Vengurla Beaches - Cinematic scenes & Relaxing Ocean Sounds वेंगुर्ला समुद्र - पहा आणि ऐका! कोकण

रविवारचा दिवस आहे आणि कोविडच्या कोपामुळे तुम्ही घरी सहकुटुंब अडकलेले आहात, उन्हाळ्याची सुट्टी अशीच गेली. आंबे खाताना कोकणात भ्रमंती कधी करायला मिळणार हा विचार नक्की मनात डोकावला असेल. तेव्हा हा व्हिडीओ मस्त मोठ्या स्क्रीनवर पहा आणि तुमची साउंड सिस्टीमही ऑन करा. मोबाईल फोनवर पाहत असाल तर तुमचे हायफाय हेडफोन लावायला
Vengurla beaches This video covers 17 beaches in Vengurla Taluka from Redi to Bhogawe. Shiroda, Aravali, Kadoba, Mochemad, Sagareshwar, Vengurla, Dabholi - Wayangani, Konudra, Falayefond, Kalavi, Kelus Mobar, Khavne, Dandeshwar Shriramwadi, Nivati .. each one of them has unique beauty and offers heavenly experience. Darya Firasti is our attempt to capture the untouched vistas of the Konkan coast using cinematic treatment. Vengurla Beaches - Cinematic scenes & Relaxing Ocean Sounds वेंगुर्ला समुद्र - पहा आणि ऐका! कोकण
विसरू नका. कारण कोकणातील दर्या फिरस्ती ही फक्त पाह्ण्याचीच नव्हे तर ऐकण्याचीही गोष्ट आहे. वेंगुर्ला तालुका म्हणजे महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे दक्षिण टोक. जगभरात समुद्रकिनाऱ्यांसाठी जरी गोमंतक प्रसिद्ध असला तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरतीरांची भ्रमंती हा एक आगळा अद्वितीय अनुभव असतो. रेवस ते तेरेखोल या सातशे किलोमीटर लांब प्रवासातील तेरेखोल ते भोगवे हा टप्पा.. वेंगुर्ला तालुक्यातील सगळे १७ समुद्रकिनारे आपण या व्हिडिओत अनुभवणार आहोत. व्हिडीओ शूट करत असताना ड्रोन अन अत्याधुनिक कॅमेरा तर वापरले आहेतच.. शिवाय सागराशी संवाद साधता यावा यासाठी खास साऊंड डिझाईन केलं आहे मित्रवर्य आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रतिभावंत नामांकित ध्वनि तज्ज्ञ मंदार कमलापूरकर.. हा व्हिडीओ नक्की पहा.. आवडला तर तुमच्या कोकणवेड्या मित्र, नातेवाईक, सहकारी सर्वांसोबत शेअर करा आणि तुमचा अभिप्रायही नक्की कळवा
00:00 - Intro montage
00:57 - Terekhol
01:55 - Redi
02:18 - Shiroda
03:25 - Sagarteertha
03:58 - Kadoba
04:20 - Mochemad
05:23 - Sagareshwar
06:47 - Vengurla
07:27 - Dabholi Wayangani
08:06 - Kondura
09:21 - Falayefondwadi
10:12 - Kelus Mobar
10:42 - Khavne
11:19 - Dandeshwar Shriramwadi
11:57 - Nivati
13:03 - Bhogawe
रेडी ते भोगवे या टप्प्यातील १७ रमणीय सागरतीरांना अनुभवण्यासाठी हा व्हिडीओ बनवला आहे. सिनेमॅटिक चित्रण केलेली दृश्ये आणि ध्वनी संयोजन तुम्हाला तिथं प्रत्यक्ष असण्याचा अनुभव देईल हे नक्की. रेडी, शिरोडा, आरवली, कडोबा, मोचेमाड, सागरेश्वर, वेंगुर्ला, दाभोली-वायंगणी, कोंडुरा, फळयेफोंडवाडी, कालावी, केळूस मोबार, खवणे, दांडेश्वर-श्रीरामवाडी, निवती आणि भोगवे... प्रत्येक ठिकाणी समुद्राचा अनुभव वेगळा.. देखावा वेगळा.. आवाज वेगळा.. हे सगळं सौंदर्य सिनेमॅटिक दृष्टीने उत्तम ध्वनी संयोजनासह तुमच्यापर्यंत आणण्याचा हा प्रयत्न आहे.
Written, videographed and edited by Chinmaye Aniruddha Bhave
Voiceover - Purudatt Ratnakar
Sound Design - Mandar Kamalapurkar
Music- Soar by Scott Buckley - www.scottbuckley.com.au
made available under the Creative Commons ‘Attribution 4.0 International’ (CC BY 4.0) License
लेखन, चित्रण, संकलन - चिन्मय अनिरुद्ध भावे
दर्या फिरस्ती प्रकल्प
निवेदन - पुरुदत्त रत्नाकर
ध्वनी संयोजन - मंदार कमलापूरकर, सचिदानंद टिकम
संगीत - सोअर, स्कॉट बकली ऑस्ट्रेलिया
क्रिएटिव्ह कॉमन्स 4.0 द्वारे उपलब्ध
Equipment
Canon EOS 80D
Canon 5D mk III
DJI Osmo Pocket Cinema
DJI Mavic Air drone
Go Pro Hero 8 Black
Zoom H4N
Imac 27 inch
Mobility solution
Tata Nano Twist 2015 XTA

Пікірлер: 43

  • @subhashsane-929
    @subhashsane-9293 жыл бұрын

    अप्रतिम चिन्मय.. अप्रतिम आवाज (voice over) .. लाटांचे निरनिराळे आवाजही तर किती सुखदायक .. वेगुर्ल्याला कामानिमित्त ५ वर्षांपूर्वी गेलो होतो. तेव्हा बंदर आणि काही समुद्रकिनारे पाहिले होते. आता परत जायला हवं 😊😊

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 Жыл бұрын

    कोकणातील वेंगुर्ला शहराचा इतिहास सर्वांना सांगा. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्याने तो आपण सांगू शकतात....

  • @shaileshtrivedi5089
    @shaileshtrivedi50899 ай бұрын

    वेंगुरल्याच्या समुद्र किनाऱ्या ची खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sujeet2jayshivaji985
    @sujeet2jayshivaji985 Жыл бұрын

    वेंगुर्ला सुंदर समुद्र किनारा आहे आमची कोल्हापूर ते वेंगुर्ला असे वर्षातून 2 ट्रिप आहेच न चुकता

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973Ай бұрын

    Khupach chan shoot mahiti ani awaj

  • @shamlimbore9406
    @shamlimbore94068 ай бұрын

    Swargiy. Sundar. Konkan ❤

  • @saritakandharkar2584
    @saritakandharkar2584 Жыл бұрын

    एवढं सुंदर वर्णन भावे च करू शकतात,दुसरे नव्हे, खरंच अप्रतिम

  • @vidyadabholkar8999
    @vidyadabholkar8999 Жыл бұрын

    मस्तच,मस्त.

  • @yogeshsalvi21
    @yogeshsalvi21 Жыл бұрын

    you deserve more likes nicely explained

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Жыл бұрын

    Wonderful....

  • @akshaybhagawat7790
    @akshaybhagawat7790 Жыл бұрын

    Khup Sundar

  • @pbhave
    @pbhave Жыл бұрын

    Superb ! Wonderful audio-visual experience!

  • @diptidesai7399
    @diptidesai7399 Жыл бұрын

    Very outstanding video 👌 I can watch n listen it for whole day. It is one of best video I have ever seen on kokan. Thanks making for this beautiful video 🙏

  • @vkulin
    @vkulin3 жыл бұрын

    इतक्या वेळा कोकणात जातो, पाच सात वर्षे कोकणातच काढलीत पण इथली ओढ कमी होण्याचे नाव घेतच नाही. असं वाटत राहते की हा समुद्र आपल्याला सतत बोलवतो. कोल्हापूर पासून कोकण जवळ आहे हे आमचे सुदैव. आपण अत्यंत सुंदर दर्शन घडवलं आहे या निळाई चे, आणि सोबत अतिशय छान समालोचन.

  • @saipravin
    @saipravin Жыл бұрын

    Amazing

  • @mrunmaipokharankar2532
    @mrunmaipokharankar25323 жыл бұрын

    फारच सुंदर झालाय विडीओ.

  • @subhashgawde3320
    @subhashgawde3320 Жыл бұрын

    छान चित्रीकरण आणि सादरीकरण, आमच्या वेंगुर्ल्याचे सुंदर समुद्र किनारे दाखविल्या बद्धल धन्यवाद. 🙏🙏

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye92133 жыл бұрын

    अप्रतिम किनारी सौंदर्य.

  • @deshpandeprasad9256
    @deshpandeprasad92563 жыл бұрын

    Amazing Keep it up

  • @anupamadhumal401
    @anupamadhumal4013 жыл бұрын

    Khup Sunder 👌

  • @kkavita3779
    @kkavita37792 жыл бұрын

    Super videos & also information|simply smart video ❤️❤️❤️❤️❤️

  • @sachinsawant1271
    @sachinsawant12712 жыл бұрын

    Because of Konkan Leader Narayan Rane, Sindhudurg known as Tourist district in India. Rane made progressive work to make Sindhudurg as Tourist place.

  • @mohannarvekar9842
    @mohannarvekar98423 жыл бұрын

    फारच सूंदर।कीप इट उप।

  • @mandarkarandekar4845
    @mandarkarandekar48453 жыл бұрын

    अप्रतिम साउंड विडीयो ही खुप सुंदर आहें😍

  • @prakashsawant2842
    @prakashsawant28423 жыл бұрын

    Jabaradast sound sitim and kokan bhomi i also kokani shiroda netiv place maza ili thanks a lot love you tooo much 👌🤣👌👌🙏🙏💞💕💞💕⛈⛈

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve36513 жыл бұрын

    Chan , sound effects and editing. 👍👍

  • @prakashsawant2842
    @prakashsawant28423 жыл бұрын

    Tumacha avaj bhardasat ahe v god ahe love you tooo much 👌👌🙏🙏🍀🌳🌲⛈🙏💞💕👌💕💞

  • @amrutadalvi5282
    @amrutadalvi52823 жыл бұрын

    निव्वळ अप्रतिम❤️

  • @PrathmeshVlogger
    @PrathmeshVlogger3 жыл бұрын

    खूप सुंदर 👌👌👌😍😍😍

  • @GeographicallyFree
    @GeographicallyFree2 жыл бұрын

    Beautiful!

  • @vkulin
    @vkulin3 жыл бұрын

    खूपच सुंदर..

  • @anandvolvoikar1217
    @anandvolvoikar12172 жыл бұрын

    Superb definition ☺️💞 of nature 🤠😂.....

  • @anantbhave2111
    @anantbhave21113 жыл бұрын

    Sound designing khup chan hota, headphones mule changla effect ala, mothya screen vr ajun chan disel

  • @user-vz9tn7wn1l
    @user-vz9tn7wn1l2 жыл бұрын

    दाभोली गाव आहे पण त्याला समुद्र किनारा नाही.खानोली वायंगणी आहे.कोंडुरापण त्याच गावात आहे.

  • @user-vz9tn7wn1l
    @user-vz9tn7wn1l2 жыл бұрын

    कालवीबंदर गाव केळुस.

  • @muktadolare2503
    @muktadolare25032 жыл бұрын

    🌊🐚

  • @sunilpednekar2469
    @sunilpednekar24693 жыл бұрын

    Phar Sundar🙏🙏

  • @ChinmayeBhave

    @ChinmayeBhave

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @sunildesai9527
    @sunildesai95273 жыл бұрын

    १७ किनारे.

  • @jyotsnapathak870

    @jyotsnapathak870

    3 жыл бұрын

    अतिशय सुंदर आहे _7__8वर्षांपूर्वी पाहिले होते प्रत्यक्षात आता पुनःप्रत्ययाचा आनंद घेतला

  • @arunhande3354
    @arunhande33543 жыл бұрын

    वेंगुरला आणि परिसर अतिशय निखळ स्वच्छ समुद्र किनारा तेथील रिसोड ची माहिती देऊ शकाल काय?

  • @ChinmayeBhave

    @ChinmayeBhave

    3 жыл бұрын

    जरूर, कोणत्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला आणि साधारण बजेट काय

  • @williamsnal9332
    @williamsnal93322 жыл бұрын

    From France Vlogytoo KZread channel Hi friend Walking on the beach and earing the wawes it's always relaxing time Here we are going often to the beach. I have done some videos of the beaches. If you want you can see in our Vlogytoo KZread channel. Kindly By

Келесі