Kavila ek dhoka asto | Shreyasee Vaze-Mantravadi | Sahaj Suchala Teva

'सहज सुचलं तेव्हा' हा माझा पहिला कवितासंग्रह.. माझे लाडके कवी-गीतकार गुरू ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशित झालेला हा संग्रह म्हणजे माझ्यासाठी अनेक आठवणींचा, अनुभवांचा खजिना आहे. या खजिन्यात भर घालत पुढेही अनेक कविता लिहिल्या गेल्या, ज्या या संग्रहात समाविष्ट नाही आहेत. काही कविता वाचल्यावर 'हे अमुक अमुक व्यक्तीवर लिहिलं आहेस की काय?' असे प्रश्न काहींनी विचारले. तेव्हा हा विचार आला मनात की ती विशिष्ट कविता लिहिताना एक असं कोणी नव्हतं डोळ्यासमोर. प्रत्येक कविता ही विविध अनुभवांचा, आठवणींचा, अनेक व्यक्तींविषयीच्या आपल्या विचारांचा गोफ असते. ती कविता स्वतःला लावून न घेता तिचा आनंद घेता यायला हवा. स्वतःला ती कविता लागू पडत असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा. उलट त्यातून आपल्याला काही घेता आलं, स्वतःचं परीक्षण करता आलं, स्वतःला चांगल्या पद्धतीने बदलता आलं तर तसं अवश्य करावं. असंच काही मांडणारी एक कविता 'सहजच सुचली तेव्हा' ती आपल्यासमोर मांडावीशी वाटली. गोड मानून घ्या आणि तुमचा लोभ असाच अविरत असू द्या !!
आवडली तर लाईक करण्याबरोबरच अभिप्राय नक्की द्या..
श्रेयसी

Пікірлер: 6

  • @kalpanashah3143
    @kalpanashah3143 Жыл бұрын

    खर आहे. कविता कोणाचीच नसते. लिहून झाल्यावर ती कवीची पण राहत नाही. ती प्रत्येक वाचाणाऱ्यांची होते. सुंदर. ❤

  • @shrikantvaze1454
    @shrikantvaze1454 Жыл бұрын

    छान रचना व काव्यवाचन! !!!👍👍👍

  • @archanagore9230
    @archanagore9230 Жыл бұрын

    Surekh सादरीकरण आणि सुरेख कविता🌷

  • @nutankanade4315
    @nutankanade4315 Жыл бұрын

    सुरेख

  • @anjalimarathe6849
    @anjalimarathe6849 Жыл бұрын

    सुंदर ❤

  • @rajeshstudio4674
    @rajeshstudio4674 Жыл бұрын

    Kya baat hai

Келесі