Datun Kantha Yeto | Unplugged | Rahul Deshpande |

Музыка

Film: Ashtavinayak
Orinal Singer : Dr Vasantrao Deshpande
Music : Anil-Arun
Lyrics : Shantabai Shelke
|#rahuldeshpande|#vasantraodeshpande|#ashtavinayak|

Пікірлер: 1 100

  • @udayrajd
    @udayrajd3 жыл бұрын

    प्रत्येक वेळी ऐकतांना डोळे भरून येतात, हे गाणे नसून प्रत्येक बापाच्या भावनाच गळ्यातुन येत आहेत. आता (मुलीच्या जन्मानंतर) हे गाणे मी गाडी चालवतांना कधीच ऐकत नाही, कारण हे गाणे ऐकतांना रस्त्यावरचे काहीच दिसत नाही

  • @nilamsalvi55

    @nilamsalvi55

    3 жыл бұрын

    Khare aahe 😭😭

  • @aneeshyt7908

    @aneeshyt7908

    2 жыл бұрын

    L

  • @nijamuddindeshpande5713

    @nijamuddindeshpande5713

    Жыл бұрын

    Agadi manatalya bhawana

  • @udaykumarmahindrakar9277

    @udaykumarmahindrakar9277

    Жыл бұрын

    Very True.

  • @nitinmore8092
    @nitinmore80923 жыл бұрын

    मी मुळात च देवीभक्त आहे , लग्न उशिरा,मुलं उशिरा,आज माझी मुलगी अडिच वर्षांची आहे , श्री स्वामी समर्थ महाराज आणि आईजगदंबेच्या कृपेने तीचा जन्म पण नवरात्रौत्सव पहिला दिवस घटस्थापना म्हणून मी तीच नाव पण वैष्णवी ठेवले आहे ,असो लहान पणापासून हे गाणं ऐकत आलो आहे ,आता जास्तच ऐकलं जातं जय माता दीड🙏🚩🌹

  • @adityapethkar5121

    @adityapethkar5121

    3 ай бұрын

  • @allthingsmelodious
    @allthingsmelodious3 жыл бұрын

    आजोबांचे गाणे नातू त्यांच्या पणती साठी गातोय. अत्यंत हृदयस्पर्शी गाणे. सगळ्या बाबांचे गाणे. डोळ्यात पाणी आल्याशिवाय कसे राहील? बाबा आठवले माझे. लग्नात चष्म्याच्या आड चुपचाप डोळे पुसणारे . अद्वितीय. काय ते शब्द , काय ते स्वर आणि काय ते गायन. पण लग्न होवो काही होवो, वडिलांचे आणि लेकीचे नाते आयुष्यभर अबाधित असते. ती कुठेच जात नाही, ती नेहमीच आपल्या आई बाबांची मुलगी असते आणि जितके तिचे हृदय दुखते इतके कोणाचेच नाही. ❤️ All Babas and their dearest darlings . ❤️ You Rahul. God bless you. 🙏🙏

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    Thank you so much !

  • @manasijoshi2470

    @manasijoshi2470

    3 жыл бұрын

    Kharay ..mi hi maza baba na khup miss karate..tumhi khup sundar bhavna mandalyat..thank you so much 🙏🏻❤

  • @sanjaydeshpande1572

    @sanjaydeshpande1572

    3 жыл бұрын

    राहूल जी खुप छान विवेचन 👌 मला आपले गाणे खूप आवडते...

  • @sunitakamerkar3385

    @sunitakamerkar3385

    3 жыл бұрын

    राहूल जी खूप सुंदर गाणे आहे डोळ्यात पाणी आले मुलगी सासरी जाताना खूप ह्या गाण्याची आठवण येते

  • @sudhirj.9676

    @sudhirj.9676

    3 жыл бұрын

    आजोबांचा कृपाशीर्वाद आणि अपार मेहनत याचे फळ

  • @bharatikulkarni5046
    @bharatikulkarni50463 жыл бұрын

    अप्रतिम!36 वर्षापूर्वी डोळे भरून मला निरोप देणारे माझे बाबा समोर उभे राहिले. आजची सकाळ खूप भावनिक होती आपल्या aavajat गाणे ऐकून मन तृप्त झाले.

  • @deeptideshmukhdesai1326

    @deeptideshmukhdesai1326

    3 жыл бұрын

    Kharach, same here...

  • @samiksha-dv8ww

    @samiksha-dv8ww

    3 жыл бұрын

    @@deeptideshmukhdesai1326 , kharay. Eka bapachya manachi avastha kay aste yache agdi ladivalpane varnan kele ahe. Mihi eka mulicha pita ahe, mi agdi samju Shakti🙏🙏🙏🙏

  • @user-mp8yf7xd6r

    @user-mp8yf7xd6r

    3 жыл бұрын

    छान

  • @andy8081

    @andy8081

    2 жыл бұрын

    😥😥😥

  • @vinodkene4358

    @vinodkene4358

    Жыл бұрын

    😢

  • @raghvendraanandgaonkar4224
    @raghvendraanandgaonkar42244 ай бұрын

    ह्या गाण्यात सुर ताल ह्याहीपेक्षा भावना वरचढ ठरतात. नकळत डोळे भरून आणण्याची ताकत ह्या ओळींमध्ये आहे. आशा शेळके ताई आणि पं.वसंतराव देशपांडे ह्यांना विनम्र अभिवादन. 🙏

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar95803 жыл бұрын

    महान आजोबांचा महान नातू🙏"आत्मजा"माझ्या मुलीचे. नाव या गाण्यावरून ठेवले आहे.तुमचे आजोबा आभाळाएवढे आहेत व तुम्ही त्या आभाळातील पुर्णचंद्र.

  • @shailendrakhandeparkar8288
    @shailendrakhandeparkar82883 жыл бұрын

    national antham of all fathers whom have daughter. राहुलजी god bless you

  • @aanariAntabri

    @aanariAntabri

    3 жыл бұрын

    An English Translation of lyrics & explanation of essence with perspective would be highly appreciated!

  • @akshaybelekar6993
    @akshaybelekar69933 жыл бұрын

    आपला आवाजात कसला जादू आहे सर ..... मृत्यु नि जर मला विचारलं तुझी शेवटची काय ईच्छा आहे , तर ती ऐकच असेल तुमचा आवाज कानावर पडू दे बस्स......👏👏👏

  • @mayapatil7884
    @mayapatil78843 жыл бұрын

    वसंत रावांच्या आवाजातील हे गाणे प्रत्येक वेळी ऐकताना डोळे भरून येतात,तीच अनुभूती तुझ्या आवाजातील गाण्याने आली राहूल खुप धन्यवाद 🙏🙏

  • @sudhakardarole2486

    @sudhakardarole2486

    3 жыл бұрын

    आम्ही काय प्रतीक्रिया द्याव्यात !!! दर्द मध्य दर्द भरला दादा

  • @aditiankush1638
    @aditiankush16383 жыл бұрын

    सकाळी सकाळी जवळपास रडवलस दादा . वसंतराव देशपांडे यांच्या शिवाय कोणीही हे गाणं गायलं तर ते मनाला एवढं भावेल असं वाटलं नव्हत . पण ........

  • @meghachandorkar2611

    @meghachandorkar2611

    3 жыл бұрын

    आणि त्यांच्या शिवाय कोणाला जमणार ही नाही. खास त्यांच्या साठीच हे गाणं जन्मला आलं आहे.

  • @pravinlate7619
    @pravinlate76193 жыл бұрын

    मराठी ला लाभलेले एक उत्कृष्ट गाणं, ज्याला खरंच हे गाणं समजलं, त्याचा खरंच कंठ दाटून येतो, राहुल तुम्ही खरंच महाराष्ट्राला लाभलेले एक रत्न आहात, माझा सलाम तुम्हाला, वसंतरावांनी गायलेले एक मोठं गाणं.

  • @prashanttakawale3345
    @prashanttakawale33453 жыл бұрын

    खरचं भाग्यवान असतात ते ज्यांना मुलगी असते....

  • @muktagokhale1476
    @muktagokhale14763 жыл бұрын

    बाबापणाचा सोहळा....जो बाबा गुपचूप डोळ्यांत साठवत असतो.... बाबा तु है तो मै हुँ...मेरे वजूद मे तु है भगवान मेरा.... रेणूका भाग्यवान आहे... साक्षात गंधर्व बाबा म्हणून लाभलाय तिला....

  • @bhaktijoshi6222
    @bhaktijoshi62223 жыл бұрын

    राहुल दादा काय लिहू आज ?? हे गाणे आई म्हणायची माझी, संगीत विशारद होती ती . मला बाबा नाही त्यांच्या चेहरा पण नाही आठवत ते गेले तेव्हा 6 महिन्यांची होते मी त्या मुळे आई आणि बाबा या दोघांची जागा आई ने घेतली . ती नाही आता तिला जाऊन 8 वर्षे होतील . त्या मुळे हे गाणे ऐकताना नेहमी मला आईचीच आठवण येते . तुम्ही ही हे गाणे आदरणीय वसंतकाकांप्रमाणे छानच गायले आहे अप्रतिम , अप्रतिम 👌👌🙏🙏🙏 हे गाणे सुंदरच गायले आहे , डोळ्यासमोर सगळ्या आठवणी उभ्या राहिल्या

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke32853 жыл бұрын

    खुप गोड आहे हो मला मांझी मूलगी जणू सासरी पाठवत आहे असा भास होतो ऐकुन

  • @asavarilandge694
    @asavarilandge6943 жыл бұрын

    अप्रतिम.. हृदयस्पर्शी राहुल जी.. 26 वर्षांपूर्वी मला निरोप देतानाचे बाबा आठवले.. आणि अश्रू ओघळू लागले... खूप धन्यवाद 🙏💐

  • @omkarfoods8054
    @omkarfoods80543 жыл бұрын

    राहुलजी, माझ्या मुलीच काही महिन्यांपूर्वी लग्न झालय. COVID pandemic मुळे अमेरिकत.... घरच्यांशिवाय लग्न करण्याचा निर्णय घ्यावा लागला. .तिची अजून भेट झाली नाहीये. Sir,.....हे गाणं specially कुठल्याही मुलीच्या बापाच्या ....अंतःकरणात रुतणारं गायलयं वसंतराव देशपांडेंनी.......तरीही तेच गाणं आज तुमचं ऐकून अंतर्बाह्य हललो मी. आत्ता भेटावं मुलीला असं वाटलं.... किती आभार मानू तुमचे!!!!!!! 🙏🙏🙏🙏🙏

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    Khoop khoop Dhanyawad !!

  • @omkarfoods8054

    @omkarfoods8054

    3 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @omkarfoods8054

    @omkarfoods8054

    3 жыл бұрын

    @@RahulDeshpandeoriginal 🙏🙏🙏

  • @mrunalinimayekar5061
    @mrunalinimayekar50613 жыл бұрын

    माझे बाबा वसंतराव देशपांडे यांचे चाहते होते.माझ्या लहानपणी मी बाबांबरोबर वसंतरावांच्या मैफिल ऐकली आहे. कट्यार काळजात घुसली हे नाटक पाहिलं आहे.त्यात अभिषेकी बुवा , फैय्याज यांनी काम केले होते. तुमचं गाणं ऐकताना आज मला माझ्या बाबांची खूप आठवण येते. तुमच्या गाण्यासाठी शब्दचं नाहीत.‌परमेश्वराची कृपा तुमच्यावर सदा राहो हीच सदिच्छा

  • @sa93957
    @sa939573 жыл бұрын

    एकेक सूर अमृताने न्हाहून आले आहेत.. पंडित वसंतरावांच मूळ गाणं एकल्याच समाधान मिळालं..

  • @amrutaphadke851
    @amrutaphadke8513 жыл бұрын

    हे गाणं ऐकतां आजही सासरी जाताना चा दिवस डोळ्यासमोर उभा राहतो.

  • @sumedhakhadilkar9406
    @sumedhakhadilkar94063 жыл бұрын

    Yes indeed . Close to a year now. Can’t thank you enough for making the lockdown bearable. स्वत:ची प्रतिभा मानवकल्याणा साठी नि:स्वार्थ वापरल्या बद्दल आम्ही श्रोते गण सदैव तुमचे ऋणी राहू . 🙏

  • @rahulnarayankar2198

    @rahulnarayankar2198

    2 жыл бұрын

    Tumchi comment he . Vachun ch.man. sandhani zal

  • @aneeshyt7908

    @aneeshyt7908

    2 жыл бұрын

    Very nice song

  • @hemangibonde2591
    @hemangibonde25913 жыл бұрын

    जेव्हाही आजोबांचे हे ऐकायचो डोळे नेहमीच भरून यायचे,येव्हढी आर्तता होती त्या स्वरात,तेच रक्त तुझ्या धमन्यात पण ,आणि रेणुका साठी हळवा बाबा तर खूप वेळा बघितलाय, त्यामुळे उत्कृष्ट झालंय!👌 फर्माईश सांगा बोललास आशा ताईच 'जिवलगा राहिले रे.. 'please!गाशील? सांगून सांगून थकले आता!

  • @renukasumedhjoshi2765
    @renukasumedhjoshi2765 Жыл бұрын

    Maza nav Renuka aahe...... Mala mazya babanchi aathavan aali na dada ki mi he tuzya tondun aeikate........... Te gat nai pn devachi aarati karatanna sur saccha baher yeto hrudayatun........

  • @prasaddiwakar8307
    @prasaddiwakar83073 жыл бұрын

    राहुलजी, ऐक विनंती जिवलगा ....राहिले रे दुर घर माझे हे गीत आपण गावे

  • @vikrantkamble3478

    @vikrantkamble3478

    3 жыл бұрын

    Mla pn Rahul dada jivlaga rahile dur ghat mzhe aikychi iccha ahe tuzhya avajat.

  • @MrKparixit

    @MrKparixit

    3 жыл бұрын

    Yes Dada please

  • @poojavaidya3074
    @poojavaidya30743 жыл бұрын

    अहाहा तृप्त झाले आमचे कान 🙏 मी आपल हे गाणं ' सुर ताल ' ह्या कार्यक्रमात प्रथम एकल होते. बहुतेक त्या गोष्टीला पण १०-१२ वर्ष झाली असतील. त्या दिवसापासून मी आपले प्रत्येक गाणं आवरजून ऐकते.🙏

  • @kjagrut
    @kjagrut3 жыл бұрын

    खूप सुंदर दादा.. गाणं ऐकताना बहिणीच्या लग्नात स्वतःचे अश्रू आवरत आईला सावरणारे आमचे 'बापू' आठवले आणि डोळे कधी ओले झाले कळाल नाही ❤️

  • @dhongdedeepak1
    @dhongdedeepak13 жыл бұрын

    तुझ्या आजोबांची आठवण झाली ऐकून... फारच हृदयस्पर्शी गायलं होतं त्यांनी

  • @dr.maheshkulkarni7060
    @dr.maheshkulkarni70603 жыл бұрын

    राहुलजी .... आपल्या आजोबांच्यावर चित्रीत झालेले हे अतिशय सुंदर भावपूर्ण असे गीत .... आजही हे गीत पहाताना एका बाबांच्या आपल्या मुलीला निरोप देतांनाची भाव विवशता काय असेल याची अनुभुती येते व आसवे सहजीच आपली वाट मोकळी करुन घेतात ... आपण या गीताला एक नवा अर्थ प्राप्त करुन दिला आज .... धन्यवाद

  • @sheetalmitkar6700
    @sheetalmitkar67003 жыл бұрын

    रडवलं दादा 😥खुपच ह्रदय स्पर्श... करणारे गीत.. त्यात तुमचा आवाज.. काळजाचे पाणी पाणी झाले.... निःशब्द झाले 🙏🙏पुढील गीताची वाट बघतोय 🙏.. खूप खूप शुभेच्छा

  • @tejallimaye3466
    @tejallimaye34663 жыл бұрын

    दाटून कंठ आला........किती ह्दयातून गाता तुम्ही........खूप ह्दयस्पर्शी

  • @ramakantkasture1807
    @ramakantkasture18073 жыл бұрын

    खुप सुंदर... अप्रतिम... पहिली तानच भारून टाकणारी होती... एक विनंती... आर्जव.. येत्या 28 मे रोजी सावरकर जयंती आहे. त्या आठवड्यात सावरकरांचं एखादं गाणं ऐकायला भेटलं तर फार आनंद होईल... 🙏🙏

  • @mohanborwankar5424
    @mohanborwankar54243 жыл бұрын

    नमस्कार वडील ही व्यक्ती कधीच आपल्या भावना उघड करीत नाही. लाडक्या लेकिस सासरी पाठवताना त्या सर्व भावना अतिशय समर्पकपणे या गाण्यात आलेल्या आहेत. शब्द , संगीत आणि वसंतरावांचा स्वर्गीय आवाज. अप्रतिम गायलं आज आपण. सर्वस्व ओतले. ३-४ वेळा ऐकले दिवसभरात . आपले व वसंतरावांचे. नातवाने आजोबांचा वारसा चालू ठेवला हे आमचे भाग्य. असेच गात रहा. धन्यवाद

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    🙏🏼🙏🏼

  • @medhainamdar5278
    @medhainamdar52783 жыл бұрын

    किती आर्त स्वर.... पहिली तान ऐकूनच डोळे भरून आले! शांताबाई, अनिल-अरुण जी आणि तुमच्या आजोबांना शतशः नमस्कार! आणि हो, आपले मुलगे असले तरी ते दूर जाताना आई वडिलांच्या भावना त्याच असतात, ज्या मुलींच्या आई वडिलांच्या असतात! तुमचं गाणं....अप्रतीम, नेहमीच!:)

  • @Gaurimilind
    @Gaurimilind3 жыл бұрын

    राहुल अ प्र ति म! This song is so so close to my heart..I had a very precious and soulful relationship with my father..He concluded his journey 22 years back..Still not able to overcome that..माझे वडिल (बापू गोखले)आणि वसंतराव हे मित्र होते त्यामुळे बापूंनाही हे गाणं खूप आवडायचं, शब्द फार फार हृद्य आहेत, मूळ गाणं उत्तम आहेच पण तुझं गाणं फार फार आवडलं.. मूळ गाणं बघताना वसंतराव स्वतःच्या मुलीच्या लग्नात गाताहेत,इतके नैसर्गिक दिसताहेत.आता तुझ्या लेकीमुळे तुला हे गाणं जास्त relate झालं असेल ना!कोणालाही खळकन रडवेल असं आहे,म्हणून सहसा त्या अर्थानं,मी ह्या गाण्याच्या वाटेला जात नाही पण आज गेले..खूप छान..

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    Tumhala namaskar. Bapu kakanna mehi anek welela baghitlay. Tyancha nirvyaaaj prem, jivhaala ani bhakti me anubhavliye. Ashi mansa mala ayushat bhetli ani tyancha sparsha jhala he Majha bhagya samajto! Tyanna manapasun sashtang naman 🙏🏼🙏🏼

  • @sachinpowar1020
    @sachinpowar10203 жыл бұрын

    वसंतरावांच्या या अजरामर रचनेचे अप्रतिम सादरीकरण! कधीही ऐकताना अंगावर काटा येतोच. तुमच्या आवाजात ऐकून खूप छान वाटले. "हातात बाळपोथी" किंवा "घेऊ कसा निरोप" या ओळी ऐकताना मूळ गाण्यात जे भिडते ते तुमच्या सादरीकरणात पण जाणवले. Very touching. दुधात साखर म्हणजे या गाण्याविषयी सांगितलेल्या पडद्यामागच्या गोष्टी. It was indeed beautiful era of Legends! You are enriching our lives during this difficult times 🙏🏽 शतशः धन्यवाद..

  • @maltisuradkar-fr5lk

    @maltisuradkar-fr5lk

    4 ай бұрын

    Sadasya dhanyvad sar😢

  • @sanjayshinde4421
    @sanjayshinde44213 жыл бұрын

    "बाप".....ह्या शब्दाचा अर्थ या गाण्या द्वारा मूर्तीमंत हृदयामध्ये प्रगट होतो.... हे स्वर हृदयाला स्पर्शून जातात.......राहुलजी🙏 रामकृष्णहरि 🙏

  • @madhavikulkarni4296
    @madhavikulkarni42963 жыл бұрын

    खूप सुंदर, पंडितजींची आठवण आली डोळ्यातून पाणी आले आजोबांचा वारसा चालवला ईश्वरी वरदानच हे जणू

  • @vidyashriram7007
    @vidyashriram70073 жыл бұрын

    डोळ्यात पाणी आलं... गेले दोन वर्षे, मी सांगलीत राहत आहे आणि माझे आई, वडील, बहिणी, मुलं पुण्यात. तूमचे गाणं ऐकताना सगळे डोळ्यासमोर उभे होते. इतका मनात घूसणारा आवाज आहे तूमचा. पंडित वसंतराव देशपांडे म्हणजे हिमालया सारखे उत्तुंग व्यक्तीमत्व... फक्त नतमस्तक व्हावे... 🙏🙏🙏🙏 आपण असेच गात रहावे... ❤❤❤❤❤❤❤

  • @charushilathorat3728
    @charushilathorat37283 жыл бұрын

    राहुल, जुन्या दिवसांत नेलंस, आणि डोळे पाणावले... खरंच एकेक सुर... आला नाहून अम्रुताने....

  • @piushshahs
    @piushshahs3 жыл бұрын

    Rahulji’s singing voice is uniquely melancholy to our ears and extremely soothing to all our hearts! Music transcends everything. I am Mumbaikar Gujarati settled in USA whose heart longs for music from different parts of India and World. Let music become instrumental in uniting all of us. Live and Let Live! Please stay safe and healthy!

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    Thank you so much 🙏🏼☺️

  • @anjubedekar7399

    @anjubedekar7399

    3 жыл бұрын

    ह्रुदयातून निघालेले सूर ऐकताना खरच कंठ दाटून येतो From Dr Anjali Bedekar,Nagpur

  • @ranjitballal712

    @ranjitballal712

    3 жыл бұрын

    Anything from your throat turns to Swar Amrit. That is God’s gift to you. Could you try to sing ‘Jivalaga’ please.

  • @medhavirkar3965

    @medhavirkar3965

    3 жыл бұрын

    So sweet.

  • @sudhirchopde3334

    @sudhirchopde3334

    3 жыл бұрын

    Modi can help ,speak words of truth to him.

  • @mujeebsayad588
    @mujeebsayad588Ай бұрын

    खुपच छान गायलेस राहूल, यात शंका नाही. तुलना मात्र आजोबा सोबत होऊ शकत नाही. तुला अजुन खुप वेळ द्यायचा आहे , गाताना कंठ दाटून आला तरच या गण्यास न्याय मिळेल.

  • @minalkarandikar3892
    @minalkarandikar38923 жыл бұрын

    हृद्य.. प्रत्येक मुलीला आणि बाबाला हळवं करणार गाणं आणि सुर 🙏🏻

  • @jyotipuranik746
    @jyotipuranik7463 жыл бұрын

    व्यक्त करण्यास शब्द च नाही राहुल जी सर्वाच्या मनाच्या कोपऱ्यात जाऊन भावूक केलेत. आणि हुंकारात म्युझिक अप्रतिम .मन भरुन आले😔

  • @sudhirj.9676
    @sudhirj.96763 жыл бұрын

    किती अर्थपूर्ण रचना आहे आणि गाताना सुद्धा भाव मनाचा ठाव घेतात

  • @sunitawani129
    @sunitawani1293 жыл бұрын

    काय लिहू आज...! तुटतात आत धागे... तुमच्या स्वरांत अश्रू भिजलेत की अश्रूत स्वर..! माहित नाही राहुलजी पण आत खोलवर पिळवटून गेलं तुम्हाला ऐकताना. माझ्यासारख्या प्रत्येक सासरी आलेल्या लेकीला हे गाणं किती जवळचये हे वेगळं सांगायला नको. आजही वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर हे गाणं ऐकताना काय वाटतं हे शब्दात सांगता येणार नाही. आज तुम्हाला ऐकताना मागे सुटून गेलेलं माहेरचं अंगण आठवून गलबलून आलं. आठवला तो थकलेला माझा बाबा... खूप खूप. काय लिहू, डोळ्यात दाटून आलंय आणि शब्द दाटलेले इथे... 🙏😪

  • @mandarlele7826
    @mandarlele78263 жыл бұрын

    Heavy rains here in Singapore since morning and with Heavy heart I listen to this most beautiful song, so very amazingly sung by you Rahul Ji, Shatasha Sashtang 👍👌🙏🙏🙏

  • @swatikulkarni7619

    @swatikulkarni7619

    3 жыл бұрын

    माझ्या वडिलांचा माझ्या लग्नातील चेहरा आठवला...

  • @MrArjun33
    @MrArjun333 жыл бұрын

    डोळ्यातून पाणी आले राहुल दादा, खूप खूप छान गायलास . एक विनंती आहे, तू बैजू बावरा सिनेमातली ही गाणी म्हण ना प्लिज 1. मन तरपत हरी दर्शन को आज 2. ओ दुनिया के रखवाले

  • @bharatkamble9493
    @bharatkamble94933 жыл бұрын

    आपला आवाज ऐकलं की मी अस imagine करतो. की आपण गाता आणि रुक्ष झालेला निसर्ग हळू हळू हिरवागार व्हायला लागला. जादू आहे स्वरांची आपल्याकडे . अंगावर काटा येतो

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    🙏🏼☺️

  • @vilasshahasane8611
    @vilasshahasane8611 Жыл бұрын

    वडिल मुलीच्या नात्याची पवित्रता किती उंचावर नेऊन ठेवली तुमच्या आवाजाने.... मुलीला निरोप देतानाचा क्षण तितकाच आजही जीवंत अनूभवला...... Tnx... Sir

  • @sanjaygolesar3320
    @sanjaygolesar33203 жыл бұрын

    'बाबुल की दूवाए ' प्रमाणेच हे एक अविस्मरणीय गाणे! अशी काही मोजकी गाणी पूर्ण एकु शकत नाही इतकी हृदय स्पर्शी असतात. अशी काही गाणे, त्यांचा भाव समजायला काही वेळ जावा लागतो. असो. या गाण्याने ही तेच feeling दिला. Thanks राहुलजी!

  • @ajitbawiskar4180
    @ajitbawiskar41803 жыл бұрын

    वा वा.... अप्रतीम शब्द नाहीत व्यक्त करायला...👌👌 डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाहीत... अप्रतीम रचना तितकेच आपले दिव्य स्वर....अमृत अनुभव.... 🙏🙏

  • @priyankamandlekar1058
    @priyankamandlekar10583 жыл бұрын

    I generally don’t comment this is my first comment on you tube. It’s divine... u just made me cry.. I got married in December 2020 my dad is in Mumbai and I’m in Pune.. I so want to meet him.. but this pathetic pandemic has taken over.. coming to ur voice it’s legendary..

  • @shaileshmahamuni8115
    @shaileshmahamuni81153 жыл бұрын

    हे गाणे कितीदाही गुणगुणण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी कंठ दाटून येतो. पंडित वसंतरावांना तर आम्ही प्रत्यक्ष पाहू ऐकू शकलो नाही, पण त्यांच्या गाण्याची अनुभूती तुम्ही देता राहुलदा🙏🙏🙏 तुमचं गाणं ऐकताना मला नेहमी वाटतं की मी भाई, कुमारजी, पंडित भीमसेन जोशी यांच्या समवेत बसून वसंतरावांच्या गायनाचा आस्वाद घेतोय. सोबत भाई 'वसंता' असं म्हणून आणखी काही गाण्याची फर्माईश करताहेत. या सगळ्यांच्या सहवासाची अनुभूती तुम्ही देता म्हणून तुम्हाला शतशः नमन🙏🙏🙏

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    🙏🏼

  • @makaranddate5260
    @makaranddate52603 жыл бұрын

    मी हा सिनेमा पाहीला तेंव्हा सात वर्षाचा होतो. त्या वेळी काहीही कळत नसतानाही या गाण्यातली पालकत्वाची भावना आणि त्या अनुषंगाने येणारे विरहाच दुःख मनाला भिडलं होतं. त्या भावनेला शब्द नंतर मिळाले. गाण्याचे शब्द तेंव्हा उमगले नव्हते पण सुरात असलेली व्यथा नक्कीच कळली होती. आज तुमच्या कडून परत हे ऐकल अनेक आठवणी जाग्या झाल्या.

  • @vsjofficial8590
    @vsjofficial85903 жыл бұрын

    अप्रतिम.... तुमचं गाणं ऐकून मन तृप्त झाले. मला तर अक्षरशः भरून आले. सर मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो कि तुम्ही तुमच्या जय हेरंब ह्या Album मधील 1) हेरंब गिरीजा तनय जय 2) जय देवा गणेशा नमो ही गाणी गावी.

  • @surekhaathaley9904
    @surekhaathaley99043 жыл бұрын

    किती भावनांचा संगग प्रेमळ बाबा,लहान पणा चा सुखा चा काळ आठवून सुखवणारे बाबा आणि गोड बोबड बोलणार्या मुली ला संगीतात पारंगत करणारे प्राऊड बाबा आणि लेकीला सासरी पाठवताना हळवे झालेले बाबा. जेव्हा अशी गाणी तयार होतात तेव्हा किती तरी कलाकारांची मेहनत आणि प्रतिभा एकत्र आलेली असते ह्याची जाणीव तुम्ही करून देता. प्रत्येक वेळी त्या गाण्याचा राग किती सुंदर रिती नी विशद करून सांगता कि त्या रागाच,त्या स्वरांच वैभवात ते गीत झळाळून उठत . खूप खूप धन्यवाद राहूल जी.🙏🙏🙏🙏 गुस्ताखी माफ पण एक मैफिल पियानो की हो जाय तो...........

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    🙏🏼☺️

  • @proudindian9039
    @proudindian90392 жыл бұрын

    राहूल सर आपण एक महान गायक आहात. तसेच भीमसेन जोशींच्या युगानंतर सध्याच्या तरूण पिढीच्या शास्त्रीय गायकांचे प्रतिनिधीत्व करण्याची केवळ तुमचीच योग्यता आहे. मा.कै. वसंतराव देशपांडे हे अलौकीक होतेच पण ते स्वत:च वसंतराव होते. त्यामुळे तुम्ही त्यांचे नातू म्हणजे तुम्हीही फक्त राहूल देशपांडेच व्ह्यायला हवे, अन्य काही नाही. पण अनेक कार्यक्रमामध्ये आपण कै. वसंतराव यांचीच गाणी गाता. आपला वसंतोत्सव हा कार्यक्रम तर वसंतराव देशपांडे यांनाच समर्पीत आहे. तरी अश्याने सतत, कै. वसंतराव यांची गाणी गायल्याने आपल्यासारख्य सारख्या उच्चकोटीची प्रतीभा असलेल्या गायकाची "कै. वसंतराव यांचा नातू" यापेक्षा मोठी ओळख निर्माण निर्माण होवू शकेल की नाही? असे वाटते (कारण यापुर्वी स्वत: प्रचंड प्रतीभावान असुनही दुर्दैवाने वडीलांच्याच प्रतीमेत अडकून पडल्याने फारशी मजल न मारू शकलेले "श्रीधर फडके" हे उदाहरण लोकांसमोर आहेच.) वसंतरावांचे नाव व पुण्याई आपल्यासोबत कायम राहणारच आहे, पण तरीही आपल्या प्रतीभेला याहूनही अधीक न्याय मिळावा व आपण "कै. वसंतराव यांचा नातू" यापेक्षा "राहूल देशपांडे" म्हणुन अधीक ओळखले जावात अशी अपेक्षा आहे. तरी त्यासाठीच आपण जास्त प्रयत्न करावा असे वाटते. आणी तसे झाले तर कै. वसंतरावांना अधीक आनंद वाटेल असेही वाटते. बाकी हे सांगून लहान तोंडी मोठा घास घेतला आहे. जर चूक भूल झाली असेल तर माफी मागतो.

  • @dilipmeher2164
    @dilipmeher21643 ай бұрын

    माझ्या मुलीच्या साखरपुढ्या नंतर आमचा घरगुती कौंटूबिक कार्यक्रमात मी हे गाणं गायल. हे गाणं गाताना माझा कंठ दाटून आला आणि माझं गाणं अर्धवट राहील. ईतकी जादु आहे यया गाण्यात. धन्यवाद राहुलजी!

  • @vaishalimhatre4477
    @vaishalimhatre44773 жыл бұрын

    Missing my Dad ...so much..whom I lost 23 days before

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    I am so sorry ! May his soul find the light ! Om shanti

  • @neetakamat5474

    @neetakamat5474

    3 жыл бұрын

    🤗

  • @meghakolhekar
    @meghakolhekar3 жыл бұрын

    अत्यंत हृदयस्पर्शी गाणे झाले तुमचे.....It is a landmark song in Marathi films and I don't think की एकही असं मराठी घर आहे जिथे हे गाणं माहीत नाही......मला आठवतं आम्ही आमच्या बाबांसोबत हा सिनेमा बघायला गेलेलो... And I had liked Dr. Vasantrao so much as an actor I remember telling my father why he hasn't done more films😁 and my father said आणि मग मृगनयनासारखी गीते कोण करेल😁 खूप सुरेख म्हटलंय तुम्ही... Editing of the video-- with the sweet moments in the beginning--is awesome! I am very curious to know why Vasantrao ji must have rejected the first version... Thank you Rahul ji for this great rendition which is close to our hearts...🙏.

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    Thank you so much Megha !

  • @meghakolhekar

    @meghakolhekar

    3 жыл бұрын

    @@RahulDeshpandeoriginal 😊🙏🙏

  • @manmohanpareek9482
    @manmohanpareek9482 Жыл бұрын

    मैं हिंदीभाषी हूँ राहुल..पर संगीत की तो एक ही भाषा है..माधुर्य..और वह मुझे भी समझ आती है..धन्य भाग्य हो तुम..क्या माधुर्य बिखेरते हो ! 🤚🏼🤚🏼🤚🏼

  • @madhavigarud6279
    @madhavigarud62793 жыл бұрын

    Ji aartata aajobanchya ganyat hoti tich aartata tuzya ganyat aalich ase vatte hts of 🙏🙏👍👍👍👌

  • @aparnashinde3794
    @aparnashinde37943 жыл бұрын

    खूप सुंदर हृदयस्पर्शी असं हे गाणं आहे 👌 आणि तुमच्या आवाजात ऐकायला मिळाले म्हणजे सोने पे सुहागा अप्रतिम अद्भुत.👌👍🙏❤️

  • @shekhardeshpande1888
    @shekhardeshpande18883 жыл бұрын

    अप्रतिम। राहुलजी मन्त्रमुग्धी अनुभूति। सतत ऐकाव असच..

  • @rameshkaslay3636
    @rameshkaslay36363 жыл бұрын

    प्रश्नच नाही... राहूल म्हणजेच सप्तसूर...!!

  • @TEJASPATKAR999
    @TEJASPATKAR9993 жыл бұрын

    खुप संगीत गायक आहेत पण त्यात राहुल दादा तुमची जागा कोणीच नाही घेऊ शकत ..खूप अप्रतिम 🙏🏻🙏🏻

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar39613 жыл бұрын

    अप्रतिम!!! सतत joji त रमलेल्या लेकीने आज status ठेवले....आज आणि discord वर दोघींचा कंठ दाटून आला...वैध्दकीय शिक्षणासाठी लांब असलेल्या लेकीला खूप miss केले...राहुलसर तुमच्यामुळे तरुणाई हिंदी मराठीतील स्वरसंस्कारीत गाणी खूप enjoy करत आहेत समजून घेत आहेत....धन्यवाद..ह्दयस्थ नजराणे अक्षरशःएक एक गाण रसिक प्रक्षकांसाठी.

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    🙏🏼☺️

  • @9970500730
    @99705007303 жыл бұрын

    माझ्या बहिणीच्या लग्नात माझे बाबा खूप रडले होते आणि त्यावेळी मी फार अवघडल्या अवस्थेत मनातल्या मनात चिडचिड करत होतो यात काय रडायचं आहे .. तेव्हा माझी आजी मला म्हणाली होती तुला आता कळणार नाही तु जेव्हा मुलीचा बाप होशील ना तेव्हा तुला कळेल... आणि त्यानंतर 10 वर्षांनी माझं लग्न झालं आणि मला मुलगी झाली... आता ती 3 वर्षांची आहे पण कधी ही न रडणारा मी हे गाणं ऐकून मात्र हृदय गलबलून जातं.... धन्यवाद राहुल दादा... आजीची आठवण झाली... आणि कर्तव्यची सुद्धा... 😊

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    🙏🏼

  • @sandippondekar1936
    @sandippondekar19363 жыл бұрын

    Rahul dada.. tumchya awajatli magic hi nehmich.. manala mohun takte.. but aj kahitri weglich jadu.. aikala milali..this is one of the best song n voice I heard my life... really thanks dada.. aai ekveera bless u...

  • @user-ot6nq2pd5z
    @user-ot6nq2pd5z3 жыл бұрын

    तुमचे आणी महेश माऊलींचे मी नेहमी गाणं ऐकतो, अप्रतीम आवाज, तुम्ही खूप भाग्यवान आहात. आपणासाठी शब्दच सूचत नाही, तुमचे देव आई आणि वडीलच.खूप भाग्यवान आहात तुम्ही . माझे वडील तबला,मृदंग वाजवायचे माझी इच्छा असताना मी नाही करू शकलो गायनाचा अभ्यास. तूम्हाला सरस्वती प्रसन्न झाली,तुम्ही खूप खूप भाग्यवान आहात.आणी मी तुमच्यावर खूप खूप प्रेम करतो🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @anumayekar8527
    @anumayekar85273 жыл бұрын

    हृदय स्पर्शी गाणं. त्यातील भाव भावना प्रत्येक मुलीच्या आणि बाबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे तुमचे आर्त स्वर . फारच सुंदर राहुल सर

  • @deshmukh211184
    @deshmukh2111843 жыл бұрын

    आपल्या मंत्रमुग्ध स्वराचे वर्णन करण्यास शब्द कमी पडतात.. आपण दिलेल्या प्रत्येक स्वर्गीय अनुभूती करीता आपले मनःपूर्वक धन्यवाद..🙏🏻🙏🏻

  • @sanjanawalekar1034
    @sanjanawalekar10343 жыл бұрын

    नुसत्या गाणं च्य पहिल्या दोन ओळी जरी वाचल्या तरी डोळयात पाणी येते...इतके हे गाणं मनात आत बसलेय.. राहुलजी तुमची आतर्ता जाणवली....🙏🙏.

  • @ujwalamangesh6824
    @ujwalamangesh68243 жыл бұрын

    शुभ सकाळ... खूप धन्यवाद, बालपणीच्या वडीला सोबत च्या आठवणी जाग्या झाल्या....नकळत खरंच कंठ दाटून आला सुखद आठवणीने 🙏

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande68423 жыл бұрын

    Ek damm chan awaz ani song. Simple, silent, and light music plus video with 👌👌👌👏👏

  • @aadeshmore937
    @aadeshmore9373 жыл бұрын

    सर या गाण्याची मी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो की, कधी मला तुमच्या आवाजात हे गाणं ऐकता येईल. पण मला आज खूप आनंद होतो आहे की माझी इच्छा आज पूर्ण झाली. सर डोळ्यात अश्रू अनावर झाले गाणे ऐकल्यावर. खूप खूप धन्यवाद😊😊

  • @gajananjadhav422
    @gajananjadhav4223 жыл бұрын

    तुमच्या आवाजाने गाण्यातील शब्दांना खरोखरच अर्थ आला असं वाटतं

  • @anupamasahasrabudhe7155
    @anupamasahasrabudhe71553 жыл бұрын

    राहुलजी आज तुमचे हे गाणे ऐकल्यावर लहानपणी picture बघितला तेव्हाचा तुमच्या आजोबांचा आवाज आणि वंदना पंडित यांचा चेहरा अजून लक्षात आहे खूप आठवण आली आज डोळ्यात पाणी आले खूप सुंदर

  • @neetadeshmukh8529
    @neetadeshmukh85293 жыл бұрын

    🙏 RAHULJI.......खर मन भरून आले, दाटून आले, ह्या परिस्थितीत तुमच्या गाण्या ची वाट बघणे... मागचे गाणे चुकले हो... थोडे उशिरा नी ऐकले... “पुकार” चा भाव.... सजना चे वेग वेगळ्या चाली...अप्रतिमच.... लसीकरणा मुळ्ये दोन दिवस असेच गेले.... आणि आज हे गाणे ऐकुन असे वाटले कि तुमच्यात जे पिढीजात संस्कार रूजले आहे हे देवा चा आशिर्वाद च आहे... म्हणून तर देवानी तुम्हाला जन्मताच १०/१० दिले आहे.....अत्यंत नशीबवान अहात... त्यात लाडक्या लेकी ला घेऊन आज जी काय समर्पक सुरूवात केली ....खरं माझ्या लेकीची बिदाई आठवली... दाटून आले.. असेच बहरत रहा. 🙂

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    🙏🏼🙏🏼

  • @sagar07wagh
    @sagar07wagh3 жыл бұрын

    अनेक दिवसापासून आपल्या आवाजात ह्या गाण्याची वाट बघत होतो आपल्या गाण्याने अपेक्षित परिणाम साधला आहे धन्यवाद...

  • @swamiyogesh
    @swamiyogesh3 жыл бұрын

    अद्भुत स्वर लागला आहे. अगदी कोवळे लुसलुशीत शहाळ्यातील खोबरे गोड आणि नरम.

  • @kunalharkal5833
    @kunalharkal58333 жыл бұрын

    काय बोलाणार.... सर... जी.... एवढं अप्रतिम....... निशब्द झालो.... खरंच काही नात्याची व्याख्या करताचं.... येत नाही....

  • @aartichilakwad5756
    @aartichilakwad57563 жыл бұрын

    तुमचा आवाज ऐकून नेहमीच माझा कंठ दाटून येतो... इतक्या कळकळी ने गाता तुम्ही राहुल जी! धन्यवाद ह्य शाश्वत प्रस्तुति साठी... You are truly a Maestro of Melancholy!

  • @alkaranade8779
    @alkaranade87793 жыл бұрын

    अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे... वसंतराव, राहुलजी आणि रेणुका. अद्भुत अद्वैत

  • @manojjadhav1169
    @manojjadhav11693 жыл бұрын

    Rahul dada tuzya swaranchi aani suranchi vyakhya mala shabdat nahi karta yet. Your simply great

  • @sudhanvadeo3663
    @sudhanvadeo36633 жыл бұрын

    मन भरून आलं आहे आपल्या आवाजात हे गाणं ऐकून, प्रत्येक सुर कानात आणि हृदयात साठवून ठेवतोय. धन्यवाद राहूलजी.

  • @DnyandeoHAinarkar
    @DnyandeoHAinarkar3 жыл бұрын

    अतिशय सुंदर.... माझ्या अत्यंत आवडीचे गाणे आहे .... ऐकताना नेहमीच डोळ्यात पाणी येते... आपल्या आवाजात पण हे गाणे खुप सुरेल झाले आहे.. खुप खुप धन्यवाद...

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial3 жыл бұрын

    श्रवणीय ! अद्भुत आवाज आहे आपला दादा..😘

  • @Tejas_Deshpande
    @Tejas_Deshpande3 жыл бұрын

    राहुल दादा फारच जबरदस्त गायले आहे तुम्ही शिवाय हे गाणे फार भावनीक आहे 🙏🙏🙏💯💯💯💯💯💯💯💯

  • @balwantkulkarni4882
    @balwantkulkarni48822 жыл бұрын

    अशी गाणी आणि अशा आवाजाचे गायक पुढच्या पिढीमध्ये तयार होतील काय देव जाणे...म्हणतात ना की old is gold... गाणं ऐकून मनमुराद आनंद लुटला आला..अतिसुंदर..🌹🌹🌹🌹🌹👍🏼👍🏼👍🏼👍🏼👌👌👌

  • @sandeepnitrudkar8039
    @sandeepnitrudkar80393 жыл бұрын

    सगळ्या बाबांना समर्पित केलेले अद्वितीय गाणे

  • @APKoilNSapthagireesanjaya
    @APKoilNSapthagireesanjaya3 жыл бұрын

    I held up my comment, as I wanted to hear your Dear grand father's Rendition and then yours. Then I learnt the meaning of the song. The tune, a mix of Todi and Bhairav, brings out the meaning very effectively! How the father would feel when his daughter is given in marriage and she leaves for her In law's home.. Both of you have sung so well it touches my heart! Even the basic sruti appeared to me same. Thanks a lot for this memorable song. I have shared with my daughters and other family group members. Also thanks for your explanation in English too !! 👌💐🌹🙏

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    🙏🏼☺️

  • @kavitagazal
    @kavitagazal2 ай бұрын

    ऐकतांना..दाटून कंठ येतो...हृदयस्पर्शी

  • @sharadgawande1433
    @sharadgawande14333 жыл бұрын

    वसंतराव देशपांडे यांच्या तोडीचे ,पट्टीचे गाईले. आपण वसंतराव देशपांडे यांचे चिरंजीव तर नाही ना? असे वाटू लागले. शब्दांचा आलाप,लय स्वर आणि कोणतीच वाद्य सामुग्री न वापरता सूर ,ताल लय एकाच वेळी सांभाळण्याचे कसब,कौशल्य आवडले. हार्दिक अभिनंदन

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    Me tyancha naatu

  • @netra21daoo
    @netra21daoo3 жыл бұрын

    प्रत्येक मुलीच्या पालकांना नेहमी भावूक करणारे.. दर वेळी न चुकता डोळ्यांच्या कडा ओलावणारे गीत.. आज सुद्धा झाल्याच.. सवय सुद्धा होत नाही इतक्या वर्षा पासुन ऐकत आलोय हे गाणे तरी. दर वेळी त्या भावना तितक्याच आवेगाने पोचवणारे.. हॅट्स ऑफ ❤️❤️

  • @hk2698
    @hk26983 жыл бұрын

    Can’t understand Marathi even a bit, but still thoroughly enjoyed the emotions accompanying the lyrics in the Melody.🌸

  • @nivaskulkarni
    @nivaskulkarni3 жыл бұрын

    क्या बात है! शब्दच नाहीत वर्णन करावयास. Made my day.

  • @mishragk5768
    @mishragk576811 ай бұрын

    माझे बाबा नेहमी हे गाणं म्हणायचे.. आत्ता जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा खूप खुप रडायला येतं... लहानपणीची मी आणि बाबा आमच्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून जातात.. खरंच खूप सुंदर आहे हे गाणं.

  • @ravindrabendre7981
    @ravindrabendre79813 жыл бұрын

    अतिशय सुंदर झाले गाणे. अष्टविनायक सिनेमातले तुझ्या आजोबांचे रुप एकदम डोळ्यांसमोर आले आणि ‘कंठ दाटून येणे’ अनुभवले.🙏

  • @ashwinraibag
    @ashwinraibag3 жыл бұрын

    Got tears in my eyes. Gandharv on earth 🙏🙏

Келесі