Mahadchya Talyach Pani | महाडच्या तळ्याचं पाणी | Shital Sathe | Sachin Mali

Navayan Mahajalsa Official Song
Production Navayan Mahajalsa
Production Head - Sachin Mali
Lyrics : Sachin Mali
Music / Singer : Shital Sathe
Video Editing : Jamir Attar (The Content Adda, Satara )
All Copyright Reserved at©Navayan Mahajalsa
Lyrics :
महाडच्या तळ्याचं पाणी पेटलं गं बाई
त्या तळ्यांत माझ्या भिमाची छबी भेटलं गं बाई...धृ
माई गं माझे माई रमाई आई गं
माई गं माझे माई रमाई आई गं...
भीम नावाचं इवल रोप दारी लावीन गं
त्या रोपाचा बोधीवृक्ष आभाळी जाईल गं
माई गं माझे माई रमाई आई गं
माई गं माझे माई भिमाई आई गं...
माती कसणाऱ्या तुक्याचा अभंग होईन गं
समतेच्या युगाचं चाक म्होरं जाईल गं
माई गं माई माझी रमाई
माई गं माई माझे भिमाई...
मुक्याला बोल देईन गाण्याला सूर गं
मूकनायकाच्या शब्दाला धार येईल गं
माई गं माई माझी रमाई
माई गं माई माझे भिमाई...
नालंदाच्या ज्ञान झऱ्यांना शोधीन गं बाई
उजेडाच्या लाखो लेण्या घडवीन गं बाई
माई गं माई माझी रमाई
माई गं माई माझी रमाई...
एकतारी वर जागर घाली कबीर दोहा गं
त्या दोह्याच्या शब्द-सुरांचं लेणं लेईन गं
माई गं माझे माई रमाई आई गं
माई गं माझे माई भिमाई आई गं...
स्वातंत्र्याच्या लाखो ज्योती हृदयी लावीन गं
त्या ज्योतीच्या उजेडात मी न्हाऊन जाईन गं...
माई गं माई माझी रमाई
माई गं माई माझे भिमाई...
भीमा तुझ्या निळाईची मी ओवी गाईन गं
समतेच्या त्या रणांगणाची निशाणी होईन गं..
माई गं माई माझी रमाई.
माई गं माई माझे भिमाई...
गीतकार : सचिन माळी
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal
नवयान महाजलसा हा अधिकृत KZread Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसा Account नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal
NAVAYAN MAHAJALSA is official KZread channel. We have been publishing new Art creations regularly on our channel. Navayan Mahajalsa is running on an objectives like people’s art. People’s Path, People’s Entertainment, People’s Enlightenment, People’s Struggle. We have taken this ‘ Panchsutri’ for the cultural revolution .People are appreciated our Artwork very heart fully. And this is become our motivation.
We don’t have sufficient resources for this cultural work. But people support is our strength. We are appealing humbly & politely to all our supporters, followers please help us through financial way and support to Navayan Mahajalsa. Our every creation has been taking more time and expenses as well. We are engaged our cultural work without help from money launderers. A Navayan Mahajalsa is giving credit to the people for this appreciation.
We are humbly request to our friends, fans and well-wishers to support in financial ways as per your wish. It gives an inspiration to us. Therefore we will publish new Artwork frequently on our channel. Following Information about ‘Navayan Mahajalasa’ official Bank account.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
You can give any help and any suggestions to Navayan Mahajalsa. Please Contact & Join Us...And connect with Navayan Mahajalsa. Dosti Zindabad!
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
Yours Thankful,
Navayan Mahajalsa
Shital Sathe & Sachin Mali

Пікірлер: 346

  • @sagarsolsesolse8907
    @sagarsolsesolse89074 жыл бұрын

    ताई जोपर्यंत तुम्ही मातंग समाजावर गाणी काढत नाही तोपर्यंत मातंग समाज हा मागेच राहिल मातंग समाजाला तुमच्या आवाजातील गाण्याची खुप गरज आहे

  • @vidyanandahire766
    @vidyanandahire7664 жыл бұрын

    लोककवी वामनदादा,शाहीर उमप, नंतर तूमची गाणी ऐकत आहे। खुप छान वाटले।

  • @shaileshsonawane2815
    @shaileshsonawane28154 жыл бұрын

    हे मात्र खर आहे की ........एखाद्या मुक्या व्यक्तीला जर बाबासाहेब आंबेडकर समजले तर तो सुद्धा बोलेल ....... अभिमानाने आणि स्वाभिमानाने जगेल.... त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ने बाबासाहेब वाचले पाहिजेत.........

  • @artandallforyou8565
    @artandallforyou8565

    जय. भिम. जय. लहुजी. ताई

  • @indian8619
    @indian86194 жыл бұрын

    शीतलजी, सचिनजी अप्रतिम कार्य,अभिमान वाटतो आपल्या प्रति,लेखणीला धार आहे,आवाजातला जिंवतपणा भावला,

  • @statuslover5751
    @statuslover5751

    खरंच खूप छान गाणं आहे .♥️👍

  • @Ragalover2210-z1v
    @Ragalover2210-z1v4 жыл бұрын

    ह्रुदय ला थेट भिडणार अप्रतिम गीत salute sachin sir ..........👌👌👌👌👍🙏 ❤

  • @sahebraokamble
    @sahebraokamble Жыл бұрын

    जय भीम ताई, अप्रतिम रचना आणि गायन.

  • @SachinPatil-dk7qe
    @SachinPatil-dk7qe4 жыл бұрын

    व्वाह...सचिन दादांचं गीतलेखन आणि शितल ताईंना आवाज... महाराष्ट्रातील माझे आवडते कलावंत 🙏🙏🙏

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare85794 жыл бұрын

    शितल ताई खूपखूपच छान अतीशय सुंदर 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @adv.manishatayadejadhav5252
    @adv.manishatayadejadhav52523 жыл бұрын

    माणूस मरतो पण विचार आणि कार्य कर्तृत्व नेहमी जिवंत राहतात

  • @amazonakshoo4386
    @amazonakshoo43864 жыл бұрын

    ग्रेट.. सचिन शीतल सलाम.. जय भीम.. अप्रतिम गीत

  • @prajwal_More14
    @prajwal_More144 жыл бұрын

    हे गाणं माझं अत्यंत आवडीचं आहे. हे गाणं आणखी नव्या पद्धतीने ऐकायला आवडेल...

  • @ganeshjadhav5839
    @ganeshjadhav58394 жыл бұрын

    सुपर जबरदस्त शितलताई क्रांतिकारी जयभीम..!

  • @amolshejwal5660
    @amolshejwal56604 жыл бұрын

    खुप छान ताई आणि सचिन भाऊ... अप्रतिम गान आणि आवाज व creation ....

  • @kiranmore8979
    @kiranmore89794 жыл бұрын

    अप्रतिम गित. जय भिम शितल ताई👌👌🙏

  • @rashtrapalgawai7101
    @rashtrapalgawai71014 жыл бұрын

    Khupach chan@

  • @Swapnesh_Mali
    @Swapnesh_Mali4 жыл бұрын

    माझ्या जवळ शब्द नाहींत. जय भीम 👆

  • @nisargrajabandpatne5955
    @nisargrajabandpatne59554 жыл бұрын

    अप्रतिम....❤💝💖

  • @ghadagespeaks5014
    @ghadagespeaks50144 жыл бұрын

    पुन्हा एकदा नव्या अंदाजात

Келесі