MPSC विद्यार्थी ते एक यशस्वी उद्योजक व लेखक | Sharad Tandale Success Story | sharad tandale

वंजारवाडी (जिल्हा बीड) ते लंडन व्हाया पुणे हा प्रवास आहे शरद उत्तमराव तांदळे या तरुण उद्योजकाचा आणि अर्थातच, हा प्रवास आहे एका यशोकथेचा. वंजारवाडी या छोट्याशा गावातून सुरुवात करून, पुण्यासारख्या ठिकाणी येऊन धडपडत, कष्ट करत, अडचणींना सामोरे जात उद्योजक बनलेल्या शरद तांदळे यांच्या यशावर मोहोर उमटली ती इंग्लंडचे युवराज प्रिन्स चार्ल्स यांच्याकडून. त्यांच्या हस्ते शरद यांना लंडनमध्ये तरुण उद्योजकतेचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाला तेव्हा ते छत्तीस वर्षांचे होते आणि साल होते 2016. शरद यांच्या उद्योजकतेच्या प्रवासातील तो उत्कंठावर्धक क्षण.
शरद यांचे वडील उत्तमराव तांदळे यांनी वंजारवाडी सोडून बीड शहर गाठले. ते माध्यमिक शाळेत शिक्षक होते. शरद यांचे बीडच्या ‘सावरकर विद्यालया’त व ‘बलभीम कॉलेज’मध्ये बारावीपर्यंत शिक्षण झाले. नंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनीयरिंगसाठी मोठा वाव असल्याच्या ऐकीव माहितीवर औरंगाबाद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना लहानपणापासून वेगळे काही करण्याची इच्छा असे. त्यांनी तरुणांनी उद्योजक व्हावे, दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील तरुणांना छोट्या छोट्या उद्योगांची माहिती व्हावी यासाठी ‘विजयी युवक’ नावाचे मासिक कॉलेजात सुरू केले. मासिकामध्ये स्वयंरोजगारांची माहिती दिली जात असल्याने त्याला काही प्रमाणात यश मिळाले. परंतु मासिक आर्थिक अडचणीत सापडल्याने बंद झाले. शरद विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवून त्यांना मदत करत. ते विद्यार्थ्यांमध्ये ‘शरदभाऊ’ या नावाने ओळखले जात. शरद यांना त्यांची ‘भाऊगिरी’ वाढत गेल्याने इंजिनीयरिंगच्या शेवटच्या वर्षी एका पेपरमध्ये अपयश आले, पण त्यांनी जिद्दीने इंजिनीयरिंग पूर्ण केले.
शरद यांची दखल राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. त्यांना लंडनचा पुरस्कार त्यानंतर मिळाला. त्यांना प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते ‘वायबीआय यंग आंत्रप्रेन्यूअर ऑफ दि इयर, 2013’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तो समारंभ त्यांच्या लक्षात आयुष्यभर राहणार आहे. ते दृश्यच तसे होते. ते चमचमत्या सोन्याचा मुलामा असलेले भव्यदिव्य छत, जगावर राज्य केल्याची साक्ष सांगणाऱ्या ऐटदार भिंती, उमरावी बाज असणारा पायाखालील लाल गालिचा अशा लंडनच्या सभागृहात समारंभ झाल्याचे ओढीने सांगतात. शरद यांना महत्त्वाच्या संस्थांमध्ये मार्गदर्शनासाठी भारतभर बोलावण्यात येते. त्यांनी तीसहून अधिक जणांना उद्योजक बनवले आहे. ते त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या कामगारांना आणि संघर्षात मदत केलेल्या सर्वांना देतात. ते उद्योजकता विकसित करण्याचे कार्य अव्याहतपणे पुढे सुरू राहणार याची ग्वाही देतात.
विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करून दाखवणाऱ्या सामान्य माणसांच्या यशोगाथा..✌🏻
येणाऱ्या पिढीला भविष्यातील विविध क्षेत्रातील संधींची ओळख करून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न..
शिक्षण, कृषी, उद्योग, सरकारी नौकरी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी प्रामाणिक हेतूने सुरु झालेला रिऍलिटी प्लॅटफॉर्म "Inspire Talks"
UPSC, MPSC अशा स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा "संघर्षमय प्रवास, अभ्यासाची योग्य पद्धती, व स्पर्धा परीक्षेतील वास्तव" मांडण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत.
हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला असल्यामुळे आपले जे मित्र, नातेवाईक किंवा स्वतः निवड झालेले असाल तर आपण स्वतः संपर्क करू शकता किंवा त्यांचे मोबाईल नंबर आम्हाला पाठवा.
आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मुलाखत व Inspire talks वर त्यांचा प्रवास जाणून घेऊ...
Whatsapp us:
wa.me/+917722039009?text=Inspi...
-----------------------------------------------------------------------
MPSC विद्यार्थी ते एक यशस्वी उद्योजक व लेखक | Sharad Tandale Success Story | sharad tandale
#ravan
#mpsc
#sharadtandale
#ravan
#mpsctopper
#mpscshorts
#mpscshortsfeed
#ytshorts
sharad tandale speech
sharad tandale mpsc speech
sharad tandale motivational speech status
sharad tandale motivation
sharad tandale ravan book
sharad tandale reels
sharad tandale shorts
sharad tandale speech short

Пікірлер

    Келесі