श्री मोरोपंत कृत गंगास्तव l यशोधन एकतारे l Ganga Staw by Yashodhan Ektare

Ойын-сауық

गंगास्तव : भाग १ (वृत्त : शिखरिणी)
तुझे जे श्रीगंगे ! जरि दिसति सामान्य, तरि ते
रिते कल्पांतीही न पडति, मुखी नामधरिते
कवींचे, प्रेमाने स्तवन करिता, दाटति गळे
गळे ज्यांचे, तोयी तव, शव, महादेव सगळे ॥१॥
न कंठी घालाया यम चुकुनिही पाश उकली
कलि स्पर्शेना त्या, कुगति तरि त्याचीच चुकली
पडे ज्याचे, नीरी तव, भसित देसी सुपद या
दयाळे ! पावे त्या सुकृतिहृदयी बोध उदया ॥२॥
त्वदंभोबिंदूशी नुरवि करिता वाद पगडी
रस स्वर्गीचा, या समुचित कसा पादप गडी ?
तुवा मोक्ष प्राण्या, सहज घडता सेवन, दिला
भजे श्रीशाला जे सुयश, तुज ते देवनदिला ॥३॥
पराघाही प्राणी, द्युनदि ! घडता मज्जन, हरी
तयाते श्रीशंभुप्रभुचि न' म्हणे' मज्जन हरी'
' करीत प्रेमाने श्रवण मम पाथोरव रहा'
असे गंगे ! माते म्हणसि जरि तू थोर वर हा ॥४॥
तुझा जो संसारी अजितचि, जसा तो सुत रणी
दृढा तू श्रीगंगे ! सति ! भवसमुद्री सुतरणी
'तुवा केले प्राणी हरिहर' असे आइकविते
न मच्चित्ता वेडे करितिल कसे, आइ ! कवि ते ? ॥५॥
सम श्रीशाचा की तव सुमहिमा, यासि कलिने
न मागे सारावे अतिशुचिस अत्यंतमलिने
' जयी व्हावा विप्रा सुरनदि ! न सोनार दमुनी'
जगी मिथ्याभाषी भगवति ! नसो नारदमुनी ॥६॥
वदे ज्ञाता, मुक्त त्वरित तुज गंगा करिल गा !'
मला नाही संताहुनि इतर या भूवरि लगा
तुला आलो आहे जननि ! कर जोडूनि शरण
स्वतीरी त्वा द्यावे द्रवुनि मज काशीत मरण ॥७॥
महोदारे ! गंगे ! अगणित महादोष हरिला
दिला दीनोद्धारे बहुतचि तुवा तोष हरिला
न कोणीही पापी जन म्हणुनि जा' गा ढकलिला
सदा बाधे त्रास भ्रमकर तुझा गाढ कलिला ॥८॥
गळावा त्वत्तीरी, भगवति ! न हा देह सदनी
पडो गंगे ! तूझे, मरणसमयी, तोय वदनी
विवेकी यावे, जे धवळपण हेरंबरदनी
भवी हो त्वन्नेत्र, प्रभुनयन ते जेवि मदनी ॥९॥
पहाता दीनाते, सकरुण खरा तो कळकळे
द्रवेना तत्प्रेमा भगवति ! मना पोकळ कळे
तव स्नेहा नाही जननि ! उपमा; तापलि कडे
मुला घे जी साची, ढकलि उपमाता पलिकडे ॥१०॥
समर्था तू, चित्ती भवभय धरू का पतित मी ?
रवीच्या पार्श्वीचे, न, पडुनि कधी, कापति, तमी
जगन्माते ! गंगे ! अभयवर तो दे, वसविता
त्वदंकी, हृत्पद्माप्रति सुखद तो देव सविता ॥११॥
जगन्माते ! गंगे ! प्रवर वर दे; पाव; नत मी
निवासार्थी आहे, चिर तव तटी पावनतमी
न देणे भारी हे, वर बहुत देतीसचि, वसे
वक, व्याळ, व्याघ्र, प्रिय करुनि घेती, सचिवसे ॥१२॥
सदाही संसारी विषयरत जो मानव ढिला
तया देसी, द्यावा बहुतचि जसा मान वढिला
असे केले गंगे ! चिर हरिपणे की हरपणे
विराजावे जीवे, कृपणपण जेणे हरपणे ॥१३॥
सदा देवू गंगे ! सदमृत तुझे शुद्धरुचिते;
नुपेक्षू; पापी मी जरि, तरि मला उद्धरुचि ते
नकोचि स्वर्गांचे, सुवुरुवचने ज्या सपकसे
कळे, तो त्यासाठी करिल गुणवेत्ता तप कसे ? ॥१४॥
न कंटाळावे त्वा, सुरतटिनि ! हे होय रुचिर
स्वये दीनोद्धारव्रत वरुनि पाळूनि सुचिर
जिते श्रीवाल्मीकिप्रमुख कवि गाती, तिस तरी
स्तवू, की तू माते ! खळभवनदी होतिस तरी ॥१५॥

Пікірлер: 7

  • @purvachitti
    @purvachittiАй бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @purvachitti
    @purvachittiАй бұрын

    अप्रतिम

  • @geetaketkar3597
    @geetaketkar3597Ай бұрын

    अप्रतिम🙏🙏

  • @mrunalparadkar56
    @mrunalparadkar56Ай бұрын

    खूप सुरेख

  • @laxmikantbhat1813
    @laxmikantbhat1813Ай бұрын

    अप्रतिम विषय

  • @pixohuntmediaworks4354
    @pixohuntmediaworks4354Ай бұрын

    chan

  • @geetaketkar3597
    @geetaketkar3597Ай бұрын

    ६ व्या श्लोकाचे स्पष्टीकरण राहून गेले आहे बहुधा

Келесі