महाभारत रहस्ये : दुर्योधन, कर्ण आणि बर्बरीक | गुप्त मंदिरे & कथा | Twig Talks Ft. Samir Thite | Ep10

महाभारतातील सर्वात गुंतागुंतीच्या पात्रांपैकी एक, दुर्योधन, त्याच्या युद्धनीती आणि निर्णयांमध्ये अनेक रहस्ये लपवून ठेवतो. या रोमांचक चर्चेत, साहित्यिक आणि अनुवादक श्री. समीर अनिल थिटे यांच्यासोबत आपण दुर्योधनाच्या आयुष्याचा आणि त्याच्या युद्धाचा वेध घेणार आहोत.
Host: Dr. Prasanna Deochake
Guest: Shri. Samir Anil Thite (Dattaprasad Thite)
या भागांमध्ये आपण काय शोधून काढणार आहोत?
• दुर्योधनाची गुप्त मंदिरे: यापूर्वी ऐकलेल्या कथांपेक्षा वेगळे, दुर्योधनाशी संबंधित गुप्त मंदिरांचा आणि त्यांच्या रहस्यांचा शोध घेणार आहोत.
• कर्ण, बर्बरीक आणि इतर पात्रांच्या कथा: दुर्योधनाच्या युद्धाशी निगडीत असलेल्या कर्ण, बर्बरीक आणि इतर महत्त्वाच्या पात्रांच्या अज्ञात कथांमध्ये बुडून जाणार आहोत.
• दुर्योधनाचा इतिहास - नवीन प्रकाश: दुर्योधनाच्या इतिहासावर नवीन प्रकाश टाकणारी माहिती जाणून घेऊन त्याच्या निर्णयांचे आणि कृतींचे वेगळे विश्लेषण करणार आहोत.
• ग्रंथांचे महत्त्व: महाभारतासारख्या ग्रंथांमध्ये दुर्योधनाच्या चित्रीकरणाचा आणि त्याच्या प्रतिमेचा कसा परिणाम झाला, हे समजून घेणार आहोत.
• अभिमन्यूचा मृत्यू आणि इतर वादग्रस्त विषय: महाभारतातील सर्वात वादग्रस्त विषयांपैकी एक असलेल्या अभिमन्यूच्या मृत्युचा आणि इतर वादग्रस्त प्रसंगांचा सखोलपणे विचार करणार आहोत.
• कल्कि अवतार: भविष्यवाणी आणि पुराणांच्या दृष्टीने कल्कि अवताराची भूमिका, त्याच्या आगमनाची कहाणी, आणि युग परिवर्तनातील त्याचे महत्त्व यावर चर्चा करू.
दुर्योधनाच्या जीवनातील या अद्भुत आणि रहस्यमय गोष्टींचा अनुभव घ्या! #TwigTalks Podcast मध्ये सहभागी व्हा आणि साहित्यिक श्री. समीर थिटे यांच्यासोबत या रोमांचक चर्चेत सामील व्हा.
आजच Twig Talks Podcast सब्सक्राइब करा आणि हा पूर्ण भाग KZread वर पहा!
समीर अनिल थिटे (दत्तप्रसाद थिटे) यांनी लिहिलेली पुस्तके तुम्ही येथे वाचू शकता:
www.amazon.in/Renunciation-Ot...
www.amazon.in/Dattaamrut-Poet...
www.amazon.in/Envelope-Dattap...
www.amazon.in/Shri-Charitra-S...
#दुर्योधन #कर्ण #बर्बरीक #कलकी #महाभारत #TwigTalks #समीरथिटे #Podcast #History #IndianMythology #HiddenTemples #DuryodhanTemples #Kalki2898ad #Untoldstories #kalki #abhimanyu #trendingpodcast #mahabharatcharacters #Hiddentruths #UnexploredMahabharatStories #महाभारतकथा #पौराणिककथा #पुराण #भारतीयसंस्कृती #मराठीपॉडकास्ट #धार्मिकस्थळ #अज्ञातकहाण्या #इतिहास
दुर्योधन | महाभारत | गुप्त मंदिर | अज्ञात कहाण्या | धार्मिक स्थळ | Sameer Thite | Twig Talks Podcast | मराठी पॉडकास्ट | Untold Stories | Indian Mythology | History | Karna | Barbaric | Kalki | Mysteries | Kalki 2898AD | Mahabharat Podcast Marathi | Duryodhan

Пікірлер: 46

  • @sagard1089
    @sagard108918 күн бұрын

    दुर्योधनाचे मंदीर केरळमधे कोल्लम जिल्ह्यात आहे.

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar410416 күн бұрын

    अभ्यासपूर्ण चिंतन मनन केले आहे.

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar410416 күн бұрын

    सर प्रथम आपले धन्यवाद.

  • @pallavimahajan9814
    @pallavimahajan981410 күн бұрын

    खूपच अप्रतिम माहिती... अशा अनेक विषयावर चर्चा होऊ द्या... बरीच नवीन मोलाची माहिती मिळते... थिटे सरांचं कौतुक, अभिनंदन आणि त्यांना अभिवादन.. मुलाखत कार Dr. प्रसन्न देवचके यांचं विशेष कौतुक... व्यवसायाने डॉक्टर असून अध्यात्मिक विषयाबद्दल ची जागरूकता वखाणण्यासारखी आहे... आपले व आपल्या टीम चे अभिनंदन 🎉🎉🎉

  • @dattaprasadanilthite6664

    @dattaprasadanilthite6664

    10 күн бұрын

    धन्यवाद आणि प्रणाम

  • @TWIGmarathi

    @TWIGmarathi

    9 күн бұрын

    खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @saurabhg6331
    @saurabhg633116 күн бұрын

    Apart from the criticism of intellectual critical thinkers the whole video is amazing with lot of wonderful information. Logical reasoning, questioning, critical thinking, rationalizing should be encouraged and not demeaned as "fake narratives'.

  • @ashwinikaranjavkar2840
    @ashwinikaranjavkar284013 күн бұрын

    Sunder mahiti dili bhartiy sanskriti cha theva saglyana kalayla hava

  • @bylagu
    @bylagu15 күн бұрын

    नमस्कार शुभ मध्यान्ह प्रसन्न आणि समीरजी. माझा समीरजी यांना एक प्रश्न आहे की पुण्याच्या भांडारकर संस्थेत कार्यरत असणारे संस्कृत तज्ञ थिटे सर हे आपले कोणी लागतात कां ।

  • @bylagu
    @bylagu15 күн бұрын

    नमस्कार, मी मृत्युंजय आणि युगंधर या दोन पुस्तकांची पारायणं करूनही मला बर्बरिक ही व्यक्तिरेखा कुठेही वाचनात आली नाही.

  • @dattaprasadanilthite6664

    @dattaprasadanilthite6664

    15 күн бұрын

    नमस्कार, वेदव्यासरचित महाभारतात बर्बरिकचा उल्लेख जरी नसला, तरीही स्कंदपुराणात आहे. बर्बरिकासारखाच घटोत्कचाचा अजून एक पुत्र अंजनपर्व याचा द्रोणाचार्यपुत्र अश्वत्थाम्यानं आणि अर्जुनपुत्र इरावान याचा अलंबुश यानं कुरुक्षेत्रात युद्धात वध केल्याचे उल्लेख महाभारतात आहेत. स्कंद पुराणात मात्र बर्बरिक हे एक उल्लेखनीय पात्र आहे. प्राचीन व्यक्तिरेखांचा मागोवा घेणारा मी एक विद्यार्थी असल्यानं मी माझा शोध केवळ ठराविक पुस्तकांपुरता मर्यादित न ठेवता त्यांच्याबद्दलच्या लोककथांनाही आदरपूर्वक स्विकारतो. राजस्थानात लाखो लोक बर्बरिक यांची भगवान श्री खाटूश्यामजी या नावानं अत्यंत मनोभावे पूजा करतात. त्या उपासकांच्या भावनांच्या भावनांचाही मी आदर ठेवतो. भांडारकर संस्थेतील संस्कृत तज्ञ श्री. थिटे यांच्याशी माझा परिचय नाही. अभिप्राय आणि चर्चेबद्दल धन्यवाद...!

  • @pushpaphadke2197
    @pushpaphadke219714 күн бұрын

    गोव्याच्या उत्तर सीमेवर रावण नावाचे गाव आहे, मंदिर असल्याचे ऐकले नाही. पण एका ठिकाणी मंदोदरीचे देवूळ आहे तसेच एक देवकीकृष्णाचेही देवूळ आहे.

  • @ganeshkale2804
    @ganeshkale280414 күн бұрын

    सोनाळवाडी माझे गाव आहे दुर्गाव जवळच आहे आणि देशात फक्त दोनच मंदिरे आहेत दुर्योधनाचे त्यातील एक माझ्या गावा शेजारी

  • @dattaprasadanilthite6664

    @dattaprasadanilthite6664

    Күн бұрын

    अभिमानास्पद वारसा आहे तुमच्या गावाचा...

  • @madhurimali9653
    @madhurimali965316 күн бұрын

    Sir, 🙏🏻जांबुवंत कडे असणारा स्यमंतक मणी म्हणजे कोहीनुर हिरा आहे का ???

  • @dattaprasadanilthite6664

    @dattaprasadanilthite6664

    15 күн бұрын

    अतिशय छान प्रश्न विचारलात आपण... अनेक ठिकाणी तसं वाचनात आलेलं आहे. पण ठोस आणि विश्वसनीय पुरावा अजून सापडत नाहीये. विष्णूपुराण आणि भागवतपुराणात स्यमंतक मण्याचे उल्लेख आढळतात. परंतु 'कोहीनूर म्हणजेच स्यमंतक मणी आहे का?' याविषयी मी अनेक ठिकाणाहून माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आहे.

  • @madhurimali9653

    @madhurimali9653

    15 күн бұрын

    @@dattaprasadanilthite6664 धन्यवाद 🙏🏻

  • @vikrampalkar1516

    @vikrampalkar1516

    2 күн бұрын

    प्रणिपात् । स्यमन्तकमणि हा सूर्यदेवांनी सत्राजित राजास प्रदान केला होता. जो स्वर्णोत्सर्ग करीत असे. तसेच हा मणि रक्तवर्णी चिन्तामणि किवा मणिक्यासम वर्णाचा होता. त्यामुळे हा कोहिनूर नसावा असे मत असू शकते. कोहिनूर हा हिरा दक्षिण भारतवर्षातील एका कालिका मंदिरातील देविविग्रहाच्या डोळ्यामध्ये स्थित होता असे ऐतिहासिक मत आहे.

  • @prasannjeetdikshant2013
    @prasannjeetdikshant201314 күн бұрын

    आपल्या संस्कृतीनुसार बर्बरिक चा मराठी किंवा संस्कृत मध्ये काय अर्थ होतो?

  • @dattaprasadanilthite6664

    @dattaprasadanilthite6664

    14 күн бұрын

    एक प्रकारची तुळस (Clove basil)

  • @user-hv9lc7ig1i
    @user-hv9lc7ig1iКүн бұрын

    उत्तर भारतात कर्ण किल्ला, कर्ण घाट आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहोळ जवळ पांडव पोफळी गावी पांडव आणि द्रौपदीचं मंदिर आहे. लाक्षगृहातून बाहेर पडून पांडव तिथं भुयारातून बाहेर आले अशी कथा आहे.

  • @dattaprasadanilthite6664

    @dattaprasadanilthite6664

    Күн бұрын

    धन्यवाद...माझा महिन्यातून एकदा येण्याजाण्याचा रस्ता मोहोळहून आहे. नक्कीच या ठिकाणी जाऊन येईन.

  • @user-hv9lc7ig1i

    @user-hv9lc7ig1i

    21 сағат бұрын

    @@dattaprasadanilthite6664 🙏 आपल्या स्वीकृती बद्दल आभार 🙏 उत्तम माहिती 🙏

  • @user-hv9lc7ig1i

    @user-hv9lc7ig1i

    20 сағат бұрын

    @@dattaprasadanilthite6664 युधिष्ठिर तथा धर्मराज कौरवाना सुयोधन, सुशाशन म्हणत असे. बाकी, महाभारताचे म्हणाल तर सगळे कौरव एकट्या भीमानं मारलेत. अर्जुनानं तर निशस्त्र योद्धा्यांवर बाण चालवलेत. पहा, भीष्म निशस्त्र होते, कर्ण चाक रुतलं म्हणून निशस्त्र तसाच जयद्रथ 😀 पण उगाचच अर्जुनाचा टेम्भा मिरवला गेलाय. महाभारताचा खरा नायक भीम आहे आणि महानायक भगवान श्री कृष्ण! दुर्योधनाने पांडवाशिवाय कुणालाही त्रास दिला नाही, तो अतिशय महान बलशाली मल्ल, गदायोद्धा होता. स्वतः च्या अधिकारासाठी लढण आणि त्यासाठी वाट्टेल ते करणं यालाच तो क्षात्रधर्म मानत होता. भीम व श्री कृष्ण सोडले तर कौरव सर्व बाबतीत पांडवाना सरस होते!

  • @adnyanandmore9156

    @adnyanandmore9156

    17 сағат бұрын

    हो. आहे। ते। आमचे। कूलदैवत आहे. पांडव पोफळी

  • @user-hv9lc7ig1i

    @user-hv9lc7ig1i

    17 сағат бұрын

    @@adnyanandmore9156 🙏🚩

  • @vikassawant005
    @vikassawant00519 күн бұрын

    Barbarik haa Vedic hota mhanjech pandav Vedic hote ani kaurav mulnivasi , bhavanda navhate kaurav pandav , pan Vedic mhanjech brahmanan ni khotyaa anek katha rachun thevlya aahet

  • @avinashkale1261

    @avinashkale1261

    19 күн бұрын

    ब्राम्हण द्वेषाची मळमळ थांबत नसेल तर औषध उपचार घ्या..

  • @TheHinduGroup007

    @TheHinduGroup007

    19 күн бұрын

    Aho pandav pan swatah kuruvanshiya mhanjech kaurav hote….. sakkhe chulat bhau hote

  • @abhiii777

    @abhiii777

    17 күн бұрын

    पहिलं हे जाणून घ्या की बर्बरिक अश्या नावाचं कोणतंही पात्र वेदव्यास लिखित महाभारतात नाहीये किंवा त्या पात्राविषयी जी कहानी सांगितली जाते तशी कोणतीच कहानी महाभारतामध्ये नाही. व्हॉट्सअँप facebook वरच्या इतिहासकारांचे लेख वाचण्यापेक्षा मूळ ग्रंथ वाचा. अशिक्षितासारखे राहू नका.😊

  • @abhiii777

    @abhiii777

    17 күн бұрын

    पहिलं हे जाणून घ्या की बर्बरिक अश्या नावाचं कोणतंही पात्र वेदव्यास लिखित महाभारतात नाहीये किंवा त्या पात्राविषयी जी कहानी सांगितली जाते तशी कोणतीच कहानी महाभारतामध्ये नाही. व्हॉट्सअँप फेसबुक वरच्या इतिहासकारांचे लेख वाचण्यापेक्षा मूळ ग्रंथ वाचा. अशिक्षितासारखे राहू नका.😊

  • @dattaprasadanilthite6664

    @dattaprasadanilthite6664

    17 күн бұрын

    Though Barbarik hasn't been mentioned in the Mahabharat by Vedvyasa, yet the Skanda Puran mentions him. The Mahabharat mentions Anjanparva, the other son of Ghatotkach (just like Barbarik), who was killed by Ashwatthama in the war at Kurukshetra. However, Barbarik became a notable character during the Skanda Puran. I am a student of history all my life. Hence i will not restrict my information only to specific books. I respect and accept all versions of the Mahabharat or any holy books and even folklores. Millions of people worship Barbarik as Shri Khattu Shyamji in Rajasthan. Even he is a " Kuldaivat" for many communities in Rajasthan. We should also respect the sentiments of people who worship him. I would suggest you to surely visit the temple and feel its energy. We shouldn't deny the existence of any energy just because of not mentioned in a particular book. Thanks for the feedback and discussion.

  • @sourabhshinge5314
    @sourabhshinge531416 күн бұрын

    krishna sarkha kapati ani jativadi manus nahi

  • @Bharatyodhha

    @Bharatyodhha

    16 күн бұрын

    What's app university 😂

  • @sagarmandake4393

    @sagarmandake4393

    15 күн бұрын

    असुदे

  • @surendraj8752

    @surendraj8752

    13 күн бұрын

    Buddha sarkha kapati aani jaativadi Manus nahi, ghe amhi pan type karu shakto ok?

  • @sourabhshinge5314

    @sourabhshinge5314

    13 күн бұрын

    @@surendraj8752 type karun satya badalat naste tucha krishna kay vishnuche sagle avtar kapati ahet. Saglyat changla kutla dev asel tar te fakt mahadevch ahet. Te krishna sarkhe kapti jatiwadi nahit. Te saglyanche ahet

  • @surendraj8752

    @surendraj8752

    13 күн бұрын

    @@sourabhshinge5314 tuza Buddh pan Vishnu cha ch ek Avatar aahe he visaru nakos. Brahma-Vishnu-Mahesh he Hindunche aadi Dev aahet.

  • @dhanashreekelshikar5866
    @dhanashreekelshikar586613 күн бұрын

    किती बाळबोध चर्चा आहे fake narrative आहेत पण बरबरिक या नावाशी काही संबंध वाटत नाही .

  • @dattaprasadanilthite6664

    @dattaprasadanilthite6664

    12 күн бұрын

    'बाळबोध' या अगदी योग्य शब्दांत वर्णन केलंत...मनापासून आभार... बाळबोध = सर्वांना समजेल अश्या संदर्भांची चर्चा...अगदी लहान वयोगटालाही समजेल अशी चर्चा...लोककथा या अश्याच असतात...सर्वांना समजणार्‍या... आणि fake narrativeचं म्हणाल, तर barbaric या शब्दाची इंग्रजी भाषेनं केलेली ही मोडतोड कशी अयोग्य आहे, हे कृपया तुम्हीच दाखवून देऊ शकाल का...?

Келесі