No video

कुकर मध्ये बनवा सुक्क मटण🤤 | बघताच तोंडाला पाणी सुटेल | Mutton Sukha Recipe

#MuttonSukka #मटणसुक्का #vandascooking
.
साहित्य
• 300 ग्राम मटण
• कोथींबीर
• 5 ते 6 पाकळ्या लसूण
• 2 ते 3 अद्रक चे तुकडे
• 1 दालचिनीचा तुकडा
• 4 मिरे
• 4 लवंग
• सुक्क खोबरं
• 2 हिरवी मिरची
• 2 कांदे
• 1 मोठा टोमॅटो
• अर्धा चमचा हळद
• 1 चमचा लाल मिरची पावडर
• 1 चमचा धनिया पावडर
• अर्धा चमचा जीरा पावडर
• 1 चमचा गरम मसाला
• 1 चमचा मटण मसाला
• चवीनुसार मीठ
• तेल 2 मोठे चमच
कृती
Stpe 1 - प्रथम मिक्सरच्या भांड्यात कोथींबीर 5 ते 6 पाकळ्या लसूण ,2 ते 3 अद्रक चे तुकडे ,1 दालचिनीचा तुकडा,4 मिरे,4 लवंग,सुक्क खोबरं, 2 हिरवी मिरची टाकून घेऊन ते सर्व मिक्सरमधून वाटून घ्यावे .
Step 2 - आता 300 ग्राम मटण घ्यावे त्यामधे अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालावे आता मिक्समधून काढलेले वाटण घालावे सर्व एकत्र करून 30 मिनिटासाठी मॅरीनेट साठी ठेऊन द्यावे
Stpe 3 - आता गॅस वर कुकर ठेवावे त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकावे . तेल थोड गरम झाल्यावर त्यामधे बारीक चिरलेला कांदा टाकावा कांदा थोडा लालसर परतून घ्यावा . आता त्यामध्ये 1 मोठा चिरलेला टोमॅटो टाकावा तो नरम होई पर्यंत परतून घ्यावा .
Step 4 - आता त्यामध्ये आर्धा चमचा हळद पावडर ,1 चमचा लाल मिरची पावडर ,1 चमचा धनिया पावडर , अर्धा चमचा जीरा पावडर ,1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मटण मसाला घालवा . सर्व मसाले एकत्र मिक्स करून घ्यावे
Step 5 - मसाले एकत्र करून झाल्यावर त्यामध्ये मॅरीनेट केलेले मटण टाकावे . मटण 5 मिनिटे चांगले मसाल्यामध्ये परतून घ्यावे . नंतर त्यामधे अर्धा ग्लास गरम पाणी घालावे . आणि कुकर चे झाकण बंद करून घ्यावे. कूकरच्या
6 ते 7 शिट्या होऊन द्याव्या.
Step 6 - शिट्या झाल्या नंतर कुकर चे झाकण उघडावे आता त्यामध्ये कोथिंबीर टाकावी . सुक्क मटण तयार आहे ते तुम्ही भाजरीची, भाकर, पोळी किंवा तंदूर रोटी सोबत खाऊ शकता .
टीप -
• तुम्ही मटण मसाला कोणता पण वापरू शकता .
• मटण जर 6 ते 7 शिट्या मध्ये शिजले नाही तर थोडा वेळ अजून तुम्ही त्याला गॅस वर ठेऊन शकता
• मी मटण मॅरीनेट करतानाच पुरेसे मीठ टाकले आहे नंतर मीठ टाकलेले नाही

Пікірлер: 10

    Келесі