मोरोपंतकृत श्रीगजाननस्तव, Moropant krit shri Gajanan Stav

Ойын-сауық

श्रीगजवदना देवा ! व्हायासि भवीं गतव्यथ मन, मुनी,
पुरुषार्थसिद्धिकामें, पूजिति भावें तुज प्रथम नमुनी. १
व्हावें शुचि, सेवुनि तव आंगण, पतितें, न तें सदाचरण ?
न वरावे, ध्याया तुज, कां गणपतितें नतें सदा चरण ? २
पुरुषार्थाचीं देसी प्रेमें भजकांस मोरया ! दानें
नच पसरावें मुख, जळनिधिच्या जलदासमोर, यादानें. ३
ऐकावें त्वां प्रभुनें निजवर्णन जें विनायका ! याचें
निजबाळवचन म्हणती पितृकर्ण न जेंवि नायकायाचें. ४
ब्रह्मांडाधार तुझे जरि दिसती हस्त-पाद आखुडसे,
शिखिसिंहवासुकीतें दापीच, त्वद्भयें न आख्य डसे. ५
विघ्न तुला कर जोडिते, सोडिति त्यां, जे त्वदंघ्रि आठविती
स्वजनांतरायशमना ! हरिहरहि तुला निरोप पाठविती. ६
हेरंबा ! अंबा तुज अंकीं घेती, बसोनि पर्यंकीं
हें किति ? परम प्रेमें बससी रतिजानिच्याहि अर्यंकीं. ७
तूं विद्यांचा दाता, अससि, विसावा महेश्वरा ताता,
धन्या दुर्गा माता, प्रसवुनि तुज विघ्नवारिभृद्वाता. ८
तूं सिद्धिबुद्धिभर्ता; देवा ! ब्रह्मांडसृष्टिचा कर्ता,
अमररिपूंचा हर्ता; म्हणता ब्रह्मादिकां न ये वर्ता. ९

Пікірлер

    Келесі