Periods: Educating Men |Khuspus with Omkar |Dr. Pallavi Patil, Harminder Kaur| Marathi Podcast

'Periods' हा अत्त्यंत सोप्पा शब्द पण तो तेवढ्याच सोप्प्यापणे उच्चारला जातो का?
मासिक पाळी मधले त्रास आणि प्रक्रिया पुरुषांना कोणी समजावून सांगतं का?
Periods हे खूप नैसर्गिक आहे. त्या बद्दलचा संकोच न बाळगता जर आपण संवाद साधला तर स्त्रीया ज्या मानसिक आणि शारीरिक बदलांमधून जातात त्यात पुरुष त्यांची मदत करू शकतील का?
'खुसपुस' च्या या चौथ्या भागात डॉ पल्लवी पाटील-जगताप, MD Gynaecologist आणि हरमिंदर कौर चिमा, Menstrual health educator at Spherule Foundation यांच्या सोबत अश्याच काही 'Periods पुरुषांना समजावून सांगताना' या संबंधित विचारांवर चर्चा केली आहे .
‘Periods’ are vaguely understood and strongly stigmatised. It is a natural cycle through which a woman goes but then why is it forced to keep it a secret? Because of this very reason, how much do men even know about menstruation? In this fourth episode of ‘Khuspus’ we have discussed these ideas about ‘Periods’ with Dr. Pallavi Patil-Jagtap, MD Gynaecologist and Harminder Kaur Cheema, Menstrual health educator at Spherule Foundation.
Credits:
Host: Omkar Jadhav
Guests: Dr. Pallavi Patil-Jagtap, Harminder Kaur Cheema
Editor: Tanwee Paranjape
Creative Producer: Shardul Kadam
Interns: Rutuja Waikar, Sohan Mane
Spotify: open.spotify.com/episode/3374...
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: open.spotify.com/show/3MyS1fZ...
#AmukTamuk #MarathiPodcasts #periods
Chapters
00:00 - Introduction
4:00 - Misconceptions and myths about periods
5:45 - Terms used instead of periods
6:45 - Period taboos around the world
8:46 - Basic physiology of periods
15:00 - Period pain and PMS
17:05 - How can men help women during periods?
18:46 - Period products & its disposal
25:48 - Hygiene and health practices
28:35 - Periods conversation
33:55 - Adverse effect on education and confidence
35:04 - Difference between Urban and rural approach
36:38 - Period leaves
38:39 - Hypocrisy of this stigma
39:48 - Menopause
44:58 - Effects of altering periods through medicines

Пікірлер: 179

  • @deeptiedanni
    @deeptiedanni Жыл бұрын

    मी माझ्या मुलीला हे पण सांगितलं आहे की तिच्या school bag मधे at least 3 pads असायला पाहिजे. आपली पाळी नसली तरी आपल्या मैत्रिणीला देता येईल. अश्या वेळी स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या कामी यायला पाहिजे हा माझ्या उद्देश्य आहे.

  • @prajaktakadkol796
    @prajaktakadkol796 Жыл бұрын

    खुसपुसत बोलायचा विषय मोकळे पणाने बोलल्या बद्दल छान वाटले. छान होता episode. असच पुढचा विषय post partum depression किंवा delivery/ प्रसूती नंतर येणारे नैराश्य ह्या वरती ऐकायला आवडेल.

  • @neetamane5646
    @neetamane5646 Жыл бұрын

    पूर्वीच्या काळात बायकांना आराम मिळावा यासाठी बाजुला बसविण्यात येत होते आणि बाहेर पडु देत नसतं कारण बाहेर जंगली जनावरांने रक्ताच्या वासाने त्या बाईवर हमला करु नये ही त्या मागील कारणे होती. त्या बाईला आराम मिळावा हीच कारण होती.

  • @smitak8675

    @smitak8675

    Жыл бұрын

    आराम नुसता बोलायला...उलट गोधड्या घरातले मोठे भांडे धुवायला द्यायचे

  • @ks-pm7ei

    @ks-pm7ei

    Жыл бұрын

    pahilyanda konala tri khar reason samjaly....👌👍

  • @pallavigokhale5536

    @pallavigokhale5536

    Жыл бұрын

    त्या दिवसात ओळखीच्या किंवा भटक्या कुत्र्यांपासून दूर रहावे. आजूबाजूच्या माणसांना कळले नाही तरी त्यांना कळते. 😂

  • @seemagauri

    @seemagauri

    Жыл бұрын

    Purvi je hota, te hota..let's not glorify that.. We have to normalise periods. As it's natural process

  • @nitee2100

    @nitee2100

    Жыл бұрын

    Aani tyana shila khayla tyanchya haatatla kahihi na ghena sarva bai la aaram milava right!? Kahihi!! Stop glorifying veiled abuse

  • @user-pg4wj2dz3q
    @user-pg4wj2dz3q Жыл бұрын

    I have to appreciate omkar❤ त्याने खरचं खूप छान विषय हाताळला very very well done omkar 😊

  • @poonambagmar772
    @poonambagmar772 Жыл бұрын

    " खुसपुस " इतकं समर्पक नाव आहे शोच . खुप छान पद्धतीनी या विषयावर चर्चा झाली . ओमकार & टीम खूप छान काम करता आहात .

  • @user-ms4wf5cf4k
    @user-ms4wf5cf4k Жыл бұрын

    खूपच छान विषय घेतलात. मस्त झाली चर्चा पाळीचा आणि देवाचा काहीच संबंध नाही या विषयावर पण एक चर्चा घ्या. पूर्वीच्या काळी पाणी कमी असायचे, टॉयलेट्स घराच्या बाहेर किंवा उघड्यावर असायचे pads नवते. यामुळे स्वच्छता पण नसायची. तसेच बायकांना या काळात त्रास होतो. त्यांना आरामाची गरज असते. हे घरातल्या पुरुषांना सरळ सांगून कळलं नसत म्हणून त्यांचा संबंध देवाशी जोडला गेला. पूर्वी प्रमाणे आता बायकाना घराच्या बाहेर बसवले जात नाही त्यात आपण पुढरलो, पण देवाशी संबंध मात्र अजूनही तसाचं आहे. त्यामुळे पूजा, गणपती आले की गोळ्या घेऊन पाळी पुढ नेली जाते. ज्याचा त्यांच्या health वर परिनाम होतो. आपण शिकलो आहोत पण आपण अजूनही ते आचरणात आणत नाही. अगदी डॉक्टर्स ना पण हे माहित असूनही घरात चालत नाही म्हणून पाळतात. हे अतिशय चूकीच आहे. माझी आजी चौथी पर्यंत शिकली होती. तिच वाचन खूप होत. तीने चाळीत राहत असल्याने सर्व काही पाळलं. तिला 4 मुलगे. पण माझी आई लग्न होऊन त्यांच्या घरात गेली तर तिने माझ्या आईला सांगितलं की याचा देवाशी काहीही संबंध नाही. तु पाळायच नाहीस. माझ्या आईने पण मला हेच शिकवलं. मी तर किती तरी वेळेस गणपतीच्या बाजूला बसून त्याला हात लावून विसर्जन केलय. काहीही होत नाहीत. आपण या अंधश्रद्धेतून बाहेर यायची गरज आहे.

  • @suchetasharma3648

    @suchetasharma3648

    3 ай бұрын

    Agadi barobar me suddha asa sagla kelay

  • @pralhadjoshi7183
    @pralhadjoshi71834 ай бұрын

    मला यामधे एवढंच समजत की आपण भारतीय रूढी परंपरा म्हणतो पण या पाळी किवा पिरियड या विषयावरील परिसंवादात जूणी लोक आहेत त्यांना त्याचा काय मत आहेत किवा ते जूनी लोक शब्द वापरत असताना संकोच किवा त्याचातला अजानतेपणा नाही पण माहीती मधील अमाहीती समजूण दिला तर खुपच सुंदर.

  • @sadhanasandeepgurav4513
    @sadhanasandeepgurav4513 Жыл бұрын

    मासिक पाळी संदर्भात खूप उत्तम मार्गदर्शन झालं आज... मार्गदर्शक उत्तम असेल तर योग्य ज्ञान मिळते...thank you ❤ Omkar ❤ इतक्या छान topic साठी ☺️

  • @vedaredkar8183
    @vedaredkar818310 ай бұрын

    अतिशय उत्तम आणि खरच मोकळेपणाने बोलण्याची गरज असलेला विषय होता. 👌👌ओमकार तुझ खूप कौतुक वाटलं मला खरच खूप मोकळेपणाने तू ही मुलाखत घेतली. 🎉😊

  • @malatisonwane1294
    @malatisonwane1294 Жыл бұрын

    इतक्या महात्वाच्या विषयावर खुसपुस केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण खूप छान मत मांडले मी जुन्या पद्धतीच्या सर्व अडचणींना सामोरी गेली आहे समज गैरसमज आणि त्यातून होणारी घुसमट. काळ बदलला तरीही अश्या विषयावर आजही बायका बायका एकत्र असल्या तरी चर्चा करत नाही हे मी स्वतः अनुभवले आहे😃😃. मला असे वाटते की अश्या विषयांवर वारंवार चर्चा करायला हवी. खूप खूप छान विषय🙏🏻🙏🏻 पुरुषांनी घरातील कामे नुसते period आल्यावरच नाही तर इतर वेळी पण करायला हवे कारण आज बायका कोणत्याच क्षेत्रात कमी नाही पण तरीही घरातील काम हे बायकांची असतात असे स्वतःच ठवरून मोकळे होतात. त्या स्त्री ची तारेवरची कसरत कधी थांबणार ही मानसिकता कधी बदलणार. किती बायका अश्या आहेत ज्या उच्चशिक्षित असून,त्यांच्याकडे स्वतःच्या क्षेत्रात नाव कमवू शकतात काही करू शकतात पण अश्या गोष्टींमुळे ती मागे राहिली. तिने तिचे करिअर संपवते. लग्न झाल्यानंतर जर तिला काम करायचे असेल तर first priority घराला द्यावा लागेल मग कामाला असे सांगितले जाते तीच अट पुरुषाला का नसते. तो त्या स्त्री च्या भरोश्यावर त्याच्या कॅरियर ला 100% देवू शकतो पण स्त्रियांना हे करता येत नाही ती प्रत्येक कामात विभागली जाते. जबाबदारी,रूढी, परंपरा या फक्त बायकांसाठी का? जर आपल्याला शक्य झाले तर आपण या विषयावर चर्चा करावी. हा पण विषय खुप महत्वाचा आहे.

  • @sunilindulkar4040
    @sunilindulkar4040 Жыл бұрын

    ओमकार साहेब तुम्ही जे वेगवेगळे विषय घेताय, त्याबद्दल तुम्हांला धन्यवाद! माझ्या पाळीविषयी असणाऱ्या अंधश्रद्धा माझ्या मुलींमुळे दूर झाल्या. माझ्या आईचा त्याला सुरुवातीला विरोध होता, पण तिला हळू हळू समजाऊन, तिच्या मनातले पाळीविषयीचे बरेचसे गैरसमज आम्हीं दूर करू शकलो. विषय सहज आणि सोपा करून सांगितला. धन्यवाद! खुसपुस टीम..

  • @rajashridamle6369
    @rajashridamle6369 Жыл бұрын

    Please call waste pickers...to know how they segrigate such waste. Congratulations for such topics. All the best.

  • @anjalipawar7255
    @anjalipawar725510 ай бұрын

    आजकाल सगळ्याना या बद्दल माहिती आहे ,,, कोणी लाजत वगैरे नाही बसत आता सांगताना ,,सध्या ची पिढी तेवढी ह्याबतीत अडाणी नाही आहे,, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींनी पॅड वापरन सोडून कप वापरणे सुरू करा ही अतिशय नम्र विनंती ,,,👍👍👍

  • @rutujahardas5454
    @rutujahardas5454 Жыл бұрын

    Another much needed topic !!! You are handling all the very delicate topics without any bias and judgements ...this is the real india we need for women !! The real meaning of feminism!!

  • @amuktamuk

    @amuktamuk

    Жыл бұрын

    ❤️

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari11 ай бұрын

    This is the best content ever.आजकाल यु ट्यूब म्हणजे गटार झालं आहे😅😂 पण असे दर्जेदार विषय मांडणारे चॅनेल हे you tube चा खरा फायदा आहे🎉🎉🎉 ग्रेट कन्टेन्टस. माझा मुलगा आता 13 वर्षाचा आहे आणी त्याला मला हे आता सांगायचं आहे.खूप मदत होईल या कन्टेन्ट ची.खूप आभार

  • @amuktamuk

    @amuktamuk

    11 ай бұрын

    खूप खूप आभार! लोभ असुद्या 🙏🏻

  • @neetamane5646
    @neetamane5646 Жыл бұрын

    खुप छान विषय हाताळला आहे आपण यामुळे समाजात जागृती करणे गरजेचे आहे

  • @kanchanm0407
    @kanchanm0407 Жыл бұрын

    Khupch important topic .....thanks omkar nd team❤

  • @vrushalipawar4574
    @vrushalipawar4574 Жыл бұрын

    खूपच छान मांडला हा विषय.आज ही आपण पाळी हा विषय कानात खुसपुस करतोय 😢पण आता वाटतय तुम्ही केलेली खुसपुस ऐकून कमीत कमी महिला वर्ग तरी ह्यावर खुसपुस करणार नाही बिनधास्त बोलतील.

  • @pajoshi70
    @pajoshi70 Жыл бұрын

    Khup chhaan discussion! Please interview experts who can talk about infertility and society's way of looking at such couples!

  • @madhuripatil2323
    @madhuripatil2323 Жыл бұрын

    इतक्या सुंदर व्हिडिओला एवढेसे views....आणि फाल्तू व्हिडीओझना लाखो views....हीच शोकांतिका.....खुसपूस टीमचे आभार....इतका चांगला विषय निवडलात.

  • @aryaapatil8046
    @aryaapatil8046 Жыл бұрын

    Khuup kmaal jhala ep...tumi je je topics cover kele te atyant mahatvache hote...doni guests pn knowlegeble shodhun anlet he disun ala..also host cha research and hw pn jhalela hota...asa nahi ki bolaychy mhanun uchalla topic... Overall much needed discussion beautifully presented Keep it up👏👏

  • @archanasagare6806
    @archanasagare6806 Жыл бұрын

    Omkar u r doing amazing job.. nice topic..

  • @prathameshjadhav829
    @prathameshjadhav829 Жыл бұрын

    What a great great episode!!! एवढा progressive topic आहे हा, तुम्ही खरंच सुंदररित्या हाताळला!!!

  • @archanachaugule3399
    @archanachaugule3399 Жыл бұрын

    Hi Amol, it's nice subject you have taken. Every boy should know this.

  • @artibiramane1671
    @artibiramane1671 Жыл бұрын

    खूप छान विषय मांडलय.अजून असे खूप विषय आहेत त्यावरती ही नकीच संवाद होऊ द्या.

  • @boradeatharv
    @boradeatharv Жыл бұрын

    Otherwise as always the guests were awesome and topic was unique as well ❤

  • @SourabhMakhare
    @SourabhMakhare5 ай бұрын

    अतिशय चांगला आहे हा podcast... जसं मुलींच्या periods बद्दल किंवा वयात येणाऱ्या मुलीनं बद्दल बोललं जातंय.. तसा एक podcast "मुलं (boys) वयात येताना" "मुलांची पौगंडावस्थेतील पदार्पण"या विषयावर पण घ्या.. त्या बद्दल कोणीच बोलत नाही... माझी ही विनंती आहे की या विषयावर एक episode करा हा देखील "खुस पुस"त बोलण्यात येणार विषय आहे...

  • @siddhisurve1957
    @siddhisurve1957 Жыл бұрын

    पूर्ण एपिसोड पाहिला मी.... इतकं basic सुद्धा आपल्याकडे बोललं जात नाही... परंतु अजूनही बरच काही सांगण्यासारख होतं यात... पुरुषांना करण्यासारखं बरच आहे आजुन.. १) तिची मानसिकता समजून घेणे सगळ्यात महत्त्वाचे.. २) साधं "ये तुला डोक्याला massage करून देतो" हे सुद्धा शब्द या दिवसात अमृतासारखे वाटतात.. ३) तिला त्रास होत असेल तर प्रवास शक्यतो टाळावा ४) पोटात दुखत असेल तर गरम पाण्याच्या पिशविने शेकवल की आराम वाटतो.. पण एखाद वेळेस ती पिशवी तुम्ही न मागता भरून दिलीत तर चॉकलेट आणि फुलं देण्याची गरज ही पडणार नाही.. थोडक्यात काय तर तुम्ही आजारी पडल्यावर ती स्त्री जशी तुमची काळजी घेते.. तशी तिची विचारपूस करा आणि "काळजी घ्या"..

  • @sonalkadam9308

    @sonalkadam9308

    Жыл бұрын

    खूप च छान explain केले तुम्ही ...❤❤

  • @amuktamuk

    @amuktamuk

    Жыл бұрын

    Good suggestions.

  • @prachibhat4749
    @prachibhat4749 Жыл бұрын

    You guys are doing an amazing job! Brilliant topics everytime. Loved the conversation and the questions asked. All the best for getting more and more interesting topics.

  • @amuktamuk

    @amuktamuk

    Жыл бұрын

    Thank you 🙏

  • @vidyasawant2763
    @vidyasawant2763 Жыл бұрын

    Really nice informational interview🙏 Great job

  • @shrutiK12312
    @shrutiK12312 Жыл бұрын

    विषय खूप छान हाताळलाय. दोन्ही guests खूप छान बोलल्या. याविषयावर अजून चर्चा व्हायायला हवी. तसेच पेरिऑड्स मध्ये खूप त्रास होतो, पाय, पोट ,अंग दुखतच असं म्हणून अनेक मुली आणि स्त्रिया दुर्लक्ष करतात, आणि सहन करतात, हा दृष्टिकोन हि बदलायला हवाय. अति दुखणं हे कधी कधी एखाद्या आजारामुळे असू शकतं, पण हे दुर्लक्षित होतं. मुलींना/ स्त्रियांना स्त्रीरोग तज्ज्ञांकडे फक्त गर्भधारणा झाल्यावरच जावं लागतं असा अनेक पुरुषच नाही तर अनेक स्त्रियांचा हि समाज आहे. हा हि बदल होणं गरजेचं आहे. तसेच periods मध्ये इकडे हात लावू नको, इकडे बसू नको हे आयांनी आपल्या मुलींना करणं बंद केलं तर एकुणात taboo कमी व्हायला मदत होईल. Periods policies असणं हे खूप महत्वाचा आणि स्वागतार्ह्य आहे पण अनेक कंपन्या ते करू इच्छित नाहीत कारण त्याचा इम्पलेमेंटेशन करणं अवघड आहे. त्यांना भीती वाटते कि काही स्त्रिया याचा गैरफायदा घेऊन उगीच सुट्ट्या घेतील, हे होणारच नाही असं नाही पण त्यामुळे हे इंपेलमेण्ट होत नाही. अजून एक निरीक्षण म्हणजे कंमेंट सेकशन मध्ये अल्मोस्ट सगळ्या कंमेंट्स स्त्रियांच्याच आहेत.

  • @amuktamuk

    @amuktamuk

    Жыл бұрын

    श्रुती धन्यवाद. हा विषय खूपच मोठा असल्यमुळे आम्ही फक्त पुरुषांना समजावून सांगण हा हेतू आत्ता साध्य करायचा प्रयत्न केला. पुढील एपिसोड मध्ये नक्कीच स्त्रीयांना अजुन detail मध्ये माहिती मिळेल असा प्रयत्न करू.

  • @shrutiK12312

    @shrutiK12312

    Жыл бұрын

    धन्यवाद 😊

  • @tusharsutar1857
    @tusharsutar185711 ай бұрын

    खूप चांगला विषय निवडला आहे... Keep it up...

  • @dailyitmforecast
    @dailyitmforecast Жыл бұрын

    Khup chan vishay ghetlay.. thanks marathi manasane yavr knowlegde diley 😊

  • @kaangoshty
    @kaangoshty Жыл бұрын

    तुमचे खुसपुसचे सगळेच पॉडकास्ट छान आहे 👌👌मी तुमची नियमित प्रेक्षक आहे. छान विषय आहेत. तुमचा over parenting चा पॉडकास्ट मला फारच भावला भुषण शुक्ला सरांसोबत आणखी एखाद्या नवीन विषयावरचा पॉडकास्ट ऐकायला बघायला आवडेल

  • @shwetavarade334
    @shwetavarade334 Жыл бұрын

    Kharach khup yogya topic nivadlat tumhi.... thank you

  • @drneetakulkarni4244
    @drneetakulkarni42448 ай бұрын

    खूप छान.. posrpartum depression, न्यूनगंड या विषयांवर नक्की episode करावेत.. we would love to hear Dr Bhushan Shukla more... Best wishes

  • @kalpanakhandalkar6590
    @kalpanakhandalkar6590 Жыл бұрын

    Khup important mahiti dili tya sathi thanks🎉

  • @aradhy528
    @aradhy5289 ай бұрын

    खुप छान विषय यासारखे कार्यक्रम सर्व श्रियानी पाहायला हवेत आणि forward पण करावेत म्हणजे सहज discuss होतील आणि घरातील पालक व इतर सदस्य सहज ह्या विषयावर बोलतील आणि या काळात तरी तिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या समजवून घेतील.v पुरुषांनाही तिचा respect वाटेल.घरातूनच सन्मान देण्यात सुरवात होईल.सर्वाचे आभार.उत्तम कार्यक्रम

  • @mayuripathak3799
    @mayuripathak3799 Жыл бұрын

    Really great talk about period

  • @vrundapatil2854
    @vrundapatil28549 ай бұрын

    Khup chan topic ani discussion 👍

  • @neetajadhav757
    @neetajadhav75710 ай бұрын

    Kup chan vishay...khi lokani yavar kuspushi keli nasel etak moklepane gappa zalya .great Omkar..ajun kup vishay eikayala avdtil ...

  • @amrutawani7554
    @amrutawani7554 Жыл бұрын

    Khup chan series ahe hi.. keep it up.

  • @AjaySatpute27
    @AjaySatpute27 Жыл бұрын

    Omkar - very insightful episode. Thanks for doing this. I hope jastit jasta lokan paryanta he dnyan pochel ani sagle myths modun nightil.

  • @OmkarJadhav09

    @OmkarJadhav09

    Жыл бұрын

    Thank you!

  • @komalkalambe7276
    @komalkalambe727611 ай бұрын

    Good topic..Increased knowledge..

  • @archrainbow
    @archrainbow Жыл бұрын

    खुप छान विषय हाताळला आहे 👏🏻👏🏻

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Жыл бұрын

    Tumhi far changale vishay nivadata mulakhati sathi. 🙏 Mi aavarjun pahate. Faar chan👍

  • @amuktamuk

    @amuktamuk

    Жыл бұрын

    Thank you ❤

  • @tejaswisalunkhe2345
    @tejaswisalunkhe2345 Жыл бұрын

    Great Work.....Respect ....discussion on Infertility and treatment please.

  • @user-pl8gw3dw1w
    @user-pl8gw3dw1w Жыл бұрын

    Khupach changla vishay mandlat... Khup garaj hoti ya vishayavar bolanyachi... 🙏🙏

  • @amuktamuk

    @amuktamuk

    Жыл бұрын

    ❤️

  • @gayatrikadam3825
    @gayatrikadam3825 Жыл бұрын

    Khupch chhan vishay madala ahe

  • @meshakgurram2879
    @meshakgurram28798 ай бұрын

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @simmischannel4554
    @simmischannel4554 Жыл бұрын

    Khupach changla ani imp vishay ghetla tumhi. Very informative. Good job

  • @amuktamuk

    @amuktamuk

    Жыл бұрын

    ❤️

  • @tejashreejoglekar5361
    @tejashreejoglekar536110 ай бұрын

    Thank you so much. मी एका १० वर्षाच्या मुलाची आणि १४ वर्षाच्या मुलीची आई आहे . मुलीशी मी सहज बोलले पाळी बद्दल . पण मुलाशी कसं आणि काय बोलाव कळत नव्हतं . अगदी लगेच नाही पण 2-3 वर्षात त्याच्याशी बोललं पाहिजे असं मला वाटत होतं . पण आता मात्र मला अंदाज आला की त्याला कळेल असं वयानुरूप कसं समजावायच . Great Going keep it up

  • @neetakeer150
    @neetakeer1509 ай бұрын

    Khup mahatvacha vishy ghetla thanks

  • @manasisawant744
    @manasisawant744 Жыл бұрын

    Khup chan vishay

  • @poojapethe6213
    @poojapethe6213 Жыл бұрын

    Hey ek open secret aahe. Pan aata, ladies khup open up hotat. Khupach changala upakram aahe aapla. Thankyou!🙏😊

  • @tanujapatil7604
    @tanujapatil7604 Жыл бұрын

    Khooop chaan episode… 🎉🎉

  • @priyankamore1975
    @priyankamore19759 ай бұрын

    Good topic and good discussion🎉 Please make video on waste management and pollution control

  • @sangeetatipale7707
    @sangeetatipale7707 Жыл бұрын

    नमस्कार ओंकार सर पुश पुश चे सर्व एपिसोड न चुकता बघते प्रत्येक विषयावर खूप छान तज्ञ डॉक्टर माहिती देत आहेत त्यासाठी त्या वक्त्यांचे आणि तुमचे खूप आभार मला एक विषय तुम्हाला सुचवा असा वाटतो बाळ होण्यासाठी ज्या काही ट्रीटमेंट घ्यायला लागतात त्यावेळेस त्या महिलेला आणि तिच्या पतीला कसे पुढे गेले पाहिजे आणि इतरांनी कसे सहकार्य केले पाहिजे

  • @krunalikamble473
    @krunalikamble473 Жыл бұрын

    Khop Sundar vishay a var charcha

  • @sarikaghorpade8176
    @sarikaghorpade8176 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली

  • @sushmajoshi6235
    @sushmajoshi623510 ай бұрын

    Khup uttam charcha zhali

  • @kokanmeva8760
    @kokanmeva87607 ай бұрын

    आत्ताच मी माझ्या फेसबुक वॉलवर तुमच्या या चॅनल बद्दल लिहिलय. मनापासून आवडलेली गोष्ट जास्त लोकांपर्यंत पीचावी हाच उद्देश.

  • @diary7083
    @diary7083Ай бұрын

    Hello 🤗 खूप छान विषय होता की periods mhnje kay Ani tyavrti चर्चा काल मैत्रिणीसोबत याबाबत थोडी चर्चा झाली की periods madhe kay hot normally discussion zal aani aaj mla vatl ki aapn janun ghyayla पाहिजे की काय असत तर हा व्हिडिओ सापडला खूप छान माहिती भेटली thank you 😊

  • @pragatikaranjkar4371
    @pragatikaranjkar4371 Жыл бұрын

    छान विषय.असं वाटलं आमच्या वेळेस इतकं मोकळं बोलतच नव्हते.म्हणून बरं वाटलं.

  • @vandanapatil2050
    @vandanapatil2050 Жыл бұрын

    Khup chan👌👌👍👍

  • @geetanjalikamble2245
    @geetanjalikamble22457 ай бұрын

    I heard this video now... Related to this, Menopause is also a important topic need to discuss.. about this family members need to understand.

  • @kavitaghate1657
    @kavitaghate1657 Жыл бұрын

    Thanks........❤

  • @vaishalikale5589
    @vaishalikale55898 ай бұрын

    छान विषय मांडला आहे

  • @madhumitachaudhary9550
    @madhumitachaudhary95508 ай бұрын

    A separate session on use of Menstrual Cups should be by helpful. There is a lack of awareness and some myths associated that it breaks the hymen, it might get stuck, etc. I have been using a menstrual cup for a long time and it’s super easy, comfy and environmentally friendly.

  • @srushtibhagwat2545
    @srushtibhagwat25456 күн бұрын

    Great Episode ❤

  • @revatikharde1953
    @revatikharde1953 Жыл бұрын

    Such an underrated topic for the discussion! Loved the conversation and the type of questions asked by Omkar. I will surely share this video with my friends especially male friends. Keep bringing these kinds of topics for discussion.

  • @OmkarJadhav09

    @OmkarJadhav09

    Жыл бұрын

    Thank you!

  • @actualangel5133

    @actualangel5133

    Жыл бұрын

    Yes… this was a very relevant topic… I was surprised that even now, mothers don’t tell their their daughters about it or how to maintain hygiene during the periods…

  • @capritidoke-jadhav5205

    @capritidoke-jadhav5205

    Жыл бұрын

    Very informative.. This really need to reach a larger audience. Omkar handled the discussion very well. 👍 Pls do "खुसपूस" about more and more versatile topics.

  • @kirankerakal5856
    @kirankerakal5856 Жыл бұрын

    Khup chhan

  • @makrandpatil-hl1iw
    @makrandpatil-hl1iw Жыл бұрын

    Chan mahiti dilit

  • @ayushkharmale8207
    @ayushkharmale8207 Жыл бұрын

    खूप छान नाव. विषय खूप सुंदर. माहिती खूप छान सांगितली.Pcod वर एक एपिसोड कर.

  • @mayurghag4581
    @mayurghag4581 Жыл бұрын

    Great 👍

  • @arunvaidya8736
    @arunvaidya8736 Жыл бұрын

    Menopause symptoms for those where is ultras is removed due to medical issue. Overall discussion was really good and appreciating your drive.

  • @kkkrazysparks

    @kkkrazysparks

    11 ай бұрын

    It's Uterus 😊.

  • @pratikdeshpande11
    @pratikdeshpande11 Жыл бұрын

    And that’s what you call a good topic and a discussion 🫡

  • @seethaswaminathan517
    @seethaswaminathan517 Жыл бұрын

    Very true..drinks r more openly sold than pads

  • @user-se1em7si2t
    @user-se1em7si2t5 ай бұрын

    Nice topic

  • @anupamaalavekar2296
    @anupamaalavekar2296 Жыл бұрын

    नमस्कार, मी तुमचे कार्यक्रम अलिकडेच पाहायला सुरुवात केली. खुसपुसचे काही भाग पाहिले. मला ते खूप आवडले. नविन माहितीही मिळाली. खूप खूप अभिनंदन🎉🎊. विशेष अभिनंदन यासाठी की तुम्ही विषयानुसार आमंत्रित केलेले तज्ञ खूप योग्य आहेत

  • @amuktamuk

    @amuktamuk

    Жыл бұрын

    धन्यवाद!

  • @zjingostani3653
    @zjingostani3653 Жыл бұрын

    Super Episode!

  • @amuktamuk

    @amuktamuk

    Жыл бұрын

    ❤️

  • @user-yd8ih1hi3o
    @user-yd8ih1hi3o Жыл бұрын

    आपण खुप छान विषय घेतला धन्यवाद

  • @gayatripendse4669

    @gayatripendse4669

    Жыл бұрын

    ओमकार आणि टीमला खूप धन्यवाद व शुभेच्छा

  • @shwetadhatunde2855
    @shwetadhatunde2855 Жыл бұрын

    Khup mst

  • @sprabhuuniquekids4327
    @sprabhuuniquekids43277 ай бұрын

    Khup chaan

  • @anuyachandratre1476
    @anuyachandratre1476 Жыл бұрын

    Bold naslela pan ugachach tyala bold karun thewlela ha vishay asun tya baddal uttam paddhatine eye opener dilay baddal khoop khoop abhar... Best host, best guests and brilliant topics... All d very best...and keep on coming with such topics... 🎉🎉

  • @suvidhapatil4971
    @suvidhapatil49716 ай бұрын

    Navin lagn jhalel couple ani aai vadilancha ati jast hastkshep tyamule honare vaad hyavr ek topic

  • @pranalimhatre6492
    @pranalimhatre6492 Жыл бұрын

    Next interview on healthy husband wife relationship

  • @harshadahande1409
    @harshadahande1409 Жыл бұрын

    yes postpartum depression vrti pn chqrcha aikyla aavdel karn bal zalynntr balachya aai kde far durlksha hot n people take granted for her

  • @2611Pranita
    @2611Pranita10 ай бұрын

    Cover some problems like pcos and pcod too

  • @user-tm6ij3ye1z
    @user-tm6ij3ye1z Жыл бұрын

    अतिशय अतिशय महत्त्वपूर्ण विषय.... 🙏🙏 Depression हा विषय घ्यावा pls...

  • @amuktamuk

    @amuktamuk

    Жыл бұрын

    Nakkich.

  • @shubhangigorhe9785
    @shubhangigorhe9785 Жыл бұрын

    Nice topic. He podcast jast mulani bghav asa vatat karan asehi kahi mil ahet te office madhe vaigare hya ghoshit varun hastat.

  • @amuktamuk

    @amuktamuk

    Жыл бұрын

    ❤️

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Жыл бұрын

    कोणत्या वयापासून नियमित दरवर्षी gynaecologist कडे जाऊन routine checkup करायला पाहिजे आणि तेव्हा कोणकोणत्या tests करायला पाहिजे हे सांगावे. शक्य असल्यास medical health checkup यावर आधारित एक एपिसोड करा महिला आणि पुरुष दोघांसाठी. या podcast चा विषय खुप महत्वाचा होता आणि खुप छान चर्चा घडवून आणली.

  • @amuktamuk

    @amuktamuk

    Жыл бұрын

    Nakkich

  • @apurvajoshi6281
    @apurvajoshi6281 Жыл бұрын

    Suggestion for new topic - June yetoy tar LGBTQ+ ya wishayawar aikayla awadel.

  • @chirag.g.6278
    @chirag.g.6278 Жыл бұрын

    👏🧡

  • @sweetswatshorts
    @sweetswatshorts21 күн бұрын

    Periods pain कमी होणे काय remedy,too much pain ,what may be reason, menopausal pain bleeding what remedy suggest pls

  • @varshaclicks9268
    @varshaclicks9268 Жыл бұрын

    Hello kahi goshti sangitkya jatat tyatli ek gosht kahi lok sangtat ki first day kes dhutale gele pahijet means heat aste ti nighun jate.. kahi sangtat ki after 3 days of pali kes wash kele pahijet nahitar blood circulation wrong way hota tar nemka kay ahe scientific reason?Ani kay kela pahije

  • @sagardumane6982
    @sagardumane698211 ай бұрын

    pan periods leaves ya provision cha barech jan misuse sudha hou shakto karan ki ya thikane tumhal kontyach prakarch medical certificate show karnyachi garaj naste tar asha veles ekhadi la leave chi actual madhe garaj nastan hi leave milu shakte.ya baddal apla kay mat ahe.

  • @jagdishnyayadhish7232
    @jagdishnyayadhish72326 ай бұрын

    ❤❤❤

  • @anujadhariya4159
    @anujadhariya4159 Жыл бұрын

    मुलींना त्या वयात म्हणजे पाळी यायच्या वयात या सर्वाची माहिती कशी द्यावी यासाठी काही सेशन अरेंज करु शकता का? किंवा या आधी झाले असेल तर link देऊ शकता का?

  • @shivanijadhav1118
    @shivanijadhav11188 ай бұрын

    कितीही चर्चा करा समाज सुधारणार नाही

Келесі