दादोजी कोंडदेवांनी कृष्णाजी नाईक बांदल देशमुखांची विश्वासघाताने हत्या का आणि कशी केली होती ???

Ойын-сауық

मुख्य संदर्भ- amzn.to/3X7pFZO शककर्ते शिवराय- शिवकथाकार विजय देशमुख खंड १, पान क्रमांक १९३, १९४, १९५,३७७
Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #krishnajibandal #bandaldeshmukhhistory

Пікірлер: 51

  • @user-hv9lc7ig1i
    @user-hv9lc7ig1i Жыл бұрын

    बिग्रेडी डुक्करछाप इतिहासानुसार दादोजी कोंडदेव अस्तित्वातच नव्हते. ना ते महाराजांचे गुरू होते? खरं कुणाचं मानायचं?

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    Жыл бұрын

    तुम्ही एक साक्षर व्यक्ती आहात आणि तुम्ही वाचू शकता. माझ्यासकट कुणावरही विश्वास का ठेवायचा? ऑनलाइन आणि बाजारात उपलब्ध असलेली अस्सल ऐतिहासिक पुस्तके कृपया वाचा, तुम्हाला सत्य समजेल.

  • @user-hv9lc7ig1i

    @user-hv9lc7ig1i

    Жыл бұрын

    म्हणजे उल्लेख केला जाणं किंवा वगळणं हे जातीवर अवलंबून आहे तर? दादोजी ब्राह्मण होते म्हणून त्यांचे शिवरायांशी असलेलं गुरूत्व नाकारायचं आणि त्याच जातीमुळं त्यांना बांदलांचा मारेकरी ठरवायचं? दोन्ही कडून मस्त ढोलकी वाजवायची?

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    Жыл бұрын

    दादोजी कोंडदेव हे एक आदिलशाहाचे एकनिष्ठ मुलकी अधिकारी होते, कोंढाणा महसूल विभागाचे सुभेदार होते. हा विभाग शहाजीराजेंच्या जहागिरीचा हिस्सा होता म्हणून त शहाजीराजांचेही नोकर होते. याशिवाय शहाजीराजांचे ते मुख्य कारभारी म्हणून काम करत होते, त्याचे वेगळे भरघोस वेतन त्यांना देण्यात येत होते. ज्यावेळी शिवाजीराजेंना ह्या प्रांताचा मोकासा करून देण्यात आला त्यावेळी ते शिवाजीराजेंचे अधिकृत नोकर बनलेले होते. ते शिवरायांचे गुरु कधीही नव्हते आणि त्या योग्यतेचेही नव्हते. आदिलशहाची फार दहशत त्यांच्या मनात होती आणि बंड करण्याची हिम्मत नव्हती. अत्यंत बुद्धिमान आणि कर्तव्यकठोर असे महसूल अधिकारी ते होते, प्रशासन आणि कायदा-व्यवस्थेची उत्तम जाण असणारे प्रामाणिक व्यक्ती होते. फार तर एक मार्गदर्शक असे तुम्ही त्यांना म्हणू शकता. गुरु हि एक अध्यात्मिक आणि वेगळ्या स्तरावरची संकल्पना हिंदू धर्मांत आहे. शिवरायांचे गुरु त्या अर्थाने म्हणाल तर फक्त जिजाऊ मांसाहेब ह्याच होत्या, ज्यांनी शिवरायांना बंडखोरी शिकवली. दादोजी कोंडदेव यांनी स्वराज्य-स्थापनेला पहिल्यापासून विरोध केल्याचे तुम्हाला जाणवेल. ते जहागिरीच्या कामातच गुंतलेले आणि आदिलशहाशी एकनिष्ठ राहण्यातच विश्वास ठेवणारे होते. शिवरायांच्या बंडखोरीची प्रशंसा करणारे दादोजी कोंडदेवांचे किमान एक पत्र किंवा त्यांचा स्वराज्य-स्थापनेच्या समर्थनाचा कुठलाही समकालीन उल्लेख तुम्ही मला दाखवा, मी तुमचा दावा निमूटपणे मान्य करून तुमचं माफी मागेन आणि त्यावर एक स्वतंत्र व्हिडीओ बनवीन. नंतरच्या काळात शिवरायांनी दादोजी कोंडदेवांचा अशा प्रकारचा कुठेही कसलाही उल्लेख केलेला नाही, तसेच त्यांची कुठेही समाधी-स्मारक उभारलेले नाही. ह्यातच सर्व आले. कृष्णाजी बांदलांची हत्या किंवा मावळात शांतता प्रस्थपित करणे हा त्यांच्या कर्तव्याचा भाग होता.

  • @user-hv9lc7ig1i

    @user-hv9lc7ig1i

    Жыл бұрын

    स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद! वेतनाचं म्हणाल तर सगळं अष्टप्रधान मंडळ हे भरघोस पगार घेत होते. फुकट कुणीच काही करत नसायचे. दादोजी कोंडदेव यांची पात्रता तुम्हाला समजली म्हणजे आपण खूपच मोठे इतिहासकार आहात हे लक्षात आलं. दीड कोटी दस्तावेज पुणे इतिहास मंडळात पडुन आहेत. कदाचित त्यात स्वामी समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव यांच्या विषयी नक्की माहिती सापडेल. महाराजांनी गावोगावी जाऊन प्रत्येक सरदाराच्या समाध्या बांधल्या तरच ते स्वराज्य समर्थक होते असं म्हणणं थोडं हास्यास्पद आहे! असो. दादोजी प्रमाणेच इतरही कुठल्या सरदाराचं स्वराज्य स्थापनेविषयी पत्र सापडत नाही यावरून तर महाराज एकटेच युद्धावर जात होते म्हणावं लागेल.

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    Жыл бұрын

    साहेब, केवळ एक अस्सल-समकालीन कागद दाखवा, मग मी तुमची जाहीर माफी मागून स्वतः दादोजी कोंडदेव यांना शिवरायांचा गुरु म्हणून घोषित करीन आणि त्याच मताचा प्रचार-प्रसार करीन. दीड कोटी कागदांची काही गरज नाही. सध्या उपलब्ध असणारे हे संशोधन दादोजी कोंडदेव याना आदिलशहाला वचकून असणारे कर्तव्यकठोर एकनिष्ठ प्रामाणिक मुलकी अधिकारी ठरवते. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाची जी ओळख आदिलशाही फर्मानांतून होते ती एखाद्या बंडखोर किंवा स्वराज्यप्रेरित व्यक्तीची नाही. तानाजी, मुरारबाजी, बाजी-प्रभू, पंताजीपंत बोकील, आबाजी सोनदेव इत्यादी अनेकांच्या समाध्या-स्मारकं स्वराज्याच्या सरकारी खर्चातून बांधली- उभारली. याकूत बाबा, रामदास स्वामी, मौनी बाबा, चिंचवडकर मोरया गोसावी या अध्यात्मिक व्यक्तींनाही दानपत्रे आणि इनामी जमिनी वर्षासने दिली. अगदी अफझलखानासारख्या शत्रूचाही स्मारक/थडगं महाराजांनी बांधलं. मग जर शिवराय दादोजींना आपले गुरु मनात असते तर त्यांनी अशा महान व्यक्तीला वाऱ्यावर सोडून दिलं असतं ? आपल्या प्रत्येक बलिदानी, वीरगतीला प्राप्त झालेल्या आणि अपंगत्व आलेल्या मावळ्यांच्या कुटुंबाच्या पोटापाण्याची व्यवस्था करणाऱ्या महाराजांनी आपल्या महान गुरूला अंतर दिल असतं ????

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 Жыл бұрын

    स्वराज्यासाठी लढलेल्या बांदल वीरांना मानाचा मुजरा🙏🚩✌ ❤जय भवानी 🙏जय शिवाजी🙏 जय जिजाऊ❤

  • @manojpawaskar2892
    @manojpawaskar28923 ай бұрын

    जिजाबाई चे आशिर्वादाने हे सर्व केले मग दादोजी कोंडदेव विश्वास घात हेंडिग कशासाठी

  • @Prasadk2009
    @Prasadk2009 Жыл бұрын

    ते शौर्य, ते तेज, तो पराक्रम काय कामाचा जो स्वराज्य विरोधक होता. आया-बहिणींची आब्रुवर दिवसा उजेडी, राजरोस पणानं पडणारा घाला आणि रयतेचे हाल उघड्या डोळ्यांनी बघत होता?

  • @manasijadhav2725

    @manasijadhav2725

    Жыл бұрын

    👏🏻👍🏻👌🏻🙏🚩✌

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 Жыл бұрын

    सुंदर माहिती

  • @jitendrabhadway986
    @jitendrabhadway986 Жыл бұрын

    जय हरी माऊली.

  • @akshaybankar3431
    @akshaybankar3431 Жыл бұрын

    🙏🙏🚩

  • @aniketbhilare2466
    @aniketbhilare2466 Жыл бұрын

    🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🔥🔥

  • @saurabhchaturbhuj1557
    @saurabhchaturbhuj1557 Жыл бұрын

    असतील ते कृष्णाजी बांदल लाख पराक्रमी पण , जो स्वातंत्र्यप्रिय शिवरायांना नडला , त्याला कोंडदेवाने तोडला स्वराज्याच्या कामी न येणारी मर्दुमकी तरी काय कामाची

  • @manasijadhav2725

    @manasijadhav2725

    Жыл бұрын

    👍🏻👌🏻🙏🚩✌

  • @sudhadeodhar8702

    @sudhadeodhar8702

    Жыл бұрын

    Jaya shriram

  • @prashantbandal4314

    @prashantbandal4314

    Жыл бұрын

    आपले इतिहासाचे नॉलेज कमजोर आहे जरा इतिहास वाचा आणि कमेंट्स लिहा

  • @sagarlonkar712
    @sagarlonkar712 Жыл бұрын

    🚩

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze9 ай бұрын

    Veer Shivaji hya maliket krushanji yana baji pasalkar yani thar marle

  • @rajkunwarlagad9516
    @rajkunwarlagad9516 Жыл бұрын

    ❤मा.विजय कोळपे सर 🙏 क्लिप ऐकताना, पहाताना प्रारंभी थोडं अवघडून आलं होतं, पण आपण गतेतिहास सांगताना दादोजी कोंडदेव ह्यांच्यावर अनावर न होता, किंवा इतर कोणतेही बेलगाम आरोप न करता त्यांच्या कार्यावर केलेलं समालोचन वास्तविक वाटले. म्हणून आपले कथन शेवटपर्यंत ऐकले आहे. शंका: राऊत,काऊत, आणि मोकाशी ह्यांची कामे आणि जबाबदाऱ्या काय होत्या. नम्र विनंती: संदर्भहीन अनिमेटेड चित्रे विषय समजण्यात अडथळा करतात. कृपया आपण तो उपक्रम टाळावा. ‼️धन्यवाद‼️ नम्र सूचना:कथानक सांगताना विषय क्लिस्ट आणि काही वेळा जुन्या इतिहासाला धक्के देणारा असल्याने कृपया आपण सांगण्याचा वेग किंचित कमी केल्यास विषय समजण्यास सोप्पे होईल अस वाटत.🛑🚩🇮🇳🙏

  • @shubhamhande5727
    @shubhamhande5727 Жыл бұрын

    Mast ❤

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    Жыл бұрын

    Thanks 🤗

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze9 ай бұрын

    Krishna ji yana baji pasalkarai marle ani tyache guru pan tech hote swarajya stahi pahile kami alele shiledar

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze9 ай бұрын

    Nane maval madhil dalvi yancha baddal pan bola

  • @balaSS3272
    @balaSS3272 Жыл бұрын

    70% बरोबर माहिती_30%चुकीची माहिती.

  • @balasahebshinde2363
    @balasahebshinde23636 ай бұрын

    खोटा आरोप केला जात आहे कारण आम्हाला शिकवलेला इतिहास याउलट होता

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze9 ай бұрын

    Adhil sahi la ani krisna ji sainikanna apsat ladun krisha ji yana ekta gatun pakadun marke hote baji pasalkar chya madatine dadoji konddev yancha bikul uklekh nahi

  • @dadasoshinde7266
    @dadasoshinde7266 Жыл бұрын

    बारा मावळ म्हणजे काय

  • @dnyaneshdabke640

    @dnyaneshdabke640

    Жыл бұрын

    Bara maval mhanje 12 prant as ki bajinch hirdas maval ase 12

  • @dnyaneshdabke640

    @dnyaneshdabke640

    Жыл бұрын

    Gunjan maval ajun ek

  • @opathak
    @opathak Жыл бұрын

    Kahihi pasuru naka, election ale ki Brahman dvesh pasravun mat milvta tumhi

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    Жыл бұрын

    केवळ शीर्षक वाचून निष्कर्ष काढू नका, विडिओ नीट ऐकावा आणि मग ठरवा.

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 Жыл бұрын

    बदलाचा इतिहास अपरिचित आहे.

  • @avinashjoshi5283
    @avinashjoshi5283 Жыл бұрын

    दादाजी कोंडदेव यांना बदनाम करण्याचे आपले कारस्थान कधीच यशस्वी होणार नाही. दादाजी कोंडदेव हे शहाजी राजांचे विश्वासू सरदार होते, शहाजी राजांनीच त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाठवलेले होते, हे लक्षांत घेणे आवश्यक आहे.

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    Жыл бұрын

    आपण विडिओ बघावा आणि यांत कुठे दादोजींची बदनामी केली आहे ते नेमके सांगावे, केवळ शीर्षक वाचून निष्कर्ष काढू नये.

  • @prasaddange8039
    @prasaddange8039 Жыл бұрын

    सर, ही माहिती तुम्ही कोणत्या पुस्तकातून घेतली आहे, मला वाचायचे आहे.

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    Жыл бұрын

    शककर्ते शिवराय- शिवकथाकार विजय देशमुख खंड -१, पान क्रमांक- १९३, १९४, १९५,३७७ amzn.to/3X7pFZO

  • @Monster11800
    @Monster11800 Жыл бұрын

    Hello everyone❤

  • @vishnuhirepatil4697
    @vishnuhirepatil4697 Жыл бұрын

    हा सर्व संभाजी बीग्रेडचा इतिहास आहे हे सर्व फेक आहे

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    Жыл бұрын

    तुम्ही खूप हुशार आहात, व्हिडिओ न पाहता निर्णय दिला! फक्त शीर्षक बघून, छान!!!

  • @mahadevmalusare541

    @mahadevmalusare541

    Жыл бұрын

    तू नक्की पाटीलच आहे का

  • @vg-kf8kg

    @vg-kf8kg

    Жыл бұрын

    कोळपे सरांचे अनेक व्हिडिओ मी पाहिले आहेत. ते ऐतिहासिक तथ्यांना धरून असतात. कृपया आपण व्हिडिओ नीट पहावा. त्या आधी टीका करू नये.

  • @user-hv9lc7ig1i

    @user-hv9lc7ig1i

    Жыл бұрын

    शंभूराजे मोगलांना मिळाले होते यातलं तथ्य समोर आणणारा एखादा व्हिडिओ यावा. धन्यवाद!

Келесі