मराठी माणसाला घर घेणं अशक्य का होतंय? | Vidyadhar Anaskar | Behind The Scenes

मुंबईतील काही सहकारी सोसायट्यांमध्ये मराठी माणसांना घरे नाकारली जातात, हा प्रकार कायद्याने योग्य आहे का? एखाद्या सोसायटीत घर खरेदी करताना कोणत्या गोष्टींची खात्री करावी? सोसायट्यांचे स्वायत्त अधिकार काय असतात? सहकारी पतसंस्था, बँका, हौसिंग सोसायट्या, साखर कारखाने यांचा आदर्श कारभार कसा असावा? सोसायटीचे रिडेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय? सामान्य माणसाचा आणि सहकार क्षेत्राचा संबंध काय?
राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची मुलाखत...
#house #societies #cooperative
===
00:00 - प्रोमो.
02:25 - सोसायटीत घर नाकारणं कायदेशीर?
07:19 - सोसायट्यांना स्वायत्तता आणि अधिकार किती?
12:07 - सोसायटी कायदा कुठपर्यंत लागू?
13:39 - सोसायटीत शासकीय हस्तक्षेपास बंदी?
15:30 - घर नाकारलं जाऊ नये, यासाठी उपाय काय?
17:23 - सहकार कायद्याचे अधिकार, उदाहरण.
20:43 - उपविधी किती महत्वाची?
24:52 - सोसायटीचं सभासदत्व स्वीकारणं म्हणजे नेमकं काय?
26:00 - सोसायट्यांमधील तक्रारी निवारण्यासाठी पर्याय काय?
27:45 - AGM म्हणजे नेमकं काय? ती कशासाठी?
31:22 - सभासदांना प्रशिक्षण.
33:16 - रीडेव्हलपमेंट, आर्थिक गणितं आणि शासनाच्या योजना.
41:27 - बिल्डर, सहकारी संस्थांची मालकी आणि त्याचे नियम.
45:51 - जाती आधारित बँकांसाठीचे नियम.
47:11 - विद्या सहकारी बँकेसाठी केलेल्या उपविधीमधील नियमाचं उदाहरण.
49:32 - 97 ची घटनादुरुस्ती.
54:16 - सहकाराची गरज आणि त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन.
55:42 - सहकार आणि राजकारण.
57:27 - सहकार धोरण, त्याचं शालेय शिक्षण.
01:00:10 - लिज्जतची सक्सेस स्टोरी.
01:01:21- सहकार ही शासनप्रणित चळवळ कशी?

Пікірлер: 274

  • @Skaivalya
    @Skaivalya10 ай бұрын

    सध्या सगळीकडे मुद्देहीन, भावनाप्रधान अन् सनसनाटी निर्माण करणाऱ्या चर्चां-बातम्या सुरू असताना, अशा पद्धतीने मुद्देसूद, स्पष्ट व उदाहरणांसहित विवेचन करणाऱ्या माणसांची गरज किती जास्त आहे याची इंटरव्ह्यू पाहिल्यावर तीव्र जाणीव झाली. इतके सुंदर अन् सरळ समजावून सांगणाऱ्या विद्याधर सरांना दंडवत, अन् थिंक बँक चे खूप खूप आभार 🙏🏻 सरांना वेळोवेळी बोलावत रहा.

  • @jayantbhagwat1557
    @jayantbhagwat155710 ай бұрын

    सरांकडून सहकाराबाबतची शक्य तेवढी माहिती आपण अनेक भागात मांडावी आपणास कित्येक कायदेच माहिती नसते सरांकडून भरपूर उपयुक्त माहिती मिळते

  • @cadeepakrameshagrawal6414
    @cadeepakrameshagrawal641410 ай бұрын

    खूप चांगली माहिती . मी आपल्या सोसायटी तील सगळ्या लोकांना हे इंटरव्ह्यू बघण्यास विनंती केली .

  • @suryakantdukare808
    @suryakantdukare80810 ай бұрын

    या चर्चे मध्ये का या प्रश्नाचे उत्तर मला मीळालेले नाही. तरी मराठी माणसांना घर का अशक्य आहे. यावरती मंथन गरजेचे आहे,असे मला वाटते. बाकी सहकार बद्ल खुपच छान माहीती मीळाली. धन्यवाद.

  • @bharatigogte7976
    @bharatigogte797610 ай бұрын

    अनाजकर सर, खूपच अभ्यासपूर्ण आणी सोप्या पद्धतीने आपण हा विषय सांगितला आहे. खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!

  • @niteshdongare1853
    @niteshdongare185310 ай бұрын

    मराठी माणसाला घर घेणं अशक्य का होतय ह्यावर हा व्हिडिओ नाहीये.

  • @anujabal4797
    @anujabal479710 ай бұрын

    उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल माननीय आनास्कर साहेब आणि पाचलाग साहेब धन्यवाद

  • @ajinkya4236
    @ajinkya423610 ай бұрын

    Anaskar सरांना पुन्हा बोलवल्याबद्दल धन्यवाद 🎉

  • @balkrishna10
    @balkrishna1010 ай бұрын

    सहकार दुधारी तलवार आहे .सहकारातील नियम घटनेस धरूनच असले पाहिजे नाहीतर चुकीचे नियम करून समाजात पुन्हा जातीभेद धर्मभेद वाढू शकते

  • @sainathparasnis9533

    @sainathparasnis9533

    9 ай бұрын

    Gujrathi bagao

  • @mayureshkokil785

    @mayureshkokil785

    9 ай бұрын

    Comunity स्वातंत्र्य सहकारातून मिळते. त्याचा वापर दुसरे करत असतील तर आपल्याला ते पचत नाही आणि आपलेच करत असतील तर आपल्याला ते योग्य वाटते. आणि हे असं वाटणं नैसर्गिक आहे.

  • @satishphansekar6713
    @satishphansekar671310 ай бұрын

    एखाद्या समाजाने स्वतःची इमारत बांधून इतरांना मज्जाव केला तर स्थानिक मराठी जाणार कुठे? असच जर देशभर होणार असेल तर एकसंघ भारत राहिला कुठे.? ज्या समाजाकडे पैसा, आर्थिक सुबत्ता असेल तो त्यांची संकुल उभारायला लागला तर इतरांचे काय? सहकार विभागात बदल होने काळाची गरज आहे.

  • @samirparandkar6708

    @samirparandkar6708

    10 ай бұрын

    स्थानिक मराठी लोकांनी स्वतःची इमारत बांधायची मनाई नाही.

  • @User15106

    @User15106

    10 ай бұрын

    ​@@samirparandkar6708मान्य आहे पण अशा ने धर्म निरपेक्ष देश राहीला कुठे

  • @dattatrayalimaye2756

    @dattatrayalimaye2756

    10 ай бұрын

    Ani sarkarach vishishta samuhansathi mahamandala kadhun yojana anat nahi ka? Sarkari Paisa vat tana ( me reservation baddal bolat nahiye) vividh yojana, ya sarkar dekhil "religions", "caste", ya Varun tharavate, tevha private lokanni tase kele tr gair nahi ase mala sirankadun samajale...kahi lok ekatra Yeun kahi upakram karaycha asel tar tyancha to adhikar ahe asa mala samajle sirankdun

  • @sanjeevgkulkarni2002
    @sanjeevgkulkarni200210 ай бұрын

    Thanks अनेक नविन गोष्टी कळल्या. ज्ञानात भर पडली. अनास्कर यांचे आभार. आणि त्यांना बोलावून योग्य प्रश्न विचारणाऱ्या विनायक यांचे

  • @creative_minds
    @creative_minds9 ай бұрын

    Very interesting and knowledge gaining session. Please bring another episode for discussion on housing society and apartment system. Maintenance of housing societies and apartment.

  • @vasantmulik303
    @vasantmulik30310 ай бұрын

    आमच्या ज्ञानात भर पडली आणि अनेक नविन नविन गोष्टी कळल्या. दोन्ही मान्यवरांचे आभार आणि नमस्कार 🙏🙏🙏

  • @varshaashtikar8225

    @varshaashtikar8225

    10 ай бұрын

    Good

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande693810 ай бұрын

    खूप चांगला, महत्वपूर्ण विषय आणि त्यावरील चर्चात्मक माहिती.बर्‍याच गोष्टी लक्षात आल्या, स्पष्ट केल्या गेल्या.💐💐

  • @annakale6727
    @annakale672710 ай бұрын

    सहकार चळवळ किती उपयुक्त आहे,याचीअतिशय उपयुक्त माहिती. धन्यवाद अनास्कर सर

  • @vishalgaikwad660
    @vishalgaikwad66010 ай бұрын

    सर फारच उपयुक्त अशी माहिती दिली आपण...

  • @shailendraminde4681
    @shailendraminde468110 ай бұрын

    एस. आर. ऐ (झोपडपट्टी पुनर्व्हसन योजना )या योजनेमध्ये मराठी माणसाला दुसऱ्या मराठी माणसाला घर विकण्याचा किंवा घर विकत घेण्याची 10वर्षाची अट नसावी. आणि नोंदणी आणि मुद्रांक फी ही फारच अल्प असावी.

  • @traveldiaries2614
    @traveldiaries261410 ай бұрын

    मास मच्छी खणाऱ्यांना प्रवेश न देणारे कित्येकजण व्यवसायात इतरांचे पैसे बुडवितात,व्यवसायात दगाफटका करतात,लोकांना लुटतात..हे चालते का.. हे कुठल्या तत्वात बसते...

  • @prashantkatti118

    @prashantkatti118

    10 ай бұрын

    जिकडे पैसा अस्तो तिकडे तत्व कचर्यात् जातो

  • @jayantjoshi2813

    @jayantjoshi2813

    10 ай бұрын

    अशा लोकांना तुमच्या सोसायटीत प्रवेश देऊ नका.

  • @chandrashekhardeshpande2814

    @chandrashekhardeshpande2814

    10 ай бұрын

    इतर कुठलाही गुन्हा कायदेशीर दृष्ट्या सिद्ध झालेला असेल तर सोसायटी उपविधी बनवुन गुन्हेगारी इतिहास (history sheeter) व्यक्ती ला मेम्बरशिप नाकारू शकते. असो .. तुमच्या बोलण्यातील आशय निर्मळ आहे परंतु ह्या मुलाखतीतील मुख्य मुद्दा नीट लक्षात घ्यावा लागेल

  • @NM-bq2dr

    @NM-bq2dr

    10 ай бұрын

    Kaydyachya babtit bhavnik hota yet nhi

  • @subh2173

    @subh2173

    10 ай бұрын

    हे लाखातल हे सगळयात जास्त यांनीच पैसा बुडवला आहे

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut573310 ай бұрын

    अत्यंत ऊपयोगि व गरजेचे मार्गदर्शन या मुलाखतीतून झाले..आज प्रथमच मला तरी ही सखोल माहिती मिळाली..सर्वांचे मनापासुन आभार..धन्यवाद..👌👌👍🙏

  • @aditikotibhaskar496
    @aditikotibhaskar49610 ай бұрын

    अतिशय उपयुक्त माहिती .सामान्य माणसाची खूप फसवणूक होण्यापसुन् वाचेल

  • @radhikasawant9314
    @radhikasawant931410 ай бұрын

    मराठी लोकांना गुजराती रहिवासी असलेल्या इमारती मध्ये जागा देत नाही ही गोष्ट खूप वर्षांपूर्वीची आहे म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी पासून माझं लहानपण ज्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणी तीन इमारती फक्त गुजराती लोकांची होती आणि आम्ही ज्या इमारतीत रहात होते त्या मध्ये सर्व भाषिक लोक होते आणि विशेष म्हणजे त्यावेळी सुद्धा गुजराती इमारती मध्ये कोणत्याही वेगळ्या भाषिक लोकांना घर विकत नसतं किंवा कोणत्याही मराठी व्यक्तीला घर विकत घेता येत नसे. माझा एक प्रश्न असा आहे की हा प्रकार गेले कित्येक वर्षे चालले आहे तर आताच या प्रकारावर इतका आवाज का😢😢

  • @darshilmashru8479

    @darshilmashru8479

    9 ай бұрын

    कारण काही लोकांना फुकटचा माज आहे मराठी असल्याचा.

  • @machindrakawade-tg7dz
    @machindrakawade-tg7dz10 ай бұрын

    खूप माहीती पूर्ण विश्लेषण केलंय , धन्यवाद साहेब

  • @manishnerkar6805
    @manishnerkar680510 ай бұрын

    अनासकर सर तुम्ही youtube channel चालू करा. आर्थिक साक्षरतेसाठी

  • @arundhanve8911
    @arundhanve891110 ай бұрын

    अत्यंत उपयुक्त ज्ञान .प्रत्त्युत्तर रुपाने पुस्तक लिहा.ही आग्रहाची विनंती. प्रश्नोत्तरातून रुपाने लिहावे ,ही पुनः विनंती.

  • @darpanshah2557
    @darpanshah255710 ай бұрын

    Very interesting and knowledgeable discussion. Thanks to vidyadhar sir for sharing his knowledge and thanks to think bank for having these knowledgeable people onbaord

  • @anaghajoshi365
    @anaghajoshi36510 ай бұрын

    An excellent program. Very good information. Thanks you so much for uploading.

  • @ranjeetkamble3048
    @ranjeetkamble304810 ай бұрын

    कोल्हापूरात सभेसाठी एका गटाचे 2000 हजार लोक आले दुसर्या गटाचे 2000 हजार लोक आले आणि ह्या सगळ्यांना सांभाळायला 4000 हजार पोलिस आले 😂😂😂😂अगदी खरं बोललात तुम्ही सर आमच्या कोल्हापूरातील साखर कारखान्याच्या आणि दुध संघाच्या सभेतील कायमची बोंब आहे ही हे कधीच बंद होणार नाही 😢😢😢🤔🤔🤔

  • @ajitvankudre2115
    @ajitvankudre211510 ай бұрын

    सहकाराचा स्वाहकार झाला आहे त्यामुळे बदनाम आहे . Politician त्याचा कसा उपयोग करून घेतात त्याचे साखर कारखाने उत्तम उदाहरण आहे

  • @zhingaru518

    @zhingaru518

    10 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/oIVpxaiOfdnIiLg.htmlsi=HyjuedcOwHU8vjTJ

  • @JalindarSolat-ry3io
    @JalindarSolat-ry3io10 ай бұрын

    धन्यवाद सर आजच्या पिढीला सहकार विषय अमुल लिजत सारखी उदाहरण देऊन सोप्या भाषेत सांगीतला

  • @sarangdhande9107
    @sarangdhande91078 ай бұрын

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार

  • @madhuvitvekar7780
    @madhuvitvekar778010 ай бұрын

    आपण दोघांनी खूप चांगली माहिती दिलीत खुप खूप आभारी आहे.धन्यवाद.

  • @sajovan
    @sajovan10 ай бұрын

    He is so knolwedgable, learnt a lot through this video. Thank you.

  • @SanjayPatil-oi4bf
    @SanjayPatil-oi4bf9 ай бұрын

    दर वेळी उत्कृष्ट माहिती थिंक टॅंक मिळते, खूप छान माहिती दिली

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji816610 ай бұрын

    👌👌🙏very good discussion held, nice knowledge given sir, thanks.

  • @chintamanideshmukh8816
    @chintamanideshmukh881610 ай бұрын

    Thanks to Vinayak for bringing new subjects and new very good and talented people for interview.

  • @pravinbhavsar3437
    @pravinbhavsar343710 ай бұрын

    खुप छान व्हिडिओ होता. ज्ञानात भर पडली.

  • @gajju-g2527
    @gajju-g25273 ай бұрын

    Definitely an eye opening interview for everyone. They explained small small nuances clearly and well defined with an example. Very well appreciated sir and channel.

  • @abhijitdeshmukh6902
    @abhijitdeshmukh690210 ай бұрын

    अत्यंत माहितीपूर्ण

  • @amolshingare9205
    @amolshingare920510 ай бұрын

    Khup mast mahiti dilit sir Thank you team think Bank ❤

  • @yashwantlele5119
    @yashwantlele511910 ай бұрын

    खूप छान सविस्तर उपयुक्त माहिती

  • @abhaybansode5415
    @abhaybansode541510 ай бұрын

    Thanks to Think Bank And Anaskar Sir.

  • @painterprashant
    @painterprashant10 ай бұрын

    उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद

  • @electricalconcepts9193
    @electricalconcepts919310 ай бұрын

    Really eye opening session 😊

  • @nitinsalvi622
    @nitinsalvi6229 ай бұрын

    सरांचे,असे मुद्देसुद,स्पष्ट उदारणांसहित विवेचन करणाऱ्या माणसांची अत्यंत गरजेचं आहे.सरांची इंटरव्ह्यू पाहिल्यावर तीव्र जाणीव झाली.इतके सुंदर अन् सरळ समजावून सांगणाऱ्या सरांना 🙏दंडवत आणि थिंक बँकेचे खूप खूप आभारी आहोत. सर आमचे मुंबईत घर आहे. ते वडिल जिवंत असते वेळी घर पुनर्विकासासाठी गेले होते सध्या वडील नाहीत आता ते घर बिल्डरांनी दिले ते घर माझ्या नावे कसे होईल विद्याधर सर मार्गदर्शन करावे विनंती करतो🙏.

  • @supriyajadhav-chavan5771
    @supriyajadhav-chavan57718 ай бұрын

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर

  • @JalindarSolat-ry3io
    @JalindarSolat-ry3io10 ай бұрын

    खुप खुप मनापासून धन्यवाद सर तुमचे काम जनसामान्यांपर्यंत पोहचत राहो हीच अपेक्षा

  • @mitgala1381
    @mitgala138110 ай бұрын

    Great knowledge, sir , very informative 👏 👍

  • @sumitshelar2883
    @sumitshelar288310 ай бұрын

    Sir is experienced and so knowledgeable

  • @anupvadnere5950
    @anupvadnere59507 ай бұрын

    फारच छान विषय अणि विश्लेषण

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz10 ай бұрын

    जबरदस्त ज्ञान दिलंय साहेब 🙏👌

  • @dr.umeshgaikwad4594
    @dr.umeshgaikwad459410 ай бұрын

    Very Important Information. Thanks

  • @dhananjayjoshi2206
    @dhananjayjoshi22068 ай бұрын

    खूपच माहितीपुर्ण, सरांचा अभ्यास /अनुभव सरसच आहे. शेवटला प्रश्न उत्तमच, पण वेगळं उत्तर अपेक्षित होतं, असो..या धर्तीवर थोडा वेगळा विचार -- नवीन सोसायटी, सहकारी संस्था यां union, alliance च्या व्याख्येखाली स्वायत्त असताना, मग्, विवाह ही देखील एक प्रकारची युती, युनियन, अल्लायन्स मानून, जोडप्याला स्वायत्तता द्यायला काय हरकते? त्यांच्यातील छोटी/मोठी भांडणे, वाद, काडीमोड नुसते महिनोन-महिने, शेकडो आठवडे नुसतेच "एकून" त्यांचे वेळ, काळ, शक्तीचा अपव्यय टाळता येईल, दोन जीवांना एकत्र येण्याचा जसा अधिकार, तसाच विलग होण्याचा अधिकार हवा, तेंव्हाच कोर्ट कचेऱ्या का? लग्नाच्या वेळी काय मुलगा/गी वाद घालून पटवून देतात, की हा/ही कशी चांगला/ली आहे, ह्या/हिच्याशीच लग्न करायचय ? नाही ना! मग, शुल्लक कारणांच्या घटस्फोटाच्या वेळेस का? जसे तुमचा कायदा, कितीही घटनाबाह्य असला, तरी सोसायचीच्या भिंतीच्या आत, त्याला परवानगी नाही, मग तसं, चार भिंतीच्या आत जोडपं काय करत ते कोर्ट का विचारते? याबद्दल कोर्टाने, समाजाने व सरकारने जागरूकता दाखवावी. त्याचे दूरोगामी परिणाम भयावह होईस्तोवर थांबू नये

  • @deepaklambole2369
    @deepaklambole236910 ай бұрын

    Sir very practical thoughts.

  • @umeshmali8655
    @umeshmali865510 ай бұрын

    Excellent Information proud of you sir ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandeepdeshmukh9974
    @sandeepdeshmukh997410 ай бұрын

    Best information sir

  • @sagarkonde6725
    @sagarkonde67259 ай бұрын

    खूप चांगली माहिती

  • @wvrujendra
    @wvrujendra7 ай бұрын

    धन्यवाद थिंक Bank. अन्स्कर साहेबांची विषय मांडण्याची पद्धत, स्पष्टता, सर्वाना विषय समजावा याबद्दल असणारी तळमळ मुलाखतीतून जाणवते. apartment संदर्भातील नियम आणि कायदे याची माहिती मिळावी म्हणजे बरेच गैरसमज दूर होतील. एखादी apartment चे सोसायटी मध्ये रुपांतर करता येईल का? याची दाखल घेईन नवीन भाग तयार करावा हि विनंती.

  • @amitbarure5158
    @amitbarure515810 ай бұрын

    Very enlightening

  • @AashitSable
    @AashitSable10 ай бұрын

    नवीन विषयचं ज्ञान तर मिळालं पण विषय "सहकार क्षेत्रातील तांत्रिक अडचणी आणि सुधारणा" असा पाहिजे होता. व्हिडियोला जे नाव दिलंय "मराठी माणसाला घर घेणं अशक्य का होतंय?" ही तासभराची चर्चा ऐकून त्याचं उत्तर कुठेच नाही मिळालं.

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi199210 ай бұрын

    Nice interview, very good information.

  • @nareshpednekar6771
    @nareshpednekar677110 ай бұрын

    Superb information 👌 👏

  • @santoshpalande3543
    @santoshpalande354310 ай бұрын

    महाराष्ट्रात मराठी माणसाने २/३ मताने फक्त मराठी माणसाला नोकरी ,धंदा करता येईल असा निर्णय घेतला पाहिजे , त्यासाठी मराठी माणसाचे हित पाहणारे राजकारणी लोकांना निवडून दिले पाहिजे

  • @omkarjadhav4429

    @omkarjadhav4429

    10 ай бұрын

    अगदी बरोबर 💯

  • @prasadcnavale

    @prasadcnavale

    10 ай бұрын

    राजकारणी हा सत्तेचा भुकेला असतो गुजराती आणि मारवाडी लोकांकड खूप पैसा आहे वेळ नाही लागत माणूस बदलायला. आत्ता अशी स्थिति आहे सगळे महत्वाचे धंदे त्यांच्याकड आहेत. उदाहरण द्यायचे झाले आपल्या इथल्या शेतकाऱ्यांकडून १० ने कांदा घेणार शहरात खर्च जाऊन २०-३० रुपये नफ्याणे विकणार, घेणारे कोण तर आपलेच महाराष्ट्रातले लोक. काम करणारे शेतकरी आणि नोकरी करणारे दोन्ही महाराष्ट्रीयन आणि नफा गुजराती-मारवाडी. यात चूक आपलीच आहे म्हणा.

  • @dattatrayalimaye2756

    @dattatrayalimaye2756

    10 ай бұрын

    ​@@prasadcnavalekatu pan atishay khara bolya baddal abhinandan, badal ha Marathi mansane rajkarnyankadun apekshit karu naye

  • @darshilmashru8479

    @darshilmashru8479

    9 ай бұрын

    राज्यघटना वाच आधी. रस्त्यात कधी भेटलास तर कानफटात मारीन तुझ्या.

  • @ashwinipingle8832
    @ashwinipingle883210 ай бұрын

    Unless maharashtrians aim to become economically very strong, they will continue to get discriminated. Also they should try to build their own areas where non maharashtrians should be restricted, exactly same as what happened in this case

  • @BaneVishakha

    @BaneVishakha

    10 ай бұрын

    There is world beyond money too & Maharashtrians are very strong at it. Example: literature, theatre & art

  • @darpanshah2557

    @darpanshah2557

    10 ай бұрын

    @ashwinipingle8832 All non Marathi speaking people are not non Maharashtrian. I hope that you have watched this podcast carefully.

  • @karanjadhavppp7076

    @karanjadhavppp7076

    8 ай бұрын

    मराठी माणसांनी इतर कम्युनिटी ला जमीन दिली नाही तर हि वेळच येणार नाही.

  • @hotesh
    @hotesh10 ай бұрын

    Please bring Vidyadhar sir again we are learning lot of new things which are very important for our daily life and know one talk these things 👍

  • @png161958
    @png16195810 ай бұрын

    Cooperative societies more information needed pls.second episode is expecting !

  • @yashwantlele5119
    @yashwantlele511910 ай бұрын

    अभिनंदन

  • @ajayrajnekar9765
    @ajayrajnekar976510 ай бұрын

    Very good information 🙏

  • @rahultapse3221
    @rahultapse322110 ай бұрын

    खूप सुंदर माहिती.. आपले आभार आहेत.

  • @nageshzore6182
    @nageshzore618210 ай бұрын

    मराठी माणूस कूठुंब प्रिय आहे (फक्तं नविन आलेली सून सोडून) त्याला आई वडील भाऊ यांच्या सानिध्यात रहावेसे वाटते. निदान त्यांनी चाळीतून सेल्फ कंटेन wc असलेल्या रुम मिळवायचं प्रयत्न करावा

  • @sanjayshete5004
    @sanjayshete500410 ай бұрын

    सर अपार्टमेंट मध्ये मला आलेला अनुभव अनुसरून पुढील सहकारी सोसायटी नसलेल्या अपार्टमेंट मध्ये शेजारील फ्लॅट ज्या मध्ये मास्टर बेडरूम व हाॅल च्या भिंती जॉईंट होते.सदर शेजारी कोरोनाच्या काळात रात्री अपरात्री व्यवसाय चे कामकाज करीत होते की जेणेकरून त्यामुळे रात्री आवाज जोरजोरात होऊन आम्हाला कुटुंबीयांना सहा महिने झोपमोड होऊन शारीरिक व मानसिक त्रास झाला.त्या व्यक्तीला विनंती करुन समजावून तसेच अपार्टमेंट मधील पदाधिकारी यांनी ही समजावून सांगूनही त्या व्यक्तीनं ऐकलं नाही.या केसमध्ये आम्ही दोघे ही महाराष्ट्रातीलच रहिवासी आहोत.तो राज्य सरकारी कर्मचारी होता या जोरावर त्याने दमदाटी करून शेवटी नाईलाजाने आम्हाला फ्लॅट बदलायला लागला.सर अशा मानसिकता असेल तर मग असा आपलाच मराठी माणूस असेल तर काय करावे या बाबतीत कायदेशीर मार्गदर्शन करायला हवे व यावर व्हिडिओ सादर करावा.

  • @sachinpukale4168
    @sachinpukale416810 ай бұрын

    उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद NISHABD zalo he bagun kharch DHANYWAD DHOGHANCHE PAN

  • @PVK365
    @PVK3654 ай бұрын

    Nice information

  • @tukaramsonwane6974
    @tukaramsonwane697410 ай бұрын

    नांदेडमध्ये एका आदिवासी डॉ. डीनला.. हेमंत पाटील नावाचा जातीवादी खासदार.. hospital मधील संडास साफ करायला लावतो.. आणि त्या डॉ..डिनचा संपूर्ण मिडिया मध्ये अवमान करतो.. त्यापेक्षा मराठी बाईला घर दिले नाही...तेवढा राष्ट्रीय प्रश्न नाही आहे..

  • @nitinsawant7984

    @nitinsawant7984

    10 ай бұрын

    साहेब दोन्ही प्रश्न तेवढेच गंभीर आहेत. त्या मुळे. कॉमेंट्स करताना भान बाळगा.

  • @sunilpatankar3647
    @sunilpatankar364710 ай бұрын

    इन्दौर मध्यप्रदेश मधे पण एक लोकमान्य नगर नामक सोसाइटी आहे आणी तेथे फकत महाराष्ट्रियन वर्गच घर बान्धु शकतो कीवा फकत महाराष्ट्रियन वर्गालाच विकु शकतो।पण भाडयावर कोणतया ही वर्गाला देउ शकतो।

  • @sadaneel19
    @sadaneel1910 ай бұрын

    Deemed conveyance detailed information expected

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental10 ай бұрын

    स्वतंत्र भारतात आपल्याला मिळणारे हक्क व कर्तव्य याचे भान ठेवले तर भांडण तंटे मिटतील आणि सहकार ही चळवळ यशस्वी होईल .

  • @rajsolanki8459
    @rajsolanki84598 ай бұрын

    Far chhan vishay nivadlay

  • @qualitysarees9420
    @qualitysarees942010 ай бұрын

    म्हणजे उद्या मांसाहारी खाणाऱ्या लोकांना गावाच्या बाहेर रहा म्हणून शकतात हे लोक

  • @jyeshthah1

    @jyeshthah1

    10 ай бұрын

    Ho mg barobar aahe

  • @kraut1982
    @kraut198210 ай бұрын

    Sarvat jasta paisa Mumbait ahe, pan Marathi lok business madhye kami ahet tyamule afat shrimant honare pan jawal jawal koni nahi. Tyata hi business madhye pan Gujrati-Marwadi lok Marathi manasan barobar bedh bhav kartat. Ase udyojak tar kiti ekte padtat. Court kacheri pan parvadat nahi. Upper Middle Class Marathi suddha oshalun ghabrun mothya buildings madhye rahto karan minority madhye asto tithe.

  • @prafulnikam2618
    @prafulnikam261810 ай бұрын

    Ha interview jar tumhi chotya clips madhe sudha realse kela tar changala hoil

  • @combinedstudy6427
    @combinedstudy64277 ай бұрын

    Shevatchi succes story khup changli sangitali. Lijjat, school level la Student cooperative bank books purchase karnyasathi

  • @rushikeshrithe8710
    @rushikeshrithe871010 ай бұрын

    👏👏👏

  • @perfectionistpersona
    @perfectionistpersona10 ай бұрын

    Many Rich Maharashtrian are richer only because they have dropped parochialism and embraced openness mingling with similar minded focus group. You become what is your immediate group and surroundings are. If you surround your self with progressive and like minded people from any community, you will automatically absorb the successful characteristics to become truly successful.

  • @sachindhavle2124

    @sachindhavle2124

    10 ай бұрын

    Means becoming vegetarian is a sign of progress???

  • @rakhidesai2768
    @rakhidesai276810 ай бұрын

    Make one episode helpfull to society members

  • @jaab007
    @jaab00710 ай бұрын

    Very informative talk. Is MNS and Gujarati people listening?

  • @darshilmashru8479

    @darshilmashru8479

    9 ай бұрын

    What Gujaratis are doing is perfectly lawful. It is MNS that needs to listen and get it into its pea-sized brain.

  • @MM-ue4ol
    @MM-ue4ol10 ай бұрын

    अमित शहा आणि कंपनी तर सहकार क्षेत्र बुडवायला निघालेत या शेत्रातल्या मुलभूत गोष्टीना जसं स्वायतता, अधिकार ई ना नख लावायला निघालेत आणि सारे ठराविक भांडवलदाराना देण्याची तालीम सुरू आहे असे या क्षेत्रातले तज्ञ आणि अर्थतज्ञ सांगताहेत, आणि ते खरे आहे असेच चित्र आहे.

  • @Struggling_star
    @Struggling_star10 ай бұрын

    Vasai virar madhe Mhada Lottery Mazya sobat cha Bhayya Ani gujrati lokka lagli pan mala nahi

  • @deccan_wolf
    @deccan_wolf10 ай бұрын

    सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थे बाबत देखील एक माहीतीपर व्हिडिओ बनवा

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant667910 ай бұрын

    ✌️

  • @babajipawar6639
    @babajipawar663910 ай бұрын

    नमस्कार सर,, दि. ४ मे २०२३ रोजी सहकार आयुक्त, पुणे, यानी सल्लागार समिती नियुक्त करण्यासाठी हौसिंग सोसायटीला आदेश दिलेला आहे. त्यामध्ये ५ सदस्य नियुक्ती करण्याची तरतूद आहे..

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev701410 ай бұрын

    अगदी बरोबर बोललात व चांगली माहिती दिलीत धन्यवाद

  • @sunitakodpe1653
    @sunitakodpe165310 ай бұрын

    पण मुंबईत कीती वेग वेगळ्या जाती राहतात मराठी लोक अस करत नाहीत कधीच

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps4 ай бұрын

    सहकारी साखर कारखाने तोट्यात आणून राजकारणी यांनी खरेदी करून आपलीनी संस्थानिक शाही स्थापन केली

  • @rohinikundle3907
    @rohinikundle390710 ай бұрын

    Reasonable restrictions (In Constitution)are the other side of the coin named fundamental rights.When rights are fundamental reasonable restrictions too,are equally fundamental.The word "fundamental " is attached to fundamental duties also.The laymen (not knowing law) misunderstood the word fundamental.Very well explained.

  • @maheshkumarl7027
    @maheshkumarl70276 ай бұрын

    What are the differences in laws of CHS Ltd and Apartment owners association

  • @abhijitalve4420
    @abhijitalve442010 ай бұрын

    गुजराती मारवाडी जैन यातील कितीजण बाहेर जाऊन नॉन व्हेज खातात हा एक विषय आहेच.

  • @darshilmashru8479

    @darshilmashru8479

    9 ай бұрын

    बाहेर खाणे, आणि घरात शिजवून खाणे, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

  • @blackoxblackox9135
    @blackoxblackox913510 ай бұрын

    आजवर किती उपाविधी आयुक्तांनी सुधारणा मंजूर करुन दिलेत. आयुक्त ,निबंधक म्हणजे सरकारी बाबू......पैसे खाऊन मस्तावल झालेली डुकरं. जनतेचे नोकर जे स्वतःला मालक समजतात.

  • @prasadcnavale

    @prasadcnavale

    10 ай бұрын

    ते मालकच आहेत तुम्हाला शिकवताना तस शिकवलं आहे की ते सेवक आहेत म्हणून. कायदे त्यांना खूप सुरक्षा देतात त्यांनी काम करो अथवा ना करो.

  • @rajeshparab1968
    @rajeshparab196810 ай бұрын

    asha society madhye ghar gena means losss ahe . Tya parasi mansacha nuksan zala. tyala jasta kimatit ghar vikata ala nahi. Samanya mansala he sagala mahit astat tyanchya mulana shalet commerce subject madhye ahe . pan tumhala maths physics interest cos theta . x square + b square karyanat interest . jycha pudhe kahi upyog hot nahi. he college level la tari detail and practicle shikavyala pahije.

  • @mayureshkokil785
    @mayureshkokil7859 ай бұрын

    मथळा आणि विषय विसंगत आहेत. विषय चांगलाच आहे;परंतु तो मथळ्यात दिसत नाही. पुढील व्हिडिओज चे मथळे विचार करून बनवा.

  • @shilpakondedeshmukh6277
    @shilpakondedeshmukh627710 ай бұрын

    if gujarathi or marwadi person dont like other " Animal eating" people, then why they do business with "non veg eating " people? stop going to shops of such narrow minded peoples.

  • @prasadcnavale

    @prasadcnavale

    10 ай бұрын

    Money from everyone is ok. But living with everyone is not.

  • @zunjarraomargale1388

    @zunjarraomargale1388

    10 ай бұрын

    बावळट शिल्पा, धंदा आणि माणसाबरोबर राहणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत

  • @User15106

    @User15106

    10 ай бұрын

    ​@@zunjarraomargale1388म्हणजे मटन खाणारेना धंद्यात लुबाडणूक पिळवणूक करायची आणि त्यांच्या सोबत राहायचे नाही हे तत्वज्ञानात बसते ते सांगा

  • @dattatrayalimaye2756

    @dattatrayalimaye2756

    10 ай бұрын

    Ashya lokankade vastu services vagaire ghyayla koni apnas bhag padat asel ase mala vatat nahi, choice is yours

  • @dattatrayalimaye2756

    @dattatrayalimaye2756

    10 ай бұрын

    ​@@zunjarraomargale1388 kitihi katu vatla, tari yogya mudda mandala, saglyana swatantra ahe kuthun vastu, service ghyaychi

Келесі