Shivneri te raigad : Part 5/शिवजन्मानंतरचे दक्षिणेतील राजकारण व शहाजीराजेंचे कार्य

Ойын-сауық

छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांचे वडील शहाजीराजे यांचा मोठा प्रभाव आहे. शहाजीराजांना इतिहास एक स्वतत्र विचाराचा व पराक्रमी व कुशल संघटक म्हणुन ओळखतो. त्यांनी जरी सुलतानी शाहयांची चाकरी केली तरी त्यांनी ब-याच वेळा आपले स्वतंत्र राज्य तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी छोटया मुर्तीजाला निजामशाहीच्या गादीवर बसवुन स्वतः बरेच वर्षे निजामशाही राज्य चालविले. त्यांचे राजकारण, रणनिती यांच्या अनुभवाचा वारसा शिवाजी राजेंना नक्कीच मिळाला. शिवजन्मानंतर त्यांनी दक्षिणेत निजामशाही वाचविण्यासाठी केलेले कार्याबद्दल आपण या व्हिडीओमधुन माहीती घेणार आहोत.

Пікірлер

    Келесі