Ramkrushna Godawari चे कर्जमाफ | सातबारा कोरा होणार | MH Bindass

Ramkrushna Godawari चे कर्जमाफ | सातबारा कोरा होणार | MH Bindass
छ संभाजीनगर जिल्ह्यातील बहुसंख्य गावातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील कर्ज माफ झाल आहे. तब्बल पस्तीस वर्षानंतर कर्ज माफीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळाला आहे. नमस्कार मी प्रविण पाटील आणि तुम्ही पहाताय MH Bindass
रामकृष्ण गोदावरी जलसिंचन योजनेतील ६४ कोटी २६ लाख ५९ हजार रुपयाचे थकीत कर्ज रक्कम अखेर राज्य सरकारने माफ केले आहे.
वैजापूर तालुक्यातील उलटी वाहती गंगा नावाने जिल्ह्यात परिचित असणाऱ्या श्री.रामकृष्ण गोदावरी उपसा सहकारी जलसिंचन योजनेतील १४ गावातील २ हजार २१७ शेतक-यांच्या सातबारा उता-यावरील छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ६४ कोटी २६ लाख ५९ हजार रुपयेचे थकीत कर्ज रक्कम माफ करण्याचा शासन निर्णय कार्यासन अधिकारी श्री शिंदे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे.
भाजपा चे डॉ. दिनेश परदेशी,शिंदे सेनेचे आमदार प्रा रमेश बोरनारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ३५ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उपसा योजनेतील शेतक-यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे.योजनेचे मुख्यप्रवर्तक माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांनी 14 गावांतील 17 हजार एकर कोरडवाहू जमीन बारा महिने ओलिताखाली आणण्यासाठी सन 1988 मध्ये श्री रामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनेला शासनाकडून मंजुरी मिळवली होती.छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून योजनेच्या लाभक्षेत्रातील 2 हजार 117 शेतक-यांच्या सातबा-यावर 6426.44 लाख रुपये कर्ज घेऊन 1990-91 या वर्षात या महत्त्वाकांक्षी योजना पुर्ण केली. गोदावरी नदीतील कायगाव टोका येथून जायकवाडी धरणाच्या फुगवट्यातील पाणी वैजापूर तालुक्यात भूमिगत पाइपलाइनद्वारे आणण्याच्या या योजनेस सन 1991 मध्येच यशही आले. मात्र, ही योजना जास्त काळ टिकली नाही. व्यवस्थापनाचे ढिसाळ नियोजन व आर्थिक घोटाळ्यामुळे 1999 ला योजना डबघाईस येऊन बंद पडली. यामुळे 14 गावांतील 2 हजार 117 शेतक-यांच्या बागायती शेती करण्याच्या स्वप्नाला तडा गेला. याशिवाय योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी सभासदाच्या जमिनीवर जिल्हा बँकेच्या कर्जाचा बोजा कसा फेडायचा या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
ही योजना अपयशी ठरल्यामुळे राज्य सरकारने योजना ताब्यात घेऊन सुरू करावी. यासाठी योजनेचे मुख्यप्रवर्तक दिवंगत माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांनी सतत पाठपुरावा केला. मात्र, सरकारकडून केवळ आश्वासनाचे गाजरच मिळाले. एकीकडे राज्य सरकार योजना हस्तांतर करून घेण्यास नकार घंटा वाजवत असताना दुस-या बाजूने जिल्हा बँकेने योजनेसाठी सातबा-यावर कर्ज घेतलेल्या 2 हजार 117 शेतक-यांमागे कर्ज वसुलीचा तगादा लावून जमीन जप्तीची धडक कारवाईही सुरू केली होती.
माञ या शेतक-यांना 35 वर्षानंतर कर्ज माफीचा लाभ मिळाला.
श्री रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेतील चार संस्थांमधील सभासदांना
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, औरंगाबाद व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण सहकारी बँक (नाबार्ड) या बँका मार्फत कर्ज वितरण करण्यात आले होते. आतापर्यंत मुद्दल व व्याजाची एकूण रक्कम २४० कोटी झाली होती.यात शिंदे सरकारने मध्यस्थी करुन ६४ कोटीची कर्जाची मुद्दल रक्कम बॅकेला वर्ग करुन शेतक-यांच्या सातबारा उता-यावरील कर्ज रक्कम कमी करण्याची तडजोड जिल्हा बॅक व राज्य शासनाने केल्याची माहिती आ. रमेश बोरनारे यांनी दिली.
शेतकऱ्यांना जमिन ना विकता आली ना कर्ज घेता आले.
सदरील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज
असल्याने या शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या शेत जमिनीच्या व्यवहारा सोबत पीक कर्ज काढण्यास अडचण होती . त्यामुळे शेतकऱ्याजवळ असणारी शेती असून नसल्यासारखाच प्रकार होता. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीलाआले होते. मात्र या कर्जमाफीनंतर या शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये अखेर साखरेचा खडा पडणार आहे.
Images in this video used for representation purpose only
Conect with Us-
Facebook link:
MHBindass?mi...
Copyright disclaimer :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
#rameshbornare
#dineshpardeshi
#mhbindass
#ramkrushnaGodawari
#mahavikasaaghadi
#mahayuti
#eknathshindelatest
#fadnvis
#marathinews
#marathilive
#marathimewstoday
#latestupdates

Пікірлер

    Келесі