तुळशीबाग राम मंदिर पुणे Ram Mandir Pune

Ойын-сауық

⁠‪@ProfDipikaJangam‬
#शॉर्ट्स
#profdipikajangam
#rammandir
नवरात्रात रामरक्षेचे अनुष्ठान
रामरक्षा अनुष्ठानाकरता नवरात्राला अनन्यसाधारण महत्व आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी पर्यंतचे रामनवरात्र या नवरात्रात कुठलेही केलेले अनुष्ठान सिद्ध होते. प्रथम प्रतिपदेला सकाळी लवकर स्नान करुन धूतवस्त्र परिधान करावे . कपाळाला मंगल तिलक लावावे.स्त्रीयांनी हळद कुंकु लावावे. आचमन करुन कुलदेवतेला नारळ विडा ठेवून गणपती , कुलदेवता, इष्ट देवतेला नमस्कार करा.आई वडिलांना नमस्कार करुन अनुष्ठान सुरु करा. श्री गणेशायनमः अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य इथुन सुरुवात करुन रामनाम वरानने इथ पर्यंत म्हणून , इति श्री बुधकौशिक न म्हणता परत चरितं रघुनाथस्य इथुन सुरुवात करुन रामनाम वरानने इथ पर्यंत म्हणावे व पुन्हा चरितं रघुनाथस्य इथुन सुरुवात करावी अशा पद्धतीने अकरा वेळा रामरक्षा एका आसनावर एका स्थानावर ( जागा बदलु नये) म्हणावी.अकराव्या वेळेस इति श्रीबुधकौशिक विरचितं श्रीरामरक्षा स्तोत्रं संपूर्णम्|| असे म्हणून संपवावे.अशा पद्धतीने नऊ दिवस दररोज अकरा वेळा रामरक्षा म्हणावी म्हणजे ती सिद्ध होते.दहाव्या दिवशी एकदाच संपूर्ण रामरक्षा म्हणावी.एखाद्या ब्राम्हणाला भोजन व यथाशक्ति दक्षणा व वस्त्र दान करावे . रामरक्षा सिद्ध झाल्यावर तुमच्या भोवती रामरक्षेचे वलय तयार होते.अपघातात देहाचे रक्षण होते, कुठलिही बाधा बाधत नाही.अनुष्ठान सिद्ध झाल्यानतर दररोज सकाळ संध्याकाळ रामरक्षा म्हणावी. लहान बाळाला रामरक्षा म्हणून अंगारा लावला की त्याला लागलेली दृष्ट उतरते . अनुष्ठान चालु असताना अकरा वेळा रामरक्षा म्हणून होई पर्यंत कोणाशीही बोलु नये, कांहीही खावु नये , अभक्षभक्षण करु नये, अपेय पान करु नये, ब्रह्मचर्य पाळावे, परान्न घेवु नये, नउ दिवस व्रतस्थ रहावे, सदाचरणाने वागावे. हे अनुष्ठान पूर्ण झाल्यावर सर्व प्रकारची मनोकामना पूर्ण होते.🙏🏻
दि. ९ एप्रिलला गुढीपाडवा आहे. ९ ते १७ एप्रिलपर्यंत आपल्याला ही साधना करायची आहे. दर वर्षीप्रमाणेच ही साधना करायची आहे. १७एप्रिलला रामनवमी आहे. या दिवशी साधनेची सांगता होईल. गुढीपाडवा आणि रामनवमी या दोन्हीं दिवशी देवाला नैवेद्य अर्पण करावयाचा आहे. साधना संकल्प करुन करा. घरातले सर्व जण ही साधना करु शकतात. एकाच ठिकाणी साधना करायची आहे. स्रियांनी पाळीचे ५ दिवस ही साधना करु नये. सुवेर,सुतक या दिवसांत साधना करता येणार नाही. काही शंका असल्यास जरुर विचारा.

Пікірлер: 8

  • @smukund
    @smukundАй бұрын

    जय श्रीराम

  • @vidyanargundi8593
    @vidyanargundi85933 ай бұрын

    Khup chan👌

  • @sharaddumbre2217
    @sharaddumbre22173 ай бұрын

    खुप सुंदर वर्णन केले आहे आणि चित्रण सुद्धा एकदम मस्त ❤

  • @ProfDipikaJangam

    @ProfDipikaJangam

    3 ай бұрын

    खुप धन्यवाद 🙏🚩

  • @kavitapardeshi2745
    @kavitapardeshi27453 ай бұрын

    दीपिका मंदिराचे यथार्थ वर्णन करून अगदी सूक्ष्म बारकावे देखील तू खूप सुंदरपणे टिपले आहेस.

  • @ProfDipikaJangam

    @ProfDipikaJangam

    3 ай бұрын

    खुप धन्यवाद 🙏🚩

  • @suvarnarane9557
    @suvarnarane95573 ай бұрын

    Yat mazi mavshi aahe sakhi.ujwala tulshibagwale.

  • @ProfDipikaJangam

    @ProfDipikaJangam

    3 ай бұрын

    😊

Келесі