भूजल शोधण्याची अचूक पद्धती Dowsing for underground water जमिनीतील पाणी पाहण्याची पद्धत

Ғылым және технология

भूजल शोधण्याची अचूक पद्धती Dowsing for underground water जमिनीखालचे पाणी, त्‍यावरील मालकी, आणि त्‍या पाण्‍याचे व्‍यवस्‍थापन - हा एक फार गुंतागुंतीचा विषय आहे. जमिनीखाली वेगवेगळ्या थरात पाणी असते. हे पाणी वरच्‍या जमिनीचा सातबारा जसा बदलेल, तसे बदलत नाही. दहा शेतकर्‍यांच्‍या जमिनींची खातेफोड झालेली असते, तशी जमिनीखालच्‍या पाण्‍याची मात्र करता येत नाही. हे पाणी एका गावापुरतेही एक नसते, अनेकदा भूजलाच्‍या एकाच साठ्यावर म्‍हणजे ‘अॅक्विफर’वर पंधरा-वीस गावे वसलेली असतात. एक अॅक्विफर कुठून कुठपर्यंत आहे, हे ठरवणेही अवघड असते. हिवाळ्यापर्यंत पाण्‍याची पातळी वर असते तेव्‍हा, एकच विशाल अॅक्विफर आहे असे भूगर्भतज्‍ज्ञांना वाटू शकते, पण उन्‍हाळ्यात पातळी घसरली की मधले काही उंचवटे एका अॅक्विफरला दोन किंवा तीन अॅक्विफरमध्‍ये विभागतात. त्‍यामुळे अमुक चार गावांचा अॅक्विफर एक आहे, असे खात्रीने म्‍हणता येईलच असे नाही..*DOWNLOAD APP --- play.google.com/store/apps/de...
WHATSAPP wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE agrowone.in/
📞📞 wa.me/919172800247
जमिनीखाली पाणीसाठा जरी एकच असला, तरी शेतकर्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍याची विहीर त्‍याच्‍या मालकीची असते. ज्‍याची जमीन, त्‍याचेच पाणी - हे तत्त्‍व पूर्वापार प्रचलित आहे. त्‍यामुळे माझ्या जमिनीतून मी किती पाणी काढतोय, त्‍याच्‍याशी तुम्‍हाला काय करायचंय - असे तो म्‍हणू शकतो. पूर्वी (म्‍हणजे वीजपंप येण्‍याआधी) जेव्‍हा मोट लावून शेताला पाणी दिले जात होते, तोवर असे म्‍हटले तरी फरक पडत नव्‍हता. पण 1970च्‍या दशकात बोअर ड्रिलिंग मशिन्‍स आली, आणि सगळी गणिते बदलली. दुष्‍काळाचा प्रश्‍न सोडवण्‍याची गुरूकिल्‍लीच आपल्‍या हातात आली आहे, असे तेव्‍हा लोकांना वाटले. शासन आणि स्‍वयंसेवी संस्‍थांनीही भूगर्भतज्‍ज्ञांच्‍या सल्ल्याने भूजलाचा शोध घेतला आणि धडाधड बोअर मारल्‍या. कूपनलिकांमधून पाणी मिळाल्‍याने अनेक दुष्‍काळग्रस्त गावांना हुश्‍श झाले. पण तंत्रज्ञान हे भस्‍मासुरासारखे असते, ते एकदा अंड्यातून बाहेर पडले की कुणाचे ऐकत नाही. हळू हळू बोअर खोदणारे खासगी कंत्राटदार वाढत गेले आणि जमिनीखाली दोनशे चारशे फुटांपर्यंत खोल बोअर जाऊ लागल्‍या. माझी 60 फूट खोल साधी विहीर असेल आणि शेजारच्‍या शेतकर्‍याने दीडशे फूट खोल बोअर घेतली, तर माझ्या जमिनीखालचे पाणी त्‍याच्‍याकडे जाऊ लागते. माझी विहीर आटते म्‍हटल्‍यावर मी कंत्राटदाराला बोलावून शेजार्‍यापेक्षा 100 फूट खोल बोअर घेतो. अशा स्‍पर्धा चालू राहिल्‍या.
एकीकडे नगदी पिकांचे लोणही आले. वर्षानुवर्षे ज्‍या शेतकर्‍यांनी भुसार पिके घेतली आणि किरकोळ बाजारभावापुढे आपली मेहनत मातीमोल केली, त्‍यांच्‍यासाठी नगदी पिके ही पर्वणी होती. ऊस, कापूस, संत्री, द्राक्षे, केळी या पिकांसाठी भरपूर पाणी हवे. बाहेरून पाणी आणायचे, म्‍हणजे कालव्‍यातून उचलायचे तर सतरा भानगडी. त्‍यापेक्षा आपल्‍याच जमिनीतले पाणी वापरलेले बरे, ते आपल्‍या हक्‍काचे - अशी शेतकर्‍याची स्‍वाभाविक भूमिका होती. जमिनीवरचे पाणी सिंचनासाठी वापरण्‍याच्‍या सोयी ज्‍या ज्‍या भागात झालेल्‍या नव्‍हत्‍या, (म्‍हणजे पश्चिम महाराष्‍ट्र सोडून सगळीकडे) त्‍या त्‍या ठिकाणी शेतकर्‍यांनी बोअरवेल घेतल्‍या आणि नगदी पिके घ्‍यायला सुरूवात केली. काही वर्षे बरी गेली, पण भूजल म्‍हणजे काही द्रौपदीची थाळी नव्‍हे. भूजल साठे हळूहळू रिकामे व्‍हायला लागले. एकीकडे लोक पाणी उपसत होते, दुसरीकडे पावसाचे पाणी वाहून चालले होते. पावसाचे जितके पाणी जमिनीत मुरेल तेवढेच पाणी भूजल म्‍हणून उपयोगात येते. भूजल साठ्याचे दोन ढोबळ प्रकार होतात - त्‍यात शॅलो म्‍हणजे उथळ अॅक्विफर हा दरवर्षीच्‍या पावसाच्‍या पाण्‍याने पुन्‍हा पुन्‍हा भरला जातो. पण डीप म्‍हणजे खोलवर असलेला अॅक्विफर मात्र असा दरवर्षी भरला जात नाही, तो भरायला अनेक दशके लागतात. वरच्‍या सर्व थरांमधून मुरलेलेच पाणी या खोल अॅक्विफरपर्यंत पोचते. साध्‍या विहीरी उथळ अॅक्विफर मधले पाणी घेतात, पण बोअर मात्र खोल अॅक्विफर मधून पाणी खेचतात.
यामुळे एकंदर विहीरींमधले आणि बोअरमधलेही पाणी हळू हळू खचत जाते. पाऊस चांगला झाला, तरी पाणी जिरण्‍याचे प्रमाण कमी असते. भूजल पातळी घसरते आहे हे शेतकर्‍यालाही जाणवत असतेच. पण त्‍याची प्राधान्‍ये वेगळी असतात. ज्‍या गावांमध्‍ये शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात बोअर घेतल्‍या आहेत, अशा प्रत्‍येक गावात पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई असते. तिथला शेतकरी काय विचार करतो - ‘प्‍यायचं पाणी आपल्‍या गावातल्‍या विहीरीला नसेल, तर कुठे तरी असेलच की. घरातल्‍या स्त्रिया एखाद मैल जास्‍त चालतील, किंवा दोन फे-या जास्‍त मारतील, किंवा टँकरपुढे लाईन लावतील. पण पाणी टंचाईच्‍या भीतीने मी जर नगदी पीकच घ्‍यायचं सोडलं, तर घरात रोकड कुठून येईल?’ #dowsing
गावात पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई झाली, तर खासगी विहीर अधिग्रहीत करून तिचे पाणी सर्वांना पिण्‍यासाठी ठेवण्‍याचा अधिकार जिल्‍हाधिकार्‍यांना असतो. तसा कायदा महाराष्‍ट्रात 1993 सालापासून अस्तित्‍वात आहे. मात्र त्‍या कायद्यानुसार विहीर अधिग्रहीत करण्‍यासाठी ग्रामस्‍थांनी किंवा ग्राम पंचायतीने तक्रार करावी लागते. प्रत्‍यक्षात पाणी टंचाई झालेल्‍या ठिकाणचा सरपंच विचार करतो की, ‘अशी तक्रार करून मी कशाला वाईटपणा घेऊ. मला तर याच गावात रहायचे आहे. पुन्‍हा परंपरेप्रमाणे खासगी विहीरीचे पाणीही खासगीच मानले जाते. कुणाचे खासगी पाणी आपण तोडले म्‍हणून जन्‍मभर शिव्‍या कशाला खा…’ अनेकदा सरपंच आणि इतर पंच मंडळी स्‍वतःच बागायती करत असतात. ते अशी तक्रार करतील असे जवळजवळ अशक्‍यच.

Пікірлер: 41

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन3 жыл бұрын

    *DOWNLOAD ❤️ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN 😊😊 WHATSAPP wa.me/919172800247 VISIT OUR WEBSITE agrowone.in/ 📞📞 wa.me/919172800247

  • @vijayjraut2047
    @vijayjraut20472 жыл бұрын

    Thanks

  • @KG-km8st
    @KG-km8st4 жыл бұрын

    Very good 👍👌😊

  • @rajughumare5733
    @rajughumare57334 жыл бұрын

    Khupch chan mahiti dili sir

  • @jingletooneslyrics
    @jingletooneslyrics4 жыл бұрын

    Khup chan

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन4 жыл бұрын

    व्हाट्सअप करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा wa.me/919172800247 करा किंवा आमच्या वेबसाईटला www.agrowone.in ला भेट द्या मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला मदत करेल सूर्यप्रकाशात व्हिडिओ काढा व्हिडीओ काढताना मोबाईल आडवा पकडा 9172800247 व्हाट्सअप group la add kara

  • @arjunjadhav5872
    @arjunjadhav58724 жыл бұрын

    Sar pashu palan che mahati daya

  • @sanjayjadhav5065
    @sanjayjadhav50654 жыл бұрын

    Sir soyabin lagwad cha video taka

  • @onlyindian1222
    @onlyindian12224 жыл бұрын

    नमस्कार अँग्राेवन चांगला व्हीडीआे विहीरीला रिंग टाकुन घ्या म्हनजे विहिर चांगली हाेईल व जास्त रान पडुन राहानार नाहि व्हीडीआे एकदम चांगला

  • @ramchandrathombare4157
    @ramchandrathombare41574 жыл бұрын

    Mala vihir karaychi aahe tari tya badl mahiti denychi krupa karavi

  • @sankarshanwaybhase420
    @sankarshanwaybhase4204 жыл бұрын

    sir maza 500ft bor aahe pani laagl aahe pn thodch aahe kahi upay sanga

  • @jayrengakorku1466
    @jayrengakorku14664 жыл бұрын

    सर ,आम्ही ९०० फूट बोर मारलं तरी २.५० इंच च पाणी लागला मोटार फक्त १० मिनिट चालते यासाठी काय उपाय करावेत?

  • @prmdp2234
    @prmdp22344 жыл бұрын

    जुन्या borewell chi depth वाढवण्यासाठी किती खर्च येतो. माझा 246 ft बोर असून पाणी level आता फक्त 20ft खाली आहे. खडा टाकला तर एक सेकंद पूर्वी आवाज येतो. तरीसुद्धा मी बोर chi depth 350ft पर्यंत वाढवायच्या विचार करतोय. Please suggest.

  • @vivekpatil3056

    @vivekpatil3056

    4 жыл бұрын

    फ्रेश बोर चा जो भाव आहे त्याच्या निम्मे भाव हा तुमचा बोर आता जेव्हढा खोल आहे त्यासाठी लागेल आणि पुढे फ्रेश बोर चा भाव लागेल

  • @jyotibabhagat1791
    @jyotibabhagat17914 жыл бұрын

    नारळा वरती पाणी पाहणे राशी वर असते का rakt gatavarti aste..?

  • @subhashpawar1877
    @subhashpawar18774 жыл бұрын

    पांचट

  • @radheshyammaske8941
    @radheshyammaske89414 жыл бұрын

    सर बोरवेल करतांना पाण्याची खोली कशी ओळखावी p/s माहीती द्या

  • @jingletooneslyrics
    @jingletooneslyrics4 жыл бұрын

    Sir tumch Gav kont ahe

  • @kacheshwarnagre6124
    @kacheshwarnagre61244 жыл бұрын

    सर तुमचं गाव कोणत आहे

  • @dnyaneshwarkatkar3168
    @dnyaneshwarkatkar31683 жыл бұрын

    आपण डॉक्टर आहे का सर

  • @dnyaneshwarpilane8685
    @dnyaneshwarpilane86854 жыл бұрын

    मला पाणी पाहायचं आहे मला आज खूप गरज आहे कारण माझं 4 ऐकर शेत आहे

  • @kailasbarwal9506
    @kailasbarwal95064 жыл бұрын

    Sir tumhi rajkarnat kheva udi marnar .....

  • @hiramanmalekar4293
    @hiramanmalekar42934 жыл бұрын

    Sir Maje 4 borewell fail gele ahet 615 foot, 480 foot, 320 foot ani 430 foot kay upay karta yeail.

  • @vivekpatil3056

    @vivekpatil3056

    4 жыл бұрын

    बोर मध्ये ब्लास्टिंग करा कॉल 8888992678

  • @hiramanmalekar4293

    @hiramanmalekar4293

    4 жыл бұрын

    @@vivekpatil3056 kele hote 2 borewell madhey kahi phrak nahi padla

  • @vivekpatil3056

    @vivekpatil3056

    4 жыл бұрын

    पूर्णपणे कोरडा गेला होता का बोर ? की थोडंफार पाणी लागलं होतं ? लागलं असेल तर किती फुटावर

  • @vivekpatil3056

    @vivekpatil3056

    4 жыл бұрын

    कारण माझा एक बोर 620 फूट कोरडा गेला होता आणि आज त्यात 3 इंच पाणी चालतं

  • @hiramanmalekar4293

    @hiramanmalekar4293

    4 жыл бұрын

    @@vivekpatil3056 125 footavar thode pani lagle hote. Atta phakat 20 minutes chalte

  • @kailasbarwal9506
    @kailasbarwal95064 жыл бұрын

    Sir tumhi rajkarnat keva udi marnar

  • @bhushansonawane5302
    @bhushansonawane53024 жыл бұрын

    पाणी अडवा पाणी जिरवा. हे पण सांगा कधीतरी

  • @dnyaneshsanap8088
    @dnyaneshsanap80884 жыл бұрын

    ञिकोन जमिनीचे श्रेञफळ १ बा .539. २ .बा . 528 ३. बा . 243 किती एकर होते . कीवा ञिकोन श्रेञाचा एखादा व्हिडीओ करा

  • @namdev25

    @namdev25

    4 жыл бұрын

    अँप डाउनलोड करा

  • @akshaymore6681
    @akshaymore66812 жыл бұрын

    विहिरीतील पाणी बोरला जात म्हणून बोर चालू आहे

  • @somnatharangale4699
    @somnatharangale46994 жыл бұрын

    सर काॅपर राॅड कुठे मिळेल

  • @vasantkhedkar2670
    @vasantkhedkar26704 жыл бұрын

    कामापेक्षा बडबड आती जास्त वेळ करीता

Келесі