Mulansathi Mul Vhava - मुलांसाठी मूल व्हावं -

मुलांविषयी आणि पालकत्त्वाविषयी भरभरून बोललं जातं, लिहिलं जातं, शिकवलं जातं... या गडबडीत आणि तणावात आपण त्या पालकत्त्वाचा आनंद घेण्याचं विसरूनच जातो. मुलंही लहानपणाचा आनंद धड घेऊ शकत नाहीत ना आपण मोठेपणाचा 😃
एक सकारात्मक आणि मानसिक दृष्टीने सक्षम समाज घडवण्यासाठी मुळातच सगळ्याचा पाया हा 'आनंद' असावा, तो लहान लहान गोष्टींमधूनही मिळवता यावा, त्याप्रति आपण कृतज्ञ असावं, समाधान नेमकं कशात आहे हे मुलांना कळावं आणि वळावं हे असं सगळं मला वाटत असतं. माझ्याही मुलाबरोबर मी मोठं होण्याचा प्रवास अनुभवत आहे आणि त्याचबरोबर सलग साडेतीन वर्षे 'गंमतकट्टा' नावाचा एक मस्त उपक्रम ४ ते १० वयोगटातल्या जवळजवळ ४० बालदोस्तांसाठी मुलुंडमध्ये राबवून तिथूनही मी आणि माझ्या मैत्रिणींनी स्वतःला त्या चिमुकल्यांच्या सहवासाने समृद्ध करून घेतलं. त्याप्रति कृतज्ञता म्हणून ही कविता - 'मुलांसाठी मूल व्हावं'

Пікірлер: 1

  • @maithilimulay4672
    @maithilimulay46727 ай бұрын

    सुंदर...

Келесі