Devak Kalji | Episode 4| Tuza Visar Na Vhava |

Ойын-сауық

या series चा हा शेवटचा episode . पण खरंतर ही नव्या नात्यांची एक सुरुवातच नाही का? विनायक आणि गणेशला स्वतःच्या आयुष्यात आपल्या सगळ्यात मोठ्या ego ला बाजूला ठेऊन एक नवीन सुरुवात करता येईल का? त्यांच्यासाठी ही खूपच गरजेची गोष्ट झालीच आहे, पण गणपती बाप्पा ने त्यांच्यात संवाद घडवूण आणलच शेवटी. आता त्यांचं पुढे काय होईल, हे कळण्यासाठी episode पूर्ण बघा! आणि तुम्हाला ही series कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा!
Embark on an emotional journey with our curated compilation of the finest Marathi web series. From riveting trailers to freshly brewed releases, immerse yourself in captivating storytelling and profound character portrayals that will leave you spellbound. As we gaze into the future, anticipate a surge of groundbreaking narratives and thought-provoking themes set to captivate audiences in 2023 and 2024. Whether you're a seasoned enthusiast or a newcomer, our handpicked selection promises an unforgettable viewing experience. Join us as we explore the unique charm and sheer power of emotions in Marathi web series, crafting an extraordinary escapade that will keep you riveted till the very end. Don't miss this chance to witness the ascension of Marathi web series as a dominant force in storytelling.
About This Episode :
The Finale !!!
Get ready to embark on an emotional rollercoaster ride as we present the much-awaited *Finale* of our beloved Marathi Web Series "Devak Kalji"
In this concluding episode, you will witness the intricate lives of Ganesh, Vinayak, and Jhila reaching a pivotal moment. Will they mend the cracks in their relationships, or will they drift further apart? The answers lie in this episode, waiting to be unveiled.
Experience the power of love, friendship, and self-discovery as our characters confront their deepest fears and embrace their true selves. Witness the final moments that will leave you in awe and contemplation.
We are profoundly moved by the overwhelming response and love you have showered upon us throughout this series. Your encouragement has been our driving force, and for that, we are eternally grateful.
Now, we look to you, our incredible viewers, to help us spread the magic of "Devak Kalji." Share this episode with your friends, family, and social networks. Let's make this series a household name, reaching millions of hearts with its touching narrative and universal themes.
Join us in celebrating the finale of a story that has become a part of us, a story that reminds us of the beauty of human connections.
Thank you for being a part of our journey. Don't forget Subscribe to Aapali Sosal Vahini.
Baki, Devak Kalji !
Cast:
Sameer Khandekar
Vinod Gaikar
Bhakti Desai
Divyalaxmi Maisnam
Mukesh Jadhav
Credits:
Producer: Vaibhavi Rane
Writer & Director: Sameer Khandekar
Director of Photography : Suyash Rajendra Mhatre
Editor : Omkar Rane
Music : Rahul Khade - Tejas Kale (Sameehan)
Art Director : Saeesh Pednekar - Rushikesh Andre
Costume : Aparna Khandekar
Assistant Director : Ardra Desai
Production Manager : Shubham Bhobaskar
Line Producer : Rutvik Dhuri
Assistant Cameraman : Dhiraj Sodaye
Sync Sound Recordist: Kailas Bagde
DI : Suraj Singh (Aryan Media)
Graphic Designer : Vaibhavi Rane
Camera Attendant : Ankit Varma
Transport : Sudesh Kule
Title Animation : Sebastian Reddy
Title Graphics : Ganesh Sovani
Legal Advisor :
Adv. Rohan Munj (New Law Alliance)
Adv. Jayesh Mestry
Adv.Hrishikesh Ambre
Digital Partner:
POV Media
Special Thanks
Grampanchayat Naringre, Devgad
Grampanchayat Dabhole, Devgad
Restaurant Kokan Katta, Malad West
Archana Sonde
Tushar Rane
Sunil Dabholkar and family
Jagannath Rane
Bhai Nare
Shailesh Loke
Mukesh Madhukar Sawant, Aachra Paarwadi
Rupesh Satam, Aachra Parwadi
Prasad Parab
Nilesh Parab
Raju Patil, Satwik
Buva Tari
Sainath Mathkar
Sanket Walawalkar
Abhishek Koyande
Aadya Koyande
Vijay Kadam
Sham Gaonkar
Moreshwar Narimgrekar
Ramdas Mithbavkar
Yogesh Kumbhar
Sainath Jalvi (Sai Jalvi Films)
Shubhangi Bhujbal
#kokan #ganpatibappamoraya #ganeshchaturthi #ganeshotsav #kokani #kokanbeauty #marathiwebseries #webseries #marathicontent #aasova #sameerkhandekar #bhaktidesai #mukeshjadhav #gavgatagajali #malvan #malvanivideos #marathicomedyvideo #webseries

Пікірлер: 1 500

  • @abhaysurve6131
    @abhaysurve61319 ай бұрын

    खूप छान वास्तववादी मालिका. डोळ्यात पाणी आणणारी व अंजन घालणारी मालिका. सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉💐💐💐

  • @suchitasaiya1439
    @suchitasaiya14399 ай бұрын

    झिला चे character excellent... डोळ्यात पाणी आले... खूप सुंदर series

  • @autisuresh
    @autisuresh9 ай бұрын

    सर्व टीम चे अभनंदन 🎉🎉 लेखकाला मनाचा मुजरा, खूप सुंदर विषय , सर्व एपिसोड नी डोळ्यात पाणी आणलं काय बोलू अजून ... सर्वाचे पुन्हा अभिनंदन 🎉🎉

  • @sumeetrane4384
    @sumeetrane43849 ай бұрын

    पुढच्या वर्षी ११ दिवस जमले नाहीतरी ५ दिवस गौरी गणपती सोबत पुन्हा आमच्या भेटीस या. सर्वांनी अप्रतिम काम केलं आहे. गणपती बाप्पा तुमचं भलं करो. तुमची सर्वार्थाने प्रगती होऊन भरभराट होवो. बाकी देवाक काळजी🙏

  • @jagruti153
    @jagruti1539 ай бұрын

    खुप छान झाला शेवट.....असाच घरोघरी च्या भाऊबंदकी चा होवो....हिच त्या गजानना ला प्रार्थना

  • @kiransonawane6643

    @kiransonawane6643

    9 ай бұрын

    Khup mst ahe Web series ❤zilaa mst kam kel😊

  • @user-zq4ye7qs3p

    @user-zq4ye7qs3p

    9 ай бұрын

    Aankhein pude pause vate

  • @manjushreesahasrabuddhe7866
    @manjushreesahasrabuddhe78669 ай бұрын

    मी वेब सिरीज कधीच बघत नाही पण ह्याचे चारी भाग लागोपाठ बघितले. असेच हृदयस्पर्शी विषय पाह्यला आवडेल❤

  • @smitakalamkar8391

    @smitakalamkar8391

    9 ай бұрын

    खरोखरच मनाला भावणारी वेब सिरीज. प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय मांडला.सगळ्यांची कामे अप्रतिमच.परत नवीन कलाकृती पहायला आवडेल

  • @vidyawaingankar6004

    @vidyawaingankar6004

    9 ай бұрын

    खूपच छान आहे सिरीज. डोळ्यांत टचकन पाणी आले. झिल्याचे पात्र बेस्ट

  • @shraddhapotdar5088
    @shraddhapotdar50889 ай бұрын

    #AaSoVa धन्यवाद......इतकी भावस्पर्शी सिरीज बनवल्या बद्दल.....कौतुक करायला शब्द कमी पडतील इतका सर्व कलाकारांचा अभिनय सुंदर झालाय...झिला तर अप्रतिम.....संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 🙏👌👍

  • @amolgurav2110
    @amolgurav21103 ай бұрын

    प्रत्येक कोकण वासी लोकांनी पहावे... आणि कोकणी नसलेल्या ...pn कोकणावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने पहावीच अशी मालिका....समोर भाई... ग्रेट ग्रेट....सगळ्याच लोकांचे काम अप्रतिम ... background music uttam... अभिनय अप्रतिम .... लै लै शुभेच्या.... मनापासून आवडली

  • @amolgurav2110

    @amolgurav2110

    3 ай бұрын

    समीर भाई तुझी interview bghun yachi link....open Karu वाटली.. तुझ्या मधील.अप्रतिम कलाकाराला आणि सत्य साठी लढणाऱ्या सच्या सैनिकाला सादर प्रणाम

  • @ParPraRah
    @ParPraRah9 ай бұрын

    Zhilla’s acting is remarkable. Loved this series. Everything is just perfect. So authentic Marathi writing Sameer. Lots of love and energy to you guys for your future work👏🏻👏🏻👏🏻

  • @sandeshkamble260

    @sandeshkamble260

    9 ай бұрын

    True

  • @rekhaalvekar3843

    @rekhaalvekar3843

    9 ай бұрын

    😂

  • @AapaliSosalVahini
    @AapaliSosalVahini9 ай бұрын

    निरोप घेतो रसिकहो आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी🙏🏻 “देवाक काळजी” चा आपला प्रवास इथेच थांबवत आहोत. या निमित्ताने “ आसोवा” कुटूंबात असंख्य रसिक जोडले गेले. आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा आणि आपली ही “देवाक काळजी” वेबसिरीज महाराष्ट्राच्या,जगाच्या कानाकोपर-यात पोहचवा❤️ लवकरच भेटू..तोवर देवाक काळजी🙏🏻

  • @manishjathar7759

    @manishjathar7759

    9 ай бұрын

    कोकणात अजूनही खूप विषय आहेत, अशेच नव नवीन विषयाची मांडणी करा नवीन सिरीज ची वाट बघतोय..

  • @smallcaseproduction6399

    @smallcaseproduction6399

    9 ай бұрын

    खूप छान झाला 🎉

  • @Manju........444

    @Manju........444

    9 ай бұрын

    खूप खूप छान सिरीज बेस्ट बेस्ट बेस्ट मोरया मोरया नक्कीच millions व्हिवसला होणारर 🎉

  • @omkarnalawade4387

    @omkarnalawade4387

    3 ай бұрын

    जबरदस्त रचना वास्तविकतेच भान दाखवणारी सिरीज

  • @meenas826

    @meenas826

    3 ай бұрын

    Apratim,vastavache bhan teun kelele lekhan.

  • @umajangam9396
    @umajangam93964 ай бұрын

    आताच्या घडीला असे नातेसंबध जपणे फार गरजेचे आहे.सुंदर वेबसीरीज आणि सर्वांचा अभिनय सुंदर

  • @Kokani_porga_official
    @Kokani_porga_official9 ай бұрын

    मस्त आहे वेब सिरीज आणि डोळे भरून आले असच नवनवीन बघायला आम्हाला खरच आवडेल लवकरच नवीन काहितरी घेऊन या सर... ❤

  • @sandeepkelaskar4334
    @sandeepkelaskar43349 ай бұрын

    खुपचं छान लेखणी ❤ आपल्या अभिनयातून खुप काही शिकण्यासारखे आहे... तुम्ही जिवंत अभिनय केला 👏👏👏 असेच व्हिडिओ बनवत रहा 🙏 देवाक काळजी 🙏 गणपती बाप्पा मोरया 🤩✨💫❣️

  • @swaminichavan_09
    @swaminichavan_099 ай бұрын

    वाह...! समीर खांडेकरानचे आपल्या कोकणा बद्दल असलेला जिव्हाळा म्हणजे प्रश्नच नाही 🙏 लेखन आणि कॉन्सेप्ट खूप विचापूर्वक हल्लीच्या परिस्थितीवर भाष्य करणारी आहे 👌👌 आणि प्रतेकाच्या आयुष्यात झीला ही व्यक्ती असावी.. शेवटी देवाक काळजी🙏🌸 #AsSoVa आणि पूर्ण देवाक काळजी च्या टीम चे मनपूर्वक अभिनंदन व खूप छान रीत्या आपल्या कोकणाला आपल्या कोकणातील सौंस्कृतिला दाखवले आहे त्या साठी पूर्ण टीम चे धन्यवाद 🙏👌... बा देवा महाराजा शंकर गजानना आपली सोसल वाहिनी या चॅनल च्या कलाकारांनी देवाक काळजी ही वेब सिरीज बनियली असा तिका खूप यश दी महाराजा .... व्हय म्हाराजा 🙏🙏🌸

  • @pradnyachavan4702
    @pradnyachavan47029 ай бұрын

    खुपचं छान....अनेक असे क्षण होते जेंव्हा डोळे वाहू लागले....गणपती बाप्पा मोरया... देवाक काळजी ❤❤❤

  • @prakashphatkare8592
    @prakashphatkare85929 ай бұрын

    डोळे पाणावले .खरंच खूप अप्रतिम वेब सीरिज होती. मुंबईला जरी असलो तरी मन आणि हृदय कोकणातच असेल शेवट पर्यंत.

  • @maheshmuthe99
    @maheshmuthe999 ай бұрын

    अतिशय छान शेवट. अप्रतिम सिरीज. सुंदर विषय आणि संकल्पना. दर्जेदार संगीत , लिखाण व अभिनय सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन व आभार 🙏🏼 पुन्हा नवीन सिरीज ची आतुरता असेलच, तो पर्यंत....देवाक काळजी 🙏🏼🌺 गणपती बाप्पा मोरया 🙏🏼🌺

  • @preciouslife..withindianyo4826
    @preciouslife..withindianyo48269 ай бұрын

    रडवलत रे तुम्ही लोकांनी.. असेच छान छान काय काय घेवून येत जावा.. उत्कृष्ट विषय... कलाकार.. अभिनय आणि picturization...❤❤❤❤❤❤..waiting for another new web series❤

  • @thedreamdecor267
    @thedreamdecor2674 ай бұрын

    खरच खूप छान आहे ही web series.. प्रत्येक माणसाला आपले हक्काच्या घरची किंमत कळून देणारी, आपले गाव किती मौल्यवान आहे हे कळाले. शेवटचा episode तर बगून कुनालापण रडायला येईल.. खूप मस्त आहे.. झिलाला तर मी गाव गता गजाली पासून ओळखते तो म्हणजे आमचा बबन्या.. ❤❤❤ अजून अश्याच real life वरती आधारित web series बगायाला खूप आवडतील ❤❤❤❤ गणपती बाप्पा मोरया.. श्री रवळनाथ प्रसन्न 💫🤗

  • @aniketkeni1477
    @aniketkeni14779 ай бұрын

    खरंच खूप छान सीरिज होती.. खूप भावली आणि लक्षात राहिल! अशा अनेक चांगल्या सिरीज येत राहूदे आणि व्हायरल होऊदेत.. समीरची 'मित्रम्हणे' वरची मुलाखत बघून तर आदर वाढलाच होता!! 🙏🏼 अनेक शुभेच्छा!!! ❤😊

  • @parabhpramod9369
    @parabhpramod93699 ай бұрын

    खरच खुपच सुंदर सादरीकरण केलत हा एपिसोड बघताना डोळ्यात पाणी आल आणि सर्वाना सांगितल की गणपतीची वर्सल पद्धत आणून देवाला वाटून घेऊ नका जमेल तशी त्या बप्पाची सेवा करा सर्वाना खुप खुप शुभेच्छा❤❤❤

  • @akakki7447
    @akakki74479 ай бұрын

    What a writing Sameer!! I must say that it this is true reflection of what Kokani Mumbaikar goes thru when you say bye bye to Ganapati Bappa and come back to Mumbai. Hats off to Sameer for remarkable writing and all actors are good special thanks to Zhila character. I still can’t get over this web series! I was eagerly waiting for episode -4 . Truly deserve for full fledge movie in future!!! I am from London but always miss Ganapati from Ratnagiri!!! Tremendous cinematography of Kokan! Please let us know which place this was shot in Kokan! Great work behind the lenses!

  • @hpmajukar
    @hpmajukar9 ай бұрын

    खुपच छान..आपल्या वाडवडीलांनी मोठ्या कष्टाने हौसेने बांधलेल्या गावातल्या वास्तुला आताच्या पिढीने जपलेच पाहिजे हा संदेश हृदयापर्यंत पोहोचला. आपल्या सर्व टीम च मनापासून अभिनंदन👏

  • @sanjaysawant3916
    @sanjaysawant39164 ай бұрын

    खुप खुप सुंदर अप्रतिम गावची कहाणी गणपती बाप्पा मोरया

  • @pramodshintre7367
    @pramodshintre73679 ай бұрын

    खूपच छान....एकदम ह्रदयस्पर्शी खूप दिवसांनी काही चांगल पहायला मिळालं.... Hats off to zilas character...... Thank You For the heart melting web series 🙏🏼

  • @pradeepsale7674
    @pradeepsale76749 ай бұрын

    अप्रतिम सादरीकरण अप्रतिम कथा अप्रतिम लोकेशन सर्व काही खूपच छान 👌👌 मनात घर करून जाणारी गोष्ट... गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...देवाक काळजी👍👍👌👌👌💐💐💐🫡🫡🫡

  • @shivarampandit716
    @shivarampandit7167 ай бұрын

    खूपच छान.शेवटी नेत्र चिंब झाले. झिला ने सुंदर काम केले.❤ गणपती बाप्पा मोरया.

  • @chitrahirlekar7815
    @chitrahirlekar78159 ай бұрын

    खूपच छान प्रसंग चित्रित केले आहेत.... कोकणात फिरवून आणले... घरोघरची वस्तुस्थिती हुबेहूब जमलीय....झीला अप्रतिम....अभिनय , बोलीभाषा एकदम तंतोतंत....

  • @rajashreemisal3246
    @rajashreemisal32469 ай бұрын

    खुपचं सुदंर शेवट, अप्रतिम , बोधयुक्त आणि वास्तववादी मालिका 👌 कोकणातील निसर्ग सौंदर्य खुपचं सुदंर, सर्व कलाकारांचा अभिनय अप्रतिम. Sound music, dialogue 👌 backstage कलाकारांचे काम सुदंर. सर्व कलाकारांना मनपूर्वक धन्यवाद 🙏 God Bless to All 🙏🙏🙏

  • @rajsh9122
    @rajsh91229 ай бұрын

    खूपच सुंदर, डोळ्यात पाणी आणलत मित्रांनो. Wonderful series with wonderful actors ❤ बाप्पा तुम्हाला भरगोस यश देवो 🙏🏻

  • @umaraorane1235
    @umaraorane12359 ай бұрын

    Khup sunder,Sameer,vastavvadi likhan.saglexh great actors,God bless you all.

  • @AyeshaKhan-px2ql
    @AyeshaKhan-px2ql5 ай бұрын

    असे वेब सिरीज बनवा रे बाबांनो, खूप छान वाटले, शेवटी डोळ्यांत पाणी आणले तुम्ही. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

  • @pratikshasawant4200
    @pratikshasawant42009 ай бұрын

    जीवाला भावणारे संगीत आणि गोष्ट.पाठून येणारी संगीता ची साथ ही वेगळ्याच जगात घेऊन जाते.खूपच सुंदर.

  • @anjalishastri4624
    @anjalishastri46249 ай бұрын

    खुप सुंदर....एका फटक्यात चारही episode पाहून टाकले.... अप्रतिम 👌👌👌👌🙏सगळ्या आघाड्यांवर उत्कृष्ट...पण सगळ्यात भावला तो झिला ❤️

  • @rupeshsalvi2976
    @rupeshsalvi29769 ай бұрын

    कोकणातल्या प्रत्येक घरात घडणारी घटना मांडली तुम्ही ❤❤❤❤❤ चारही भाग अप्रतिम होते.... पुढच्या वर्षीची वाट बघतोय ❤❤❤❤❤❤

  • @avinashranade9534
    @avinashranade95349 ай бұрын

    खूपच सुंदर हृदयाला हळुवारपणे चाटून जाणारी गोष्ट, चित्रीकरण उच्च दर्जाचे...सुंदर कोकण, आमचं कोकण..नकळत कोकणात पोहचवले.. धन्यवाद, अविनाश रानडे, हैदराबाद

  • @diptisakharikar3121
    @diptisakharikar31219 ай бұрын

    खूप अप्रतिम वेब सिरीज! सगळ्यांचा सहज सुंदर अभिनय! लेखन, दिग्दर्शन, फोटोग्राफी सगळंच अती उत्तम! खूप छान अनुभव दिल्याबद्दल सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.

  • @user-gc4pe2qg5r
    @user-gc4pe2qg5r9 ай бұрын

    गणपती बाप्पा मोरया ❤❤मराठी माणसं किती रागात असले तरी एक क्षण पुरेसा असतो मन जुळ्याला ❤❤ ASOVA ROCKS 🙏🏻🙏🏻देवाक काळजी रे

  • @user-yg7ep5ew5m
    @user-yg7ep5ew5m9 ай бұрын

    कसा कौतुक करु तुमचां, प्रत्येक कोकणी माणसाच्या काळजाक छेडणारे विषय म्हणजे भावकी आणि गणपती आणि त्यात तुमचा कोकणाचा सुंदर चित्रण. खरचं खुप चांगलो विषय निवडलास. अभिनंदन तुमच्या सर्व टीमचा.

  • @ektapawar6225
    @ektapawar62259 ай бұрын

    Episode bagtana fakt feeling express mahnun ashru dolyatun yet hote...superb....

  • @ajitraje1
    @ajitraje19 ай бұрын

    मुकेश भाऊ तुमचा अभिनय कडक... लयभारी... अप्रतिम.... तुमच्या टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा....💐💐💐💐

  • @fitnessfirst609

    @fitnessfirst609

    9 ай бұрын

    zilya kamal Kelis mitra

  • @kmilind3660
    @kmilind36609 ай бұрын

    खूप छान आणि सुंदर सिरीज आहे.. संपूर्ण टीम चे अभिनंदन ...🎉🎉🎉 ❤❤❤

  • @user-gp2fr5cd9r
    @user-gp2fr5cd9r5 ай бұрын

    खुपच छान सिरिज आहे डोळ्यात पाणी आले आपल्याच घरातील वास्तव्य आहे असे वाटते

  • @samiksharane3751
    @samiksharane37519 ай бұрын

    खुप सुंदर सिरिज आहे.......नात्यातला गुंता.... सोडवण कठीण वाटत.....पण खरंच देवाक काळजी...... संयम,एकमेकांवरील भरोसा,आणि तेवढीच काळजी.....एकमेकांची.....खूप चांगल्या त्हेने विषय दाखवलाय......great......❤

  • @tejashreeshinde7403
    @tejashreeshinde74039 ай бұрын

    Khupach chan Webseries… touched our hearts. Waiting for another season My fav character is Zhila 😊❤️

  • @roshanburte5661
    @roshanburte56619 ай бұрын

    खुपच छान आहे वेब सिरीज❤ विषय सुद्धा खूप छान पद्धतीने मांडला आहे🙌 #AaSoVa टीमचे खूप खूप अभिनंदन👏 ह्या वेब सिरिजचे अजून भाग व्होवोत हीच प्रार्थना🙌 #thankyou #teamAaSoVa देव तुमच्या सर्वांचं निरंतर भल करो🙌 गणपती बाप्पा मोरया ❣️

  • @ritaparab8937
    @ritaparab89379 ай бұрын

    सगळी सिरीज ज्याने टिपली आणि लेखक...दिग्दर्शक यांचे अगोदर खूप खूप कौतुक ...सगळी गोष्ट खूप सहजतेने मांडली होती..प्रत्येक वेळी प्रत्येक पात्रा बरोबर त्याच्या भावणांमध्ये गुंतत गेलो जणू स्वतः तिथे आहोत. विषय खूप नाजूक अगदी घरा- घरातलाच होताच. मुकेश यांचा अभिनय मनाला भावला आणि मनात घर करून गेला...सगळ्यांनीच खूप उत्तम पणे विषय पोचवला...सच्या तुला बघुन खूपच आनंद झाला... सगळ्यांचे आभार आणि अजून अश्याच खूप सिरीज साठी शुभेच्छा...आणि रडवलस मित्रा हे बोलण्या ऐवजी जिंकलस मित्रा हे वाक्य योग्य ठरेल.... बाकी तुम्ही यावेळेक उसळ दिलास न्हाय ता लक्षात ठेवा 😉

  • @manjushalagoo6937
    @manjushalagoo69379 ай бұрын

    ह्रुदयस्पर्शी मालिका!

  • @nskanade
    @nskanade9 ай бұрын

    Excellent story and very well scripted and executed. Hats off to all contributed. And more importantly, am glad this worked well even in the judiciary terms with you. Glad this came to us for view. Huge thanks to all. Love from Puneri heart residing in Melbourne ❤❤

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak3739 ай бұрын

    Heart touching!!! Aasova Team Kamaal kelit!! Manapasoon Shubhechha sampoorna Team la!!🙏🙏

  • @amolvalanju512
    @amolvalanju5129 ай бұрын

    खुप छान बनवली आहे सीरीज ज्या दादा ने ही स्टोरी लिहिली आहे ना त्यांचे प्रथम आभार तसेच पूर्ण टीम चे आभार खरच कोकनात ही सगळीकडे परस्थिति आहे आनी ती तुम्ही उत्तम मांडली आणि अश्याच् प्रकारे ही सीरीज पाहुन कोकनातील लोक हेवे दावे विसरुण गणपति ला गावी एकत्र येतील अशी गणपति चरणी प्रार्थना गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया

  • @tusharghadigaonkar3069
    @tusharghadigaonkar30698 ай бұрын

    कसला भारी Episode होता. यार , डोळ्यात पाणी आंल❤

  • @yogeshjogle5946
    @yogeshjogle59469 ай бұрын

    एक अप्रतिम कलाकृती झाली आहे. सर्व च कलाकारांनी खुप छान काम केले आहे. विशेष उल्लेख झिला साकारणारे जाधव , समीर खांडेकर , दिव्या आणि भक्ती देसाई . समीर ची कविता पण एकदम मस्त. मालिकेच्या कित्येक प्रसंगात डोळ्यांतून नकळत पाणी तराळत आणि एक ओढ लागते आपल्या कोकण ची आणि तिथल्या गणपती उत्सवाची. गेली काही वर्षे मुंबईतला गणपती उत्सव खरोखरच हरवला आहे असे जाणवत होत त्याचं कारण बाप्पा ही कदाचित या मुंबई भूमी पासुन दूर होऊ पाहतोय आणि उत्सवाला आपल्या कोकणात च जातोय असे वाटत. तुमच्या सर्व टीम चे आभार आणि अभिनंदन. गणपती बाप्पा मोरया !🙏🙏🙏🙏

  • @yogeshjogle5946

    @yogeshjogle5946

    9 ай бұрын

    Poster boyz 2 aan Timepass ya madhil bhumike nantar ek vagala aani adhil saksham abhineta Samir Khandekar madhye disla ya web series madhyd

  • @nitins1802
    @nitins18029 ай бұрын

    One of the best series I have saw after many days .. Awesome ❤❤❤❤😢best of luck for next projects

  • @sheetaljadhav4884
    @sheetaljadhav48849 ай бұрын

    खूप छान web series देवाक काळजी आहे. 4 ही episode बघताना असं वाटलं आपली घरातली गोष्ट आहे ही, AaSoVa ने घराघरात सध्या चा काळात असणारा विषय इथे खूप छान पद्धतीने मांडला आहे यातून खूप काही चांगल शिकायला मिळालं सगळ्या कलाकाराचे मुकेश जाधव, समीर खांडेकर, भक्ती देसाई, दिव्यालक्ष्मी, विनोद गायकर आणि कोकणातल्या सगळ्या कलाकारांचा अभिनय खूप छान होता अशी आणखीन छान छान विषय घेऊन AaSoVa ने यावे आणि आणि खुप प्रगती करावी ही च सदिच्छा 💐💐💐💐❤❤

  • @ruchitasawant8693
    @ruchitasawant86939 ай бұрын

    Seriously dolyat Pani aanlas... khupch sunder kathanak... devak kalji.. bappa asach saglyana ekatr thevo...

  • @madhavidesai5420
    @madhavidesai54209 ай бұрын

    सगळ्या कलाकारांचे अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ❤

  • @nandusawant3705
    @nandusawant37059 ай бұрын

    Beautifully made all four episodes. Enjoyed it. 😊. After watching I really missed my village in Ratnagiri. Great work all. Nandu Sawant. Virginia, USA

  • @amod333
    @amod3339 ай бұрын

    रडवलतं मित्रांनो खुपचं अप्रतिम वेब सिरीज त्यात या वर्षी गणपतीला कोकणात जायला नाही मिळालं त्यामुळे अजूनच जिव्हाळ्याची झाली सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @amitmhaskar8128
    @amitmhaskar81289 ай бұрын

    चारही एपिसोड्स अतिशय उत्कृष्ठ झाले आहेत सर्वांचे काम उत्कृष्ठ झाले आहे आणि विशेष म्हणजे झिला हया character चे काम अतिशय उत्कृष्ठ आणि नैसर्गिक झाले आहे मालिका खूपच टचिंग झाली आहे आपल्या सर्व टिमला धन्यवाद आणि अनेकोत्तम शुभेच्छा ❤

  • @user-ch6bj9xw6g
    @user-ch6bj9xw6g9 ай бұрын

    मन हेलावून टाकणारी कथा ..... येवा कोकण आपलाच आसा ❤️❤️❤️

  • @prashantgavkar2678
    @prashantgavkar26789 ай бұрын

    खूप लवकर संपवली webseries 😢.... १० episode तरी पाहिजे होते Climax ची कविता छान आहे...

  • @namitaaphale9478
    @namitaaphale94789 ай бұрын

    झिला....अस्सल कोंकणी माणूस लीलया वठवलायत !!! अस्स्संच छान दिसेल इतकं अप्रतिम चलचित्र !!!! मनापासून धन्यवाद !!!

  • @ashwinipatwardhan5539
    @ashwinipatwardhan553929 күн бұрын

    मी मित्रम्हणेच्या एपिसोड नंतर पाहीली....खूप खूप सुंदर .सगळ्यांच्या भूमिका अप्रतिम .झिल्या खूप छान आणि खरा ..

  • @AapaliSosalVahini

    @AapaliSosalVahini

    29 күн бұрын

    खूप खूप धन्यवाद!!

  • @_kaivalyasamrajyachakravarti
    @_kaivalyasamrajyachakravarti9 ай бұрын

    ❤ ||Ganpati bapa morya|| 🚩❤️✨

  • @shubhamkorgaonkar5537
    @shubhamkorgaonkar55379 ай бұрын

    खूप मस्त ❤ हसता हसता डोळ्यात पाणी 😢

  • @pramodwalke3259
    @pramodwalke32599 ай бұрын

    देवाक काळजी पहाणे । योग आ सो वा 👌🥰 सुदंर माडणी़ । उत्तम लेखन कोकणचा स्वाद । आणी आवशिक खाल्यान आमची मालवणी भाषा । पेजेबराबर आणखी काय व्हया । बस पोट भरला मरे समीर। ।।

  • @gharatepallavi318
    @gharatepallavi3187 ай бұрын

    देवाक काळजी... खरंच वास्तव विषय आणि तितकाच जिवंत, तगडा अभिनय. असं वाटत की सगळं आपल्या समोरच घडतंय. प्रत्येक पात्रात आपणच बोलतोय की काय असे जाणवते. कोकणाचं निसर्गसौंदर्य जेवढे वर्णावे तेवढे कमीच की.... मस्त मस्त असेच विषय घेऊन भेटत राहा. पुढील दैदीप्यामान वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @jeevanshinde8490
    @jeevanshinde84909 ай бұрын

    काही पण बोल पण एकदम कळीच्या मुद्याला हात घातला आहे आपण सगळेच मुंबईला राहत असलो 2035 पर्यंत हे असच राहील का इकडे विकास नको 2050 मधे लोक मागे वळून हेच शोधायला येतील विकास कितीही झाला मुंबईमध्ये तरीपण शांतता इकडेच मिळते असं नको व्हायला सगळे मुंबईकडे आणि तिकडे रान मोकळं झालय कोणी मारवाडी गुजरातीने आपले बंगले बांधले आहेत आणि आपण पैसे देऊन तिकडे राहतोय आणि हे आपल कोकण असं नको व्हायला कृपया काही करा घरे विकू नका

  • @markoyog
    @markoyog9 ай бұрын

    मुकेश... किती छान भूमिका साकारलीस. खूप मोठा अभिनेता हो... संपूर्ण सिरीज, प्रत्येक एपिसोड छान आहे. कामंही सगळ्यांचेच छान. खूप शुभेच्छा तुम्हाला...

  • @anilbaburaoshinde
    @anilbaburaoshinde9 ай бұрын

    चार ही भाग उत्तम झाले आहेत. कथानक आणि मांडणी कमाल. मराठीत चांगली वेब सिरीज बनत नाहीत अशी बोंब मारणाऱ्या नो.त्या हिंदी चया किळसवाणी वेब सिरीज पाहणाऱ्यानो. मराठीत सुद्धा दर्जात्मक वेब सिरीज बनतेय. जी वेब सिरीज आपल्याला खिळवून ठेवतेय. नात्यातील भावनिक गुंतागुंत वाढत जातोय. आपली माणस जपा. हा संदेश डोळ्यात पाणी आणून गेला. बाप्पा नात जुळवून गेला. सर्वांची कामे आवडली आहेत. पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा. मिलियन पेक्षा जास्त views मिळतील. हा विश्वास आहे माझा बाप्पावर. गणपती बाप्पा मोरया

  • @shrutibane4104
    @shrutibane41049 ай бұрын

    Khup mst ahe Webb डोळ्यात पाणी आलं.ganpati बाप्पा मोरया 🌺👍

  • @tusharrane102
    @tusharrane1029 ай бұрын

    अत्यंत सुंदर अशी वेबसिरीज. आमच्या जिव्हाळ्याचा असलेला विषय खूप छान हाताळलात. आणि त्यात आमच्यासारख्या खेडेगावातल्या कलाकारांना कॅमे-यासमोर काम करायची संधी दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार... आणि या गोष्टीचा विशेष आनंद आहे की आपल्या नारिंग्रे गावात याचं चित्रीकरण झालं, आपल्या गावाचं सौंदर्य हजारो लोकांनी पाहिलं. ही वेबसिरीज लाखो लोकांनी पाहावी हिच परमेश्वर चरणी प्रार्थना... आणि आसोवाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.... यापुढेही असंच लोकांच्या काळजाला हात घालणारं काम करत राहा... आम्ही कायम सोबत आहोत...

  • @sachindhasade2497
    @sachindhasade24979 ай бұрын

    एकच नंबर आहे.आपला ग्रुप,आणी तुमची स्टोरी.पण खर सांगू विनोद डोळ्यात पाणी आल.खूप छान पुढील वाटचालीसाठी आपल्या बाप्पा कडे नक्की गारणे गातो.आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार यासाठी की आपल्या सर्वांची देवक काळजी.

  • @deepaknesrikar900
    @deepaknesrikar9009 ай бұрын

    खूप खूप छान... सर्वांना हार्दिक शुभेच्छा... विदर्भातील शेतक-यावर पण एखादा विषय यावा. खूप छान पध्दतीने आपण प्रेक्षकांसमोर विषय मांडता आहात.धन्यवाद🙏🙏

  • @rp-fy6ml
    @rp-fy6ml9 ай бұрын

    मनाला भावणारी वास्तववादी मालिका. जी आज प्रत्येक गावात पाहायला अनुभवायला मिळते.खूप छान विषय. खूप खूप शुभेच्छा.

  • @user-pj2wl8kn6z
    @user-pj2wl8kn6z9 ай бұрын

    झिला हा कोकणातील प्रत्येक घरातील एक भाग आहे आणि त्याचे उत्तम चित्रीकरण झाले त्यातच आमचा मुकेश एक गुणी कलाकार तसे आपण सर्वच उत्तम आहातच, मुकेश त्याच्या भूमिकेबाबत शंकाच नाही हृदय हालवून टाकल पोरांनी. आई जगदंबा तुमच्या पाठीशी आहेच.अशी मस्त मस्त विषय घेवून या. 🙏🙏🚩🚩 जगदंब 🙏🙏🚩🚩 पुढच्या वर्षी लवकर या.

  • @jyotigohad4890
    @jyotigohad48909 ай бұрын

    विषय खुपच छान होता, काम ही सगळ्यांची छान झालीत, सिरीज बघून लोकांनी घरातील वाद मिटवावेत हीच गणपती चरणी प्रार्थना. 👌🏻👌🏻👍🏻🙏💐

  • @supriyasawant1469
    @supriyasawant14699 ай бұрын

    Excellent writing,Zila is too good, dolyat pani ale . All character are.too good

  • @sonusawant3242
    @sonusawant32429 ай бұрын

    मालवणीतून बोलतय....... ऐक ते चार एपिसोड आसत ते ...एकदम भरी .. शब्द नाय माजा कडे.... डोळ्यासून पानी येण्या सारखे आसत....कोणी पण पाहुंदे....नक्की डोळ्यातून पाणी येणार..... सगळेच भरी आसत.....100 पैकी 100...आभार तुमचे येवडी चांगली सिरीज .... बनवलात.....❤ love u all

  • @nishankmhatre919
    @nishankmhatre9199 ай бұрын

    ही गोष्ट कोर्टात पोट तिडकीने सांगून तू ह्या गोष्टीला न्याय मिळवून दिला आणि तुझ्या खरया गोष्टी साठी तू लढलास त्या वेळी बाप्पा खरच तुझ्या बरोबर होता. ही सिरींज खुपच छान झाली तुझी.... तु ह्या पुढे ही अश्याच नविन सिरींज देत जा... मी सध्या भारतात नाही रहात पण परदेशी असुनही तुझ्या येणार्या नविन पार्ट ची वाट बघत असायचो. Thank you for ur efforts towards this series.. पुढिल वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏

  • @manishadalvi8790
    @manishadalvi87909 ай бұрын

    असेच घरोघरी एकी होऊ दे,मस्त खुप मनाला भावलं धन्यवाद 🙏

  • @yugandharapage5674
    @yugandharapage56749 ай бұрын

    खूप छान लेखन , दिग्दर्शन, अभिनय, विषय हृदयस्पर्शी होता , प्रत्येकाने आपली माणसं , बालपण , प्रेम , जिवलग मित्र , संस्कृती कधीच विसरू नये. बोधात्मक मांडली . असेच विषय हळूवार हाताळावे . पुढच्या एपिसोडची वाट पहातीये , ऑल द बेस्ट 😊😊

  • @kiransawant2427
    @kiransawant24279 ай бұрын

    खूप छान, आपल्या सर्व कलाकारांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. खरोखर आपल्या गावाकडच्या मातीचा, गावाकडच्या संस्काराचा, आपल्या गावाकडच्या साध्या राहणीचा मनस्वी आनंद ही वेब सिरीज पाहत असताना मिळाला. त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.

  • @veenamedhekar9668
    @veenamedhekar96689 ай бұрын

    अतिशय सुंदर ,असेच उत्तरोत्तर व्हीडिओ येऊ देत ,🙏🙏 आणि देवाक काळजी ,असे अनेक व्हीडिओ येणार आणि प्रेक्षकांच्या पसंतीस येणार याची 100 टक्के खात्री आहे

  • @priyankakamale6947
    @priyankakamale69479 ай бұрын

    सर्वांच्या घरात हेच चालू आहे सध्या.. किचकट विषय नीट सादर केला आहे .. उत्तम लेखन आणि सादरीकरण ❤❤

  • @bhavanasheth336
    @bhavanasheth3369 ай бұрын

    अतिशय सुंदर शेवट, खूपच भावनात्मक सीरिज आहे,आपल्या कोकणातली बऱ्याच जणांची हीच व्यथा आहे

  • @sandeshgharat642
    @sandeshgharat6429 ай бұрын

    खरचं खूप छान ... सुंदर विषय.... गणपती बाप्पा अशेच एकमेकांमधील क्लेश दुर करतो.

  • @narendravichare
    @narendravichare9 ай бұрын

    अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम आणि हृदयस्पर्शी .. 👌👌😍 खरा हा... देवाकच काळजी 🙏😊

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar54909 ай бұрын

    खरय."देवाक काळजी".शेवट खूप गोड.सर्वांची मेहनत फळाला आली.खरं ते खरं पुढे आलं,तुम्ही एकेक दिव्व्यातुन कसे बाहेर आलात,ते बघुन पुन्हा म्हणावस वाटतं"देवाक काळजी".सर्वांना खूप शुभेच्छा व आशिर्वाद.❤

  • @jayeshsahasrabuddhe5228
    @jayeshsahasrabuddhe52289 ай бұрын

    खूपच अप्रतिम गावची मित्रांची खूप आठवण आली आणि खूप रडलो खरंच खूप छान मांडणी केली आहे दादा खूप आवडला सर्वांची कामे पण छान असेच नवीन नवीन विषय घेऊन या गणपती बाप्पा मोरया🎉🎉🎉😭😭😭😭😭😭😭 पुढच्या वर्षी लवकर या आम्ही वाट बघतोय

  • @tusharnaik327
    @tusharnaik3278 ай бұрын

    खरंच खूप अतिशय सुंदर सिरीज.....एकदम डोळे भरून आले.......heart touching.

  • @prashantnaik5576
    @prashantnaik55769 ай бұрын

    शेवट गोड करी गणराया, शेवट गोड करी, खूप बारा वाटला, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @dayah3968
    @dayah39689 ай бұрын

    सर्व प्रश्न आणि वाद तिथेच सोडवले जातात ते मुख्य ठिकाण म्हणजे आपले मूळ गाव आणि रक्ताची नाती.खूप सुंदर आणि जड मनाला हलक करणारे एपिसोड.

  • @yogeshgavali7157
    @yogeshgavali71579 ай бұрын

    Mi bagitleli aata paryant tachi Sarvat Best webseries god bless all of you khup means khup bhari webseries shabd ny ❤

  • @vaishnavibrid-fo5gh
    @vaishnavibrid-fo5gh9 ай бұрын

    सुंदर , सुरेख , अप्रतिम , काय बोलू शब्दच नाहीयेत , डोळ्यात पाणी आहे , आनंद देणारे धन्यवाद, सर्व टिमसाठी ❤❤❤❤❤❤ 🌹 गणपती बाप्पा मोरया 🌹

  • @jayashrisawant4234
    @jayashrisawant42349 ай бұрын

    आतून बाहेरून हलवून टाकले ,सर्व कलाकारांचे काम खूप अप्रतिम ,असेच सुंदर कोकणातील सिरीज बनवा,

  • @pritinaik975
    @pritinaik9759 ай бұрын

    इतकी जबरदस्त सिरिज आहे ना.. ❤❤❤ खुप च भारी. एकेक क्षण खिळवून ठेवतो.. झिला द बेस्ट ❤❤❤❤❤

  • @user-nj4fn3ns4m
    @user-nj4fn3ns4m9 ай бұрын

    समीर दादा खुपच सुंदर विषय, मांडणी... लेखकाचे आणि सर्व कलाकारांचे अभिनंदन... कोकणातल्या प्रत्येक घरात एक झिला असतो आणि तुमचा झिला पण आम्हाला आपला तोच झीला वाटला...गणपती आत्ताच येऊन गेले पण गावाकडची ओढ संपत नाही...डोळ्यात पाणी आलं गावातल , गणपतीचं वातावरण पाहून... गणपतीचा आशीर्वाद तुमच्यावर असाच राहो आणि तुम्हा सर्व कलाकारां कडून तो असेच उत्तम काम करून घेत राहो हीच प्रार्थना 😊

  • @LifeEvolve
    @LifeEvolve9 ай бұрын

    Leading OTT च्यापेक्षा स्पेशल होती हि सिरीज. विषय, अभिनय, फोटोग्राफी, क्लारिटी तर फारच छान. मज्जा आली. Worth watching. लिखाण अणि अभिनय मराठी नेहमी विशेष असते आता technology ने पण संपन्न आहेत आपले काँटेंट. खुप छान. वेगळे वेगळे विषय आणून broawder viewership मिळुदे - होय महाराजा. ❤

Келесі