फेसबुकवर पोरींचे मेसेज येतायत, जरा जपून सेक्सटॉर्शनचे बळी व्हाल | Facebook Scams | Vishaych Bhari

फेसबुकवर पोरींचे मेसेज येतायत, जरा जपून सेक्सटॉर्शनचे बळी व्हाल | Sextortion scams | Vishaych Bhari
साधारण दोन एक आठवड्यापूर्वीची घटना. माझ्या ओळखीतल्या एका मित्राला फेसबुक मेसेंजरवर पूजा शर्मा नावाच्या चिकण्याबांड पोरीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तसा त्यो गडी सक्तय, आमच्या सारख्या खंडू खपक्यांची रिक्वेस्ट accept करताना दहा वेळा इचार करतो. पण एखाद्या पोरीची रिक्वेस्ट आली की बाददिशी पहिला तिच्या प्रोफाईलवर जाऊन तिचं फोटू चेक करतो अन जर त्येला त्यात काय एंगेजेबल मटेरियल दिसलं तर काचदिशी रिक्वेस्ट accept करून टाकतो. त्यादिवशी बी तसंच झालं. साधारण महिन्याभरापूर्वी ओपन झालेल्या त्या पूजा शर्मा नावाच्या अकाउंटवर मोजून तीन पण हॉट फोटो अपलोड केलेले होते. त्ये फोटू पाहून ह्यो गडी पाघाळला अन तिची रिक्वेस्ट accept केली. ज्यादिवशी ती दोघं फेसबुकवर फ्रेंड झाली त्याचंदिवशी रात्री ९ वाजता पूजानं आपल्या भावाला इनबॉक्सात हाय केलं. पाखरू आपणहून जाळ्यात अडकायला येतंय म्हणल्यावं ह्यो गडी खुल्लाला. आमच्यापस्नं पार कोसभर लांब जाऊन त्यो तिच्याशी chating करायला लागला. पहिला दिवस हाय हॅलोत गेला. दुसऱ्या दिवशी अजून थोड्या पर्सनल लेव्हलच्या गप्पा झाल्या अन तिसऱ्या दिवशी एकमेकांनी त्यांचे कॉलिंग आणि whatsapp नंबर शेअर केले. असं कुठल्यातरी पोरीबरं गुटरगु करण्याची ही त्याची पहिलीचं वेळ होती. ह्यो गडी मनातल्या मनात गर्लफ्रेंड गटवल्याच्या माजात होता. चौथ्या दिवशी समोरच्या व्यक्तीनं त्याला whatsapp वरून व्हिडीओ कॉल कर म्हणून सांगितलं. तेव्हापासून खरं तर भावाच्या मनात गुदगुल्या होत होत्या पण ह्येन दिवस कसाबसा रेटला आणि रात्री १० च्या सुमारास तिला शेतात जाऊन रस्त्याच्या खांबाच्या लायटीत व्हिडीओ कॉल केला. दोनचं मिनिट सिम्पल बोलणं झालं आणि तिसऱ्या मिनिटाला पुढच्या पार्टीनं चक्क न्यूड होऊन भावाच्या शिट्ट्या गुल केल्या. पहिल्यांदाचं असं काही घडत असल्यामुळं आपला भाऊ ओघाओघात तिच्याबरं बोलून गेला. दहा मिनिट त्यांच्यात फुल्ल पीक point चं बोलणं झालं आणि दोघांनी व्हिडीओ कॉल कट केला. त्या रात्री भावानं स्वर्गसुखाची झोप अनुभवली. पण पुढच्याचं दिवशी सकाळसकाळी भावाच्या मोबाईलवर एक खतरनाक अश्लील व्हिडीओ आला. त्याचं शर्मा नावाच्या व्यक्तीच्या नंबरवरून. त्या अश्लील व्हिडीओत भावाचा चेहरा मॉर्फ करून वापरण्यात आला होता. त्यो व्हिडीओ पाहून भावाची घाबरगुंडी उडाली. त्यो व्हिडीओ मेसेज सीन करेस्तोवर दुसरा एक मेसेज whatsapp ला येऊन धडकला. जर आम्ही दिलेल्या नंबरवर एवढे एवढे पैसे पाठवले नाय तर आम्ही ह्यो व्हिडीओ तुझ्या फ्रेंडलिस्ट मधल्या इतर लोकांना पाठवीनं. त्यो मेसेज वाचून तर मित्राच्या हातापायाचं ढाबचं गळले. त्येला काय करायचं सुधरंना. गड्यानं चार पाच दिवस टेन्शनमध्ये खाणंपिणं सोडलं. काय झालं इचारलं तर कुणालाचं काय सांगना. शेवटी त्येजी ती अवस्था आम्ही पोलीसात असणाऱ्या त्येज्या चुलत भावाला सांगितली आणि त्यानं त्यो matter त्येज्या पद्धतीनं सोडवला. तर आमच्या मित्रासोबत घडलं त्यो शुद्ध फसवणुकीचा प्रकार असून त्याला सेक्स्टॉर्शन असं म्हणत्यात. आजच्या या व्हिडीओमध्ये आपण ह्ये सेक्स्टॉर्शन म्हणजे नेमकं काय, त्यामध्ये पोरांना कसं फसवलं जातंय आणि टेन्शनमध्ये पोरं टोकाचा निर्णय का घेतायत, ह्ये जाळं देशात कुठकुठ पसरलंय, त्यात सापडल्यावर काय करायचं, त्यातून वाचायचं कसं या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणारंय,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#facebookscams
#facebookscammergirl
#facebookscammerblackmail
#facebookscammer
#facebookscamsfriendrequest

Пікірлер: 69

  • @gopalrathod6105
    @gopalrathod61059 ай бұрын

    हसण्यासारखी बाब नाहिये मित्रांनो हि फारच गंभीर गोष्ट आहे माझ्या एका मित्राला गळफास घेण्याची वेळ आली होती यात कोणी कधी कसा अडकेल सांगता येत नाही नेमकं पोलिस प्रशासन पण अशशस्वी ठरतात या भडव्यांना पकडण्यात.

  • @PARMESHWAR_MHAISNE
    @PARMESHWAR_MHAISNE9 ай бұрын

    मी तर 2.5 वर्षापासून मी Facebook log in पण केला नाही🎉🎉🎉

  • @tejassupe3002

    @tejassupe3002

    9 ай бұрын

    सेम टू यू🎉

  • @KiranSurve-cp2ds
    @KiranSurve-cp2ds9 ай бұрын

    मी पण २०२१ मध्ये या शर्मा मॅडमच्या WhatsApp video चा शिकार 😂😂झालो असतो ,मला माझाच video करून धमक्या दिल्या पण मी न घाबरता तिला बोललो तुला जे करायचे आहे ते कर ... तिने काहीही वाकडे केले नाही😂😂😂😂😂मित्रांना माझे पण हेच सांगणे आहे की प्लीज तुम्ही असे जाळ्यात अडकला असाल तर यांना मुळीच घाबरु नका ..काहीही झाले तरी❤

  • @KiranSurve-cp2ds
    @KiranSurve-cp2ds9 ай бұрын

    खूप छान डोळे उघडणारी माहिती आणि बातमी दादाने सांगितली आहे ..धन्यवाद दादा ....विषयच भारी😂😂😂

  • @marathistatuslegend3015
    @marathistatuslegend30159 ай бұрын

    महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना VS मोहिल धुमाळ यांच्या वादा बद्दल विडिओ बनवा

  • @SagarBagade-wl7cr
    @SagarBagade-wl7cr9 ай бұрын

    Mlaa kaal ch ek friend request aali anannya Anamika 2 taas chat kelo nantar ti 5000 rupaye magitli an mi naahi bollo techa शिव्याच द्याला suru केली 😂😂😂mahit nahi manus hota ki बाई

  • @pavanbhalsing2557

    @pavanbhalsing2557

    9 ай бұрын

    Video call ch pn sanga 😅😅

  • @rahulwable6924
    @rahulwable69249 ай бұрын

    अहो हा झोल आहे सगळा पोरींचा पैसे कामवायच धंदा आहे

  • @SunilShinde-ct3cd
    @SunilShinde-ct3cd9 ай бұрын

    नक्कीच आवडली मी अनुभव घेऊनच कमेंट करत आहे मला तुम्ही सांगताय तसेच फोन येत होते पण एका मित्राला माझी सर्व कथा सांगितली तेव्हा त्या मित्राने योग्य मार्गदर्शन केले त्या मुळे मी शिकार होता होता वाचलो‌ आहे

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg9 ай бұрын

    भावा अस काही झालं तर पहिले आपलं फेसबुक deactivate कर आणि नंतर त्या नंबर वर लय घान घान शिव्या सुरू करायच्या आणि स्वतः फोन करून शिव्या द्याच्या .परत फोन नाही करत ....आणि आपल्या true caller वर पोलिस लिहायचं ...बाकी २ दिवसात सगळं शांत होत कारण त्यांच्या काडे खुप लोक असतात ते एका माणसावर जास्त वेळ घालवत नाही

  • @arjunwadatkar2923
    @arjunwadatkar29239 ай бұрын

    चांगली माहिती आहे

  • @sanjayburaje386
    @sanjayburaje3869 ай бұрын

    छान माहिती

  • @pigeonlovermaharashtra7621
    @pigeonlovermaharashtra76219 ай бұрын

    🌟🌟🌟🌟🌟आली आस माहित जाल आहे. भावा तू लवकर त्या वर विडिओ बनव भावा.

  • @vasantphadke4694
    @vasantphadke46949 ай бұрын

    Thanks for this

  • @vivekdalvi594
    @vivekdalvi5947 ай бұрын

    काही म्हणा राव तुम्ही बोलताच लय भारी

  • @eknathpole8169
    @eknathpole81699 ай бұрын

    खरं आहे हे माझ्या मित्रा सोबत झालेला आहे आस

  • @pigeonlovermaharashtra7621
    @pigeonlovermaharashtra76219 ай бұрын

    ✨️🌟🌟✨️दादा ऐक भावा बकसूर वर बंदी घालण्यात आली आस माहित जाल आहे. भावा तू लवकर त्या वर विडिओ बनव भावा.Prince mj lonari

  • @kiransawant6102
    @kiransawant61029 ай бұрын

    Very nice video and information

  • @sachinbaravakar1148
    @sachinbaravakar11489 ай бұрын

    हे अस व्हिडिओ कॉल वर येडी लोकच बोलतात

  • @gauravkhillare5923
    @gauravkhillare59239 ай бұрын

    Thanks sir 🙏

  • @vivekdalvi594
    @vivekdalvi5947 ай бұрын

    बाकी माहिती छान माहिती..अशा घटनांना पायबंद ghlne गरजेचे

  • @Analysis565
    @Analysis5659 ай бұрын

    आता मला एवढा अनुभव झालाय फोटो बघितलं बघितलं तर समजतंय बाई आहे का बाबा... लगेच विषय close...

  • @JayMaharashtra50
    @JayMaharashtra509 ай бұрын

    मला ही असा फोन आला होता राजस्थान मध्ये सोने आहे स्वस्तात देतो मी ओळखले गेल्यावर आपला कार्यक्रम नक्की होणार मग काय पुणेरी शिव्या चालू केल्या हिंदीतून परत फोन नाही आला दहा वर्ष झाले !!जय महाराष्ट्र!!

  • @pigeonlovermaharashtra7621
    @pigeonlovermaharashtra76219 ай бұрын

    🎉🎉🎉🎉✨️✨️✨️✨️✨️दादा ऐक भावा बकसूर वर बंदी घालण्यात आली आस माहित जाल आहे. भावा तू लवकर त्या वर विडिओ बनव भावा.prince mj lonari

  • @sakshat_anap
    @sakshat_anap9 ай бұрын

    भाऊ पैशेच नाही तिला देऊ कुठून जाऊदे भाऊ चॅटिंग तरी होईल 😂

  • @user-ot6pp7rq5d
    @user-ot6pp7rq5d9 ай бұрын

    मित्रांनो घाबरु नका ति मुलगी नसुन तो मुलगा असतो

  • @AmolShinde-ug2vm
    @AmolShinde-ug2vm9 ай бұрын

    मला सुद्धा पूजा शर्मा ची requst आली आहे

  • @rahulrajiwade5829
    @rahulrajiwade58299 ай бұрын

    Yamadhe khedya madhle Police kahi nahi karat majhe khup friends yamadhe adakle hote police adani ahet ajun he lok policesanpeksha 4 pavle pudhe astat

  • @prabhakartamnar728
    @prabhakartamnar7289 ай бұрын

    मी म्हटल मला अटक करा कारण मी माझा चेहरा दाखवला नहता

  • @pigeonlovermaharashtra7621
    @pigeonlovermaharashtra76219 ай бұрын

    दादा ऐक भावा बकसूर वर बंदी घालण्यात आली आस माहित जाल आहे. भावा तू लवकर त्या वर विडिओ बनव भावा.prince mj lonari

  • @psedunets2790
    @psedunets27909 ай бұрын

    Mala pan asa message ala whatsapp var , video call sathi mahnt hoti ek mulgi , mala kahi gadbad vatl mi response dela nahi. Tyana audio call sathi bolalo. Pan te response nahi dila. Ajali Sharma Facebook var common ahe.

  • @mohangabhale5555
    @mohangabhale55559 ай бұрын

    Policesani karvayi karayla pahije tya lokkna pakda adhi

  • @abhijit-oq7yc
    @abhijit-oq7yc9 ай бұрын

    Sextortion black mail karnyaryan jagewr golya ghatlya pahijet. Asha mule por le tention yetat n he aaighale maja ghetat poranchi.

  • @vijayaithape2269
    @vijayaithape22699 ай бұрын

    Kirit sommaiya😂

  • @sujit.fishing
    @sujit.fishing9 ай бұрын

    मेवात

  • @bhushanmhatre2660
    @bhushanmhatre26609 ай бұрын

    Asha lokanna phone karun dhamkya dyayala lagle tar tondat chaku maru kacha kach asa uttar dyaycha je karaycha aasel te kar

  • @SANJAYWADKAR-pw7bv
    @SANJAYWADKAR-pw7bv9 ай бұрын

    माझ्या मित्रा संगती पण सेम अशी स्टोरी झालेली होती

  • @prabhakartamnar728
    @prabhakartamnar7289 ай бұрын

    भाऊ मला पण आला होता फोन पोलिस अधिकारी म्हणून

  • @yashchoudhari9853
    @yashchoudhari98537 ай бұрын

    अहो दादा फेसबुकवरील मैत्रिणींनी मेसेजेस मधे चॅटींग करताना आपला फ़ोटो मागीतले तर काही धोका होवु शकतो काय ❓

  • @ankushdane
    @ankushdane9 ай бұрын

    Bhai camera vr tape laun takaycha

  • @kilomotorsanket1933
    @kilomotorsanket19339 ай бұрын

    Raaz movie dialogue.. She-main tumhe barbad kardungi He-main barbad hona chahta hoon😅

  • @adwalaindia6127

    @adwalaindia6127

    9 ай бұрын

    😂😂😂

  • @akshaykota4695

    @akshaykota4695

    9 ай бұрын

    😂

  • @vishalwankhede2029
    @vishalwankhede20299 ай бұрын

    माझ्या मित्रा सोबत पण सेम टु सेम असच झाल.. SEXTORTION

  • @biruwaghmode9397
    @biruwaghmode93979 ай бұрын

    मला पण आला होता रिया गुप्ता म्हणून होती

  • @rohandavari
    @rohandavari9 ай бұрын

    Facebook vr asa prakar zLa tr cll kra

  • @user-ew6zd8om7g
    @user-ew6zd8om7g9 ай бұрын

    Ghabrnyache kahi Karan nahi, kahi divsani koni ase black mail kele tar abhimanachi baat hoyeel Karan lav** uthanarach nahi ahait.

  • @rajnirmale7227
    @rajnirmale72279 ай бұрын

    Me FB vr mulagi pathun lgn pn janvale😊

  • @yogeshmodke5816
    @yogeshmodke58169 ай бұрын

    चिकणी पोरगी 😂😂

  • @abhaykolhe7806
    @abhaykolhe78069 ай бұрын

    Banned fb account

  • @kirankale6042
    @kirankale60429 ай бұрын

    Fkt dhamki aste ki viral keliye konachi video

  • @BlackMamba6131_pubg

    @BlackMamba6131_pubg

    9 ай бұрын

    फक्त धमकी असते कारण जर viral केलं तर पैसे कोण देईल हाना

  • @vivekchindarkar2219
    @vivekchindarkar22199 ай бұрын

    कर बिनधास्त व्हिडिओ शेअर सांगायचे काही करत नाही मला पण असेच ब्लॅकमेल करत होते मी बोललो खर बिनधास्त मी पण बघतो काय करतो तू

  • @avirathod5815
    @avirathod58159 ай бұрын

    Malapan 5000 magitle hote

  • @mihirjoshi9801
    @mihirjoshi98019 ай бұрын

    Aslya fraud lokanna lava 3rd degree ani 3rd degree cha video karat chala viral Policanni Mag baghu kon kartay blackmail😂

  • @sammly768
    @sammly7689 ай бұрын

    😂😂

  • @marathistatuslegend3015
    @marathistatuslegend30159 ай бұрын

    महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना VS मोहिल धुमाळ यांच्या वादा बद्दल विडिओ बनवा

  • @pigeonlovermaharashtra7621
    @pigeonlovermaharashtra76219 ай бұрын

    ✨️🌟दादा ऐक भावा बकसूर वर बंदी घालण्यात आली आस माहित जाल आहे. भावा तू लवकर त्या वर विडिओ बनव भावा.Prince mj lonari

  • @marathistatuslegend3015
    @marathistatuslegend30159 ай бұрын

    महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना VS मोहिल धुमाळ यांच्या वादा बद्दल विडिओ बनवा

  • @marathistatuslegend3015
    @marathistatuslegend30159 ай бұрын

    महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना VS मोहिल धुमाळ यांच्या वादा बद्दल विडिओ बनवा

  • @marathistatuslegend3015
    @marathistatuslegend30159 ай бұрын

    महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना VS मोहिल धुमाळ यांच्या वादा बद्दल विडिओ बनवा

  • @marathistatuslegend3015
    @marathistatuslegend30159 ай бұрын

    महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना VS मोहिल धुमाळ यांच्या वादा बद्दल विडिओ बनवा

  • @marathistatuslegend3015
    @marathistatuslegend30159 ай бұрын

    महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना VS मोहिल धुमाळ यांच्या वादा बद्दल विडिओ बनवा

  • @marathistatuslegend3015
    @marathistatuslegend30159 ай бұрын

    महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना VS मोहिल धुमाळ यांच्या वादा बद्दल विडिओ बनवा

  • @marathistatuslegend3015
    @marathistatuslegend30159 ай бұрын

    महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना VS मोहिल धुमाळ यांच्या वादा बद्दल विडिओ बनवा

  • @marathistatuslegend3015
    @marathistatuslegend30159 ай бұрын

    महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना VS मोहिल धुमाळ यांच्या वादा बद्दल विडिओ बनवा

Келесі