Madhyameshwar Temple | Nandur Madhyameshwar | Nashik | मध्यमेश्वर मंदिर नाशिक जिल्हा

मध्यमेश्वर मंदिर आणि बानेश्वर मंदिर खानगाव थडी
डॉ. जयंत वडतकर
नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर हे पक्षी अभयारण्य निर्माण झाले आहे ते नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्याच्या उथळ पाणथळ क्षेत्रामुळे. या बंधाऱ्याच्या खाली खानगाव थडी भागात गोदावरी नदीचे विस्तीर्ण असे पात्र आहे. दक्षिणेतील गंगा म्हणून मान्यता असलेली गोदावरी नदी आणि एकीकडून येणारी कादवा नदी यांच्या संगमावर लांबच लांब बांधलेल्या ब्रिटीशकालीन बंधाऱ्याला नंतरच्या काळात पाण्याचे नियंत्रण करण्याच्या दृष्टीने दोन बाजूला धरण बांधून गेट बसविण्यात आले आहेत. या बंधाऱ्यासमोरील भागात संपूर्ण नदी पत्रात खडक असल्याने नदीचे दोन प्रवाह निर्माण झालेले आहेत. या दोन प्रवाहाच्या मधील भागातील उंच भागावर मध्यमेश्वर शिव मंदिर आहे. या शिव मंदिराच्या नावावरूनच येथील पक्षी अभयारण्याला नांदूर मध्यमेश्वर असे नाव मिळालेले आहे.
या मंदिराकडे जाण्यासाठी खानगाव थडी गावातील निसर्ग निर्वाचन केंद्रा पासून नदी पात्र ओलांडून जावे लागते. या प्राचीन अशा शिव मंदिराचा अलीकडे जीर्णोद्धार करण्यात आलेला असून भोवताल उंच असा परकोट बांधण्यात आला आहे. पूर्वमुखी असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारा समोरच छत नसलेली हनुमानाची मूर्ती आहे. प्रवेशव्दारातून आत गेलो कि उजव्या हाताला उंच मिनार असून तो अलीकडे बांधलेला वाटतो. मंदिराच्या समोरच दिसतो तो पाषाणात कोरलेला भव्य नंदी, या नंदीवर सुद्धा पूर्वी छत नसावे, ते अलीकडे बांधलेले आहे. कोरीव चौकट असलेल्या प्रवेशव्दारातून प्रवेश केला की प्रथम लागतो तो कमानी असलेला सभामंडप. सभामंडपाच्या पुढे अर्धमंडप असून त्यापुढे गर्भगृह आहे. उंच शिखर असलेल्या गर्भगृहात पायऱ्या उतरून जावे लागते. मध्यात भव्य असे शिवलिंग आहे. या शिवलिंगास पितळेने मढविलेले आहे.
परकोटाच्या आत फरसबंद भव्य पटांगण असून या ठिकाणी काही नव्याने बांधलेली मंदिरे आहेत. संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा केली असता मंदिर प्राचीन असल्याचे लक्षात येते मात्र शिखरा जवळील मिनार नवीन बांधलेली वाटतात. या परिसरात असलेल्या डावीकडील नदीप्रवाहात कुंभार पाकोळी पक्ष्यांचे हजारो घरटी असलेली जागा आहे. या ठिकाणी पक्षी निरीक्षक या पक्ष्यांचा सायंकाळी घरट्याकडे परतणारा थवा बघण्यासाठी येत असतात.
गोदावरीच्या उजव्या प्रवाहाच्या किनारी पौराणिक संदर्भ लाभलेले आणखी एक प्राचीन असे मंदिर आहे. रामायण काळात, प्रभू श्रीराम वनवासात जात असतांना मार्गक्रमण करीत असतांना वाटेवर शिवमंदिर लागले. जेव्हा श्री रामाने मारिच राक्षसाला येथूनच बाण मारला अशी मान्यता आहे त्यामुळे या शिव मंदिराची ओळख बाणेश्वर शिवमंदिर अशी झाली. हे बाणेश्वर शिवमंदिर अगदी खानगाव थडी गावातील निसर्ग निर्वाचन केंद्राजवळच आहे. या परिसरात आणखी काही मंदिरे असून काही प्राचीन अशा पाषाणातील मूर्ती आणि शिल्प विखुरलेली दिसतात. गोदावरीच्या दोन तीरावर ही दोन्ही प्राचीन मंदिरे भेट द्यावी अशीच आहेत. नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यास भेट देत असतांना या प्राचीन मंदिरांना सहज भेट देता येते. -डॉ. जयंत वडतकर
#Nandur Madhyameshwar #Madhyameshwar Temple #Baneshwar Temple #Temples in Nashik District #Nandur Madhyameshwar Bird Sanctuary #Ramsar site # first Ramsar site in Maharashtra
#Dr. Jayant Wadatkar
Camera & Gear used -
1) Video shoot with : GoPro Hero 7 and Canon Power Shot SX50HS
2) Photographs - Canon Power Shot SX50HS
Music credits-
KZread Library - kzread.info...
Category -History & Education
Explore Historical Forts and Temples, Historical and unknown places, nature & Wildlife of Vidarbha

Пікірлер: 13

  • @hareshwarnaik4820
    @hareshwarnaik48203 ай бұрын

    खूप छान माहिती दिली आहे.

  • @explorewithdr.jayantwadatkar

    @explorewithdr.jayantwadatkar

    3 ай бұрын

    Thank you 🙏

  • @user-on2vb3jg1u
    @user-on2vb3jg1u3 жыл бұрын

    हर हर महादेव 🚩🌹

  • @explorewithdr.jayantwadatkar

    @explorewithdr.jayantwadatkar

    3 жыл бұрын

    हरहर महादेव

  • @r.pankaz2490
    @r.pankaz24903 жыл бұрын

    महत्त्वपूर्ण माहिती. 👍👍👌👌

  • @explorewithdr.jayantwadatkar

    @explorewithdr.jayantwadatkar

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @abhi9779
    @abhi97793 жыл бұрын

    As always a great video dada 👌

  • @explorewithdr.jayantwadatkar

    @explorewithdr.jayantwadatkar

    3 жыл бұрын

    Thank you very much!

  • @saimaka6866
    @saimaka68662 жыл бұрын

    Nice

  • @explorewithdr.jayantwadatkar

    @explorewithdr.jayantwadatkar

    2 жыл бұрын

    Thanks

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod85543 жыл бұрын

    श्री .मध्यमेश्वर महादेव मंदीर व परिसर छान असून आपण वर्णन केलेली माहिती विस्तृत स्वरूपाची व मस्त आहे .व्ही. डी .ओ. सुंदर . धन्यवाद सर .

  • @explorewithdr.jayantwadatkar

    @explorewithdr.jayantwadatkar

    3 жыл бұрын

    धन्यवाद सर

  • @jogeshwarnandurkar1397

    @jogeshwarnandurkar1397

    2 жыл бұрын

    कार ने मंदिरापर्यंत कसे जाता येईल ते कृपया सांगा

Келесі