corona : कोरोना

Ойын-сауық

गर्दीने हैराण रस्ते
आज मात्र ओस पडलेत
गोंगाटाला कंटाळलेले
बघा कसे एकटे पडलेत
पोटाच्या भुखेनं
इथपर्यंत आणुन ठेवलय
मरणाच्या भितीन मात्र
चालण्याच धाडस दिलय
बर झाल आपल्यांनीच
वेशीवरती आडवलेत रस्ते
नाहीतर अधीर मनाला समजावन
थोड जडच गेल असते.
नव्हती केली कल्पना
मनात नव्हतीच शक्यता
एक महामारी बदलेल
संपुर्ण जगाची सभ्यता
समुजतदारीने घरात बसलेत
आज भटकणारे फिरस्ते
जातील हे ही दिवस
फक्त संयमाने अडवावेत रस्ते
चला तर आता लढु
एकजुटीन या संकटाशी
लढु आपण संयमान
लढु माणुसकिच्या भावनेन
मिळुन नाही तर लढु ...
एकेकटे सुरक्षीत अंतर ठेवुन,
आपणच आपली खबरदारी घेवुन ...
लढु सजग होवुन
एका अदृश्य शत्रुला हरविण्यासाठी
लढु जिंकण्यासाठी आणि पुन्हा एकत्र येण्यासाठी
इमानदारीने लढु एका नव्या पहाटेच्या स्वागतासाठी

Пікірлер: 3

  • @bollywoodentertainment3567
    @bollywoodentertainment35674 жыл бұрын

    Wah

  • @bollywoodentertainment3567
    @bollywoodentertainment35674 жыл бұрын

    Video share kelay group var

  • @mradeshop6446
    @mradeshop64463 жыл бұрын

    Hi mama me papu👍👍😀😀

Келесі