खरबूज शेती करावी तर अशी, 🌱लागवड, हंगाम, बियाणे, संगोपन, विक्री संपूर्ण मार्गदर्शन🥇कृषी हेच जीवन 🇳🇪

कृषीभूषण
मा.श्री.बालाजी दत्तात्रय लोहकरे
प्रगतिशील शेतकरी
मु.पो.बेगमपूर ता.मोहोळ जि.सोलापूर
मोबाईल नंबर 9823666886
#खरबूज #लागवड #कुंदन
श्री #बालाजी_लोहकरे
खरबूज लागवड
नोव्हेंबर 2022 ते सप्टेंबर 2023
लागवडीचे अंतर 6/1.25
झिकझ्याक पद्धतीने खरबूज पिकाची लागवड . जमिनीचा प्रकार लाल तांबडी मिक्स. रोपांची लागवड करताना लगेच पाठीमागे रोपांना पाण्याचे ड्रेंचिंग केले. एक दिवसानंतर बुरशीनाशक +ह्युमिक यांचे ड्रेंचिंग केले
दोन दिवसांनी 19/19/19 +प्लांट ग्रोथ रेगुलेटर यांचे ड्रेंचिंग केले
लागवडीनंतर सातव्या दिवशी बुरशीनाशकाची फवारणी करून क्रॉप कव्हर ने संपूर्ण खरबूज बेड 21 दिवसांकरता झाकून घेतला त्यामुळे कडाक्याच्या थंडीत सुद्धा खरबूज वेलीची जोमदार वाढ झाली.
उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाशापासून संरक्षण झाले आणि पावसाळ्यामध्ये पावसापासून संरक्षण झाले.21 दिवसांनी क्रॉप कव्हर बाजूला केला. खरबूज पिकाच्या अवस्थेनुसार 12/61/00
13/40/13
00/52/34
बोरॉन,कॅल्शियम नायट्रेट, मायक्रोन्यूट्रिएंट, पीक वाढीसाठी उपयुक्त असणारी उत्पादने यांचा वापर केला.
प्रति एकरी 15 ते 20 टनांपर्यंत खरबुजाचे उत्पादन मिळते. एक एकर क्षेत्रासाठी संपूर्ण खर्च 80 हजार ते एक लाखापर्यंत खर्च येतो.
नोव्हेंबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये खरबूज पिकाचे 23 प्लॉट कृषीभूषण बालाजी लोहकरे सरांनी 100% सक्सेस केलेले आहेत.
या खरबूज पिकाला विक्री करताना कमीत कमी 18 रुपये प्रति किलो ते जास्तीत जास्त 53 रुपये प्रति किलोचा बाजारभाव मिळाला.
शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याने शेती मध्ये हार्डवर्क करता करता स्मार्ट वर्क सुद्धा करणे फार गरजेचे आहे. लोहकरे सरांनी सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावीपणे वापर करून त्यांच्या सर्व पिकांचे विक्री व्यवस्थापन फारच सुखकर पद्धतीने केले आहे.
कृषीभूषण श्री बालाजी लोहकरे सरांच्या शेतीला भेट देण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतून सुद्धा शेतकरी येतात. आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लोहकरे सर योग्य मार्गदर्शन करतात.
या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती व फोटो लोहकरे सरांच्या फेसबुक प्रोफाईलवर सुद्धा तारखेसहित पाहायला मिळेल.
#Farming
#Agriculture
#organic
#baliraja_special
#Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
#आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
#टेक्निकल_बळीराजा
#Technical_Baliraja
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
KZread
/ @balirajaspecial
/ @technicalbaliraja
Facebook page
/ balirajaspecial
Instagram
baliraja_sp...
Twitter
DiwateRamrao?s=08

Пікірлер: 6

  • @bhairawnath487
    @bhairawnath48710 ай бұрын

    कृषिभूषण बालाजी लोहकरे सरांच्या फेसबुक पोस्ट आणि फेसबुक लाईव्ह मधून सुद्धा आम्हाला शेती कशी याची प्रेरणा आणि मार्गदर्शन कायम मिळत आहे सरांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि बळीराजा स्पेशल चे दिवटे सरांना धन्यवाद 🌹🌹

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    10 ай бұрын

    धन्यवाद 🌹🙏

  • @Surajdiwate
    @Surajdiwate10 ай бұрын

    nice 👌

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    10 ай бұрын

    🙏🌹

  • @sandippatil3023
    @sandippatil30236 ай бұрын

    फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात कोहिनूर लागवड चालेल काय सर

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    6 ай бұрын

    व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करून अधिक माहिती घ्यावी

Келесі