No video

फर्माईश : माझ्या मित्रा | Spruha Joshi | Marathi Poems

For Brand Collaborations & Partnerships drop an email to: teamspruhajoshi@gmail.com
खादाडी Playlist : shorturl.ae/TqKYC
गंमत गाणी Playlist : shorturl.ae/GNnXC
_______________________________
माझ्या मित्रा
ऐक ना,
मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ,
अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ
बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा
तीव्रमधुर तिथला वाऱ्याचा वावर
आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही
कितीदा पाह्यलेय मी हे स्वप्न, झोपेत आणि जागेपणीही !
आज तुला ते सांगावेसे का वाटले कळत नाही
पण थांब, घाई करू नकोस,
अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नाही.
हे ऐकताना हसशील, तर मर्द असशील;
स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी,
तर प्रेमिक असशील,
समजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात
धपापतेय माझे काळीज,
तर मग तू कोण असशील ?
स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील,
हाती देशील तर पती असशील,
आणि चालशील जर माझ्यासोबत
त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे
समजून हेही, की ते हाती येईल, न येईल,
पण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे, धापत धावणे
आणि माझा विश्वास, की माझे मलाच लढता येईल,
तर मग तू कोण असशील ?
मित्र असशील माझ्या मित्रा !
- अरुणा ढेरे
तुम्हाला कविता कशी वाटली ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
#SpruhaJoshi #Poems #Marathi #Food #Travel
_________________________________
Credits
________________________________
Produced By :
Spruha Joshi
Nachiket Ashok Khasnis
Location Partners :
Tushar & Chiranjivi Kothawade, Studio Infinity
Filming & Production Stills :
Angad Joshi
Shubhankar Havele
Editors :
Soham kurulkar
Yogesh Dixit
Tanishq Mohite
Hair & Makeup: Bhagyashree Patil
Styling : Tanmay Jangam
Costumes: Cotton Village
Partnerships and Brand Collaborations: Anurag Pathak
___________________________
About Spruha Joshi :
___________________________
Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
Instagram: / spruhavarad
Facebook: / spruhavarad
Twitter: / spruhavarad
____________________________
DISCLAIMER: This is the official KZread Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________

Пікірлер: 348

  • @bhartikumbhar4781
    @bhartikumbhar4781 Жыл бұрын

    खूप सुंदर कविता.. खूप छान विषय.. खूप छान सादरीकरण... " नुसतंच काय जगायचं.. जग कवितेतून बघायचं.. "😊

  • @ishavadodkar1159
    @ishavadodkar11592 жыл бұрын

    अरुणा ढेरे या माझ्या पण खूप लाडक्या लेखिका, कवयित्री आहेत. सध्या मी त्यांचं जाणीवा जाग्या होताना हे पुस्तक वाचतेय. आणि खरच खूप ओघवती आणि अभ्यासपूर्ण लेखन त्याच असत. आजची तुमची कविता सादरीकरण अप्रतिम.

  • @shobhanabhalearao460

    @shobhanabhalearao460

    Жыл бұрын

    खुप छान कविता आणि सादरीकरण... अभिनंदन स्पृहा....

  • @vilaspundle4766

    @vilaspundle4766

    Жыл бұрын

    छान कविता सृहा ताई

  • @ashishkarle7580

    @ashishkarle7580

    10 күн бұрын

    ताई माईक वापरा आवाज आजुन छान येईल

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor99739 күн бұрын

    कविता आणि सादरीकरण खूप सुंदर.धन्यवाद.

  • @anantshinde5617
    @anantshinde561715 күн бұрын

    अतिशय सुंदर व हृदयाला❤ भिडणारी कविता

  • @amityeske1357
    @amityeske135710 күн бұрын

    पैसा कमी असेल तर... पण जवळच्या एक मित्र आयुष्य मध्ये

  • @sagarshinde4393
    @sagarshinde43932 жыл бұрын

    अप्रतिम सादरीकरण... अर्ध्यावर फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नकोस... हे मित्रा ...आपली साथ आहे जन्माची अशी अर्ध्यावर सोडू नकोस...!!!

  • @sujatababar7645

    @sujatababar7645

    2 жыл бұрын

    I am speechless

  • @kaumudipundikar9028
    @kaumudipundikar90282 жыл бұрын

    मैत्री सोबत इतर नात्यांची व्याख्या पण किती अचूक केलीय...♥️

  • @amityeske1357
    @amityeske135710 күн бұрын

    .... खरच शब्द. अप्रतिम व्यक्तिमत्व

  • @shailasarode5733
    @shailasarode57332 жыл бұрын

    👌👌अरुणाताईंची खूप सुंदर कविता ऐकायला मिळाली. मैत्री म्हणजे निखळ नाते विश्वासाचे, आधाराचे व नितळ प्रेमाचे. स्पृहा नेहमीप्रमाणेच सुंदर सादरीकरण!!👍

  • @ganeshrajguru
    @ganeshrajguru2 жыл бұрын

    मॅम खुप छान होती कविता अशी मैत्री खूपच निथळ आणि निरागस असते अशी मैत्री मिळणे भाग्याची गोष्ट असते...🙏🙏🙏

  • @shantagaikwad4177
    @shantagaikwad41772 жыл бұрын

    सुंदर मैञी, निरपेक्ष, स्वच्छ, प्रेमळ, आपुलकीच्या स्नेहपूर्ण सुंदर नात्यांचा सुगंध अक्षयी.धन्यवाद स्पृहा. Very nice presentation. Love u so much!!!

  • @neetagaikwad9920
    @neetagaikwad99202 жыл бұрын

    मैत्रीच्या सुंदर निखळ नात्याचं अप्रतिम वर्णन आणि अतिशय सुंदर सादरीकरण ❤️🙏

  • @marathikavitashobhadalvi6826
    @marathikavitashobhadalvi68265 ай бұрын

    अप्रतिम काव्य आणि सादरीकरणही सुंदर

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu63606 ай бұрын

    सुंदर प्रासादिक व रसाळ वाणीतून सादरीकरण❤

  • @gauravlute1481
    @gauravlute14812 жыл бұрын

    मैत्रीला अत्यंत सुंदर लळा लावणारी अप्रतिम कविता. इतकं प्रचंड‌ विश्र्वासाचे धागे घट्ट मैत्रीच्या नात्यांना बांधणारी कविता आहे. खूपच सुंदर ❤️👌👌

  • @prathameshthakur5822
    @prathameshthakur58228 ай бұрын

    ज्याच्या कडे आवाज देता बरोबर येणारा मित्र किंवा मैत्रिणी आहे तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती

  • @manoramaghatge6066
    @manoramaghatge6066 Жыл бұрын

    Rama ghatge khup sundar kavita ahe dhanwad

  • @girijamahamuni2327
    @girijamahamuni23272 жыл бұрын

    खरंच...गारुड घालतेय ही कविता मनाला...❤️ स्पृहाताई ...द.मा.मिरासदार यांची 'रिस्क' नावाची गमतीदार कविता फर्माईश च्या भागात ऐकायला आवडेल...😊😊

  • @jyotiupadhye8402
    @jyotiupadhye8402 Жыл бұрын

    खुप छान कविता आणि स्पृहा सादरीकरणहु छान

  • @smitasaraf7950
    @smitasaraf79502 жыл бұрын

    हृदयाला स्पर्श करते ही कविता

  • @pallavinagwade3708
    @pallavinagwade3708 Жыл бұрын

    खरच खुप खुप सुंदर कविता.

  • @sandhyapandit1624
    @sandhyapandit1624 Жыл бұрын

    आपला चॅनल फार छान आहे. कोणाबरोबर शेअर केल्यास त्या व्यक्तीला पण आनंद देणारा.

  • @anusayapotdar3845
    @anusayapotdar38454 ай бұрын

    खरंच खूपच निखळ नी निरागस मैत्री च हे नातं ज्यांना लाभल खरंच अहो भाग्यम!

  • @manasiphadke7247
    @manasiphadke7247 Жыл бұрын

    Arti sunder spruha👌👍

  • @user-st6kc1uf2i
    @user-st6kc1uf2i2 жыл бұрын

    खूप सुंदर कविता. काही जुन्या मैत्री डोळ्यांसमोर लख्ख पणे उभ्या राहिल्या. Nostalgic करून गेली कविता. Thank you स्पृहा

  • @prabhasonawane5346
    @prabhasonawane53464 ай бұрын

    सुंदर कविता ❤ सुंदर सादरीकरण

  • @sachinshinde8283
    @sachinshinde82837 ай бұрын

    Hii Spruha khup chaan Kavita Ani khup chaan Saadarikaran . Nice.

  • @namdevpp
    @namdevpp2 жыл бұрын

    खुपच सुंदर अर्थबोध आहे या कविताचा.. धन्यवाद स्पृहा...

  • @rashmisp1
    @rashmisp12 жыл бұрын

    फारच सुंदर सादरीकरण अणि सुंदर कविता

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar61876 ай бұрын

    चतुरस्त्र लेखिका ,साहित्यिका व कवीयत्री डाँ अरूणाताई ढेरे यांना प्रणाम व धन्यवाद!

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha14192 жыл бұрын

    Spruha kiti sunder kavita aahe Aruna Dhere hyanchi ,arth kiti chan aahe ani tujha sadarikaran apratim.👍🏻

  • @saishtodankar8033
    @saishtodankar80332 жыл бұрын

    Sundar kavita,apartim sadrikaran, uttam content.

  • @madhukaryesane6715
    @madhukaryesane67159 ай бұрын

    स्पृहा तुमचं कविता प्रेम मला खूप भावतं. इतका भावनिक विकास होण्यासाठी तुमच्या बालपणी कोण कोणते संस्कार तुमच्यावर झाले असतील याचा मी विचार करतो. खूप छान. शुभेच्छा...

  • @monalijoshi5207
    @monalijoshi5207 Жыл бұрын

    Khup Sundar kavita ahe

  • @kaumudipundikar9028
    @kaumudipundikar90282 жыл бұрын

    मला गोविंदाग्रज यांची प्रेम आणि मरण ही कविता तुझ्याकडून ऐकायची आहे... ही कविता खूप खास आहे माझ्यासाठी.... please 🥺

  • @SandeshMane
    @SandeshMane2 жыл бұрын

    Apratim 😍😍 tachkan bharun ale dole 😍

  • @smitatapadiya5474
    @smitatapadiya54742 жыл бұрын

    Khuppach Chhan Spruha.kavita khup chhan asanyasobat tuzya wachnyachi style awesome..Tuzya wachnyamulech tya kavitela artha ala ahe.yess.

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar92832 жыл бұрын

    काव्य वाचन पण खूप सहज.छान..!👌

  • @vaishnavipatil8052
    @vaishnavipatil80522 жыл бұрын

    अप्रतिम सृहा ताई

  • @pandurangchate8115
    @pandurangchate81152 жыл бұрын

    अरुणाताईंची अतिशय अर्थपूर्ण अशी कविता आहे. स्पृहा तु उत्तम अभिनेत्री तर आहेसच. पण त्यापेक्षाही एक मोठी कवयित्री म्हणूनच नावारूपाला येत आहे. खूप खूप सुंदर. कविता आवडली...अप्रतिम!

  • @veenamusic...2225
    @veenamusic...2225 Жыл бұрын

    खूप खूप 🌺🌺सुंदर #वीणा म्युझिक मैफिल शब्द सुरांची

  • @ramlingpatale8898
    @ramlingpatale8898 Жыл бұрын

    खुप च छान कविता...माझ्या मित्रा. ऐक ना..

  • @sanjaykumar-jl8xt
    @sanjaykumar-jl8xt2 жыл бұрын

    खरा मित्र हा काळजाच्या आतला एक असा भाग जो आपल्यापासून वेगळा असून कुण्या एका वेगळ्या मित्ररूपी व्यक्तीजवळ सुखरूप असतांना तो ज्या ज्यावेळी आपल्याला भेटतो त्या त्या वेळी आपल्याला पूर्णत्वाचा सुखमय जिवंत आभास होतो... निस्वार्थ, निरागस, आपुलकी, आदर, ओढ, उणीव ह्या सगळ्या भावना जिथे विरतात आणि तो त्या सर्व अपेक्षेवर खरा उतरतो जी आपल्या आतली असते.... ☘️आम्हा सर्वांच्या लाडक्या स्पृहा ताई ☘️ आपण सदर केलेली कविता खुप खुप आवडली. खुप खुप आभार...🙏🙏

  • @anjalikonkar2983
    @anjalikonkar29836 ай бұрын

    ही फार सुंदर आणि सच्चा मैत्रीबद्दल बोलणारी कविता आहे. खूप छान वाचलीस स्पृहा.

  • @atharvabhatade9853
    @atharvabhatade98532 жыл бұрын

    अरुणा ढेरे मलाही खूप आवडतात आणि खास गोष्ट म्हणजे मी स्वतः त्यांना भेटलो आहे.१०वी चा वर्गात असताना एका धड्यापासून वाचायला सुरुवात केली. खरंच खूप सुंदर लिहितात त्या...♥️👌😍

  • @mandarkhare3194
    @mandarkhare31942 жыл бұрын

    अतिशय सुंदर सोज्वळ कविता आणि सादरीकरण देखील निर्मळ

  • @krishnapatil1126
    @krishnapatil112617 күн бұрын

    मैत्रीचं नातच वेगळं असतं

  • @akshaydhakate7232
    @akshaydhakate72322 жыл бұрын

    अरुणा ताईच लेखन आणि शब्दांची मार्मिक खूप अथांग आहे..त्यांची बोलण्याची शैली खूप मार्मिक आहे.92 वें साहित्य संमेलन यवतमाळ येथे झाले तेव्हा त्या आध्यक्ष म्हणून लाभल्या त्यांच्याशी संवाद साधता आला ..

  • @vrushaliapte7682
    @vrushaliapte76822 жыл бұрын

    अरुणाताईंची अप्रतिम कविता .. खूप आवडली स्पृहा

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar85482 жыл бұрын

    अप्रतिम ताई कविता फारच आवडली धन्यवाद

  • @user-nf4cy7ut1r
    @user-nf4cy7ut1r5 ай бұрын

    Wah क्या बात है Aruna ताई कविता छान पणे मा टली

  • @sayeekulkarni1901
    @sayeekulkarni19019 ай бұрын

    अतिशय सुंदर सादरीकरण. आणि अरुणा ढेरे यांच्या कविते बद्दल बोलणे यासाठी मी खूप छोटी आहे असा एक खरा मित्र आहे हे माझे सौभाग्य आहे

  • @vaishalinemade3228
    @vaishalinemade322811 ай бұрын

    अप्रतिम सादरीकरण....मैत्री म्हणजे एक विश्वासाचे,आपुलकीचे, आधाराचे व नितळ प्रेमाचे घट्ट नाते....अर्ध्यावर फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नकोस....हे मित्रा!! आपली साथ आहे जन्मांची अशी अर्ध्यावर सोडू नकोस...!!❤

  • @enjoywithnama77k
    @enjoywithnama77k Жыл бұрын

    पिंपळाच पान ही कविता 🙏🙏⚘🙏🤝👍😍

  • @mitalidhole4452
    @mitalidhole44522 жыл бұрын

    khup sundar spruha tai

  • @archanatidke7240
    @archanatidke7240 Жыл бұрын

    अरुणा ढेरे यांच्या अप्रतिम कवितांमधील माझी सर्वात आवडती कविता.

  • @anuradhakulkarni5383
    @anuradhakulkarni53839 ай бұрын

    अगं, चंदन,केशर,यांचा सुवास भरून भारून गेलेल्या देवघरात सायंकाळी सुंदर लख्ख सम ई स्नेहपूर्ण संथ तेवत असावी आणि पहाणार्‍या मनाचा गाभारा व्हावा अशी अरूणा आणि तिची कविता मला वाटते. शांत, तेजस्वी. होय ना गं.

  • @RoshanNavhate
    @RoshanNavhate Жыл бұрын

    स्पृहा मॅडम, तुम्हचं मराठी मला खूप आवडत.मी UPSC चा अभ्यास करता करता कधी भावनिक झालो की तुमच्या शब्दातून व्यक्त झालेली कविता ऐकतो.. नंतरच मला खूप प्रसन्न आणि अल्हाददायक वाटतं... तुमच् व्यक्तिमत्व आणि शब्दांची ठेवणं खूप प्रभावशाली आहे❤

  • @avk5822
    @avk58222 жыл бұрын

    KHUP SUNDAR KAVITA .

  • @ManjushaNsik-pt6br
    @ManjushaNsik-pt6br Жыл бұрын

    मैत्री वर खूप छान कविता वाचन व सादर करण्याची पध्दत अतिशय सुरेख

  • @surajsatav1016
    @surajsatav1016 Жыл бұрын

    उत्तम पोरी जसं काही तुझ माझं नातं. खूप छान. सुंदर 👌👌

  • @meghaghotekar7466
    @meghaghotekar74662 жыл бұрын

    Khupch mst....tumch sadarikaran👏👏

  • @adityagalgale2986
    @adityagalgale29862 жыл бұрын

    मैत्रीचे अतूट नाते काय असते.....हे ह्या कवितेतून खूप खूप खूप..... साध्या सोप्या रीतीने व्यक्त होते आहे.....आयुष्याचा आधार काय असतो तर तो मैत्री असतो.....मैत्री ही कोणाही मध्ये होऊ शकते.....पण ती मैत्री अशी स्वप्न दाखवून आणि त्या स्वप्नात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे सोबत असणारी असते....आणि जो ही आपला मित्र / मैत्रीण आपल्यासोबत ह्या स्वप्नांत नेहमी असेल.....मिळालेल्या यशाचे किंवा अपयशाचे ते वाटेकरी असतील तर खरंच.....ते आपले मित्र असतात....मैत्री ला खूलवून ठेवणारी ही कविता ....!!! खरंच खूप सुंदर .....स्पृहा ताई तुझा तोंडून तर ही कविता खूप च सहजतेने समजून गेली....!!!

  • @jyotsnachavan4687
    @jyotsnachavan4687 Жыл бұрын

    खुप छान प्रकारे एका मिञासोबत आपली भावना सागंण्याचा प्रयत्न अशी छान कविता, खरचं स्पृहा तुम्ही छान प्रकारे बोलली पण.......! मी पण माझ्या कविता प्रेमाच्या कविता लिहिलेली आहे अनेक...........! मला खुप आवड आहे.......!

  • @user-hi8qp1gi1j
    @user-hi8qp1gi1j9 ай бұрын

    Khup sundar👍👍👌👌

  • @shantagaikwad4177
    @shantagaikwad4177 Жыл бұрын

    सुंदर,अप्रतिम!!!

  • @priyashaikh7709
    @priyashaikh7709 Жыл бұрын

    अप्रतिम solid kavita aahey

  • @tejalchaudhari3421
    @tejalchaudhari34212 жыл бұрын

    Ekdum perfect 👌👌👌

  • @shubhadavyas8968
    @shubhadavyas896811 ай бұрын

    खूप छान कविता ही आणि वाचानही!मला सुद्धा अरुणा ढेरे च लेखन खूप आवडत!त्यांची कृष्ण किनारा ही कादम्बरी मिळाल्यास अवश्य वाचा!

  • @simranmore4046
    @simranmore40462 жыл бұрын

    खूप मस्त माझा मित्र देखील same असा आहे ❤️😘

  • @shalakashet5553
    @shalakashet5553 Жыл бұрын

    Khup ch Chan Aruna tai chi konti pan Kavita chalel Thank you so much😊

  • @tusharisame1982
    @tusharisame19822 ай бұрын

    खूप सुंदर ❤

  • @nitinvaidya3013
    @nitinvaidya30132 жыл бұрын

    सही कविता . सुंदर सादरीकरण .

  • @gaurighule2986
    @gaurighule29862 жыл бұрын

    Atishay sunder kavita aani sadarikaran suddha 👌👌

  • @nishaadbhushan8689
    @nishaadbhushan86892 жыл бұрын

    धन्यवाद स्पृहा!! ही माझी अतिशय प्रिय असणारी आणि मनाच्या आणि मोबाईल च्याही कोपऱ्यात जपून ठेवलेली कविता तुझ्या सादरीकरणातून जीवंत झाली.. अरुणा ताई माझ्याही आवडीच्या आणि माझ्या मनातली इच्छा या फर्माईश मधून पूर्ण केल्याबद्दल तुझे आणि फर्माईश करणाऱ्या ताईंचे खूप आभार.. ❤️❤️🙏

  • @sanjaydhamdhere3708
    @sanjaydhamdhere37086 ай бұрын

    फारच सुंदर भावपूर्ण कविता व तेवढेच सुरेल वाचन

  • @priyagunjal4938
    @priyagunjal4938 Жыл бұрын

    Khup sundar,

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 Жыл бұрын

    खुप खुप छान कविता असे मित्र आपल्या आयुष्यात सदैव हवे

  • @urmilajagtap2798
    @urmilajagtap27985 ай бұрын

    खूप छान!👌

  • @medhavighne3896
    @medhavighne38962 жыл бұрын

    Khup ch Sundar

  • @rasikahinge2630
    @rasikahinge26302 жыл бұрын

    माझ्या आवडत्या लेखिका कवयित्री खूप छान आवडती कविता

  • @avantikote
    @avantikote2 жыл бұрын

    ही माझीही अत्यंत आवडती कविता आहे..thank you so much स्पृहा!! संदीप खरे यांची मैत्रीण ही कविता वाच ना ग..

  • @bhanudassakhare8788
    @bhanudassakhare87882 жыл бұрын

    खूपच सुंदर आहे

  • @madhavjagdambe631
    @madhavjagdambe631 Жыл бұрын

    अप्रतिम सादरीकरण...

  • @neelajoshi1617
    @neelajoshi16174 ай бұрын

    खूप छान.

  • @swatideshpande5041
    @swatideshpande50412 жыл бұрын

    अरूणाताई च्या कविता तर सुंदर आहेत 🙏🙏तुझे सादरीकरण पण छानच👌👌

  • @rajeshreepawar918
    @rajeshreepawar91810 ай бұрын

    Khup Sundar khup Chan ahe tai❤❤❤

  • @SurekhaJawake
    @SurekhaJawake2 ай бұрын

    Khup channn. ❤

  • @user-ju3jq4vx3j
    @user-ju3jq4vx3j9 ай бұрын

    ❤ शब्द मनाचा ठाव घेतात.. 👍सर्वोत्तम सादरीकरण..

  • @geetakashikar722
    @geetakashikar7222 жыл бұрын

    मस्त कविता माझ्या मना बन दगड ही कविता ऐकायला आवडेल

  • @anjaligawai6215
    @anjaligawai6215 Жыл бұрын

    खूप सुंदर मी ही कविता करते माझी ही इच्छा आहे माझी कविता तुझ्या आवाजात एकावी स्पृहा ,, मी तुझी फॅन आहे मला तुझ बोलण दिसण हसण खूप खूप आवडत

  • @smitamahulkarhatekar8650
    @smitamahulkarhatekar8650 Жыл бұрын

    खूप सुंदर..... 👌👌👌

  • @rekhamainde5077
    @rekhamainde5077 Жыл бұрын

    Apratim Kavita 💖😍👌👌

  • @saurabhkshirsagar7302
    @saurabhkshirsagar73022 жыл бұрын

    माझ्या मित्रा खुप सुंदर कविता अरुणाताईंची आणि उत्तम रितीने सादरीकरण👌केले ताई तुम्ही

  • @samruddhikadam2038
    @samruddhikadam203811 ай бұрын

    😊😊👌👌💐 अप्रतिम, तुझे सादरीकरण खूप खूप खूप छान... अर्थ पूर्ण कविता....👍👌😊💐

  • @vedikashirbhate1632
    @vedikashirbhate16322 жыл бұрын

    Khup sundar ,ajun Aruna tai chya kavita sanga❤️❤️

  • @pratibhayadav8711
    @pratibhayadav87112 жыл бұрын

    कवी कुसुमाग्रज ...पृथ्वीचे प्रेमगीत कवीता

  • @pratikshagawai6186
    @pratikshagawai6186 Жыл бұрын

    अप्रतिम मांडलय मैत्रीचं सौंदर्य ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @rajendradongare8322
    @rajendradongare83222 жыл бұрын

    Khup sunder..touchy

  • @sagarmachale173
    @sagarmachale1732 жыл бұрын

    खूप छान कविता आणि सादरीकरण..... ❤️

Келесі