यांच... निर्भीड व्यासपीठ MH Bindass
मागील विधानसभा निवडणूकीत हर्षवर्धन जाधव यांना अटितटीची फाइट देत या मतदारसंघातून ऊदयसिंग राजपूत हे शिवसेनेकडून निवडून आले होते.माञ आता हीच लढत तिरंगी होणार असल्याचे चिञ पहावयास मिळत आहे...
यात हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजनाताई जाधव यांची सध्या मतदारसंघात जोरदार हवा आहे. वडील रावसाहेब दानवे यांचा त्यांच्या पाठीशी वरदहस्त असल्याचे समजतय याशिवाय भाजपकडून त्यांना तिकीट दिल जाऊ शकते. अस झाल तर विद्यमान आमदार यांच्यासमोर त्या चांगल्या फाइट देऊ शकतात याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे हर्षवर्धन जाधव हे सुद्धा या निवडणुकीत माघार घेनार नाही त्यांचा सुद्धा एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यामुळे प्रामुख्याने सध्यातरी मिळालेल्या माहितीनुसार ही लढत तिरंगी होईल असच चिञ दिसतय....!
कुनाचीही सहानुभुती न घेता ही निवडणूक आपल्याला लढवायचीय असा चंग संजनाताई जाधव यांनी उराशी बाळगलाय त्यांच्या या लढतीसाठी मोठमोठ्या गावातून सरपंच ,सोसायटी चेअरमन ,ग्रा संदस्य ,जिल्हा परीषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य सुद्धा जोरदार पाठींबा दर्शवत तयारी करताना पहावयास मिळत आहे. काही महिन्यांपुर्वी झालेल्या त्यांच्या जन्मदिवसाच्या निमीत्ताने मतदारसंघातील विवीध गावात त्यांच औक्षण करत वाद्य गजरात त्याना जणु विधानसभेच्या तयारीकरीताच शुभेच्छा दिल्या गेल्याच चिञ पहावयास मिळत होते.
याशिवाय वडील रावसाहेब दानवेंचे वरदहस्त असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक, राजकीय आणि सामाजिक बळ त्यांना दिले जाऊ शकते.
यांमुळे समोर कुठला उमेदवार आहे हे डोक्यात न ठेवता ही निवडणूक त्या भाजपकडून किंवा अपक्षसुद्धा लढवू शकतात.
त्यांच्यासमोर आव्हाहन देऊन असनार आहेत शिवसेना ऊबाठा गटाचे आमदार उदयसिंग राजपूत ..आपल्या पक्षाच्या कठीण काळात सुद्धा त्यांनी पक्षाची साथ न सोडल्याने यावेळेला सहानुभुती आणि पक्षतिकीट मशाल चिन्हावर ते ही निवडणूक लढवू शकतात हे जवळपास निश्चित आहे..
मा आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मोठ्या धुमधडाक्यात बीआरएस या पक्षात प्रवेश केल्यानंतर बीआरएसकडून त्यांनी विधानसभा निवडणूकीचे संकेत दिले होते. केसीआर यांचा तेलंगाणा निवडणूकीत पराभव झाल्याने महाराष्ट्र काबीज करण्याचे स्वप्न भंगले..आणि बीआरएसने आपला गाशा गुंडाळत असंख्य बड्या नेत्यांना भुमीगत केले.त्यामुळे विधानसभा लढवायची असेल तर जाधव यांना पुन्हा अपक्ष निवडणूक लढवावी लागणार आहे.
एकंदरीत संजनाताई जाधव, हर्षवर्धन जाधव आणि उदयसिंग राजपूत या तिघांमध्ये जोरदार रस्सीखेच पहावसाय मिळणार आहे. परंतु आमदारपदाचा मानाचा मुकूट कुनाच्या शिरपेचात जाईल या व्हिडीओच्या कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा .
पुन्हा भेटूया नविन बिंदास घडामोडी सह बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर
#sanjanajadhav #harshvardhanjadhav #udaysingrajput #ravsahebdanve
#mhbindass
#kannadvidhansabha
#politics
#shuvsena
#brs

Пікірлер: 5

  • @rushipawar836
    @rushipawar83614 күн бұрын

    येवढ्या वेळेस हर्षवर्धन दादा ला चान्स देऊ

  • @user-vt2ig8vv7b
    @user-vt2ig8vv7b11 күн бұрын

    Only harshvardhan DADA jadhav

  • @keshavshirse3580
    @keshavshirse358025 күн бұрын

    नवरा बायको व मुलाला देखील उभे रहाएला सांगा सतरंज्य उचलनारे भरपूर आहेत येथे

  • @keshavshirse3580
    @keshavshirse358025 күн бұрын

    केतन काजे नितिन पाटिल संतोष कोल्हे हे देखिल रिंगनात येनारच aankhin मनोज पवार देखील ताल ठोकनार आहे

Келесі