खरंच Software Industry मध्ये काम करणाऱ्यांचं आयुष्य सोपं असतं का? | Bol Bhidu | IT Industry | IT

#BolBhidu #SoftwareEmployee'slife #ITEmployee'slife
आपल्या आजू बाजूला सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत काम करणारे अनेक लोकं आपण पहात असतो. बहुतांश जण परदेशातून परतलेले असतात आणि त्यांचं राहणीमानही बरेचदा उच्च दर्जाचं असतं. पण खरी वस्तूस्थिती अशीच आहे का? खरंच सॉफ्टवेअर इंडस्ट्रीतील लोकांचं आयुष्य सोपं आहे का ह्याची चर्चा आपण ह्या व्हिडिओत केली आहे.
We see a lot of people around us working in the software industry. Most of them have returned from abroad and their standard of living is often very high But is that really the case? In this video, we have discussed whether the life of people in the software industry is really easy. it's not easy o work on software sector you have to attempt deadlines, you have to update yourself everyday. you have to maintain work balance.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 000

  • @JayBhatkanti_By_G_R_Jadhav
    @JayBhatkanti_By_G_R_Jadhav2 жыл бұрын

    पहिली गोष्ट एकदाच पास होऊन आयुष्य भर आरामात सरकारी खुर्चीवर निवांत बसण्याची स्वप्न बघणाऱ्यानी ह्या क्षेत्रात यायचा विचार करू नये कारण सोप्प आहे दर महिन्या 6 महिन्याला टेक्नॉलॉजी बदलते त्यामुळे वयाचा आणि सर्व्हीस च्या शेवटच्या दिवशी पण अपडेटेड राहण्यासाठी अभ्यास करावा लागणार आहे नाहीतर नोकरी जाण्याची सतत भीती. दुसरी गोष्ट आजकाल it ची मोहमाया बघून लोक 3 महिने 6 महिने एक वर्षाचा कोर्स करून पैसे घालवतात पण जॉब मिळत नाहीत त्यांना , कारण काय तूप खाऊन लगेच रूप येत नाही it वाला 4-5 वर्षाची डिग्री घेऊन एक एक बेसिक गोष्ट शिकलेलो असतो 3 महिन्यात शिकायला हा काय ms cit कोर्स नाही , आता राहिला प्रश्न जो पैसा ब्रँडेड वस्तू पार्ट्या शनिवार रविवार सुट्टी मजेशीर आयुष्य याचा तर सांगावं हेच वाटत दिसत तस नसत . निम्मे लोक फक्त दाखवण्यासाठी जगत असत निम्मे हफ्ते फेडत असतात एवढं करून कामाचा ताण इतका प्रचंड की 2 दिवस सुट्टी पुरत नाही सोमवारी सकाळी पुन्हा तोच ताण , शिवाय माझं वयक्तिक मत हे आहे जे सर्वांना पटेल की माणसाचा जन्म एका जागी बसून राहण्यासाठी झालेला नाहीये . आता हेच बघा ना सर्कस मध्ये पिंजऱ्यात राहणारा प्राणी आणि जंगलात खुलेआम जगणारा प्राणी , कोण जास्त बिनधास्त आणि जास्त दिवस जगतो . खुर्चीवर तासनतास बसून डोळे , मान , पाठीचा मणका , गुडघे पाय एक ना अनेक कित्येक व्याधी ह्या it वाल्याना जडणार आहेत माहिती नाही पण सुरवात तर आधीच झालीये . पण it चा भरपूर पगारासोबत तेवढाच मानसीक शारीरिक त्रास हा free मध्ये मिळतो त्यामुळे गावची कष्ट करून खाल्लेली भाजी भाकरी कधीही चांगली असच मी म्हणेन . एवढं सगळं लिहायचा खटाटोप एवढ्याच साठी केला की IT किंवा सॉफ्टवेअर फिल्ड मधला फक्त पगारच पाहिला जातो पण हे नाही . - © गौरव रा. जाधव - जय भटकंती चॅनल

  • @hydramortal4212

    @hydramortal4212

    2 жыл бұрын

    👍💯

  • @prashantpatil2214

    @prashantpatil2214

    2 жыл бұрын

    सही हे भिडू👍

  • @vivekshinde4553

    @vivekshinde4553

    Жыл бұрын

    💯

  • @dattatraygaikwad6267

    @dattatraygaikwad6267

    Жыл бұрын

    अतिशय नकारात्मक आणि दळभद्री विचार आहेत तुझे. सरकारी खुर्ची निवांत आहे कुणी सांगितलं तुला ? एखाद्या धोरणाची अंमलबजावणी करताना लाखो करोडो लोकांवर त्याचा परिणाम होणार असतो याचा मोठा तणाव असतो. कोरोना काळात स्वतः फिल्डवर जाऊन अनेक खात्यांतले कर्मचारी दिवसरात्र काम करत होते. निवडणुकांच्या काळात किती तणाव असतो तुला काय कळणार ! प्रत्येक अधिवेशनाच्या काळात आणि अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अनेक विभागांचे अधिकारी/ कर्मचारी दरोज रात्री १२ नंतर घरी पोहोचतात.

  • @vsp2022

    @vsp2022

    Жыл бұрын

    CORRECT AAHE...

  • @137_mahesh_khatik7
    @137_mahesh_khatik72 жыл бұрын

    असा जर विचार केला तर आयुष्य हे कुणाचंच आनंदमय नाही आता प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे आपण जे काम करतोय त्या कामातच आनंद शोधणे ही काळाची गरज आहे....

  • @vinodlandage40

    @vinodlandage40

    2 жыл бұрын

    एकदम right

  • @sumitraje5832

    @sumitraje5832

    2 жыл бұрын

    Ahe akach KZreadr

  • @vvkipathshala

    @vvkipathshala

    2 жыл бұрын

    खरंय भावा

  • @shubhams2693

    @shubhams2693

    2 жыл бұрын

    💯

  • @snehaldabhade6962

    @snehaldabhade6962

    2 жыл бұрын

    Day start with ur positive thought ....🙌

  • @makrandjadhav3442
    @makrandjadhav34422 жыл бұрын

    Software industry मधलं सॉफ्टवेअर नेहमीच update होत राहते.... पण त्यांच पर्सनल life कधीच update राहतच नाही...खूपच disturb असतेच...ऐकायला खूपच कडवट आहे... पण सत्य आहे... आणि सत्य कटू असते

  • @omkaryande5506

    @omkaryande5506

    2 жыл бұрын

    Nahi

  • @atulpatil1020

    @atulpatil1020

    2 жыл бұрын

    We are enjoying.

  • @thinkbig9006

    @thinkbig9006

    2 жыл бұрын

    Tumi software engineer ahesa ka? Jalo mat bara bari karo. 😎😎

  • @RakeshBitling

    @RakeshBitling

    2 жыл бұрын

    I am completely agree with you

  • @always-cool-dude

    @always-cool-dude

    2 жыл бұрын

    @@thinkbig9006 kispe jalege middle class job wale logo pe kaun jalega

  • @aniruddhakaruley3272
    @aniruddhakaruley32722 жыл бұрын

    मी एक Software Engineer आहे, तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे. पण माझे वडील हे शेतकरी आहे आणि शेतकरी वर्गाचा struggle हा एका software Engineer पेक्षा खुप पटिनी जास्त आहे. त्यामुळे software profession हे तुम्ही जे बोलतात एवढ पण struggling नाही. If you wan't money, you have to work.

  • @sachinshinde-qh7di

    @sachinshinde-qh7di

    Жыл бұрын

    Janiv ahe , waa!

  • @mayankwasekar

    @mayankwasekar

    Жыл бұрын

    Agree 👍

  • @AI_videoes

    @AI_videoes

    Жыл бұрын

    Agree

  • @vaibhavjadhav6455

    @vaibhavjadhav6455

    Жыл бұрын

    100percent agree

  • @HappyLife-yu3eb

    @HappyLife-yu3eb

    4 ай бұрын

    jabaradast.....😍

  • @girishsawant8263
    @girishsawant82632 жыл бұрын

    आपल्याकडे private sector मधील job म्हणजे *Exploitation Industry* आहे. Private sector मधील नोकरीत आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आयुष्याला काहीही किंमत नाही. पैसा, संपत्ती कमवण्यासाठी खऱ्या आनंदाच्या अनेक गोष्टींचे बलिदान देत मन मारून काम करणे एवढंच आयुष्य आहे.

  • @Reva-1988

    @Reva-1988

    2 жыл бұрын

    Atlist in pvt IT sector well paid to but in core sector ,worst condition

  • @shakti9967

    @shakti9967

    2 жыл бұрын

    Bhai govt job madhe pn kamach stress khup ahe... Specially banks job.. Less payment and more work Atleast IT madhe payment tr chan ahe

  • @justcallakshay1803

    @justcallakshay1803

    2 жыл бұрын

    Business करा छोटा मोठा

  • @vivekmandlik18

    @vivekmandlik18

    2 жыл бұрын

    True..

  • @astheticrose960

    @astheticrose960

    2 жыл бұрын

    Private sector ne punha ekda ekatra houn union banavla pahije.Nahi tar polticain ani industrialiast sarvanche haal kartil.

  • @swapneeljagdale7398
    @swapneeljagdale73982 жыл бұрын

    मी स्वतः 6 वर्षे झाली सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत आहे. मला वाटतं आहे या व्हिडिओ मध्ये software engineer ना एवढं पगार का मिळतो हे जबरदस्ती पटवून देण्यात प्रयत्न केला आहे. अस काही नाही की प्रत्येक software engineer la नवीन नवीन languages शिकाव्याच लागतात. मी स्वतः 6 वर्षे झाली एकाच language वर काम करत आहे पण हा कोडींग करणे इतके पण सोपं काम नाही आहे. हा पण प्रोजेक्ट ची तशी गरज असेल तर शिकावं लागताच. खरं भरमसाट पगार देत असतील तर शिकायला काय जातंय 😅. सध्याचा परिस्थितीला software engineer च एकदम मजेत आहे हे कोणी कितीही सांगितलं तरी नाकारता येत नाही.

  • @sawant1655
    @sawant16552 жыл бұрын

    Universal Truth:- जी मुलं/मुली Other than IT job krun sadhya IT madhe aalet tyanach mahit aahe ki, IT kiti better aahe te.

  • @vvkipathshala
    @vvkipathshala2 жыл бұрын

    पैसा आहे भाई IT त. ITत राहायच ITत जगायचं🔥

  • @Dr_Tushar_Rajput.
    @Dr_Tushar_Rajput.2 жыл бұрын

    पशुसंवर्धन विभागाविषयी बोला फक्त 2100(BVSc &AH पदवी)५वर्ष पदवी शिक्षण- जनावरांचे डॉक्टर महाराष्टात पद आहेत फक्त ....बाकी गावागावात बोगस लोक फिरतायेत डॉ सांगुण

  • @positivevibes779
    @positivevibes7792 жыл бұрын

    थोडक्यात काय तर जिंदगी झंड आहे सगळ्यांचीच 😂

  • @vintagegoldcricket4921

    @vintagegoldcricket4921

    2 жыл бұрын

    mhanun gov nokri havi

  • @nitin9589

    @nitin9589

    2 жыл бұрын

    Govt. Wale aani politicians fakt sukhi aahet sale.

  • @sameerramdasi88

    @sameerramdasi88

    2 жыл бұрын

    Gov job la tan nahi mitra ajun pan pagar kami ahe pan life khari toch jagto 5 la ghari yeto gym la jato sandhyakali tyache tyanche chand jopasato kuni bar madhe jaun basato

  • @Siddya_5545

    @Siddya_5545

    Жыл бұрын

    Khar bollas bhava 😂😂

  • @swapniljadhav1296
    @swapniljadhav12962 жыл бұрын

    Updated राहून company switch करत राहायला लागते नाही तर आयुष्य frustrating होतं. 2021 वर्ष IT employee साठी खुप चांगलं होतं काही जणांना 100% hikes पण मिळालेत.

  • @sudhirpandit5023
    @sudhirpandit50232 жыл бұрын

    खरे सुखी होण्यासाठी आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत. शेवटी आपण किती धावणार. अर्थात या बाबत कुटुंबास विश्वासात घेऊन आपला निर्णय घ्यावा. भविष्या साठी बचत करावी

  • @RohitRpatil-op4kd

    @RohitRpatil-op4kd

    Жыл бұрын

    Agadi barobar

  • @omkarghogale423

    @omkarghogale423

    Жыл бұрын

    Nice thought

  • @cinemamylove5712
    @cinemamylove57122 жыл бұрын

    Sabse badiya aaplaa chotasa business.... peaceful life...chain ki neend🙂

  • @yashpawar6853
    @yashpawar68532 жыл бұрын

    इंजिनीअरिंग असो किंवा इतर कोणतं क्षेत्र , त्यामध्ये तुम्ही दररोज च काम दररोज करत जाल आणि अभ्यासात consistency ठेवली तर कोणत्याही क्षेत्रात तुम्ही बाजी मारू शकता ...

  • @thinkbig9006

    @thinkbig9006

    2 жыл бұрын

    For example Sundar Pichai. Hye middle class lok boltil sundar pichai ni government kela asta tr bar jhal asta. 🤣🤣

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc2 жыл бұрын

    Development सोपं नाही, डोक्याला मुंग्या येतात जशी रात्रीचे 8 9 10 व्हायला चालू होतात ते... कुणाशी बोलायची किंवा जेवायची इच्छा नसते.... IT field खूप कठीण....

  • @vaibhavkalbande1

    @vaibhavkalbande1

    2 жыл бұрын

    दादा मी government job चा preparation सोडून.. IT field मधे येण्याचा विचार करत आहे...

  • @RS-zh1vc

    @RS-zh1vc

    2 жыл бұрын

    @@vaibhavkalbande1 येऊ शकतो... कष्ट केले तर पैसापण आहे.... फक्त math strong असेल तर सोपं पडते coding.........

  • @upscspace4050

    @upscspace4050

    2 жыл бұрын

    Dada mi mechanical 3 years experience job sodun IT madhe yenacha vichar kartoy.. Is it good decision?? Please help 🙏

  • @shouryabhosale5792

    @shouryabhosale5792

    2 жыл бұрын

    तुम्ही सगळे पैसे बघून येत आहेत....

  • @Yash-fz7kw

    @Yash-fz7kw

    2 жыл бұрын

    @@RS-zh1vc Bhau kontya technology stack vr kam karto tu asa? Js?

  • @qwermngh
    @qwermngh2 жыл бұрын

    या जगात फुकट काही मिळत नाही मेहनत करा चांगले विचार करा आयुष्यात पुढे जा ...

  • @omkarghogale423

    @omkarghogale423

    Жыл бұрын

    Yes right 😊

  • @narayanpatil6470
    @narayanpatil64702 жыл бұрын

    software इंजिनियर म्हणजे एक म्रूगजळ आहे. लोकांसाठी दिसायला मोठे पेकेज आहे पण इंजिनियर च्या जीवनात सगळे जीवन खडतर आहे. ना वैयक्तिक जीवन,ना कौटुंबिक जीवन, ना सामाजिक जीवन . या सर्वांपासून हा जीव पारखा आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर एक व्यथा... समाजापासून तुटलेला एक तारा ...☺☺☺☺

  • @anandkvk

    @anandkvk

    2 жыл бұрын

    @@Rain-j3q mala 65000 pagar ahe pan lokannna kami vaatto

  • @MMJotkar

    @MMJotkar

    2 жыл бұрын

    Tula nit manage karta yet nahi mitra mag goshti

  • @narayanpatil6470

    @narayanpatil6470

    2 жыл бұрын

    Dhanyawad Mitra

  • @prashantl819

    @prashantl819

    2 жыл бұрын

    रडवलंस भावा 🥴

  • @Abhiyanta
    @Abhiyanta2 жыл бұрын

    माझे नातेवाईक सॉफ्टवेअर Engineer आहेत आणि मी #CivilEngineer. त्यांना बघून अस वाटत होत की आपली काहीच लाइफ नाही. पण तुमचा वीडियो बघून हे समजले की, "आपली कमाई कमी आहे पण स्वतः ला आणि परिवाराला वेळ द्यायला वेळ आहे."..छान आणि खरी माहिती दिली... आता मला Civil Engineer असण्याचा जास्त अभिमान वाटत आहे 😜 पण खरच सॉफ्टवेअर Engineer लोकांना सलाम.. अशी लाइफ जगणे सोपे नाही राव. #respect आपला, Er #SurajLaghe #CivilEngineer

  • @UdaypatilComedy

    @UdaypatilComedy

    2 жыл бұрын

    Kon mhntle civil engineer kharach vel milto

  • @UdaypatilComedy

    @UdaypatilComedy

    2 жыл бұрын

    Ith tr night ani Saturday sudha kryla lavtat

  • @Abhiyanta

    @Abhiyanta

    2 жыл бұрын

    मला self employed Civil Engineer म्हणायचे होते 😊

  • @UdaypatilComedy

    @UdaypatilComedy

    2 жыл бұрын

    Accha business hoy

  • @UdaypatilComedy

    @UdaypatilComedy

    2 жыл бұрын

    Job ani business ch kadich comparison kadich hou shakt nhi. Business is best

  • @12vvs
    @12vvs2 жыл бұрын

    लोक ऐटीत राहायच म्हणून IT त येतात पण Software Industry म्हणजे short gain च्या नादात long pain स्विकारने.

  • @hemantsable3791
    @hemantsable37912 жыл бұрын

    खरच engineer केलेल्यांचच खरच खूप चांगलं आहे...आमच्या सारख्या लोकानी पाहिल आहे...एकदा coding decoding shikla ki ky ny bhagha...tyancach आयुष्य सुखी आहे...बाकी konacach आयुष्य सुखी nyea..✌🙏

  • @oldagecourage713
    @oldagecourage7132 жыл бұрын

    कोणत्याही क्षेत्रात टेन्शन असतेच. महिलांना तर जास्तच.

  • @omkarpandit2047
    @omkarpandit20472 жыл бұрын

    चांगले विषय select करून तू आणि तुझी team चांगली काम करते.... Good 😊👍

  • @sawant1655
    @sawant16552 жыл бұрын

    stress आहे पण त्या बदल्यात तितकाच पगारही मिळतो. आणि finantial stress कमी झाला की बाकी कामाच्या stress काही वाटत नाही I also worked in other industry but Now IT is the Best.

  • @always-cool-dude

    @always-cool-dude

    2 жыл бұрын

    It employees peksha jast paise youtubers,bloggers kamvtat Ani te pan khup kami mehnat madhye. It madhye job karne mhanje gadha mehnat aahe.

  • @powerofcompounding123

    @powerofcompounding123

    2 жыл бұрын

    कॉर्पोरेट वाले स्पेसिअल सॉफ्टवेअर वाले ना जीवन काय आहे हे 42-45 नंतर समजते... कारण बरेच से आजार माघे लागलेले असतात आणि कुत्र पण जवळ नसते विचारायला 🙄

  • @sawant1655

    @sawant1655

    2 жыл бұрын

    @@always-cool-dude mg ho na blogger asel talent tr. jyachyat je talent tyane te banuyat

  • @sawant1655

    @sawant1655

    2 жыл бұрын

    @@powerofcompounding123 we got more than sufficient time for fitness, & it is upto you how you utilities that. आणि आजार कोणालाही होऊ शकतात, त्यासाठी IT Engg चं पाहिजे असं नाही ना..!! it may be other personnel..

  • @hgb4968

    @hgb4968

    2 жыл бұрын

    डोंगर दुरून च छान वाटतो भावा😁 ज्याचं जळत त्याला कळत. आपल्याला वाटत हा सुखी तो सुखी पण सुखी कोणीच नाहीय😂

  • @WolfManThoughts
    @WolfManThoughts2 жыл бұрын

    Hard Fact: India madhe Software Engineer US Clients payment detat mhanun kamavtat, Indian Client kadun payment nahi milat. Product Company vs Service Company cha debate kara bhidu. IT Service company doesnt bring economic growth and development. Look at China - they have own search engine, own IT infrastructure. India madhe apun US companies chya IT products la competition det nahi, US chya lifestyle chya hisobane cheap madhe karun deto kaama, and also Night shift and UK shift naste US madhe, te lok 9-5 job kartat , even google madhe pan.

  • @Dattebayo3089

    @Dattebayo3089

    2 жыл бұрын

    India consultancy provide karte. And china IT companies are made for Chinese companies. Tyanche employees he kami kamavtat indian software engineer peksha. Tyanchya revenue IT madhe kami ahe. And 2010 pasun foriegn madhe indians, Koreans and afrikans software engineers ghetat jast. Chinese policies and dictatorship mule Tyanche it engineer mage padle. Tumhi chuki he sangat ahat.

  • @WolfManThoughts

    @WolfManThoughts

    2 жыл бұрын

    @@Dattebayo3089 LOL magh employment ka generate hot nahi ahey?? unemployment rate ka jasti ahey??? consultancy manjhe service sector zhala mitra. Ek doctor pan consutancy karto. Ek Lawyer pan corporate consultancy karto. Tell me where are the Products - Search Engine, Servers, Domain Businesses, Cloud Storage, Email Services etc etc etc. All these IT Products are owned by US companies, because Indian companies never gave competition to US Product companies. First understand the difference of Product Company and Service Company in IT.

  • @Dattebayo3089

    @Dattebayo3089

    2 жыл бұрын

    @@WolfManThoughts Abe pagal unskilled engineers ahet te. It madhe khup jaga ahet. Naukri or LinkedIn la tak resume 20+ jobs Eka month madhe yetil. 😂😂 Pn te crack nahi honar. Jar skills nasel tar

  • @Dattebayo3089

    @Dattebayo3089

    2 жыл бұрын

    @@WolfManThoughts I'll already said in india off shore work happens. Client side work happens in other countries . India provides consultancy. And china madhe unemployment jast ahe. Te data share nahi karat. Except usa IT madhe india la konich nahi mage sodi shakat. And usa product base companies india madhe nahi kadhay. Karan tyamule india cha GDP vadhel.

  • @WolfManThoughts

    @WolfManThoughts

    2 жыл бұрын

    @@Dattebayo3089 LOL, thats why india is called cheap labor country, because you don't have a product that you can sell to europeans or Americans, rather all you can do is provide services for the US client or foreign client, so the US client can save money to fund innovation and research, so that they can patent even more technologies and make more powerful products that will dominate the global market, what you are doing in India - IT Outsourcing is basically doing cheap labor compared to standards of the US society. USA has unemployment today because many mid-tier and mid-management level jobs are shifted to south asian countries. There are videos on BrainDrain, go and watch those videos, The jobs in IT are "Cyber Coolie" jobs which creates no value , or contribution to the Indian GDP and in terms of Innovation we have not even patented a single technology, basically you are surviving because the Foreign Powers are giving you work, that's not called being a Independent Nation. And About China , you have a wrong mentality towards China, they have beaten USA product companies with companies like Tencent, Alibaba, BBK Electronics, Oppo, Lenovo, Vivo, OnePlus , Nio etc etc

  • @swapnalihadawale191
    @swapnalihadawale1912 жыл бұрын

    Working as software developer since last 6 years, every single point mentioned in vedio, I can relate with my life. True research on topic sir🙌 🙂. We have different lifestyle but along with we carry extreme stress n pressure, other person can't see that and can't feel that😐 it's a sad reality

  • @tejasrupnawar1244

    @tejasrupnawar1244

    2 жыл бұрын

    Yes it's really true 👍

  • @sachinlimaja2804

    @sachinlimaja2804

    2 жыл бұрын

    That’s true

  • @rohitvarat2032

    @rohitvarat2032

    2 жыл бұрын

    i am also prepairing for mhtcet entrance exam to get best college of computer enginnering but i does'nt lose hope there is no option for me i already choosen my career and i will work hard for that to achieve it💪

  • @khaugalliindia954

    @khaugalliindia954

    2 жыл бұрын

    True brother ❤

  • @r.naikwadi4681

    @r.naikwadi4681

    2 жыл бұрын

    Hii dii I had completed my 12th STD pls give me guidance whether I do BCS or not

  • @ganeshmane
    @ganeshmane2 жыл бұрын

    Sir me swatah 12 varsha IT madhe aahe , me 40 taas continue kaam kel aahe , sir mentally tired houn jaato, zope ch pattern badalat , activity aste tevha fakt 30 minutes alarm laaoon jhopav laagat , activity madhe chukila maafi naste , ek chukicha update aani crore ch nuksaan hot... ... Pan he Sagal asla tari I love my job ❤️❤️❤️❤️

  • @devendradube1244

    @devendradube1244

    2 жыл бұрын

    Sir mech engg ahe IT made entry have ahe. Which course should be done to get a job n would be a growth opportunity in IT sector

  • @knowyourstrength8114
    @knowyourstrength81142 жыл бұрын

    Computer engineering- रोजगार हमी योजना... सर्वांना जॉब

  • @besmart5326
    @besmart53262 жыл бұрын

    Software developer साठी शनिवार रविवार हा एखाद्या सण पेक्षा कमी नाहित.

  • @adityachavan6755

    @adityachavan6755

    Жыл бұрын

    😅😅

  • @Suraj-kd5gb
    @Suraj-kd5gb2 жыл бұрын

    Code run zala nahi tr zop lagat nahi..swapnat pn code disto ani tya swapnat code ch Uttar sapdat. 😂 Kay sangych ata

  • @introvertleader

    @introvertleader

    2 жыл бұрын

    he matr 100% khar aahe!

  • @birupadulkar8341

    @birupadulkar8341

    2 жыл бұрын

    Selling pan asach ahe bhau Customer call yetat swapnat😀😀😀

  • @MILINDNEWTON

    @MILINDNEWTON

    2 жыл бұрын

    😁😁 khar ahe

  • @harshadasarang2944

    @harshadasarang2944

    2 жыл бұрын

    Ho kharach...

  • @sachindandge764

    @sachindandge764

    2 жыл бұрын

    Improve skill then don't copy pesting it

  • @vikas898
    @vikas8982 жыл бұрын

    जाधवराव direct काळजाला हात घातला बघा तुम्ही . शब्द न शब्द खरा आहे. अगदी योग्य आणि मोजक्या शब्दात विषय सांगितला आहे. 👍💐👍

  • @ramchandrajadhav6440
    @ramchandrajadhav64402 жыл бұрын

    आज तुम्ही वस्तुस्थिती सांगितली👌🥰❤️

  • @rangari01
    @rangari012 жыл бұрын

    खुप जणांना माहिती नाही की IT मध्ये रिटायरमेंटची वय ४५ आहे. चाळिशी मध्ये पदार्पण केलेल्या इम्प्लोयीस ला कंपन्या काढुन टाकतात.

  • @user-ym8yg2jr7t

    @user-ym8yg2jr7t

    2 жыл бұрын

    kadhat nahi technical madhun management madhe taktat.

  • @TheHalloween81

    @TheHalloween81

    2 жыл бұрын

    Aadhi technical vertical var jast options navte....tamule direct manager banav lagaycha, pan aata technical architect, principal architect, technology consultant ase vividh options tayar zale aahe je tumhala development madhech 40 nantr suddha rahaycha marg uplabdh karun detat...pan position kami aani saprdha jast hi aahech yashivay tumhi technology madhle geek asna hi garjecha aahe

  • @Harsh-yj9ly
    @Harsh-yj9ly2 жыл бұрын

    Baidu you speak very true about the IT industry, as being a software engineer I know what kind of stress feel one IT person, no matter you will earn lots of money in this industry, but it's very harsh we can not find peace of life

  • @harshal4412

    @harshal4412

    Жыл бұрын

    how many hours do you work daily?

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding1232 жыл бұрын

    कॉर्पोरेट वाले स्पेसिअल सॉफ्टवेअर वाले ना जीवन काय आहे हे 42-45 नंतर समजते... कारण बरेच से आजार माघे लागलेले असतात आणि कुत्र पण जवळ नसते विचारायला 🙄

  • @hydramortal4212

    @hydramortal4212

    2 жыл бұрын

    True??

  • @sagarmane9251
    @sagarmane92512 жыл бұрын

    तुमच्या द्वारे खूप छान माहिती मिळते , माहिती सांगणारे निवेदक यांची भाषा , उच्चार स्वच्छ आणि स्पष्ट असावी .

  • @rameshkokare696
    @rameshkokare6962 жыл бұрын

    खरोखर अतिशय सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल बोल भिडू या चैनल चा मी अतिशय मनःपूर्वक आभारी आहे पण अतिशय चांगली वेळात वेळ काढून अशीच माहिती पुरवत राहावा हीच अपेक्षा आहे 👍👍👍👍

  • @manojtolagekar6717
    @manojtolagekar67172 жыл бұрын

    मी software engineer म्हणुन काम करायलोय. आणि माजा fresher अनुभव असा आहे की, fresher साठी फार कठीण आहे job करण.

  • @samdiaries1005
    @samdiaries10052 жыл бұрын

    मी काय आयटी क्षेत्रात जाणार नाही.....आपले मेकॅनिकल क्षेत्रच बर....जेवढा जास्त experience तेवढा पैसा जास्त....पण सुरवातीला कमी पगारावर काम करावं लागते.....जेवढा जास्त अनुभव तेवढी मल्टी नॅशनल कंपनी मध्ये जॉब मिळण्याची संधी.... उदाहरणात टाटा मोटर्स,किर्लोस्कर,महिंद्रा, etc....

  • @Rafian1924
    @Rafian19242 жыл бұрын

    I have been a developer and architect since last 12 years and the points you mentioned are very much relevant. But, one needs to enjoy the work. That's the key to survival.

  • @user-ig7xi6fn2d

    @user-ig7xi6fn2d

    2 жыл бұрын

    Correct, if we enjoy the work with interest then no stress

  • @dipakpatil5717

    @dipakpatil5717

    2 жыл бұрын

    I agree with you!!

  • @udayworld
    @udayworld2 жыл бұрын

    म्हणूनच मी एमएससी कॉम्पुटर करून सुधा सरकारी नोकरी निवडली....मला जीवनाचा आनंद घ्यायचाय... पैसामागे धावायचं नाही....गरजा कधीच संपत नाही....शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ असणें हीच खरी संपत्ती...शेवटी कितीही कमावलं तरी सोबत काही येत नाही...गाडी बंगला...सर्व इथेच राहते... 😀

  • @prasadgaikwad6160

    @prasadgaikwad6160

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर 👍👍👍

  • @sanketgavali9252

    @sanketgavali9252

    2 жыл бұрын

    Ata kay krtay tumi?

  • @udayworld

    @udayworld

    2 жыл бұрын

    @@sanketgavali9252 PSU mdhe programmer

  • @a7155-w5s

    @a7155-w5s

    Жыл бұрын

    Ye baat jabardast

  • @pranitsathe1646
    @pranitsathe16462 жыл бұрын

    please make video on current situation of Civil engineers.. Day by Day civil engineers getting less salary in private sector as compared to other fields

  • @Mr._Bean.

    @Mr._Bean.

    Жыл бұрын

    True

  • @surajghodke1033
    @surajghodke10332 жыл бұрын

    As a software developer, every single point I can relate with my life.

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam17822 жыл бұрын

    अगदी बरोबर आहे आपण चांगले विश्लेषण केले आहे अभिनंदनीय बाब आहे कोणत्याही कामात ताणतणाव करुन घेण्यापेक्षा कामात राहून आनंद कसा मिळेल याची चिकित्सा केली तर जिवनात खुप काही मिळाल्यानंतर त्याचे त्याला समाधान मिळते जीवन एक संघर्षमय असते कुछ पाने के लिये कुछ खोना चाहिए

  • @gzdr835
    @gzdr8352 жыл бұрын

    वा भाऊ खूपच वाईट परिस्थिती आहे सॉफ्टवेअर वाल्यांची,शेतकऱ्यांच्या जीवनावर पण एक छोटा व्हिडिओ बनवा

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam33062 жыл бұрын

    पैसा,सुख सुविधा,ताण तणाव स्वतःचे शारीरिक स्वास्थ्य कुटुंबातील समस्या याचा ताळमेळ साधने गरजेचे आहे पैश्या ला गरजे पेक्षा अति महत्त्व देऊन त्या साठी वाटेल ते करण्याची तयारी त्यातून शारीरिक व्या धी मानसिक ताण तणाव अपेक्षा चे ओझे घेऊन सुखसुविधा मिळवता येते पण समाधान नाही जो की गरजेचा असे वाटते

  • @sujatadumbre4662
    @sujatadumbre4662 Жыл бұрын

    Very well explained….. जेव्हा लोक बोलतात, तुझं काय बाई लॅपटॅाप समोर बसून ४ बटनं दाबा आणि भरपूर पगार घ्या. It hurts.

  • @rajendrasurashe2755

    @rajendrasurashe2755

    Жыл бұрын

    😆

  • @abs2486
    @abs24862 жыл бұрын

    Sir, Tum che vdo's khoop informative and changle astat khoop Navin mahit milte shiknya sarkha khoop sangta tumhi... Tumch kaam chaan ahe... Amhala asheech Navin Navin mahiti det raha ,dhanyawad sir🙏

  • @user-qw7fz4cv4b
    @user-qw7fz4cv4b2 жыл бұрын

    Automaton tester from past 6 years, i started from very very scratch, for those who want a career in IT :- trust yourself, practice daily, dont give up, everything is possible. Best luck!!

  • @MMJotkar

    @MMJotkar

    2 жыл бұрын

    How did you learn automation from scratch?

  • @user-qw7fz4cv4b

    @user-qw7fz4cv4b

    2 жыл бұрын

    @@MMJotkar I had attended Selenium With Java course and daily practice on each topic and framework

  • @user-qw7fz4cv4b

    @user-qw7fz4cv4b

    2 жыл бұрын

    @@khaugalliindia954 I attended physical batch, there are lot of courses available on Udemy as well if you just watch Naveen automation labs and implement the things you are good to go, best luck.

  • @khaugalliindia954

    @khaugalliindia954

    2 жыл бұрын

    @@user-qw7fz4cv4b ok

  • @Yogiiii__

    @Yogiiii__

    2 жыл бұрын

    Hello friends, I am Mechanical engineer having 9 years of experience in manufacturing field, i didn't seen any growth in this field. So i want to change my field to software testing, is it possible guys?? Pls reply

  • @shahajinarwade2809
    @shahajinarwade28092 жыл бұрын

    I believe everyone should respect the IT industry for providing such respectable jobs & salaries. Despite of having such a sudden change in work style & decreasing revenue during COVID times, most of the industries managed to deliver consistent support to all their employees. Indeed, this is the brilliantly analyzed video.

  • @shripadjoshi6640
    @shripadjoshi66402 жыл бұрын

    Boldhidu is very informative channel . Keep it up 👍👍

  • @user-lb4sz7zp3l
    @user-lb4sz7zp3l9 ай бұрын

    very nice video... एक गोष्ट इम्पोर्टंट आहे.. ते म्हनजे IT मधे सर्व जन coding नाही करत.. उलटे अधिकऔंश लोक Support मधे आस्तात. त्याच्या Life अधीक अवघड आहे.. मि Support मधे आहे आणि weekend ला काम करावे लागते..

  • @rgodase
    @rgodase2 жыл бұрын

    When you will reach in management profile, remember this and make sure your team is not stressed out. It will not be easy with all targets etc but try to be reasonable, keeping your past experiences in mind. I try my best not to stress out my teams and have open env.

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar092 жыл бұрын

    Most of the topics are covered in this video. Its true that software people get good packages but on other hand they have to sacrifice lots of things. थोडक्यात काय दुसर्‍याची बायको/ नवरा कायम चांगला वाटतो. बाकी कष्ट कुणाला चुकत नाही. तुम्ही तुमच्या क्षेत्रांत कार्यरत असताना नवनवीन गोष्टी शिकत रहा. आजचा काळ हा स्पर्धेचा आहे. त्यामुळे काळासोबत राहणे गरजेचे आहे.

  • @ajinkyamashalkar6782
    @ajinkyamashalkar67822 жыл бұрын

    सत्य परिस्थिति संगितली IT मधे खुप tentions असतात

  • @vijaygadhe1385

    @vijaygadhe1385

    2 жыл бұрын

    सर, मग टेंन्शन नसलेलं क्षेत्र कोणतं आहे ते सांगावं.

  • @sameerramdasi88

    @sameerramdasi88

    2 жыл бұрын

    @@vijaygadhe1385 gov job

  • @adityachavan6755

    @adityachavan6755

    Жыл бұрын

    @@vijaygadhe1385 govt. Job 😁

  • @atharvthorat3827
    @atharvthorat38272 жыл бұрын

    सॉफ्टवेअर क्षेत्रत बेवड्या लोकन च प्रमान जास्त का होत आहे आहे ह्यवर्ती देखिल एक व्हिडिओ व्याला हवा , खुप लोक stress हे करण देतात.

  • @bhartiya8199
    @bhartiya81992 жыл бұрын

    1.30 line mast बोलली bhidu ne👌👌👌

  • @bagul6753
    @bagul67532 жыл бұрын

    Mazi sister pn aahe computer engineer Nashik mdhe job krte ...aata work from home aahe tr Working krte..skali 9 te ratri 12.. corporate vale purn vasul krtat tyanchya kdun...

  • @user-ym8yg2jr7t
    @user-ym8yg2jr7t2 жыл бұрын

    aaj itkya prachand competetion chya yugat if anyone has job then u r lucky.something is better than nothing.50% tarun mul berojgar ahe kay tumhi ith stress chya goshti karta sir. berojgar mulachi vyatha sanga.lagnala muli milat nahi berojgar mulanna.

  • @vidyapatil9636

    @vidyapatil9636

    2 жыл бұрын

    Barobar ahe tumch.nokri asel trch lagn jultayt nhitr far bikat ahe

  • @p3ccpp

    @p3ccpp

    2 жыл бұрын

    Majority of mula Engineering karun degree tar ghetat pan aple technical skills developach nahi karat. Jo aplya talent ani skills var kaam karto tyana jitka hoil titka improve karto tyalach job lagto💯 Ani competition kay ghena ahe competition tar sagli kadhe ahe re pan jyachya kadhe yogya knowledge and skills tyalach opportunity milel. Ani ekhadyala successful honya sathi aple passion follow kele pahije jya goshtin madhe aplyala awad aste tyach gostinvar jast focus karayla pahije and mala asa vatte ki parents ni pan support karne garjecha ahe🙏🏻🙏🏻

  • @user-ym8yg2jr7t

    @user-ym8yg2jr7t

    2 жыл бұрын

    ​@@p3ccpp cs it sathi jobs lavkar miltat ani salary jast aste,problem faqt mech civil cha problem ahe

  • @p3ccpp

    @p3ccpp

    2 жыл бұрын

    @@user-ym8yg2jr7t Ho bhava he tar khara ahe 💯 Sadhya mi tar 12th madhech ahe and next year pasun engineering life la suruvat hoil but tula ek suggestion deto ki jari mech kiva kontya hi branch la asla tari coding shikun ghe job madhe thodi help hau shakte karan mi kahi engineering Student che interview bagitle different branches chya tya madhe ek question common hota coding cha. Even kal mi ek student cha video bagitla tyache branch chemical engineering hoti even tyala pan same question kelela so kutha garaj padel sangta yet nahi🙃😊

  • @Chiragkharge

    @Chiragkharge

    2 жыл бұрын

    @@user-ym8yg2jr7t agreed i am also mechanical engineer but left that field after 2 yrs job and now I am a bakery chef in american brand ......So happy with my new field 😊

  • @priyarahade4470
    @priyarahade44702 жыл бұрын

    Khup chaan video, kharach ashi vyatha ahe. Fakt engineers nahi tar saglech IT madhlyanchi gosht ahe.

  • @MyAkshay009
    @MyAkshay0092 жыл бұрын

    इंजिनीअरिंग च आयुष्य एकदम भारीच असते एसी कार्यालय मध्ये काम करतात मर्सिडीज कार मध्ये फिरतात आणि सामाजिक जाणीव नसते.

  • @swapnilbagul7502
    @swapnilbagul75022 жыл бұрын

    Completely agree with bol bhidu...but because of this pandemic situation,human interaction becomes very rare right now.....earlier we use to spend time with friends over the weekends....that's why sometime work from home feels very boring way of work.....

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde21212 жыл бұрын

    भारतात ते सॉफ्टवेअर इंजिनिअर नसतात हो ते थोडक्यात टायपिस्ट असतात 😂😂😂 मुळात IT industry मध्ये इंजिनियर मुलांना का घेतात हेच त्यांना समजले नाहिये 🙏 तरुण मुलांवर हे जुगार खेळतात लागली तर लागली लॉटरी 😌😌😌

  • @amitbhoirrr

    @amitbhoirrr

    2 жыл бұрын

    Tumhi he kasa sangu shakta kahi tark ahe ka

  • @vilas-shinde2121

    @vilas-shinde2121

    2 жыл бұрын

    @@amitbhoirrr कारण मी एक इंजिनियर म्हणून ते बघत आहे 🙏

  • @rushikeshgodase4150

    @rushikeshgodase4150

    2 жыл бұрын

    @@vilas-shinde2121 kontya company madhe ahes???

  • @vilas-shinde2121

    @vilas-shinde2121

    2 жыл бұрын

    @@rushikeshgodase4150 Accenture

  • @rushikeshgodase4150

    @rushikeshgodase4150

    2 жыл бұрын

    @@vilas-shinde2121 typist ka boltoy mg tu??? Development madhe tr dokk lagtach ki bhava.

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan56212 жыл бұрын

    खुप उत्कृष्ट माहिती दिली आहे आपण धन्यवाद.

  • @prathameshlot
    @prathameshlot2 жыл бұрын

    12:40 konachi life perfect naste. Ti banvavi lagte

  • @RoarMaddy
    @RoarMaddy2 жыл бұрын

    सरकारी जॉब घेऊन गरिबांना लुटण्या पेक्षा तर बरा आहे IT चा जॉब स्वतःची मेहनत आहे आणि देशा मध्ये परकीय चलन बऱ्या पैकी IT इंडस्ट्री अनते .

  • @sameerramdasi88

    @sameerramdasi88

    2 жыл бұрын

    Copy tar kartat mitra it industry madhe mothe shodh he sagle baherchya company tar lagtat

  • @RoarMaddy

    @RoarMaddy

    2 жыл бұрын

    @@sameerramdasi88 Jara knowledge asav tar bolav mansane copy karata te thik ahe pan barryach moth mothya companyache RandD center ahet India madhe jedhe reserch hote . Ani apala desh mage ahe copy keli tar kay bigadal

  • @myprincesstanishka7914
    @myprincesstanishka79142 жыл бұрын

    Very nice research, Related to every software engineer, others can only see the money but not the efforts and stress behind it

  • @SYLARish
    @SYLARish2 жыл бұрын

    80% correct aahe. Pann sir hya software industry madhye pann 2 part aahe service based and product based companies. Tumhi je cover kelay te sevice based sathi. Ratriche calls jar USA cha client asel tar. Jyanchya companies mnc nastil te lok. Hya saglya pann cover jhalya pahije hotya. Tum ek video engineering and medical cha study and difficulty level hyavar video kara please.

  • @nilampatil2278
    @nilampatil22782 жыл бұрын

    Sir khup chan tumi all round ahat sagle information ghet asta tumi v amala kalvat asta thank you sir 🙏

  • @ravikalein
    @ravikalein2 жыл бұрын

    Game development industry is booming in India with lots of companies coming to our contry. People will surely benifit from the info. Than you for all informative videos ❤️

  • @prajo9578

    @prajo9578

    Жыл бұрын

    People are busy in social networking ..gaming is slowly reducing

  • @rtxWARDADDY
    @rtxWARDADDY2 жыл бұрын

    1. Parties jyana avdte tech krtat 2. Sometime have to work for 12hrs(without OT) 3. Project change zalyvr new tools and work method shikavi lagte 4. Superiors expect to attend calls, meetings and mails 24×7 5. Work is repetative in most of the cases..

  • @vaibhavrokade7917

    @vaibhavrokade7917

    2 жыл бұрын

    Salary kiti ahe tumhla

  • @rtxWARDADDY

    @rtxWARDADDY

    2 жыл бұрын

    @@vaibhavrokade7917 specific ny sangu shakat but between 20-25k for 1.5yr exp

  • @vaibhavrokade7917

    @vaibhavrokade7917

    2 жыл бұрын

    @@rtxWARDADDY 👍

  • @a.m3180

    @a.m3180

    2 жыл бұрын

    Reality 😬🥲🥲

  • @bendover-bz4bc

    @bendover-bz4bc

    2 жыл бұрын

    What language you code?

  • @sandip0503
    @sandip05032 жыл бұрын

    आपल्या कामावर प्रेम करणाऱ्या लोक आनंदीच असतात रडणारे रहतच असतात मी एक software engineer आहे

  • @dipikajagtap8327
    @dipikajagtap83272 жыл бұрын

    ekdam manatla bolllat tumhi thank you IT lokanchi vytha mandya baddal nhitr lokani rikamtekd samjun thevla hota avdhe kashta krun pn

  • @gaurjj
    @gaurjj2 жыл бұрын

    चला मग मी mechanical engineer चे आयुष्य समोर मांडतो: पगार: मला 3 वर्ष अनुभव असून पण फक्त 15 हजार, सुरुवातीला 11 हजार काम: फक्त एक दिवस आराम मिळतो week madhe, ते पण नशीब असला तर टेन्शन: प्रचंड, टार्गेट इथे पण असतो जॉब रोल: आता पर्यंत कॉन्ट्रॅक्ट वर आहे, company पॅरोल वर शोधून पण मिळत नाही 16-16 तास काम करावे लागते ते पण उभे राहून पळत पळत स्किल कितीही असली तरीही रेफरल वर नोकरी मिळते मोठ्या कपन्यां तर प्रसिद्ध कॉलेज शिवाय दुसरा विद्यार्थांना येऊ पण देत नाही कॅम्पस ला मला तरी वाटते कोअर पेक्षा IT कधीही उत्तम!!

  • @shreebhosale3181

    @shreebhosale3181

    2 жыл бұрын

    100% बरोबर आहे. Never seen a mechanical engineer who switched his job to IT or software field, complaining about his job.

  • @omkarsawardekar3654

    @omkarsawardekar3654

    2 жыл бұрын

    If you are a fresh graduate from any branch of engineering you can get a job in IT. Jobs are raining in the IT field. I am also a mechanical who got placed in TCS.

  • @maharashtratech5479

    @maharashtratech5479

    2 жыл бұрын

    Me diploma kartoy mechanical madhe pudhe kay karu dada plz sang

  • @mandarbamane4268

    @mandarbamane4268

    2 жыл бұрын

    @@maharashtratech5479 "IT field madhe jaychay" then try switching field to computer science engineering or information technology engineering (I have seen people going from diploma who appear HSC 12th science and then can choose any 4 years engineering course... I don't know direct branch change hote ka after diploma... choose good college giving good placements) Learn some basic programming languages C, C++, Java, Python, etc. Learn data structures and algorithms and write programs for them & practice a lot Another difficult way is on diploma basis, appear for government job exams First look at opportunities, number of students, skills and where you stand. Core field (mechanical, civil, electrical) madhe too extreme competition, but fair amount of opportunities. In semi core (Electronics, communication instrumentation) moderate competition and less opportunities. And a lot of opportunities for CS/IT, but usually less government jobs

  • @shrinathbhosle6170

    @shrinathbhosle6170

    2 жыл бұрын

    Ekdum manatl ani paripurn bollas bhava...Me pn BE mech ahe....Ata IT field mdhe enter kartoy

  • @zaqwsxxswqaz2280
    @zaqwsxxswqaz22802 жыл бұрын

    Tension and stress directly proportional to salary

  • @omkarbhor4457
    @omkarbhor44572 жыл бұрын

    Thank you dada he information share keli sagle software engineer la changla pagar ani tumchi maza ahe boltat pan reality kahi vegli aste amcha ayushyat survat khup kami pagarat ani khup stuggle madhe kela

  • @rajv4838
    @rajv48382 жыл бұрын

    Kup danyawad IT cha topic ghetyla baddal..🙌

  • @mubinnadaf862
    @mubinnadaf8622 жыл бұрын

    Hi sir ,You did very well study about IT sector , I have completed B.Tech in electrical engg. Then can you make a video on 'What to do after electrical engineering'

  • @dnyaneshwarkesbhat7697
    @dnyaneshwarkesbhat76972 жыл бұрын

    क्षेत्र कोणतेही असले तरी कष्ट करावेच लागतात. पण माझं व्यक्तीगत मत असे आहे कि फक्त पाच वर्ष गाढवासारखे काम करा पुढील 50 वर्ष राजसारखं जीवन जगाल..

  • @Shrinis
    @Shrinis2 жыл бұрын

    सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत madhe entry karan avaghad ahe, khup competition ahe ani update rahan, tikun rahan difficult ahe, Paisa milato pan mehnat pan ahe

  • @Fitnessforhealthylife
    @Fitnessforhealthylife2 жыл бұрын

    तुम्ही मस्त explain करता. असेच नवीन विषय येउद्या.

  • @maheshkale5032
    @maheshkale50322 жыл бұрын

    मुंबईतील BMC -150 शिक्षकानं महापालिकेत मराठी शिकलेम्हणुननाकरण्यातआले मराठी माणसाच्या मुद्द्यावर आपणं व्हिडिओ बनववा

  • @dilipshelake803
    @dilipshelake8032 жыл бұрын

    Very well explained. I can relate my self.

  • @romanempire4475
    @romanempire447511 ай бұрын

    तान तनाव प्रत्येक Private job madhe आहे आणि पैसे pan कमी. IT madhe tension ahe pn Paise pn bharpur आहेत Lifestyle chhan आहे. Saturday Sunday weekend Foreign culture. IT is far better than Other private job.

  • @pallavinpatil2841
    @pallavinpatil28412 жыл бұрын

    You said correctly about the working women as software developer, it is really deadly combination

  • @anupkulkarni4273
    @anupkulkarni42732 жыл бұрын

    Pvt co madhe saglikade hich paristhiti ahe but IT valyana jast pagar asto he nakki.. shevti kam saglech jan kartat. pvt.sector madhe saglikade IT valyaevdich bomb ahe ani salary pan milat nahi.😢 IT public mulech ghrachya kimti evadhya bharamsath vadhlya ahet. mhanun mazya mate govt employee yavdech IT vale eitit ahet.

  • @akshay8013
    @akshay80132 жыл бұрын

    Please cover *Bank employees lifestyle* (Government vs Private Bank Employees)

  • @xobohoro1625
    @xobohoro16252 жыл бұрын

    I am currently in IT Industry working as BDM pressure asta pun te kuthe nasta. Aapan aapla kaam imandari ne karayacha. Aapli chul tyavar pet tey, he lakshat theun mehnat gyachi, pun kahi company employees sobat bekar ragdun ghetat. Bugha koni konala jabardasti kaam karayala lau shakat nahi. Paishe jasta tar mehnat pun jasta. Yaa logic var jag chalta.

  • @pravinsalunke5984
    @pravinsalunke5984 Жыл бұрын

    सर पोलिसांची नोकरी किंवा पोलीस भारती चे career निवडनाऱ्यान बाबत एक व्हिडिओ बनवा

  • @indrajitdj
    @indrajitdj2 жыл бұрын

    Each and every word from this video is true, but also the fact is there are lot of individual aspects involved in every industry. If you switch to IT industry from othe fields that exploit human you will start valuing software field even though you have any type of pressure and work stress.

  • @shrutisubhedar501

    @shrutisubhedar501

    2 жыл бұрын

    I agree with you. I have switched from banking, to software and I can feel the difference every single day. People here are very behaved.

  • @omkarchougale6794

    @omkarchougale6794

    2 жыл бұрын

    @@shrutisubhedar501 mam it is wise to switch from banking to IT? Considering work pressure. I m currently working in Public Secty Bank as an Officer. Nowadays banking sector has tremendous work pressure.Please reply.

  • @ushalandesahoo1794

    @ushalandesahoo1794

    2 жыл бұрын

    @@omkarchougale6794 as I heard from my friends banking culture is not good so they moved to IT.

  • @gademanoj1
    @gademanoj12 жыл бұрын

    Fantastic Marathi diction Arunraj! Feels like some friend or family member is talking! Keep up the good work. More than the subject I am watching your videos because I like the way you speak.

  • @akshaytalikhede4545
    @akshaytalikhede45452 жыл бұрын

    Thank u sir konitari amchya baddal pn vichar kela shevtii🙏❣️💯

  • @dhananjaykshirsagar6334
    @dhananjaykshirsagar63343 ай бұрын

    आज मला हेच सत्य समोर आणायचे आहे की मुलांना गवंडी पलबंर बनवा पण ईजीनीयर बनवू नका माझा मुलगा 32 वर्षे वयोगटातील होता रात्री पाळी चा त्या ला ताण आला व त्या ला हाटॅ अॅटक आला तो गेला जीवन भराच दुख देउन गेला आता दोघच उरलो आहहोत

  • @sohamsalgar5776
    @sohamsalgar57762 жыл бұрын

    वकिली पदवी घेऊन बाहेर पडलेल्यांच आयुष्य कस आहे ? ह्याच्यावरदेखील कृपया व्हिडिओ बनवा !

  • @hydramortal4212

    @hydramortal4212

    2 жыл бұрын

    💯💯

  • @tushar12ism
    @tushar12ism2 жыл бұрын

    Nice video but.... Have you ever heared about mechanical design engineer's life....its somewhat like software engineer but the process of designing mechanical components and getting it manufactured without any error is very tough.... This is the topic you will find definitely need to make video after researching....

  • @61.pranamyajoshi23

    @61.pranamyajoshi23

    2 жыл бұрын

    Te AutoCAD vapartat ka?

  • @tushar12ism

    @tushar12ism

    2 жыл бұрын

    @@61.pranamyajoshi23 Ho....all 3D model softwares

  • @10dhanesh
    @10dhanesh2 жыл бұрын

    सुट्टी न मिळणं ही खंत असली तरी याला जबाबदार आपली पद्धतही आहे. डेडलाइन ही सर्व गोष्टी ठरवल्या ( सुटट्यांना पकडून) तर काम पूर्ण करायला पूर्ण वेळ असेल च. पण client कडून बिलिंग चुकायला नको म्हणून मॅनेजर लोकांचा माज/नाइलाज (वरून दडपण) हे कारण ही तितकंच कारणीभूत आहे..

  • @RathoreFitnessAndNutrition
    @RathoreFitnessAndNutrition2 жыл бұрын

    Agdi vyavasthit bollat tumhi 👍 lambun sagla god god vatto , pan ambala mahiti actually life Kashi aste ti 👍

  • @vidyapatil9636
    @vidyapatil96362 жыл бұрын

    Pharmaceutical production dept var video banva. First shift second shift night shift.12 hours first shift 12 hrs night shift. No good increment. Stress etc etc

  • @ketanmengal7401

    @ketanmengal7401

    2 жыл бұрын

    Sarvach thikani 12 hours shift naste 8 hours pn aahe.aani increment naste Karan D pharm asnare suddha production madhe kam karu shaktat.

  • @dsideas5136

    @dsideas5136

    Жыл бұрын

    @@ketanmengal7401 pharmacy is worst field i have ever seen and always get less paid

  • @gouravjoshi3050
    @gouravjoshi30502 жыл бұрын

    I am working in IT since last 10 Years ,We have to manage project deadlines with Personal life and health . If someone want to survive here then need to keep updated with latest tech stacks .

  • @sachinlanjekarkokanyoutube647

    @sachinlanjekarkokanyoutube647

    2 жыл бұрын

    मी गावाला।कोकणात राहतो. समुद्र किनारी. मिळेल त्या पैशात आम्ही सुखी राहतो. आमच्या कडे कोणते ही प्रदूषण नाही

  • @chetanmotghare7657

    @chetanmotghare7657

    2 жыл бұрын

    @@sachinlanjekarkokanyoutube647 tujhe mul pn tithech rahnar ahe ka.... ki tyanna baher pathvnar

  • @bendover-bz4bc

    @bendover-bz4bc

    2 жыл бұрын

    @@sachinlanjekarkokanyoutube647 udya tuzya gharat konala achanak konti mothi bimari zali ani doctor bolel 30 lakh rupees kharch lagel nahitar jiv vachnar nahi teva samjel paishanchi kimmat. Tumchyavar asi paristhiti yeu naye hich mazi prarthana . Mazyavar yeun geli ani teva paisa kiti important ahe te samajle.

  • @gayatrikulkarni346
    @gayatrikulkarni3462 жыл бұрын

    विवाहित महिलांबद्दल खूप छान परिस्थिती व्यक्‍त केली आहे

  • @pratikdesai204
    @pratikdesai2042 жыл бұрын

    Zakkas explanation Bhidu ❤️ ..From die hard software engineer

Келесі