नाचत गुरुभजनी | दत्त प्रेमलहरी पद १४३२ | पंत भजन | datta premlahari pad 1432 | nachat guru bhajni
Ойын-сауық
नाचत गुरुभजनी । आम्ही जाऊ निरंजनी ।। धृ० ।।
सहजचि आलों सहजचि जातों ।। राहुनी जनीं विजनीं ।। १ ।।
नाहीं कुणाचा मी माझें न कोणी ।। नाहीं मोह मनीं ॥ २॥
अवधूतकृपें समरस झालों ।। दत्तनिरंजनीं ।।३।।
आम्ही सहज प्रेमाने, आनंदाने, हसत-खेळत, नाचत मजेने पाऊल टाकीत, सद्गुरूच्या भजनानंदात डुलत, स्तुतिस्तोत्रे गात, त्याच्या नामाचा जयघोष करीत, अशी गुरुभक्ति करीत, करीत मायामलरहित अशा शुध्द आत्मस्वरूपाठिकाणी जाऊन, एकरूपच होऊन जाऊ. ।।धृ.।। मी मूळचाच ब्रह्मस्वरूप आहे. मी या पृथ्वीतलावर स्वाभाविकपणेच प्रेम भोगण्यासाठी जन्माला आलो आहे व येथे काही दिवस लोकांमध्ये तर कांही दिवस रानावनांत राहून, स्वाभाविकरित्याच येथून निघून जाईन. आम्ही आमच्या मूळ घरी जातो. तेच आमचे वास्तव्य स्थान आहे. ।।१ ।। विचार करून पाहू गेलो असतां, मी कोणाचाहि संबंधी नाही व माझे येथे कोणीहि नाही. माझ्या मनामध्ये स्त्री, पुत्र, घरदार, आप्त, संपत्ति वगैरेचा मोह मुळीच नाही. अगर यांची मला आसक्ती नाही. माझा मीच एकटा जन्मून, येथून एकटाच निघून जातो. मी कांहीहि बरोबर आणीत नाही व येथून निघून जाताना कांहीहि बरोबर नेत नाही, कोणीहि माझ्याबरोबर येत नाहीत. असा माझा या जगाशी कांही एक संबंध नाही. ||२|| दत्तात्रय गुरूच्या कृपानुग्रहाने मायामलरहित अशा शुध्द दत्तगुरूच्या स्वरूपांत मिळून मी एकरूपच होऊन गेलो ! तो दत्त निराळा, मी वेगळा, असा भिन्न भाव माझ्या ठायी राहिला नाही. ।। ३।।
गायन : जयेश शेटकर
तबला : अजित गांधी
पेटी : एकनाथ गोवेकर
मृदुंग : सचिन परब
टाळ : रवी देशपांडे
चिपळ्या : मिलिंद महाडदळकर
गणेश खराटे यांच्या निवासस्थानी
२१/११/२१
#दत्तभजन #पंतमहाराजभजन #पंतमहाराजबाळेकुंद्री #pantmaharajbalekundri #pantmaharajbhajan #पंतभजन #दत्तप्रेमलहरी #dattapremlahari #भजन #bhajan #आरती #arti #arati #भक्ति #bhakti #दत्तात्रेय #dattatraya #dattatreya #दत्त #datt #datt #भक्ती #pantsampraday #पंतसंप्रदाय #पंतसांप्रदाय #पंथमहाराज #panthmaharaj
Пікірлер: 61
वा.... दादा आगदी भरून आले ऐकून खूपच छान आवाज आहे आपला आगदी नरसोबाच्या वाडीला जाऊंन आल्या सारखे वाटले दादा खूपच गोड आवाज आहे आणि आपल्या बरोबर साथ देणारी मंडळी देखील खूपच गोड गातात मी आपले गाणे खूप वेळा ऐकतो दादा खूप भरून येत 🙏👌👌 दत्त.......
खुप खूप छान, नाचत गुरूभजनी...
खूप सुंदर भजन व आवाज ही, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🎉🎉
उत्तम मस्त । श्री गुरुदेव दत्त ।
Sundr.athi.sundr.sirji
वा बुवा......कायवाणु आता नपुरे हि वाणी.......
एक नंबर भाऊ
खुप छान
अप्रतिम 💐🌹🚩🙏
🙏🙏🙏🙏🙏👌👌
सुंदर चाल ताल सांगलीतून
👌
उत्तम हो....😌😌😌😌😌😌
अमये खूप खूप छान..
छान
अप्रतिम तबला वादन खूप छान
दंडवत प्रणाम..... गुरुदेव दत्त.
श्री गुरुदेव दत्त..असा आवाज ..आणि ..तबला ऐकला नाही... दत्त.. ओम नमह शिवाय
🚩🌹🙏 !! श्री दत्त पंत महाराज कृपा...!!! 🙏🌹🚩
वाद्य वृंद जबरदस्त
Khup sundar Avadhut chintan shri Gurudevdatta.
❤ नादखुळा ❤🎉🎉🎉🎉अमा आवाज ,तबला वादन कुठे ऐकला नाही❤❤❤ सर्वांचे मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉
🙏 va khupch Chan pad gaele aahe. II Shre.Gurudev Datta II
खूप छान श्री गुरुदेव दत्त
अवधूत छानच
छानच
अतिशय सुंदर
खूप छान मन प्रसन्न झाले आयकुन
सुंदर आलाप 👋🏻👋🏻
अवधुत चिंतन गुरु देव दत्त
गुरूदेव दत्त खूप छान
वा दादा गायन दत्त अवधूत 🙏
गुरूजी खूप सुंदर आवाज❤❤❤
श्री गुरूदेव दत्त
वा खूपच छान दत्त🙏
Ahahaahahah खुप सुंदर सादरीकरण 🌷🌷🙏🙏🙏🌷🌷
अप्रतिम आवाज आहे दादा ❤
Mast khup chan🙏
🙏🙏🙏
Very nice Datt
जबरदस्त
भजनाची निवड छान
व्वा सुंदर 👌👍🌹🌹🙏
दत्त
अप्रतीम सादरीकरण दादा.......अवरणानिय.......
दादा खूपच सुंदर आवाज.
Khup chan
Khoop chan
👌👌👌👌👌👌👌👍
Apratim 🙏🚩
Nice song 🎵 👌 video 👌 👌 👌 me and thanks at Belgaum
Mast😂
Very and only very nice
👌👌
Superb
Gayak ani vadyavrund kuthle aahet
हार्मोनियम नोटेशन पाठवावे
sunder,
@manohardehare
10 ай бұрын
Sundr.sirji.
खूप छान