एकनाथ षष्ठी विशेष | संत एकनाथ महाराज यांची संपूर्ण माहिती | Eknath_Maharaj

Ойын-сауық

#षष्ठी_विशेष#संपूर्ण_माहिती#Eknath_Maharaj
नाथ षष्ठी
संत एकनाथ महाराज
संत एकनाथ (१५३३-१६००) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला.
शांतिब्रह्म, 'संत 'पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह 'ज्ञानाचा एका ' या बिरुदावलीने साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत एकनाथ. आदर्श गृहस्थाश्रमी, मायमराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमति पंडित, दयेचा सागर या शब्दांतही त्यांचे वर्णन करता येईल.
एकनाथांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदान्त, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव.
एकनाथांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती.
एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सद्गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. नाथांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले, असे म्हणतात. आत्मबोध, पूर्णगुरुकृपा, आणि भगवंत दत्तात्रेय यांचे दर्शन यांमुळे नाथांचे जीवन धन्य झाले. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या.
नाथांनी एका सद्गुणी व सुलक्षणी मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित या नावाने प्रख्यात झाला. तो परंपरेचा अतिशय अभिमानी होता. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.
कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत.
संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी नाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते. संपूर्ण समाज कर्तव्यच्युत झालेला होता. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता. भर दिवसा स्त्रिया बाटविल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. 'बये दार उघड ' असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला. ते 'एका जनार्दन ' म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.
अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले. 'एकनाथी भागवत ' हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्र्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे (व्यासकृत) काव्य अतिशय प्रासादिक आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणीस्वयंवरअत्यंत लोकप्रिय होते. नाथांची दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) प्रसिद्ध आहे. या महात्म्याने विपुल वाङ्मय निर्माण करून मराठी भाषा समृद्ध केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२५ फेब्रुवारी इ.स. १६००) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस नाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो
🙏🏼😌
नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले " गजर किर्तनाचा " या आपल्या लोकप्रिय KZread Channel वर
तुमच्या कड़े काही व्हिडिओ किंवा किर्तन असेल तर आम्हाला खालील इमेल वर पाठवू शकता .
आपल्या जवळ कविता, कॉमेडी व्हिडीयो, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या KZread Channel वर सहर्ष प्रदर्शित करू
Mo:9075098220
Email : arvindshinde77933@gmail.com
टिप...
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our KZread Channel
" गजर किर्तनाचा "
Don't Forget to SUBSCIRBE to our KZread Channel गजर किर्तनाचा

Пікірлер: 10

  • @harilalgatkhane3203
    @harilalgatkhane3203 Жыл бұрын

    खुप छान माहिती आहे महाराजांचे दर्शन झाले आज, त्या वेळेस जिल्हाच नाव औरंगाबाद नवत त्या वेळेस खर नाव काय होते ते नाव पाहिजे असत।

  • @sandipkjagtap863
    @sandipkjagtap8633 ай бұрын

    जय हरी🙏🙏🙏🙏🙏

  • @advprasadchandras5969
    @advprasadchandras59693 ай бұрын

    संत एकनाथ महाराज यांची कोल्हापूर जवळ बुवा चे वाठार इथे दुसरी गाधी आहे तिथून आम्ही संथ एकनाथ महाराज यांचे वंशज आहोत

  • @chavan7458
    @chavan74582 жыл бұрын

    राम कृष्ण हरी खूप छान माहिती आणि आज एकनाथ षष्टी आहे या व्हीडिओ चा माध्यमातून आम्हाला नाथांच्या दर्शन मिळाले खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Omkarghawat.
    @Omkarghawat.3 ай бұрын

    श्री एकनाथ महाराजांचे वंशज कोणते याचा व्हिडिओ टाका

  • @rageshreeshastri8823
    @rageshreeshastri88232 жыл бұрын

    🙏🪔🌹 जय जय राम कृष्ण हरी! 🌹🪔🙏

  • @rageshreeshastri8823
    @rageshreeshastri88232 жыл бұрын

    🙏🪔🌹जय जय राम कृष्ण हरी! 🌹🪔🙏

  • @vilaskarve6123
    @vilaskarve6123 Жыл бұрын

    नाथ महाराज यांच्या घरी साक्षात् भगवान् गोपाळकृष्ण यांनी श्रीखंड्या च्या रुपात येऊन त्यांची सेवा केली.. कावडीने पाणी भरले.. याचा उल्लेखच नाही... आश्र्चर्य वाटले..

  • @user-dl8hb4gp8q
    @user-dl8hb4gp8q3 ай бұрын

    जाती भेद, नष्ट करणे च्या कार्या मुलेच सर्व समाजात एकनाथ शष्टि साजरी होते, अन्नदान होते

  • @akshaykoli-dt8jo
    @akshaykoli-dt8jo Жыл бұрын

    मृत्यु नका म्हणु जलसमाधी बोला

Келесі