पायथागोरस, कविता ते झोप! ft. Spruha Joshi | भाग २६ | Marathi podcast

Комедия

​‪@whyfal‬ Marathi podcast by Suyog aka ‪@thefunIndianguy‬
👚 व्हायफळ दुकान सुरु 👕
आमच्या येथे व्हायफळ गोष्टी मिळतील!
swiy.co/Whyfal_Dukan
स्पृहा जोशी यांच्या बरोबरच्या खळ-खळत्या आणि हटक्या गप्पा. लहानपणीचं दादर ते सेमी-इंग्लिश शाळेतील मजा ते आई-बाबांनी केलेलं संगोपन ते कविता कश्या तयार होतात, तिला भेटलेली ग्रेट माणसं आणि हो, झोपेचं महत्त्व. हे सारं आणि खूप साऱ्या आधी कधीच न सांगितलेल्या स्पृहाच्या आठवणी ह्यांनी भरलेला धमाल एपिसोड.
A superb Marathi podcast with Spruha Joshi. From childhood to semi-English to parents mindful upbringing to how poems come into the being along with Spruha's interactions with great people and yes, the importance of sleep. All of this and much more! Especially the memories that Spruha has never shared! Enjoy this wholesome episode.
Join व्हायफळ पत्र व्यवहार!
swiy.co/WhyfalNL
Follow Spruha: / spruhavarad
Follow Whyfal: / why_fal
📚 पुस्तकं बिस्तकं 📚
स्पृहा जोशींची पुस्तके
amzn.to/3Q4JqzA
How music works
amzn.to/3rChNDW
विशाखा । कुसुमाग्रज
amzn.to/44uvSBU
इंदिरा संतांची पुस्तके
amzn.to/3K6G6jI
बा. भ. बोरकरांची पुस्तके
amzn.to/3DlASwX
दर्शन । शंकर वैद्य
amzn.to/3Q6rlkU
कृष्णाकिनारा । अरुणा ढेरे
amzn.to/3OnQExm
वैभव जोशींची पुस्तके
amzn.to/44VpUcW
मौनाची भाषांतरे । संदीप खरे
amzn.to/3Qc0hAR
सर्व अंशातून आपण | संकेत म्हात्रे
amzn.to/3Q4HW8u
कोर्पोरेट कविता । प्रथमेश पाठक
amzn.to/44xtD0L
शांताबाई शेळकेंची पुस्तके
amzn.to/470wnVQ
वसंत बापटांची पुस्तके
amzn.to/43AxNn9
#marathipodcast #marathi #spruhajoshi
Chapters:
00:00 Whyfal Gappa
01:21 Introduction
04:34 Spruha’s Favourite season of the year
09:52 Spruha’s poem on rain
10:36 Spruha’s Childhood memories
24:33 Spruha’s school life and extracurricular activities
41:15 Creating a personal library
49:19 Poem writing
52:40 Guidance from elite poets & writers
57:02 Spruha’s process of writing a poem
58:48 Salvador Dali’s creative process
1:00:01 Documenting the dreams
1:06:05 Imaginary world while writing a poem
1:06:39 Mangesh Padgaonkar
1:10:24 Spruha's love for sleep
1:13:49 Whyfal's 'Adbhut Darwaja'
1:22:09 Retro Mumbai
1:26:06 Spruha’s recommendation for books
1:28:18 How to understand & enjoy a poem
1:36:30 Whyfal Gappa's conclusion

Пікірлер: 1 100

  • @chandrakantamlekar7064
    @chandrakantamlekar70645 ай бұрын

    मराठी अत्यंत श्रीमंत भाषा आहे. मराठी असण्याचा फार अभिमान आहे .....

  • @bdk182
    @bdk18211 ай бұрын

    @spruha tai आजच्या काळात जिथे लोकांना 2 min reel चा patience असतो तिथे हा 2h चा episode संपूच नये असं वाटतंय. खूपच अप्रतिम

  • @sujata5115

    @sujata5115

    7 ай бұрын

    खरेच

  • @daminichury281
    @daminichury28111 ай бұрын

    स्पृहा एक अशी व्यक्ती आहे की ती सर्वाना आवडते कारण ती talented आहे

  • @sunitature992

    @sunitature992

    Ай бұрын

    Crap lolipop

  • @prasannajoshi6412
    @prasannajoshi64123 ай бұрын

    असच चालत जाताना दिसलेल्या दरवाजाची कल्पना खूपच सुंदर आणि मुलाखत उत्कृष्ट.

  • @surendrasutar6290
    @surendrasutar629011 ай бұрын

    इतर कलाकार आणि स्पृहा यांच्यात खुप फरक आहे...अप्रतिम मराठी साहित्याची जाण आहे. मंगेश पाडगावकर, पु. लं, अशी नाव घेतली खरच हा भाग संपुच नये वाटत. Legendary Personality...खुप खुप शुभेच्छा स्पृहा...GBU..❤❤❤❤😊

  • @sheetalkulkarni9696
    @sheetalkulkarni96962 ай бұрын

    1:22 अगदी मला हेच वाटतं....१९७८-७९ ची मुंबई, कमी ट्रॅफिक, बस चा प्रवास, मोकळे रस्ते, झाडी.... छोटी सी बात आणि गोलमाल मधली मुंबई....साधं आयुष्य ....तो काळ प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला ते लोक खरे भाग्यवान

  • @shrirangprabhudesai5776
    @shrirangprabhudesai577611 ай бұрын

    स्पृहा आणि सुयोग, फार छान कार्यक्रम. आमच्या ४० वर्षांपूर्वीच्या सुवर्ण काळात गेलो. Keep it up!

  • @shobhakhare3188
    @shobhakhare318811 ай бұрын

    स्पृहा जोशी खरोखर एक अफलातून व्यक्तीमत्व, सहज , सोपं आणि तरीही थेट ह्रुदयाला भिडणारं, आपलंसं वाटणारं..

  • @niranjanchindarkar9967

    @niranjanchindarkar9967

    11 ай бұрын

    😢😢

  • @meenatawde9210

    @meenatawde9210

    11 ай бұрын

    अगदी बरोबर ❤

  • @Rupalikatre-dg2ir

    @Rupalikatre-dg2ir

    10 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @snehachavan2768

    @snehachavan2768

    9 ай бұрын

    ​@@niranjanchindarkar9967😊

  • @kalpanamayekar2676

    @kalpanamayekar2676

    8 ай бұрын

    स्पृहा तुझा कार्यक्रम पाहिला आणि मी माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या मी सुद्धा दादरला जनरल एज्युकेशन मुलींच्या शाळेत होते. तुझ्या आठवणीत मी रंगून गेले.

  • @tejaswinibapat3447
    @tejaswinibapat344711 ай бұрын

    एपिसोड बघायला सुरुवात करायच्या आधीच तो कमाल असणार आहे हे माहिती आहे.. स्पृहा कलाकार म्हणून कवी म्हणून आवडतेच पण तिच्याकडे नुसतं बघितलं तरी छान प्रसन्न वाटतं..फक्त आणि फक्त positivity मिळते तिच्याकडून.. तिच्याशी आमची भेट घडवून आणल्याबद्दल धन्यवाद..

  • @Libra6

    @Libra6

    11 ай бұрын

    Yes, my only favourite marathi actress today.

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande273011 ай бұрын

    फार फार गुणी आहेत ह्या स्पृहा ,,कविता एक नंबर करतात, मराठी भाषा फार छान बोलतात आणि, स्पष्ट उच्चार आहेत,,big fan form , अग्निहोत्र पासून ,,, खूप आभारी आहे,, मॅम

  • @Libra6

    @Libra6

    11 ай бұрын

    Yes me too she does not seem to be showy like many other actresses.

  • @madhuriparanjape620

    @madhuriparanjape620

    11 ай бұрын

    मंगेश पाडगावकर - बोलगाणी चंद्रशेखर गोखले - मी माझा These two are best starting points if you are stepping into poetry books. एकदा त्या वाचायची आवड लागली की मग खजिनाच खजिना...पण ही दोन सगळ्यात सहजपणे कविता वाचण्याच्या प्रेमात पाडणारी पुस्तके!

  • @amarjathatte4284

    @amarjathatte4284

    11 ай бұрын

    स्पृहा स्पृहा खूप.आवडतेस तुझ अभ्यास पूर्ण बोलण ऐकत रहावं वाटत अशीच आनंदी रहा

  • @sulbhakolhatkar5068

    @sulbhakolhatkar5068

    9 ай бұрын

    😊

  • @madhavparanjpe8330

    @madhavparanjpe8330

    9 ай бұрын

    EXCELLENT

  • @savitabagde3738
    @savitabagde37385 ай бұрын

    खूपच मस्त आहे हा पूर्ण एपिसोड, actully मी हा दुसरा भाग आहे पाहण्याचा. या आधी या एपिसोड ची कल्पना न्हवती. प्रथम जो एपिसोड पाहिला तो संकर्षण चा होता आणि तो अफलातून होता. आणि आत्ताचा हा स्पृहा जोशी चा पण भन्नाट होता. दोघेही खूप आवडीचे आहेत. स्पृहा की तो बात ही अलग है. खूपच सुंदर रीतीने तुम्हीं हे एपिसोड सादर करता. मज्जा व आनंद घेतो पाहताना. खूप खूप धन्यवाद असे एपिसोड देण्या बद्दल. आणि शुभेच्छा.

  • @SuperPoonam143
    @SuperPoonam14311 ай бұрын

    Crab lollipop....... अतिशय सुंदर पॉडकास्ट झालेला आहे स्पृहा मला प्रचंड आवडते आणि खूप छान विषयांवर बोलला आहात तुम्ही थँक्यू सो मच

  • @anitabanage7644
    @anitabanage76449 ай бұрын

    स्पृहा खुप छान आहे ती आपल्यातील च व खुप जवळची असल्या सारखी वाटते व खुप छान खळखळून हसते ‌व गोड दिसते❤❤❤❤🙏🙏💐💐

  • @sharadmohite5508
    @sharadmohite550811 ай бұрын

    To watch Spruha is like an experience of watching an intelligent lady who has a clear mind and flawless beauty and a cute smile. God bless her 🎉🎉

  • @SavitaTanksale-xb5yk

    @SavitaTanksale-xb5yk

    10 ай бұрын

    ❤❤

  • @chandramohan6502

    @chandramohan6502

    10 ай бұрын

    Mohiteji 100 200 300 percent I endorse your comment on our soor navaa GOD

  • @chandramohan6502

    @chandramohan6502

    10 ай бұрын

    @@SavitaTanksale-xb5yk Savitaji I am joining you in saluting our Marati God though I am aged 81 running nothing is coming in the way of my viewing our Madh va Brahmin Culture and costume of 9 yard Navari Kacche Saree beauty of SPRUHA GOD in Soor Nava Anch aring and also in a serial the name of which I am not remembering at present but certainly is a Kanmda Version of MOODALA MANE

  • @meena71463

    @meena71463

    9 ай бұрын

    छानच .शेअर chaa column naahi kaa

  • @user-st6kc1uf2i
    @user-st6kc1uf2i11 ай бұрын

    अगदी आताच पायथागोरस कविता ते झोप हा व्हिडिओ यूट्यूब वर पाहून संपवला. गंमत म्हणजे सुरवातीला मी थोडा पाहून बंद केला आणि कमेंट लिहिली, "स्पृहसाठी पाहायला घेतला पण आवडला नाही." थोड्या वेळाने काय वाटलं कोण जाणे पुन्हा पाहायला लागलो आणि मग मात्र पूर्ण पाहिला. खूप खूप nostalgic होण्याची संधी दिलीस. कितीतरी आठवणी relate होत होत्या कारण मी ही बालमोहनकर, अर्थात तुझ्या खूप आधीचा. पण त्यानंतरही तू बोलत असलेल्या अनेक गोष्टी.. म्हणजे रात्री काही डोक्यात आलेलं सकाळी पूर्ण धूसर होऊन जाणं, लेख कवितेच्या अंथरुणावर पडल्यावर काही ओळी सुचणं, अशा अनेक गोष्टी ऐकताना खूप छान वाटत होतं. माझी आत्या तू सांगितलस तशा चिकट वह्या करायची, ते आठवलं. एकूण खूप मजा आली ऐकताना, आणि तुला पहाताना. अगदी नेमकं सांगू का ? तू एक छान आठवणींची सैर करून आणलीस. Thank you so much.

  • @sukanyajoshi2903
    @sukanyajoshi290311 ай бұрын

    किती रिलेटेबल 😍 स्पृहा आम्ही पण कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो सगळे एकत्र येऊन. ❤ आणि स्पृहाचं भाषेविषयीचं म्हणणं खूप पटलं …. भाषा उत्तम यायलाच पाहिजे☺️

  • @labheshmore1536
    @labheshmore153611 ай бұрын

    Midnight in Paris❤ Even I would love to go back in timeline to the PuLa Deshpande period

  • @seemajumde9308
    @seemajumde93085 ай бұрын

    खूप छान,स्पृहा सगळ्यांना च आवडणारी अभिनेत्री आहे तिचे बालपण , तिच्या कविता फारच आवडले, शेवटच्या वायफळ गप्पा मस्तच आहेत

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar478611 ай бұрын

    समृद्ध असणं, प्रगल्भ असणं आणि ते आपोआप आपल्या अपब्रिंगिंगमध्ये होत आलं, याची जाणीव यातून झाली. खूप गोष्टी रिलेट होणाऱ्या होत्या. खूप छान, खूप नॉस्टॅल्जिक, आणि अत्यंत प्रामाणिक आविष्कार..मस्त👌👌👌❤️❤️

  • @monalipatil1593
    @monalipatil159311 ай бұрын

    खुप छान एपिसोड, कविता वाचायची कशी हे खुप आवडली. मजा आली ऐकताना

  • @neilabhide
    @neilabhide11 ай бұрын

    खरच खूप nostalgic gappa होत्या. Cherry on top was स्पृहा ni mention केलेलं लोकसत्ता chi गाथा competition. मी college च्या 1st year la असताना लोकसत्ता मध्ये गाथा campaigner आणि organizer होते. आमचा campaigners cha group होता जो आजही whatsapp वर contact मध्ये आहे. खूप आठवणीना उजाळा मिळाला. Thank you and keep up the good work!

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe541111 ай бұрын

    स्पृहा तू जन्मजात कवयित्री उत्तम अभिनेत्री आहेस.बालपणी घरातील वातावरणही समृद्ध होतं. भाग्यवान आहेस तू

  • @supriyarokde3927
    @supriyarokde392710 ай бұрын

    खूप खूप सुंदर spruha, मुक्त पणे खळखळून गप्पा,वाटतंच नाही औपचारिक,ऐकतंच रहावेसे वाटतं.संस्कारी,व मराठमोळेपण, आताच्या पिढीला प्रेरणा देणारे, धन्यवाद तुझ्या सर्व कुटुंबातील सदस्यांना, ज्यांनी तुला घडवलं 🎉

  • @asmitasalve214
    @asmitasalve21411 ай бұрын

    खूपच सुंदर podcast. जुन्या आठवणीं मध्ये रमायला मिळाला पुन्हा एकदा.. एकंदरीतच किती किती गोड आठवणी आणि अनुभव सांगितले आहेत स्पृहा ने. साने गुरुजींच्या पुस्तकां बद्दल किती छान म्हणाली आहे स्पृहा.. किती सहज व्यक्त झाली. आपल्यापैकीच कुणीतरी बोलत आहे असंच वाटत होत.. खरचं गोड podcast.

  • @paragbhise4008
    @paragbhise400811 ай бұрын

    माहीत नसलेली स्प्रुहा ! Differently approached !! Excluding filmi and acting side !!! This calls for one more episode about film & acting & still unknown sharable experiences !

  • @sachinagharkar2347
    @sachinagharkar234711 ай бұрын

    स्पृहा अतिशय सुंदर संवाद साधते. तिचं ज्ञान वाचन पाठांतर उत्तम असल्याची जाणिव होते. मुळातच आई वडीलांनी दोघी मुलींना सुस्कांरीत केलं आहे.

  • @omdeshpande6733
    @omdeshpande6733Ай бұрын

    लहानपणीच्या आणि शाळेच्या nostlagic आठवणी जागृत झाल्या... साधा ..सरळ..सोप्पा podcast... मनाला भिडणारा.. व्यक्त होण्याच्या वेगवेगळ्या छटा. best wishes for bright future of whyfal

  • @labheshmore1536
    @labheshmore153611 ай бұрын

    Immense love and respect for Spruha, Kshipra and their parents. Khup sundar interview jhala. Majja aali

  • @MONSTER-ue8nj
    @MONSTER-ue8nj5 ай бұрын

    काय भाषा आहे.. असं वाटतंय आम्ही बोलतोय ते वेगळेच बोलतोय 😂... शब्बदांची खजिना 👍🏼

  • @virendravaidya7714
    @virendravaidya77145 ай бұрын

    कवितेचा आनंदी अनुभव कसा घ्यावा याबद्दल स्पृहाच मार्गदर्शन आवडलं. बंद दरवाजा पलिकडची दुनिया ही कल्पना फारच भावली, जी आपण आपली शब्दांकित करू शकतो आणि आपल्या कल्पना साम्राज्यात जाऊ शकतो. माझ्या साठी हा उपाय मला आमळत आणता येईल. म्हातारपणात हा छंद फारच उपयुक्त आहे. धन्यवाद.

  • @prasadsukhathankar4945
    @prasadsukhathankar494511 ай бұрын

    मुंब्रे सर हे एक अप्रतिम कुंभार आहेत. अनेक मातींना त्यांनी अतिशयच सुंदर आकार दिलाय. एखादी माती कशी आहे हे बघून तिचा माठ करायचा की सुरई हे त्यांना बरोबर माहिती आहे. 😊

  • @charushealthworld7801
    @charushealthworld780111 ай бұрын

    This should be watched by every parent of the young generation, Hats off to her parents. Especially Mother. I❤it

  • @nikhilmodak214
    @nikhilmodak21411 ай бұрын

    खूप गोड मुलाखत! सुयोगने @thefunindianguy दरवाजा उघडून दिल्यावर पलीकडच्या वाटेवरून स्पृहा तू कुठे कुठे घेऊन गेलीस, बालपणात, शाळेत, आजीच्या मांडीवर, माझ्या आजीच्या शाळेत, आजोबांच्या घरी, आणि ती मैफिल! डोळे मिटून त्या मैफिलीला मी ह्यापूर्वी कित्येक वेळेस गेलो आहे पुलं, वसंतराव, अण्णा, बोरकर, मन्सूर, बाबूजी, माणिक वर्मा, गदिमा, सुनीताबाई, इंदिराबाई, शांताबाई. आपण फक्त बावळटासारखं मनानेच तिथे जाऊन बसावं आणि अधाशा सारखं पित राहावं. आणि म्हणावं, इतक्या लवकर येई न मरणा!

  • @atharvaathalye1587
    @atharvaathalye158711 ай бұрын

    Suyog ji you are doing great work. If possible please invite sankarshan karhade ji on your podcast. 🙏🏻

  • @swatikurtkoti1534

    @swatikurtkoti1534

    11 ай бұрын

    Great recommendation

  • @sarikamarne5735

    @sarikamarne5735

    10 ай бұрын

    Here the same

  • @ashwinikulkarni9066
    @ashwinikulkarni906611 ай бұрын

    स्पृहा. सुयोग... Great bhet... Both are toooo good.... गप्पा.. कविता....... तुझी कुहू ही व्यक्तिरेखा अविस्मरणीय... तशी ह्या गप्पा.. आणि कविता अतिशय सुंदर.... ❤with bountiful blessings and best wishes..... Forever... To you and suyog prachi too

  • @Libra6

    @Libra6

    11 ай бұрын

    Her all roles are very good, still she deserves more. Other nondeserving yet egoistic actresses are given more weightage than her.

  • @rupakulkarni5566
    @rupakulkarni55668 ай бұрын

    सुयोग मी हळू हळू रोज बघायला लागले आहे तुमचे पॉडकास्ट. आज शोधून काढले सुयोग कोण आहे वगैरे. ह्याला स्पृहा कारणीभूत आहे. कारण इतके छान बोलत होते तुम्ही दोघे. Multi talented आहात. स्पृहा च्या घरचे अगदी मराठमोळे वातावरण असल्याने अगदी घरातली वाटली. गॉड ब्लेस यू all.

  • @deshpandeaarya2693
    @deshpandeaarya269311 ай бұрын

    I've always had a immense love and respect for Spruha since childhood✨️🌟 Thankyou so much for this episode !!!! It was a treat to hear her ✨️

  • @shraddhakulkarni7109
    @shraddhakulkarni710911 ай бұрын

    Crab lollipop, amazing, immense pleasure watching this video! One of the best podcast ❤️❤️❤️

  • @kalpanamayekar2676
    @kalpanamayekar26768 ай бұрын

    स्पृहा आणि सुयोग तुम्ही मला माझ्या बालपणीच्या शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या झाल्या. मी दादरला जनरल एज्युकेशन सोसायटीच्या दादरच्या शाळेत होते. कुमार कला केन्द्राच्या स्पर्धा आमच्या शाळेतच होत होत्या. शिवाजीपार्क माझा आवडतं ठिकाण पंधरा ऑगस्ट. सव्वीस जानेवारी या दिवशी केलेलं कवायत, प्रभातफेरी खप अनुभवलं. छान सुवर्ण काळ होता तो.❤

  • @vp295
    @vp2955 ай бұрын

    Crab lolipop 😂 स्पृहा एक असं व्यक्तिम्त्व आहे जी एक उत्तम अभिनेत्री, उत्तम कवयित्री, उत्तम साहित्यिका आणि बरच काही आहे.... ती बोलताना आपुलकी निर्माण होते. ती साहित्य आणि संस्कृती या विषयी अगदी अंत: कारणातून बोलत होती हे लगेच जाणवलं.... आजचा एपिसोड खरचं खूप खूप छान झाला ❤

  • @Libra6

    @Libra6

    3 ай бұрын

    True, but asha versatile actresschi parakh ajun marathi filmschya directors zhali nahi. Sai priya yasarkhya faltu actressesna bhav detat, marathi Paul padte pudheche award detat, hi khanta ahe.😢 Actually spruhacha face ha classic marathi actressescha face ahe.😊

  • @littlelearningexplorer
    @littlelearningexplorer8 ай бұрын

    40:15 yes, जेवताना पुस्तक मी आणि माझा भाऊ पण नेहेमी वाचायचो 😀👍🏼.. the best interview of Spruha,.. लहानपणीच्या आठवणी आणि कित्ती छान गप्पा. 👌🏼👌🏼 and yes, "crab lollipop", lol 😅👍🏼

  • @user-hv5ev2br9f
    @user-hv5ev2br9f9 ай бұрын

    स्पृहा सोबत गप्पा म्हणजे पर्वणी असते, अनुरुप मध्ये तीच्या पतीसोबत गप्पा असाच सुंदर अनुभव आहे.😊

  • @oakketaki7512
    @oakketaki751211 ай бұрын

    वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे ही कविता स्पृहा जोशींच्या च आवाजात ऐकायची आहे. अप्रतिम म्हटली आहे

  • @sushamaamladi3518
    @sushamaamladi35187 ай бұрын

    माझ्या गोव्याच्या भुमीत ....ह्या कवितेची चाली अनुराधा पौडवाल व सुरेश वाडकर यांनी गायलेल्या काळ्या मातीत मातीत तिफन चालते,तिफन चालते इज थयथय नाचते,इज थयथय नाचते ढगढोल वाजवितो ह्या गाण्यावर आहे. स्पृहाचा कार्यक्रम अतिशय सुरेख झाला. तिच्या कविता, तिचा अभिनय, सूर नवा ध्यास नवाचं तिचं सादरीकरण सगळचं मनाला भावतं.

  • @kamatradhika15
    @kamatradhika1510 ай бұрын

    Spruha.... U r really really intelligent.. U speak so well g... It touches straight to the heart❤

  • @shreeyalimaye6838
    @shreeyalimaye683811 ай бұрын

    Immense love for Spruha ! Thanks Suyash for bringing her here 🎉🎉🎉

  • @SuyashW

    @SuyashW

    11 ай бұрын

    You are welcome.

  • @whyfal

    @whyfal

    9 ай бұрын

    😅

  • @truptibawachkar
    @truptibawachkar11 ай бұрын

    कमाल कमाल झाला संपूर्ण Podcast👏👏😂....आणि सर्वात आवडती गोष्ट म्हणजे स्पृहा मॅमनी जी पु.ल.देशपांडे,वसंतराव देशपांडे आणि इतर मान्यवर मंडळीं सोबत राहता आले असते तर जे सांगितले ना ते खूपच छान आहे.....👏🙌🙂

  • @Dr_hems
    @Dr_hems9 күн бұрын

    कसली भारी आहे ही मुलगी ..किती छान मराठी मुलाखत...पहिल्यांदा येवढे सुंदर मराठी शब्द ऐकले नाहीतर आजकाल फार इंग्रजी बोलले जाते मधे मधे. ..स्पृहा म्हणजे कविता असा छान समीकरण झालंय आमच्या साठी आता.फार आवडली ही मुलाखत मला..love स्पृहा❤.

  • @rasikamarle6201
    @rasikamarle620111 ай бұрын

    We should make marathi version of Midnight in Paris🌃🗼.. Would love to be part of it...midnight in Pune!!

  • @_.Swaraliiiiiii._
    @_.Swaraliiiiiii._11 ай бұрын

    29:45 we want full poem on your channel @spruha!!! ❤

  • @user-wn8bf4kl9x
    @user-wn8bf4kl9x11 ай бұрын

    श आणि ष मधला फरक ऐकताना खरंच खूप छान वाटलं. हल्ली सगळेच श झाले आहेत

  • @shashikantmhatre9680
    @shashikantmhatre968011 ай бұрын

    Spruha जोशी मुलाखत छानच, एकदमच झकास!

  • @snehalbhise2336
    @snehalbhise233611 ай бұрын

    Very nice episode... Thanks for this. Since you ppl brought up the topic of music timeline over the decades, plz invite Kaushal Inamdar if possible. You ppl will have good discussion on Music Era. ☺️

  • @anchoranita
    @anchoranita11 ай бұрын

    Wah... This is amazing interview totally loved it.. 😍मज्जा आली खूपच पूर्ण गप्पा गोष्टींमध्ये रमून गेलो ❤❤

  • @questfornone6792
    @questfornone679211 ай бұрын

    This was one of my favorite episodes! Spruha mala junior hoti shalet ani ajun tila balashri award milala tevha falakavarchi ti news lihileli athawtey. Ek dadarkar tyat.. Mhanje full nostalgia!!! ❤️ khup sundar astat tumche podcasts ani ekandarit mandani!

  • @sp-sachinpole
    @sp-sachinpole5 ай бұрын

    खूपच छान सुंदर, एक अभिनेत्री, अँकर, कवी, अशा बऱ्याच भूमिका खुप छान पने बजावतात स्पृहा जोशी त्यात आज मुलाखत मेजवानी गप्पा गोष्टी 🥰😊🙏💕 मनःपूर्वक आभार आपले सर्वांचे why फळ ❤

  • @cancer4684

    @cancer4684

    5 ай бұрын

    Spruha ahech versatile far better than most of the shit actresses of Marathi industry. Tila je filmmadhe ghet nahit, he tyanche bad luck. Actresses like Sai, Priya are lucky not versatile like spruha.

  • @tusharmahamuni4777
    @tusharmahamuni477711 ай бұрын

    काळया मातीत मातीत चाल 😂

  • @krupapise550
    @krupapise55011 ай бұрын

    Crab lollipop was the last word😂... n yup I thoroughlly enjoyed the video... I was so engrossed in the content that I found myself getting a emotional roller coaster ride... Spruha is my all time fav. Loved it❤

  • @ranjitavirkar614
    @ranjitavirkar6148 ай бұрын

    स्पृहा व सुयोग आणि प्राची तुमच्या मनमोकळ्या गप्पा अतिशय रंजक कविता , पुलं ची आठवण ७० चा काळ, त्या काळातील महनीय व्यक्ती, त्यांचा एकमेकांशी असलेला मनमोकळा संवाद. जो आज जवळपास थांबला आहे हीच बोचरी जाणीव तरीही या बदलत्या काळाची गंमत स्पृहाने खूप छान सांगितली. कविता कशी अनुभवावी याचे प्रत्यंतर लाजवाब.❤ स्पृहा तुझे कलावंत म्हणून विस्तारणे, शाळा, दादर चौपाटी, चिकट वह्या,दारापुढचा काळ, कवितेला अनुभवणे या गप्पा खूप आवडल्या. मीही तो काळ अनुभवला. अनुभवाचा खजिना लुटला. शेवटपर्यंत लुटला.

  • @suchetajoshi2989
    @suchetajoshi29894 ай бұрын

    क्रॅब लॉलीपॉप Podcast खूप आवडले. स्पृहा आता अजूनच आवडायला लागली आहे..

  • @poojahindlekar4257
    @poojahindlekar425711 ай бұрын

    मला फार आवडले, या पूर्वी असे podcast नाही पहिला. खुप छान ❤

  • @bharatitalwalkar9991
    @bharatitalwalkar99916 ай бұрын

    खुप छान आहे स्पृहा. सोज्वळ, आणि संस्कारी आहे.

  • @kedarrajopadhye6954
    @kedarrajopadhye695410 ай бұрын

    A Spruha...tu atyant sojwal, satwik ani genius aahes...tuz nivedan ani tuzya kavita aprateem...abhinay surekh...khoooop awadtes....❤❤

  • @user-st6kc1uf2i
    @user-st6kc1uf2i11 ай бұрын

    अनेक आठवणींचा कोलाज सुसूत्रपणे ऐकायला आणि पाहायला मिळाला.

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare66799 ай бұрын

    किती छान पुस्तक वाचण ही गंमत असायची,आणि आता मुलांचया हातात मोबाइल असतो ़

  • @anirudhatapkire4523
    @anirudhatapkire45235 ай бұрын

    क्रॅब लॉलीपॉप झाला आहे एपिसोड 😍 खरंच खूप शिकण्यासारखं आहे स्पृहा कडून आणि ती पुन्हा यावी हिच इच्छा आहे, तुम्ही खूप सुंदर काम करत आहात 🙏🏻😊

  • @seemapandit3567
    @seemapandit35675 ай бұрын

    खूप छान वाटले स्पृहा तुला ऐकताना.मलाही माझ्या आईची आठवण झाली

  • @mohiniatre1237
    @mohiniatre12372 ай бұрын

    स्पृहाच्या बोलण्यामुळे कवितेकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला. छान मुलाखत झाली. असेच कार्यशाळा करा. All the best!!!!

  • @sunitawani129
    @sunitawani12929 күн бұрын

    खूप छान! अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी फार randomly व्हायफळ बघितलंय. नित्यानेमानं नाही होत. म्हणजे अगदीच सांगायचं तर कलाकार कोणये यावर ते अवलंबून असतं असं म्हंटलं तर... अगदी खोटं नाही बोलत. खरंच. आज स्पृहा दिसली अन अगदी सरसावून बसले ऐकायला. अतिशय मनस्वी हुशार आणि सर्वांगानं विचार करणारी, भाषेवर प्रभूत्व असलेली ही कलाकार. मला प्रचंड भावते. मालिका असू देत, नाटक, यु ट्यूबर सिनेमा... सर्व माध्यमातून झळाळून उठणारं हे देखणं व्यक्तिमत्व आहे माझ्यासाठी. तिला ऐकून खूप छान वेगळं असं आतून वाटलं. मी 55+ आहे. या generation ला ओलांडून थोडं (?)पुढे गेलेले. पण मला भारी वाटलं आज व्हायफळ ऐकताना. बघताना. अगदी खरंच. मला तिच्या सगळ्याच कविता ऐकायला प्रचंड आवडतं. कविता ही वाचण्यापेक्षा अनुभवायची असते हे तिच्याचमुळे कळलं. कविता ही व्यक्तीसापेक्ष अनुभवता येते किंवा व्यक्ती जे विचार करतात त्या नजरेतून ती अनुभवायला येते. पण काहीही असो, कविता visualize होणं हे शब्दांचं सामर्थ्य असतं हे नक्की. स्पृहानं सांगितले ते सर्व दिग्गज हा अनुभव देतात. स्पृहा म्हणूनच खूप आवडते. स्पृहा तुला भेटायला नक्की आवडेल. व्हायफळ खूप शुभेच्छा 👍🌹

  • @RainbowbabyOvee
    @RainbowbabyOvee11 ай бұрын

    Spruha tai la kadhipan kuthepan kitihi vel aiku shakate me. My favorite ❤❤❤

  • @MILINb3E
    @MILINb3E5 ай бұрын

    किती प्रगल्भ आहे ही मुलगी, स्पृहा....❤❤❤

  • @sanjaymadhukar4913
    @sanjaymadhukar491311 ай бұрын

    क्रॅब लाॅलिपाॅप पर्यंत पूर्ण पॉडकास्ट बघितला आणि ऐकला.खूपच छान अनुभव, मनापासून एंजॉय केला .स्पृहा नेहमीप्रमाणेच प्रसन्न आणि खेळकर.मस्त वाटतंय.... पुन्हा अशीच छान भेट व्हावी.

  • @shailadeokar2348
    @shailadeokar234810 ай бұрын

    तुला तुझ्या मित्रा ने विचारलें दाराच्या पलिकडे तुला काय दिसते?तु खुप सुंदर बोललीस.मला काय वटले तु म्हणशील मी मंत्र मुग्ध झाले. पण पुन्हा जागी झाले दाराच्या पलीकडील तो सुंदर निसर्ग ही मला बोलावतो.जणू तो सांगतोय आतले बहुमुलय मोती घेवुन या निसर्गात ये अन् तुझ्या भावना कागदावर उतरव.अग तु खुप महान आहेस.विदुशी आहेस.मी हे वर लीहील त्या बद्दल क्षमाकर. माझ वय ७० च आहे

  • @manishagogate1061
    @manishagogate106111 ай бұрын

    खूप छान.... अत्यंत गुणी आणि आनंदी अभिनेत्री

  • @gauripotdar616
    @gauripotdar61611 ай бұрын

    Aha...what a fantastic podcast it was ..total nostalgia...."कुमार कलाकेंद्र" & " गाथा बलिदानची " कमाल आठवणी ... Thanks....it was trip to school days.. childhood... & thanks for mike to प्राची 😊

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande880611 ай бұрын

    Maja aali. Lahanpancha athvani jagya zalya. Spruha Josht mast aahe. Khup Chan bolte.🎉

  • @poojachinchole8803
    @poojachinchole88037 ай бұрын

    She is brilliant!! Her sense of music, poems is amazing❤

  • @manishakulkarni6192
    @manishakulkarni61925 ай бұрын

    😂😂crab lollipop... स्पृहासोबतच्या गप्पा मस्त रंगल्या..मजा आली..

  • @user-ro3hq2bg2t
    @user-ro3hq2bg2t5 ай бұрын

    खूपच सुंदर स्पृहा हा episode संपूच नये असं वाटत होतं आणि तू मला कविता कशी वाचावी हा सुंदर अनुभव विलास.Thank you.

  • @kvisualtree
    @kvisualtree11 ай бұрын

    Wonderful Episode. Admire Spruha Joshi. Amazing and beautiful personality.

  • @sanjaypalnitkar9533
    @sanjaypalnitkar953311 ай бұрын

    खूप भारी, एकच नंबर, podvast मधल्या अनेक गोष्टी relate करू शकलो, कविता नेहेमीच आवडतात, पण आज त्यांच्याकडे बघायचा नवा दृषटीकोन मिळाला, thanks स्पृहा ❤

  • @bhaktikadam703
    @bhaktikadam7035 ай бұрын

    अद्भुत दरवाजाच्या पलीकडे जे विचार होतं ते मस्त होतं... म्हणजे exactly अस ज्यावेळी 'भाई' बघितला होता त्यावेळी वाटलं की काय मस्त... येवढ दिग्गज लोक एकत्र ... त्यांच्या गप्पा... मैफिली....

  • @neetapurandare5599
    @neetapurandare559911 ай бұрын

    स्पृहा खूपच आवडते.छान भाग 👍👍 आम्ही चौघी बहिणीही दापोलीच्या A.G.High School मध्ये शिकलो आहोत त्यामुळे हे podcast बघताना खूप मजा आली 👍👍

  • @shobhachitale9194
    @shobhachitale91948 ай бұрын

    मला आवडणारा पदार्थांच्या नावानं की रँब लालीपांंपनं कार्यक्रम संपवणं हे फारच उत्तम, मजेशीर होतं. कार्यक्रम आवडणारा होता कारण या गप्पा संपूर्णपणे अकृत्रिम ,मनमोकळ्या , मधेमधे भरकटणआर्यआ असणार आहे हे माहीत होतं.त्यात स्पृहा ची भ्रमंती कुठेही नेऊ शकते असा अनेकवेळचा अनुभव आहे. खूपच मजा आली.धन्यवाद म्हणणार नाही कारण ते क.त्रिम आणि कार्यक्रमाशी विसंगत होईल.

  • @madhurinbamane1420
    @madhurinbamane14203 ай бұрын

    फार गुणी अभिनेत्री..रमाबाई रानडे - स्पृहा..👋👋💐💐मराठी ही खूप समृद्ध आणि गोड भाषा आहे..खूप छान मुलाखत..👋👋

  • @ajaykulkarni573
    @ajaykulkarni57311 ай бұрын

    Sensitive lokan barobar zalelya sensitive sanwad ......ek number.......very nice and thanks a lot..for sharing very openly.

  • @aryaharesh1788
    @aryaharesh178810 ай бұрын

    गप्पा खूप च छान झाल्या,रंगल्या मुळात त्या निखळ गप्पा वाटल्या फारच धम्माल आली बघताना . आणि अगदी शेवटपर्यंत बघीतल्या. खूप काही समजलं या गप्पांमधून ,त्या साठी तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद .स्पृहा सुयोग, तुझ्या कविता ही खूप भावल्या. आवाज खूप छान आहे . तुझ्या बालपणीच्या गोष्टी खूप जवळच्या वाटल्या, बालपणीत घेऊन गेल्या ,माझं ही बालपण गोखले रोड दादर चे , माझ्या आजीकडे. समुद्र, शिवाजीपार्क फारच फार जिव्हाळ्याचे,आजी बरोबरचे दिवस आठवले म्हणजे ते सोबतच आहेत. खरच मांजरीचा आवाज लहान बाळांसारखाच असतो .

  • @varshajoshi1722
    @varshajoshi17224 ай бұрын

    फारच भारी!!!👍👍👍👍👍👍👌👌😍💐 किती सहज सुंदर गप्पा ..... स्पृहा आहेच गोड!❤️🌹

  • @mayakatti3437
    @mayakatti343711 ай бұрын

    Mast Episode of Spruha. Her Childhood with Grandfather and motther, School days. Love passion of Marathi language. Her wishing of imagine in Spacious Special Door. She is my favorite. Mastch.

  • @Jaymala1401
    @Jaymala14016 ай бұрын

    मला अतिशय आवडते स्पृहा.... तिची मुलाखत पूर्ण बघितली हे सांगायला मला तुम्ही सांगितलेला शब्द लिहायची गरज वाटत नाही तरी लिहिते क्रॅम लॉलीपॉप.

  • @shilpanarvekar2068
    @shilpanarvekar206810 ай бұрын

    खूप छान, मनमोकळ्या आणि नेहमी पेक्षा वेगळ्या गप्पा. काही प्रमाणात पुस्तके वगैरे माहिती सुद्धा मिळाली. खूप शुभेच्छा 🎉

  • @2010Melodies
    @2010Melodies5 ай бұрын

    Spruha you are truely blessed to have such wonderful set of parents and grandparents..

  • @ankitasurve3001
    @ankitasurve300111 ай бұрын

    मी पण SemiEnglish Medium. इतका nostalgic vaatla. Thank you Spruha❤❤❤❤

  • @shirishbapat181
    @shirishbapat1815 ай бұрын

    Spruha speaks very well, well articulated and impressive. Nice video.

  • @mangssailor
    @mangssailor11 ай бұрын

    प्रिय सुयोग तुमचा हा podcast लै भारी उपक्रम आहे राव! आणि स्पृहा बरोबरच्या गप्पा ही आम्हा श्रोत्यांना मेजवानीच होती. स्पृहाची प्रगल्भता शब्दात वर्णन करणं कठीण आहे. आणि तिने कविता कश्या वाचाव्यात हे जे शिकवलं ना ह्या episode मध्ये ते फारच वेगळी दिशा देऊन गेलं माझ्या कविता वाचनाला!!! त्यासाठी स्पृहाची शतशः धन्यवाद!! अश्याच छान व्यक्ती आणि वल्ली आणत राहा कार्यक्रमात. प्रेक्षक आणि श्रोते म्हणून प्रोत्साहन आम्ही देतंच राहू!!! आणि हो!! शेवटचं आणि महत्वाचं #crablolliop !!!😂😂😂

  • @sai_pallavi9218
    @sai_pallavi921811 ай бұрын

    Khupch chan agdi real ani live tyasobat khup connected ahe interview

  • @Jaymala1401
    @Jaymala14016 ай бұрын

    तुम्ही अतिशय सहज,सुंदर, फार तामझाम न करता मुलाखत घेतली आहे आणि स्पृहा ने ही त्याला अतिशय सहज उत्तरं दिलीएत.

  • @deepakupkarni6188
    @deepakupkarni618811 ай бұрын

    Spruha Joshi mazi aavdati abhinetri. Kavita vachan khup aavdate.

  • @chetanaumarji7609
    @chetanaumarji760911 ай бұрын

    Love the casual approach....

  • @chetanaumarji7609
    @chetanaumarji760911 ай бұрын

    Superb guys....Stay Blessed Always ....looking forward to many more.....yes Want to see Prachi too....

Келесі