No video

Kavitecha Paan | Episode 14 | Guru Thakur

KAVITECHA PAAN | कवितेचं पान - Episode # 14
Guru Thakur reciting his own poems
गुरु ठाकुर काव्यवाचन
कवी : गुरु ठाकुर
Concept & Direction : Madhurani Gokhale - Prabhulkar
Camera : Prasad Jadhav, Alankar Misal, Amol Sangre
Editing : Deepak Kolekar
Production : Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd.

Пікірлер: 406

  • @shrirampatki6866
    @shrirampatki6866 Жыл бұрын

    कवितेचं पान...माझा खूप आवडीचा कार्यक्रम .गुरु ठाकूर यांची प्रतिभा अलौकिक आहे. ते एक उत्तम कवी,गीतकार,संवाद पटकथा लेखकतर आहेतच पण त्यांनु कलेची सुरवात एक व्यंगचित्राकार म्हणून केली.

  • @sugandhamarathichavicha1517
    @sugandhamarathichavicha151711 ай бұрын

    परमेश्वराने विनामुल्य दिलेली सरस्वती ची देणगी गुरु सरांना मिळालीय मनापासून धन्यवाद शुभेच्छा

  • @diptijadhav1645
    @diptijadhav16453 жыл бұрын

    माणुसकीने आपलं मूळ जपण्याची प्रगल्भता आणि आपल्यातलं विनम्र मुल जपण्याची निरागसता दोहोंना सलाम..

  • @avimango46
    @avimango465 жыл бұрын

    “कानाला पापण्या असत्या तर “ ही कल्पना आवडली !

  • @212mayur
    @212mayur4 жыл бұрын

    असे जगावे आव्हानाचे लावून अत्तर... ही माझी सर्वात आवडती कविता गुर ठाकुरांची आहे हे मला या episode निमित्ताने कळले. मी आत्तापर्यंत ती विंदा ची आहे असं समजत होतो.. thanks to।thisepisode& हे ऐकल्यावर तर गुरू आणखीनच माझा fav. झालाय

  • @pratik3302
    @pratik33026 жыл бұрын

    "कवितेचं पान" हा अप्रतिम उपक्रम हाती घेतल्याबद्दल मधुराणी तुमचं कौतुक आणि आभार... गुरू तुम्ही नावाप्रमाणे गुरू आहात, तुमच्या लेखणीतून मातीचा सुगंध येतो...तुमच्यातल्या माणसाने तुमच्यातल्या कलाकाराला सर्वार्थाने समृद्ध केलंय.

  • @vaidehipurohit2932
    @vaidehipurohit29322 жыл бұрын

    पुन्हा एकदा गुरु ठाकूर... प्रतिभासंपन्न कलाकार, सर्वार्थाने समृद्ध माणूस... शतशः नमन... मधुराणी तुमची मुलाखत घेण्याची हातोटी अप्रतिम. समोरच्या व्यक्तीला छान बोलतं करता. तुमचं व्यक्तिमत्व आल्हाददायी आहे. ❤️

  • @amitap78
    @amitap786 жыл бұрын

    खूप सुंदर अनुभव....या एपिसोड ची खूप वाट पाहत होतो.. गदिमा, खेबुडकर अशा प्रचंड ताकदीच्या गीतकारांची आठवण करून देणारी गुरु ठाकूर यांची प्रतिभा म्हणजे या काळातलं सोनेरी पानच आहे! तरीही व्यक्तिमत्व इतकं साधं आणि नेटकं! प्रतिभा विनयेन झळाळते !

  • @vaishalilulay7274
    @vaishalilulay72742 жыл бұрын

    वाळूत चांदण चुरा हे खूप आवडलं। चमकत असलेली वाळू अनेकदा पाहिली पण चांदणचुरा अप्रतिम

  • @jitendravaze6020
    @jitendravaze60204 жыл бұрын

    मधुरा जी तुमचा हा उपक्रम आम्हा रसिकांसाठी मेजवानीच, तुमचं सहजसुंदर निवेदन, ठरवून नाही पण एखाद्या आवडलेल्या शब्दाला वा वाक्याला दाद देण्याची पद्धत खूपच छान. 'कवितेचं पान' ह्या कार्यक्रमाचे बरेच भाग पाहीले पण हा गुरू सरांसोबतचा हा भाग कायम स्मरणात राहणारा. कितीदा ऐकला पाहीला तरी पण मनाचं समाधान होत नाही. खूप सुंदर!!

  • @ashwinijoshi639
    @ashwinijoshi6394 жыл бұрын

    खूप सुंदर ....गुरू तुला खूप खूप आशिर्वाद. अश्याच सुंदर भावपूर्ण अर्थपूर्ण, आशयाच्या कविता तुला सुचूदे आणि आम्हाला मनमुराद आनंद तुटण्याची संधी दे.

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar48545 жыл бұрын

    "कवितेचं पान"अप्रतिमच! एकाहून एक सरस मुलाखती... मधुराणी ग्रेट.... !

  • @rekhasonawane7105
    @rekhasonawane71054 жыл бұрын

    एका साध्या सरळ तरल माणसा ला भेटून कविता ऐकून खूप आनंद झाला

  • @krantijyotiedutech
    @krantijyotiedutech3 жыл бұрын

    मनातल्या जाणिवांना परिस्तिथीचे डंख झाले की शब्द जन्म घेतात आणि कवितेचा जन्म होतो.कवितेच्या पानावर मन झुलत आणि उंच प्रतिभेच्या नभाळी घेऊन जात .🌹🌹अप्रतिम मुलाखत अंजली गोडसे मर्ढेकरांच्या गावातून सातारा🌷🌷

  • @narendravispute8567

    @narendravispute8567

    Жыл бұрын

    तुम्ही सुद्दा प्रयत्न करा, छान लिहाल तुम्ही...

  • @ashwinijahagirdar730
    @ashwinijahagirdar7303 жыл бұрын

    गुरू ठाकूर हे माझे सध्याच्या काळातले आवडते कवी आहेत ...मनस्वी धन्यवाद मधुराणी जी हा एपिसोड केल्याबद्दल. 👍👍👍👍👍

  • @dipalidabhade7722
    @dipalidabhade77222 жыл бұрын

    कौतुकास्पद उपक्रम .... कविताप्रेमिंसाठी मेजवानी.....धन्यवाद मधुराणी जी

  • @shrirampatki6866
    @shrirampatki6866 Жыл бұрын

    खूप छान वाटतं कवितेचं पान हा कार्यक्रम एकताना.

  • @sudhagokhale6593
    @sudhagokhale65935 жыл бұрын

    मधुराणी तू आणि गुरुठाकुर च्या या गप्पा व कविता अन कवितेचं गाणं आणि चाली वरच्या कविता कधी संपूच नये हे जसं मला वाटतय न तसच तुमच्या मध्ये अधून मधून दिसणाऱ्या त्या पांडुरंगालाही वाटत असेल तो कंबरेवर हात ठेवून तुमच्या गप्पा ऐकण्यात रंगून गेलाय आणि माझ्या कडे पाहून मला तुमच्या गप्पां त त्याला होणारा आनंद सांगतोय आणि मीही. तुमचा दोघांचा संवाद चालू आहे आणि आम्हीदोघे एकरूप होऊन ऐकत आहोत त्याचे आशीर्वाद व माझी वाह वा तुमच्या बरोबर आहेत.

  • @priyanshkharote611

    @priyanshkharote611

    3 жыл бұрын

    वाहह छान लिहीलय

  • @DrParagPathrudkar
    @DrParagPathrudkar6 жыл бұрын

    कवी , गीतकार म्हणून गुरु ठाकूर परिचित होते परंतु माणूस म्हणून सुद्धा त्यांचे विचार खूप प्रगल्भ आहेत हे जाणवले. आपले बहुतेक सगळे एपिसोड मी पहिले .. आवडले . समोरच्या कवीला मुलाखत घेतांना कसे खुलवत जावे हे आपल्याला छान जमते .

  • @pravinkulkarni1327

    @pravinkulkarni1327

    6 жыл бұрын

    Manjiri10 Guru Thakur great ani such has kavi aahe are Malala vatatey. Khoop chhan episode. Madhuraniche nether anchoring bhavaley. Pudheel pravasasathi bharpoor shubheccha.

  • @meeghate-khedkar7694
    @meeghate-khedkar76943 жыл бұрын

    सुरेल एपिसोड...कोकणावरची कविता मस्तच...👏👏एपिसोड संपवताना वाचलेली कविता फार सुंदर..प्रेरणादायी 👏❤👏

  • @vinaydesai1017
    @vinaydesai1017 Жыл бұрын

    सुंदर फारच सुंदर

  • @aaravpadvi2660
    @aaravpadvi26606 жыл бұрын

    you tube वर आतापर्यंत सर्वात उत्तम चॅनल कवितेचं पान

  • @vidyamore601

    @vidyamore601

    3 жыл бұрын

    प्रचंड प्रतिभाशाली कवी गुरु ठाकुर आणि कवीच्या प्रतिभेला सहजतेने व्यक्त करायला प्रोत्साहीत करणारी मधुराणी. दोघांना ही खुप खुप शुभेच्छा.

  • @suchetagunjawale1124
    @suchetagunjawale11243 жыл бұрын

    आज अचानक वादळात सापडले हे नाजूक कवितेचे पान खूप खूप छान कार्यक्रम

  • @jayshreedani9914
    @jayshreedani99144 жыл бұрын

    कवितेचे पान हि मालिका खूपच सुंदर आहे

  • @deepaknirmal4506
    @deepaknirmal45064 жыл бұрын

    जाणिवांच्या एका वेगळ्या पातळीवर गेलो ।।। आनंद आणि शुद्ध सुखाचा स्पर्श झाला ।।।। खूप सुंदर ।।।।।।।।

  • @adityasurve8106
    @adityasurve81062 жыл бұрын

    कवितेच पान, ही खूपच संवेदनशील आणि आनंददायक मालिका आहे. आम्हा साळख्य काव्याप्रेमीसाठी तर ही सुवर्ण अशी अविस्मरणीय पर्वणीच आहे. कवी, गीतकार गुरु ठाकूर यांच्या बरोबरचा हा भाग दर्जेदार प्रतिभासंपन्न झाला. गुरु ठाकूर हे गीतकार म्हणून अलौकिक आहेत, पण त्यांच्या मधला प्रतिभासंपन्न संवेदनशील कवीचे दर्शन आज पहिल्यांदा घडले.🌹🌹🌹 कवितेच पान हा मधुराणी गोखले-प्रभुलकर याची खूपच आनंददायक आणि आल्हाददायक संकल्पना, कवितेचे पान हा अविस्मरणीय स्वर्गीय अनुभव होत आहे, त्यांचे मनःपूर्वक आभार.🙏

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi Жыл бұрын

    हा episode मी अनेक वेळा पाहते, ऐकते. फारच सुंदर !!

  • @minakshirahane6671
    @minakshirahane66712 жыл бұрын

    Khuch sunder episode hota......

  • @tusharingole7
    @tusharingole74 жыл бұрын

    खूप छान, बोरिंग tv चॅनेल पेक्षा हे अस्सल जीवनाचं वर्णन वृत्त

  • @shubhangi1947
    @shubhangi1947 Жыл бұрын

    अप्रतिम! मनाला भिडणारी कविता!

  • @gsthakur1210
    @gsthakur12106 жыл бұрын

    गुरू आणि श्रीमती मधुराणी प्रभुलकर, एकदम मस्त मुलाखत झाली. यशस्वी काम विसरून नवीन-नवीन गोष्टी करणं नाहीतर यश तुम्हाला फरफटत घेऊन जातं..... पु.लं. ची आठवण झाली. बटाट्याची चाळ, असा मी असामी, वाऱ्यावरची वरात, वटवट...... प्रयोगांची ठरावीक संख्या झाली की प्रयोग मुद्दाम ह्याच कारणासाठी थांबत असत. त्यांच्या प्रत्येक नाटकात, लिखाणा मध्ये जशी नाविन्यपूर्णता आहे तशी गुरूच्या कविता-गाण्यांमध्ये आहे.

  • @aartishevde283
    @aartishevde2832 жыл бұрын

    मधुराणी धन्यवाद गुरू thakuryala कवितेचे पा न मधे आणल्याबद्दल .एक संवेदनशील कोकणी माणूस ऐकता आला.शेवटची कविता फारच छान

  • @latabalwe2099
    @latabalwe20993 жыл бұрын

    फारच छान. ऐकत रहावे असे वाटते. शेवटची कविता तर अप्रतिम.

  • @ExploreLife360
    @ExploreLife3604 жыл бұрын

    Madhu tai...अप्रतिम अावाज...Tai tumhi aflatun ahat! Tumcha avaj aikun stress dur zala! Lots of love!

  • @meerashinde9177
    @meerashinde91773 жыл бұрын

    फारच सुंदर विवेचन, खूपच अर्थपूर्ण, कविता तर मस्तच.मनापासून आवडणारी कविता, धन्यवाद गुरू ठाकूर .

  • @manishajoshi7693
    @manishajoshi76933 жыл бұрын

    मधुराणी ताई हा उपक्रम खूप खूप सुरेख आहे .इतक्या उत्कृष्ट मेजवानीच तू आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ranjitkale4575
    @ranjitkale45754 ай бұрын

    व्वाह....खूपच छान. गुरु ठाकुर एक प्रतिभावान कवी तर आहेच पण त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून खूप ग्रेट आहे. गुरुला खूप खूप शुभेच्छा ! आणि हा उपक्रमही खूप छान...

  • @nandkishorlele5888
    @nandkishorlele58884 жыл бұрын

    फार मोकळेपणाने काव्य प्रवास ,कला प्रवास उलगडून दाखविला आहे। मधुराणी ताई तुझ्यामुळें हे सर्व आमच्या पर्यंत पोहोचल आहे ।।।किती किती आभार मानू ।।।पुन्हा केव्हा येणार यांना भेटीस घेवून।

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog31595 жыл бұрын

    मोरनिंग वोक झाल्यानंतर बागेत मस्त बसून श्री गुरुं ना ऐकलं.....खूप छान....खूप मोठा माणूस पण तेवढाच नम्र......आनंद....आनंद.....

  • @sarikapatil4387
    @sarikapatil43872 жыл бұрын

    कार्यक्रम ऐकून खूप छान वाटले👌👌🙏

  • @prashcop
    @prashcop3 жыл бұрын

    अप्रतिम आजचा भाग पाहून मला आलेला रायटिंग ब्लॉक नक्की जाणार

  • @deepapujari112
    @deepapujari1123 жыл бұрын

    खूपच सुंदर. मी आधीपासून कविता करत होते. ह्या कार्यक्रमामुळे ऐकून पारायण करून inspiration घेऊन जास्त कविता करू लागले .गुरु ठाकूर ह्याच्या कवीता वाचून, ऐकून, काही शब्द, अर्थ, विषयामुळे प्रेरणा घेऊन मी माझ्या अजून कविता केल्या thanks.

  • @geetabudhale2822
    @geetabudhale28224 ай бұрын

    खूप सुंदर विचार आहेत गुरु ठाकूरजी

  • @snehlekani2906
    @snehlekani2906 Жыл бұрын

    सर, धन्यवाद खूप छान माहिती दिली तूम्ही प्रेरणादायी आहात

  • @bhavanavispute4925
    @bhavanavispute49254 жыл бұрын

    खूपच छान .. मधुराणी यांची ही संकल्पना खूपच छान . गुरू ठाकूर यांच्याबरोबरचा हा संवाद आणि कविता अप्रतिम

  • @kiranshah9438
    @kiranshah94383 жыл бұрын

    खूप सुंदर कार्यक्रम ! गुरू ठाकूर यांच्या कविता खूप आवडल्या .त्याचा साधेपणा जाणवत होता . उपक्रम खूप छान . मला आत्ता याची माहिती झाली . मनावर मोहिनी झाली आहे

  • @sandip_natha_agane07
    @sandip_natha_agane072 жыл бұрын

    खुपच सुंदर सर जी...

  • @user-my1gz1sv1v
    @user-my1gz1sv1v23 күн бұрын

    अफलातून कार्यक्रम... खूप आवडला!👏🏻👏🏻

  • @radhikav2530
    @radhikav25303 жыл бұрын

    खूपच छान मैफिल होती..👌 गुरू ठाकूर यांच्याकडून त्यांच्या कवितेच्या प्रवासाबद्दल ऐकायला मिळाले छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्या कवितेचे पान या उपक्रमात. दोघांचेही खूप आभार!🙏 👍

  • @letslearntogether5433
    @letslearntogether54334 жыл бұрын

    अप्रतिम शो मधुरानी, गुरू ठाकुर दि ग्रेट.

  • @vandanaaher5865
    @vandanaaher58654 жыл бұрын

    अप्रतिम कविता आणि अनुभव विचार

  • @sanjayjadhav5884
    @sanjayjadhav58844 жыл бұрын

    अतिमधुर कविता, सुंदर शब्दांची जोड. गुरू ठाकूर आपण छान कविता लिहीता..

  • @anjaligurav9977
    @anjaligurav99772 жыл бұрын

    Uttam

  • @manjiriendait9940
    @manjiriendait99406 жыл бұрын

    मधुराणी तू विचारलेले प्नश्न खूपच आवङले. खूप सुंदर एपिसोङ!

  • @pushpakolhe9090
    @pushpakolhe90902 жыл бұрын

    असे जगावे ...खूप छान ..

  • @vrushalioka1707
    @vrushalioka1707 Жыл бұрын

    खूप सुंदर कविता, मनाला भावणाऱ्या

  • @rekhavaidya7784
    @rekhavaidya77846 жыл бұрын

    कार्यक्रम खूपच छान झाला... तुमच्या लहान पणीच्या आठवणी माझ्या लहानपणाशी मिळत्याजुळत्या आहेत. तुमच्या पुढच्या मुलाखतीची आतुरतेने वाट बघेन.👌 खूप मस्त

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar48545 жыл бұрын

    अथांग शब्दसागरातील लाटा झेपावत,झेपावत काठावरती येतात, मनाची सोनेरी वाळू रसिकतेने चिंब भिजून जाते....ह्रदयातून उत्फूर्त दाद येते......वाह गुरू👌वाह ....मधुराणी 👌अप्रतिम💐

  • @secondhandgaming7072
    @secondhandgaming7072 Жыл бұрын

    सर्वच कविता खूप छान आहेत

  • @anandikerkar
    @anandikerkar3 жыл бұрын

    💖💖💖💖दोघेही खुप छान 👌👌👌👌💐🙏 तुमच्या कविता तर भारीच..... शब्दच नाहीत

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi41622 жыл бұрын

    क्या बात है ... गुरू ठाकूर व मधुराणी दोघांनाही सस्नेह नमस्कार ...💐🙏🙂

  • @dnyaneshyedge3016
    @dnyaneshyedge30164 жыл бұрын

    पाहिलेल्या काही एपिसोडपैकी मनाला पाझर फोडून गेलेला हा एपिसोड... गुरु ठाकूर सर मनात घर करून राहिलात..... धन्यवाद.... 🙏🙏🙏

  • @dale617
    @dale6172 жыл бұрын

    ताई कवितेचे पान. एक उत्कृष्ट उपक्रम. मनाला भुरळ घालणारा.

  • @dr.anupam_borade
    @dr.anupam_borade3 жыл бұрын

    पाचूच्या रानात ! , तसा मी ताकास तूर हि लागू दिला नव्हता ..! 👌👌👌

  • @sushantj3285
    @sushantj32856 жыл бұрын

    आजपर्यंत फक्त एक गीतकार म्हणून गुरू ठाकूर यांच्या बद्दल ऐकून होतो पण हा एपिसोड पाहिल्यावर नव्याने त्यांची ओळख झाली. एक कलावंत आणि त्याचे विचार किती सोपे आणि साधे सरळ असतात. खुप छान वाटलं. मधुराणी जी आपणांस अनेक अनेक धन्यवाद.

  • @medhajogdeo8975
    @medhajogdeo89754 жыл бұрын

    मधुराणी,तुमचे खूप खूप कौतुक,अभिनंदन आणि या उपक्रमास मनापासून शुभेच्छा. तुमचा हा उपक्रम माहीत होता पण ऐकायचा योग आला नाही.पण आता वाटलं की इतके दिवस योग आला नाही ते चांगले झाले.kovid19 चा धुमाकूळ चालू असताना मी प्रवास करून आले सुखरूप,पण 14 दिवस होम quarantine होते.नेमकं याकाळात मी तुमचा चॅनेल subscribe केला आणि माझ्या सारख्या कविता प्रेमीला खजिनाच मिळाला.आणि हे 14 दिवस अगदी मेजवानी मिळाली मला.एपिसोड पहातानाचा वेळ कसा गेला ते कळले नाही आणि मग दिवसभर त्या कवितांची आणि तुमच्या बोलण्याची धून मनात वाजत राहायची,आणि त्या नादात साऱ्या दिवसाचे सोने झाले.तुम्ही कार्यक्रम conduct पण अतिशय दिमाखदार पणे करतात. खूप सांगायाचे आहे अजून ....पण काय आणि कसे सांगू ,ते सारे फिकेच आहे या लखलखीत कवितांपुढे.

  • @priyanshkharote611
    @priyanshkharote6113 жыл бұрын

    मला शेवटची कविता विंदांची वाटायची... गुगल images मधे तसच दिसतं. खुप चकीत झालो मी. वा गुरू. धन्यवाद मधुराणी.

  • @nandkishorlele5888
    @nandkishorlele58884 жыл бұрын

    गीतकार याला सून म्हणूनच काम करावं लागतं । किती चपखल सांगितलं आहे। फारच प्रेरणादायक....

  • @user-bc9bf6sz9u
    @user-bc9bf6sz9u4 жыл бұрын

    लॉक डाऊन सत्कारणी👍

  • @saeebai
    @saeebai4 жыл бұрын

    वा...छान रंगली मुलाखत ..पाचुच्या रानात दंग झालो..

  • @sujanshirodkar1578
    @sujanshirodkar15782 жыл бұрын

    नाते माझे मातीशी खुणगाठ मनाशी नाती जपा स्वतःसाठी समाधान सर्वासाठी

  • @sarveshjoshi7462
    @sarveshjoshi74626 жыл бұрын

    सृजनाची परिभाषा ! वाह गुरु !

  • @deepapujari112
    @deepapujari1124 жыл бұрын

    मी आता आताच तुमचे काही एपिसोड पाहिलेत. खूप सुंदर, मी ही कविता लिहिते. खूप छान विचार मिळतात मनन करायला.

  • @nileemajoshte5348
    @nileemajoshte53489 ай бұрын

    Great , 👍 Hats off to you Guru Thakur 🎉

  • @nandkumardhavalikar4251
    @nandkumardhavalikar4251 Жыл бұрын

    उपक्रमास शुभेच्छां

  • @nikhilnilawar2597
    @nikhilnilawar2597 Жыл бұрын

    Khup khup aawadla

  • @dhananjaykothawale7949
    @dhananjaykothawale79495 жыл бұрын

    मस्तच.... राणीताई तुमच्या आवाजातील पाचूच्या रानातं खुपच मस्त.

  • @ujwalakawyagandh1619
    @ujwalakawyagandh16193 жыл бұрын

    अतिशय सुंदर गुरू सर सुंदर मधुराणी सुंदर

  • @pandurangdombepatil9493
    @pandurangdombepatil94936 жыл бұрын

    गुरू ठाकूर हे खूप सिम्पल राहणीमान असलेले महान प्रतिभा लाभलेले कवि, गीतकार आहेत त्यांच्या sadhepanatun त्यांच्या महान प्रतिभेचे दर्शन होते ग्रेट...

  • @veena197419
    @veena1974192 жыл бұрын

    दुसऱ्या भागाची खूप आतुरतेने वाट पाहतो आहोत.

  • @sonalmayannache1282
    @sonalmayannache12825 жыл бұрын

    वाह वा वा वाहहह.. काय लिहिलंय माणुसकी वर ... तोडच नाही.. जगातल्या सगळ्या अगदी सगळ्या प्रशनांची उत्तरं एका वाक्यात .. मानाचा मुजरा तुम्हाला गुरू सर..

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh53853 жыл бұрын

    कवितेचे पान मध्ये आज खूप छान व्यक्तीमत्वाला आपण बोलवलंत धन्यवाद , खूप छान विचार; शब्दांवर प्रभूत्व असलेला एक सुंदर चित्रकार खूप खूप कौतुक 👍👍👍👍👍🌹🌹

  • @adityiswalkar3909
    @adityiswalkar39094 жыл бұрын

    खुपच छान अविस्मरणीय आहे हे कवितेचे पान नुसत्याच कविताच नाही तर व्यक्ती देखील कळुन जाते ह्या पानातुन👏👏 गुरु ठाकुर दि ग्रेट👍👍

  • @jayashreegore5799
    @jayashreegore57993 жыл бұрын

    वाह, क्या बात है. गूरू ठाकूर, मधुराणी फार छान कवतेचं पान.

  • @ashishkshirsagar6524
    @ashishkshirsagar65246 жыл бұрын

    फारच सुंदर, आल्हाददायक अनुभव होता. अनेक शब्द पुन्हा ऐकण्याचा योग आला.

  • @KARAN-xf2it
    @KARAN-xf2it6 жыл бұрын

    गुरू ठाकुर यांच्या कवी गुणाला सलाम... Aaj 6 year nantrr prt haa episode baghitalaa aani titakaach to navinyapurn anubhavalaaa ..❤

  • @veenasurve8243
    @veenasurve82432 жыл бұрын

    Guru Tuze Dole... ek Sunder Kavita aahe.

  • @nirajashwini
    @nirajashwini6 жыл бұрын

    कार्यक्रम खूपच छान झाला. मधुराणीचे प्रश्न खूप वेचक असतात जे कार्यक्रमाची रंगत वाढवतात. गुरू ठाकूर.... मनापासून धन्यवाद

  • @aadnyadalvi8865
    @aadnyadalvi88652 жыл бұрын

    खुपच सुंदर

  • @smita5340
    @smita5340 Жыл бұрын

    ❤❤❤

  • @dipakmastud8662
    @dipakmastud86623 жыл бұрын

    शब्दच नाहीत सर तुम्हच्या कौतुकासाठी. मला खंत आहे की इतक्य ऊशीरा मी तुम्हाला ऐकले.

  • @vedantgemer7430
    @vedantgemer7430 Жыл бұрын

    गुरू ठाकूर .....प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व 🙏

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar83014 жыл бұрын

    अप्रतिम ! संपूच नये असा भाग. कोकणवासियांचा अभिमान

  • @khushaldesai501
    @khushaldesai5014 жыл бұрын

    फारंच छान, खूप मजा आली... नवोन्मेदित कवींसाठी 'ठाकूर' साहेब, 'खरे' 'गुरू' आहेत... 😍😍😍

  • @Niks655
    @Niks6556 жыл бұрын

    फारच सुंदर, अनेक शब्द पुन्हा ऐकण्याचा योग आला.

  • @smitakale3672
    @smitakale36723 жыл бұрын

    कवितेच्या पानातुन उमगत गेल्या कविता आणि कवी ,कवीचे भावविश्व ,मन तृप्त झाले पण कानाला आस लागली असे काही सुंदर मनातले कवीच्या शब्दात आणि मधुराणीच्या सोबत कवितेचे पान ऐकावयाची.

  • @introption3820
    @introption38206 жыл бұрын

    खूप छान कविता आहेत, मनाला भिडनाऱ्या आणि चेतना जागवणाऱ्या आहेत. मधुराणी तुमचा हा उपक्रम खरच स्तुत्य आहे. गुरु ठाकूर सरांसोबतचा आणखिन एक ऐपिसोड नक्कि बघायला आवडेल.

  • @dilipsapkal1256
    @dilipsapkal12566 жыл бұрын

    गुरु ठाकुर मराठी वाङमयाचा माथा उन्नत करणारे बहुआयामी व्यक्तीमत्त्व .आजच्या युवकांचे प्रेरणास्थान . त्यांच्या कतृत्वाला सलाम व पुढील वाटचालीस शुभेच्छा !

  • @asnikarsd
    @asnikarsd5 ай бұрын

    काय बोलू दोघे ही उत्कृष्ट भरपूर ज्ञान ,मनोरंजन आपली दोघांची चर्चा कधीच संपू नये असे वाटते. आभारी आहे. 🙏

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 Жыл бұрын

    खूप सुंदर कार्यक्रम आणि गुरू ठाकूर यांच्या कविता

Келесі