मन हे गुरुभजना सोकले | पंत महाराज बाळेकुंद्री पद | दत्त प्रेमलहरी पद १२३७ | datt premlahari pad 1237

Музыка

मन हे गुरुभजना सोकले ।। धृ० ।।
मिथ्या संसार जाणुनी हृदयीं ।। गुरुभजना विकलें ।। १ ।।
शब्दभीति सर्वही सांडुनी ।। निःशब्दीं रमलें ।। २ ।।
वाचामनातीत दत्तावधूत ।। नित्य भजनीं रंगलें ।। ३ ।।
श्री बाल अवधूत पंत भजनी मंडळ, कुरुंदवाड
गायक - संजय जोशी
तबला वादक - रामदास कुलकर्णी
पेटी वादन - अमित आंबल
एकतारी - प्रल्हाद आंबले
साथीदार - सुनिल माळी, अमर आंबले, संतोष आंबले, अनिल आंबले, सदानंद आंबले, धनंजय पोतदार, अवधूत आंबले
भैरववाडी पंत मंदिर, कुरुंदवाड
३ एप्रिल २०२१
*************************
सहजस्थितीतून उठलेले प्रेमोद्गार गुरूभजनच होय. अशा गुरूमजन-भक्तीत माझे हे मन पूर्ण तल्लीन झाले आहे. मला गुरूचे भजनच प्रिय वाटते. ।।धृ.।। हा दिसणारा, जन्ममरणाच्या फेऱ्यांत टाकणारा, दुःख कष्ट माया असा संसार, अगर दृश्य हा व्यवहार दोरीवरील सर्प भासा प्रमाणे खोटाच आहे, हे गुरूकृपे मी जाणून, त्याची आसक्ती सोडून माझे मन गुरू भजनाच्या पूर्ण अधीन झाले आहे. मला त्याच्या भजनाचीच गोडी लागून राहिली आहे. ।।१।। शद्ध पढून, अगर ते श्रवण करून, म्हणजे शास्त्रातील शद्बज्ञान पाहून, शास्त्रांत सांगितलेल्या आज्ञा, कर्मविधि, नियम हे जर आपल्या कडून बरोबरी पाळले गेले नाही तर, आपल्यावर देवाला कोप तर होणार नाहीना ! अशी खोटी भीती त्या शब्दापासून उत्पन्न होते. हे मी अनुभवाने जाणून हा खोटा शद्वभ्रम टाकून, शब्दातीत निःशब्द वस्तू असे जे ब्रह्मस्वरूप आहे, त्या स्वरूपांत माझे मन रममाण झाले ! ||२॥ परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या चार वाचेच्या व मनाच्या पलीकडचे जे ब्रह्मस्वरूप आहे. असा साक्षात, ब्रह्मस्वरूपच माझा सद्गुरू बालमुकुंद आहे. त्या सद्गुरूच्या भजन भक्तीत माझे मन पूर्ण रंगून, एकरूपच होऊन गेले. || ३ ||
*************************
#दत्तभजन #पंतमहाराजभजन #pantmaharajbhajan #पंतभजन #दत्तप्रेमलहरी #dattapremlahari #भजन #bhajan #आरती #arti #arati #भक्ति #bhakti #दत्तात्रेय #dattatraya #dattatreya #दत्त #datta #datt #भक्ती #pantsampraday #पंतसंप्रदाय #पंतसांप्रदाय #पंथमहाराज #panthmaharaj #अवधूत #अवधुत #avadhut #avdhoot #पंतमहाराजबाळेकुंद्री

Пікірлер: 5

  • @dattagurav2886
    @dattagurav28862 жыл бұрын

    मन हे दत्त भजन ऐकले दत्त

  • @amolsathe8652
    @amolsathe86523 жыл бұрын

    🙏🙏

  • @digambardesai897
    @digambardesai8973 жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त

  • @sureshjawale5748
    @sureshjawale57483 жыл бұрын

    अप्रतिम! श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त--------दत्त सोऽहं दत्त 🙏

  • @shirishkumbhar9985
    @shirishkumbhar99853 жыл бұрын

    श्री पंत समर्थ 🙏🙏

Келесі