श्रीक्षेत्र वडगाव दर्या पारनेर

श्रीक्षेत्र वडगाव दर्या पारनेर अहमदनगर
#जगप्रसिद्ध लवणस्तंभ
स्वयंभू दर्याबाई वेल्हाबाई दर्शन
#दरीतअसलेलेमंदीर
नमस्कार मित्रांनो,
आजच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितले आहे दर्याबाई आणी वेल्हाबाई या दोन देवींचे रहस्य, तर चाला जानुन घेऊ.....
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वडगांव दर्या या ठिकाणी दर्याबाई व वेल्हाबाई या दोन्ही बहिणींचे देवीचे मंदिर सुप्रसिद्ध आहे. कान्हूर पठार जवळ हे गांव वसलेले आहे. नगर-कल्याण रोडवर टाकळी ढोकेश्वर जवळ वाफारेवाडी फाट्यापासुन या तीर्थाच्या ठिकाणी पोहचता येते.
श्रीक्षेत्र वडगांव दर्या हा एक रमणीय परिसर असुन तो वृक्ष वल्लरींनी वेढलेल्या निसर्ग रम्य एका दरीत वसलेला आहे. याचठिकाणी दर्याबाई व वेल्हाबाई या दोन्ही देवीचे मंदिर आहे. वडगांव दर्या हे गांवच मुळी दरीत वसलेले आहे. देवीचे देवालय हे डोंगराच्या कपारीत कोरलेले आहे. दोन्ही देवीच्या मुर्ती या प्राचीन व स्वयंभू आहेत असे तेथील देवीचे पुजारी सर्वश्री मधुकर व दत्तात्रय बळवंत कांबळे गुरुजी यांनी सांगितले.
दाट झाडीत खाली दरीत देवीच्या मंदिरात जाण्यासाठी शंभर सव्वाशे पायरी उतरून जावे लागते. पायरी उतरतांना परिसरातील माकडांची टोळी भक्तांजवळ प्रसाद ग्रहण करण्याकरीता येतात. त्यांना फुटाणे शेंगादाणे केळी आदि घेऊन जावे. माकडांपासुन सावध रहावे .
पायरी उतरून आल्यानंतर उजवीकडे डोंगर कपारीत दर्याबाई व वेल्हाबाई यांची कळस विरहित शेजारी शेजारी मंदिरे आहेत. मंदिराजवळ डोंगर कपारीतुन वाहणारे झुळझुळ पाण्यात भाविक चिंब होतात. पावसाळ्यात डोंगर कपारीतुन अंखड पाणी झिरपत असते. मंदिरासमोर भले मोठे पटांगण व शेजारी प्रशस्त पडवी विश्रांती करीता देवस्थानने बांधली आहे. डाव्या बाजुला एक कुंड असुन ते शक्तीतीर्थ नावाने प्रसिद्ध आहे. स्नान कुंडात स्नान केल्याने खरुज नायटा सारखी त्वचेचे विकार दूर होतात अशी देवीची ख्याती आहे. देवीच्या मंदिरास दरवाजे नव्हते परंतु माकडांचा उपद्रव टाळण्याकरीता आता तेथे लाकडी दरवाजे लावले आहेत.
आत मंदिरात प्रवेश करताच दर्याबाई व वेल्हाबाई देवीच्या तांदळाकृती स्वयंभू मुर्ती आहेत. देवीच्या शेजारी महादेवाची पिंड आहे. मंदिरात सदैव पाणी झिरपत असते. तेथे पाणी साचवण्यासाठी मोठा ड्रम ठेवला आहे जो नेहमीच भरून वाहत असतो. दर्याबाईच्या शेजारी वेल्हाबाई मंदिरात जाण्यासाठी छोटा दरवाजा आहे. तेथुन वाकुन जावे लागते. दोन्ही देवा बहिणी असुन मोठ्या बहिणीने दर्या बाईने कोपराने तो दरवाजा निर्माण केला आहे अशी ख्याती आहे.
धबधब्याजवळ एक भुयार तयार झाले आहे. या भुयारात एक किलोमीटर पर्यंत सर्व प्राणी संचार करतात. 1958 मध्ये हे भुयार दगड मातीने बुजले गेले आहे. परंतु अद्याप 150 फुटापर्यंत गुहा आहे.
नवरात्रात दहा दिवसाचा उत्सव असतो. तसेच माघ शुद्ध पोर्णिमेस मोठी यात्रा भरते. वडगांव दर्या येथील शुक्ल यजुर्वेदीय शाखेचे ब्राह्मण मधुकर व दत्तात्रय कांबळे गुरुजी यांचेकडे देवीची पुजा अभिषेक आदि धार्मिक कार्य करण्याची जबाबदारी पुर्वपंरपरेने चालत आलेली आहे.
#ahamadnagar
#parner
#nature
#kanhoor pathar
worldfamous lavan stambh
India's first lavan stambh
तर मित्रांनो विडिओ पहा. आनंद घ्या. विडिओला लाईक करा. चॅनलला सबक्राईब जरूर करा. धन्यवाद
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा व आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ साठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
Hope you will like the video. Do share and subscribe the channel
My channel👇
RANJANA'S campaign vlogs
‪@ranjanas07vlogs‬

Пікірлер: 3

  • @shamlimbore9406
    @shamlimbore94066 ай бұрын

    Khoop. Sundar 💓💓💓

  • @jayeshnaikwadi1574
    @jayeshnaikwadi15747 ай бұрын

    Nicee 😊

  • @rajendrakumarnaikwadi7268
    @rajendrakumarnaikwadi72687 ай бұрын

    Jay Mata di🙏🙏🌹🌹

Келесі