जागतिक महिलादिन विशेष मुलाखत एक भाकर तीन चुली श्रीदेवा झिंजाड ​⁠

Ойын-сауық

✓✓ ग्रामीण स्त्रीच्या जगण्याचा आवाज बनून ग्रामीण सहित्यातील मैलाचा दगड ठरली आहे अशी लोकप्रिय कादंबरी म्हणजे
" एक भाकर तीन चुली " ✓✓
देवा झिंजाड ह्यांची
एक भाकर तीन चुली
प्रत्येकाला विचार करायला लावणारी प्रत्येक महिलेची गोष्ट आहे.
पुस्तक वाचायला घेतले अन् पारु या व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्यातील उलथापालथ म्हणा किंवा भयानक अनुभव हे अनुभव प्रत्येक स्त्रीला येतात त्याचे फक्त स्वरुप वेगळे असते.
स्रीला सोसाव्या लागणाऱ्या हालापेष्टा आणि
सामाजिक त्रास तो या कथेत मांडला आहे.
वाचताना कधी आपली आई तर कधी स्वतः आपण समोर येतो. आपल्या आईने ही हेच केले वेगळ्या स्वरूपात वेगळे कष्ट आज मी ही एक आई आहे आपल्या लेकरांसाठी त्यांच्या सुखासाठी होणारी घालमेल. पण यातील पारु चे सतत येणारे दुःख तरीही न डगमगता त्याला सामोरे जाणे काहीही झाले तर आपले चांगुलपण न सोडणे. परिस्थितीने कुंकू पुसले जाऊनही प्रामाणिक राहणे.
समाजाने जरी दुखावले पण रामाने दिलेली साथ आणि
विश्वास यामुळे ती पुढे ही संकटाना सामोरे जाऊ शकली.
पुस्तकातील भाषा पूर्णपणे आमच्या
आळेफाटा, जुन्नर, बेल्हे, अलकुटी, राजुरी भागातील ग्रामीण असल्याने एक वेगळी उंची तर गाठतेच पण ह्या कादंबरी विषयी एक आपुलकीही निर्माण होते.
बबूने आईला म्हटलेलं आयावडे ,
त्याची आवडती शेळी झिप्री,
मित्रांची नावे,
ग्रामीण शिव्या,
ग्रामीण लग्न
यांचे वर्णन
त्यातील जातीला धरून दिली जाणारी वागणूक याचे टिपण उत्कृष्ठ केले आहे.
आई ला दिलेली सुर्याची, चंद्राची
आणि
पिच क्युरेटर
या उपमा खूप छान वाटतात
*गरिबी हीच जगण्याची प्रेरणा झाली ती नसती तर समाज,भाऊबंद समजले नसते.
* स्वतः ला कामात जुंपले की आपले मन दुसरा कसलाच विचार करत नाही.
खुप कष्ट आणि परिस्थीतिला सामोरे गेल्याने बबू ही तसाच घडला कधी मानमरून तर कधी समजून उमजून तो ही सामोरे गेला समाजातील अनेक रूढी त्याला बदलू वाटत होत्या त्यासाठी शिक्षण हेच हत्यार आहे हे समजून खूप शिकायचं मोठं व्हायचं आणि परिस्थिती बदलायची. आई ची शिकवण संस्कार घेऊन आई पासून दूर राहून बबू आईच नाव मोठं करण्यासाठी आई पासून दूर झाला.
आई शिकलेली नव्हती पण संस्कारी होती बबू ला उत्तम संस्कार दिले की जे आयुष्यात त्याला मोठं होण्यास उपयोगी पडले.
एक भाकर तीन चुली ग्रामीण बाज आणि धगधगते सत्य आहे की जे प्रत्येक स्त्री चे दुःख आहे पण याला सामोरे जाण्याची शक्ती महिले कडेच आहे.
लेखक देवा झिंजाड यांनी सत्य मांडण्याचे फार मोठे धारिष्ठ दाखविले आहे.
प्रत्येकाने नक्की वाचावे असे हे पुस्तक आहे.
ह्यामुळे आत्मविश्वासाने आयुष्य जगण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल ह्याची 100% खात्री आहे...🙏
पुस्तकांसाठी , 9890697098
प्रा. दीपिका जंगम
7709225334🙏🫡
@profdipikajangam
#mahila
#devajhinjad
#ekbhakartinchuli
#womensday

Пікірлер: 31

  • @saheerpinjari415
    @saheerpinjari41515 күн бұрын

    आजच कादंबरी वाचून पूर्ण केली. खूप रडायला आल .खूप छान कादंबरी आहे.

  • @kavitapardeshi2745
    @kavitapardeshi27454 ай бұрын

    दीपिका खूप छान मुलाखत घेतली आहेस. देवा सर पुस्तकासाठी मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा . सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि मातृत्व अशा त्रिगुणात्मक शक्तीने परमेश्वराने स्त्री ची रचना केली आहे. पण तरीही विविध पातळीवर स्त्रिया कायमच संघर्षमय जीवन जगत आल्या आहेत. मला असे वाटते की, स्त्री -पुरुष भेद दूर करून एक व्यक्ती म्हणून स्त्रीच्या अंतरंगाला जाणून तिचा योग्य तो सन्मान केला पाहिजे. तिलाही आपल्या भावना व्यक्त करून मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे, ही मानसिकता आधी समाजामध्ये रुजायला पाहिजे🙏

  • @shivajikale4376
    @shivajikale43764 ай бұрын

    खूप छान मुलाखत घेतली, अभिनंदन, कादंबरी आर्धी वाचून झाली.पूर्ण वाचून होईल लवकरच.

  • @balajidhage3441
    @balajidhage34414 ай бұрын

    Very nice

  • @prayuktisonar4094
    @prayuktisonar40944 ай бұрын

    Khup Chan👌👍

  • @MayaPatil-ws8ue
    @MayaPatil-ws8ueАй бұрын

    खुप छान सर

  • @shubhadakulkarni1051
    @shubhadakulkarni10514 ай бұрын

    छान संदेश दिलाय.वाचत रहा आणि हरू नका धन्यवाद

  • @vishnuwagh7873
    @vishnuwagh78734 ай бұрын

    महिला दिनाला एक पुरुष लेखकांची मुलाकत घेतली जात हेच खरे यश आहे एक भाकर तीन चुली कादंबरीचे. अभिनंदन देवा सर. खूप छान मुलाकत घेतली. मॅडम तुमचे अभिनंदन.

  • @cmfsimran901
    @cmfsimran901Ай бұрын

    खूप सुंदर मुलाखत

  • @ProfDipikaJangam

    @ProfDipikaJangam

    Ай бұрын

    Thank you

  • @vidyanargundi8593
    @vidyanargundi85934 ай бұрын

    Khup chan..

  • @tanhajiborhade1955
    @tanhajiborhade19554 ай бұрын

    खूप छान..

  • @sudhakardarole2486
    @sudhakardarole24864 ай бұрын

    त्रिवार वंदन 🙏🙏🙏

  • @nayanrajmane
    @nayanrajmane4 ай бұрын

    अभिनंदन

  • @shwetajangam7970
    @shwetajangam79704 ай бұрын

    सन्माननीय देवा सर यांनचे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप मंगलमय अशा स्वामीमय शुभेच्छा 🙏🏻💐💐 दिपीका ताई तुझे पण खूप खूप अभिनंदन खूप छान मुलाखत घेतली महिला दिनानिमित्त जागतिक महिला दिनाच्या तुला आणि स्त्री शक्तीला हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @sachinnalawade3202
    @sachinnalawade32024 ай бұрын

    सर मी कादंबरी 80% पर्यंत वाचत पूर्ण झाले आहे लवकरच पूर्ण होईल पण मला तुमचं मो वहा आहे

  • @netrajangam3149
    @netrajangam31494 ай бұрын

    Women's day la ha interview is just a treat.. Awesome vdo aand book both.. i read Dipika's book review it was so amazing...

  • @sudhakardarole2486
    @sudhakardarole24864 ай бұрын

    प्रथम दर्शी मला असे वाटले एक भाकरचे तीन भाग ( तुकडे ) झाले. पण मुलाखत ऐकून विषय समजला

  • @ProfDipikaJangam

    @ProfDipikaJangam

    4 ай бұрын

    पुस्तक ही वाचा

  • @kishoripatil498
    @kishoripatil4984 ай бұрын

    खूपच छान

  • @alkasapakal1232
    @alkasapakal12324 ай бұрын

    खूप छान 🎉

  • @shailanimbalkar7393
    @shailanimbalkar73934 ай бұрын

    🙏🙏💐💐

  • @user-yj5to1bn8c
    @user-yj5to1bn8c4 ай бұрын

    खुपच छान 🎉🎉🎉

  • @artandcraft4415

    @artandcraft4415

    4 ай бұрын

    खूप छान🎉🎉🎉

  • @nileshnmahadik1089
    @nileshnmahadik10894 ай бұрын

    छान 🙏

  • @hemauke2216
    @hemauke22162 ай бұрын

    Mazi sapurn wachun zali aata 2 part chi pretiksha aahe

  • @ProfDipikaJangam

    @ProfDipikaJangam

    2 ай бұрын

    Wow

  • @UjwalaMore-ox7qt
    @UjwalaMore-ox7qt2 ай бұрын

    दादा मी अजूनही रडत आहे

  • @subhashjagdale471
    @subhashjagdale4714 ай бұрын

    Very nice

  • @dhanashreebangar4608
    @dhanashreebangar46084 ай бұрын

    खूप सुंदर मुलाखत

Келесі