उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा | भाग - १ | परिपूर्ण माहिती मराठीमध्ये

मुंबई ते तिलकवाडा, वासुदेव कुटीर आश्रम,संकल्प
उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा संपूर्ण..!! नर्मदे हर ऽऽ
भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना लोकमाता अर्थात देवता मानतात. नद्यांच्या दैवी प्रभावाची कल्पना-जाणीव आपल्या पूर्वसुरीना असल्यामुळे नद्यांबद्दल पूज्यभावना कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याची पुरातन परंपरा इथल्या भूमित चालत आलेली आहे. अर्थात हे सर्व व्यक्त करण्याच्या नानाविध प्रथा, पद्धती आणि रितीभाती आहेत. अशापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि पृथ्वीतलावरची एकमेवाद्वितीय परंपरा आहे. नर्मदा परिक्रमेची !
पण सर्वांनाच पूर्ण परिक्रमा शक्‍य होत नाही. त्यांच्यासाठी उत्तरवाहिनी परिक्रमा हा एक पर्याय आहे. मात्र तिलकवाडा ते रामपुरा परिसरातील ही परिक्रमा केवळ चैत्रातच असते. ही परिक्रमा गुजरात येथील “तिलकवाडा’ येथून सुरवात होते. तिलकवाडा ते रामपुरा या परिसरात फक्त चैत्र महिन्यात ही उत्तरवाहिनी परिक्रमा केली जाते. जो कुणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल, त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळेल, असे नर्मदा पुराणामध्ये व स्कंद पुराणामध्ये म्हटले आहे.
ही परिक्रमा तिलकवाडा येथून उत्तर तटावरून सुरू होते, उत्तर तट संपल्यावर नावेने समोरील तीरावर म्हणजे दक्षिण तट रामपुरा येथे यावे लागते. दक्षिणतट पूर्ण झाल्यावर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते. अशी ही साधारण 21 किलोमीटरची परिक्रमा आहे.
परिक्रमा मार्गात छोट्या गावातून जाताना काही मंदिरे, आश्रम लागतात. जागोजागी नर्मदे हर...नर्मदे हर... असे म्हणून स्वागत होते. गावातील काही मंडळी परिक्रमावासींसाठी थंड पाणी, सरबत, चहा, फळे किंवा छास अशी सेवा देतात. परिक्रमा मार्गातील उत्तरतट रस्ता म्हणजे गावातून जाणारा, तसेच किनाऱ्यावरून जाणारा आहे. काही ठिकाणी वाट बिकट आहे. पण कसलाही त्रास न होता आपण आरामात उतर तट पार आम्ही पार केला. या उलट दक्षिण तट मार्ग बहुतांश डांबरी सडक आहे.
नर्मदामैयाच्या तीरावरील राहणाऱ्या लोकांची मैयावर नितांत श्रद्धा आहे. अगदी नावाड्यापासून ते नर्मदामैयाच्या तीरावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची सर्वांची भावना हीच की, नर्मदामाई आमची जीवनदायिनी आहे. ज्याच्या घरी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत तोसुद्धा अगदी “नर्मदे हर बाबाजी चाय पिओ, भोजनप्रसादी पाओ’ असे आग्रहपूर्वक विनंती करतो. परिक्रमावासीबद्दलचा आदर पाहून आम्ही आश्‍चर्यचकित झालो . किनाऱ्यावरून सकाळी परिक्रमेला जाताना मंदिरात होणारा घंटानाद, जागोजागी आश्रमात होणारे स्वागत, छोट्या गावांतून जाताना तटावरची संस्कृती पाहता नर्मदामैयाच्या सान्निध्यात आपली परिक्रमा कधी पूर्ण होते ते समजतच नाही. या परिक्रमेत पवित्र नर्मदामैयाचे स्नान व दर्शन घडते. पायी परिक्रमा केल्याचा आनंद मिळतो, तसेच भविष्यात पूर्ण परिक्रमा करण्याची इच्छा जागृत होते. नर्मदामैया ही कुमारी आहे. त्यामुळे परिक्रमा झाल्यावर कन्यापूजन करतात. कन्यापूजनामध्ये मैया छोट्या कन्येच्या रूपात आपल्याला दर्शन देते, असे मानतात.
२२ किमी चा अनुभव हा सुंदर होता. #narmadehar #narmadashivling
Video Courtsey - Mayur Kulkarni ‪@shaurindesai2923‬ ‪@savanishevade2467‬

Пікірлер: 9

  • @ashwinlangote7719
    @ashwinlangote77193 ай бұрын

    नर्मदे हर

  • @prasadshevade8547
    @prasadshevade85473 ай бұрын

    नर्मदे हर हर हर

  • @sumedhadesai8207
    @sumedhadesai82073 ай бұрын

    अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण..फारच छान मयूर!!!

  • @sulekhasudhirajgaonkar2307
    @sulekhasudhirajgaonkar23073 ай бұрын

    नर्मदा परिक्रमा करणाऱ्या साठी उपयुक्त माहिती 🙏👌👌 नर्मदे हर हर

  • @anjalikulkarni7961
    @anjalikulkarni79613 ай бұрын

    Very informative and beautiful, Mayur!!

  • @anjalikulkarni7961
    @anjalikulkarni79613 ай бұрын

    Very informative, and useful Mayur!!

  • @anjalikulkarni7961
    @anjalikulkarni79613 ай бұрын

    माझ्यासारख्या काहींना उत्सुकता असतें, काय असेल hi परिक्रमा, खरंच खूप छान तु्यांच्यासथ!!

  • @aartimav7743
    @aartimav77433 ай бұрын

    My dream place 🙏💖thank you for sharing this pious and sacred journey

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    3 ай бұрын

    Our pleasure!

Келесі