'सहज सुचलं तेव्हा' - कार्यक्रम झलक

एखादी संध्याकाळ आपल्याला इतकं काही देऊन जाते की ते देणं आयुष्यभर पुरावं आणि आपण त्या क्षणांच्या ऋणात राहणच पसंत करावं. ११ जुलैची संध्याकाळ अशी होती माझ्यासाठी. 'सहज सुचलं तेव्हा' या माझ्या कवितांच्या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड प. या नामांकित संस्थेने त्यांच्या मैत्रेयी विभागातर्फे काल केलं होतं. औचित्य होतं त्यांच्या ३५० व्या कार्यक्रमाचं. Fortune Entertainment ची ही निर्मिती आहे. रसिक श्रोत्यांनी तुडुंब भरलेल्या सभागृहात प्रचंड प्रतिसादात माझ्या वेगवेगळ्या विषयांवरच्या, विविध आशयाच्या, विविध प्रकारात मोडणाऱ्या कविता वाचता आल्या. जवळपास ३ तास कोणीही न उठता हा कार्यक्रम रंगला होता. कवितेला वा, आहाहा, क्या बात है अशा उत्साहवर्धक प्रतिसादाबरोबरच दुमदुमणाऱ्या टाळ्या आणि once more यावेत हे माझ्या कवितांचं भाग्य... या कार्यक्रमात सुरेल आणि विशेष सहभाग होता सुप्रसिद्ध गायक, संगीतकार मंदार आपटे या माझ्या मित्राचा. मी लिहिलेल्या आणि त्याने संगीतबद्ध केलेल्या गाण्यांबद्दल बोलत, ती प्रत्यक्ष गाऊन दाखवत, त्यामागचे किस्से, कलाकाराची परीक्षा घेणारी आव्हानं उलगडत नेणारा त्याचा सहभाग खरंच विशेष ठरला. माझी मैत्रीण लोकप्रिय गायिका अर्चना गोरे २ गाण्यांबद्दल अतिशय सुंदर बोलली, गायली... ज्यातलं एक गाणं तिनेच स्वरबद्धही केलं होतं. काही लहानसे व्हिडिओ दाखवले जे प्रेक्षकांना अतिशय आवडले. माझ्या आजीने सगळ्यांसमक्ष माझं अतिशय मनापासून केलेलं कौतुकही मला आशीर्वाद देऊन गेलं...
आदीश गोखले, वीणा गोखले, सागर पटवर्धन, प्रसाद ओक, समीर वैद्य या माझ्या सगळ्या मित्रमंडळींच्या प्रेमळ सहकार्यामुळे मला कार्यक्रम अधिक देखणा करता आला..
जाई काजळ आणि SVC बँक मुलुंड पूर्व शाखा या दोन्ही प्रायोजकांचेही मनापासून आभार....
अनेक गावांमध्ये, शहरांमध्ये, देशांमध्ये विविध रसिकांच्या भावपूर्ण प्रतिसादात मला हा कार्यक्रम सतत करता येवो हीच ईश्वर चरणी मनापासून प्रार्थना...
Shreyasee Mantrawadi या माझ्या you tube channel ला अवश्य भेट द्या, Subscribe करा आणि तुमचा प्रतिसाद नोंदवा...
असेच भेटत राहू आणि कवितांचा आनंद लुटत राहू....
श्रेयसी

Пікірлер: 10

  • @kalpanashah3143
    @kalpanashah3143 Жыл бұрын

    झलक अतिशय सुंदर. विषयांचा आवाका पण खूप मोठा. आता संपूर्ण कार्यक्रम कधी ऐकायला मिळतो अस वाटत आहे .खूप अभिनंदन❤️🌹🌷

  • @maithilimulay4672
    @maithilimulay4672 Жыл бұрын

    अप्रतिम..... इतके वेगवेगळे विषय... चपखल शब्द...

  • @arvindsainekar1599
    @arvindsainekar1599 Жыл бұрын

    सुंदर संकल्पना!!💐💐👌👌

  • @aaaprasannajoshi
    @aaaprasannajoshi Жыл бұрын

    Apratim Shreyasee. Gr8 going. ❤

  • @vireshkambli6366
    @vireshkambli6366 Жыл бұрын

    मस्तच खूप छान

  • @AppaWadhavkarMusicalJourney
    @AppaWadhavkarMusicalJourney Жыл бұрын

    Waa....mast, bless u, lv.

  • @jyotivaidya5626
    @jyotivaidya5626 Жыл бұрын

    विषय आणि आशय एकदम अप्रतिम आहे, तसेच सादरीकरण उत्तम.एकुणच कार्यक्रम लवकरच यावा युट्यूबवर हिच सदिच्छा.

  • @geetashreeguha6628
    @geetashreeguha6628 Жыл бұрын

    श्रेयसी खुप च गोड शब्द आणि तरल भाव, झलक च ऐवढी सुंदर आहे!!संपूर्ण कार्यक्रम कधी कुठे मिळेल??मी या आधी तुला ऐकलं धनश्री बरोबर ,मी तिला फॉलो करते. तुझं नाव फार सुंदर आहे, अनेक शुभेच्छा.🎉❤

  • @vaishalichitale8728
    @vaishalichitale8728 Жыл бұрын

    अप्रतिम ❤

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 Жыл бұрын

    Best wishes Shreyasi🎉

Келесі