कदम घराण्याचे कुळ, मूळ आणि देवक

प्राचीन काळी चेर, चोल, पांडत्र, सातवाहन, वाकाटक, पल्लव, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट यासारख्या दिग्गज घराण्यांनी राज्यकारभार केला. यातील कदंब घराण्याने सुमारे एक हजार वर्षे कर्नाटक, गोवा आणि ओरिसा याठिकाणी सत्ता गाजवूनही ते इतिहासात दुर्लक्षित राहिले.
त्रिलोचनला कदम घराण्याचा मूळ पुरूष मानला जातो. त्यांच्या उत्पत्तीचा संबंध कदंब वृक्षाशी लावला जातो. त्यामुळे कदंब कुळ म्हटले जाते. कदंबांची राजकीय कारकीर्द ही इ.स. ३५३ मध्ये मयुरवर्माने कर्नाटकातील उत्तर कनाडा जिल्ह्यातील बनवासी या ठिकाणी स्थापन केलेल्या राजधानीपासून होते. पल्लव दरबारात अपमान झाल्यानंतर कदंबाचे स्वतंत्र राज्य निर्माण केले, मयूरवर्मानंतर पुढे कंगवर्मा, भगीरथ, रघू, काकुस्थवर्मा, शांतीवर्मा, कृष्णवर्मा, कुमारवर्मा यासारखे पराक्रमी राजे होऊन गेले. या राजांनी पुढे हळशी, उच्छंगी या स्वतंत्र राजधान्यातून बेळगांव, खानापूर, संपगाव, सिरसी, सावनूर, शिमोगा, हुबळी या परिसरावर राज्य केले. या दरम्यान कदंबांनी प्रथमच कन्नडला प्रशासकीय भाषेचा दर्जा दिला. कर्नाटकातील बनवासी, हनगल, हळशींगे, सांतलिगे येथे कदंबांची छोटी राज्ये १२ व्या शतकापर्यंत कायम होती. क .दंब घराण्याची माहिती देणारा सर्वात मोठा संदर्भ कर्नाटकातील तालगुंड शिलालेखात आहे गोव्यातही कदंबांनी इ.स. १००७ ते १२३७ पर्यंत साम्राज्य गाजवले. षष्ठीदेव हा गोव्यातील कदंब वंशाचा संस्थापक असून त्यानंतर पुढे जयकेशी, गुहल्लदेव, पेर्माडी यासारखे राजे होऊन गेले. आज गोव्यात दिसणारी ग्रामव्यवस्था ही कदंबांनी दिलेली देणगी आहे. गोव्याची ग्रामदेवता सप्तकोटेश्वराची उभारणी कदंब राजांनी केली. याचाच पुढे छत्रपती शिवरायांनी जिर्णोद्धार केला. त्यांना कोकण चक्रवर्ती ही पदवी होती.
गोपिकापट्टण म्हणजे गोवा ही कदंबांची राजधानी असून या घराण्यात जयकेशी, पेरमाडी यांच्या उज्वल कारकिर्दीबरोबरच कमलादेवी, महादेवी, लक्ष्मीदेवी यासारख्या कतृर्त्ववान स्त्रियाही होऊन गेल्या. याच पेरमाडीच्या पत्नी कमलादेवींनी संपगाव तालुक्यातील देगावे (कर्नाटक) याठिकाणी इ. स. ११४७ मध्ये कमलनारायण आणि महालक्ष्मीचे सुंदर असे बांधलेले आहे.
आपल्या कार्यकाळात कदंबांनी गोव्यामध्ये गद्याना, होन्नू, बेले, व्हाईज, हगा यासारखी आपल्या नावानी नाणी पाडली होती. ज्यावर कमळ आणि सिंहाचे चित्र असून कदंबांनी सोन्याची नाणी पाडली होती हे विशेष आहे. गोव्याच्या अनेक भागात कदंबांचे शिलालेख, ताम्रपट सापडतात. गोव्याला वैभव प्राप्त करून देण्याचे काम कदंब राजांनी केल्यामुळेच तेथील बस वाहतुकीला कदंबा ट्रान्सपोर्ट हे नाव देऊन सरकारने या घराण्याचा गौरव केला आहे..
कर्नाटक आणि गोव्यानंतर कदंब घराण्याने ओरिसा राज्यातही प्राचीन काळापासून आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानुसार धर्मखेडी, प्रतापदेव यासारख्या राजांनी ओरिसात कदंबांची सत्ता निर्माण केली. त्यानुसार पुढे पुरी, अंगूल, अथम्लीक, मांडपा या परिसरात कदंबांची सत्ता होती. इंग्रजांच्या काळात ओरिसात कदंब जमीनदार म्हणून छोट्या छोट्या संस्थानात विभागला होता. या संस्थानांना तेथे १९ तोफांची सलामीचा मान होता. आजही तेथे कदंबांची मोठी जमीनदार घराणी आहेत.
खर तर कदंब म्हणजे कदम असून ते मूळचे सुर्यवंशीय, मानव्य गोत्री, सिंह हे त्यांचे लांच्छन, लाल रंगाचे निशाण, झेंड्यावर अर्जुनाप्रमाणे वानर होते. कर्नाटक, गोव्यानंतर कदम सर्वत्र विखुरले गेले त्यावेळी प्रसंगानुरूप त्यांना भिसे, भोग, कोकाटे, राजगुरू, नुसपुते, महाले, डोके, कोरडे, बोबडे, सातपुते, धुमाळ इत्यादी आडनावे मिळाली.मध्ययुगीन कालखंडातही कदमांनी विविध सत्तामध्ये आपले नाव राखले. बहामनी कालखंडात (१४२१) फक्रुद्दीन निजामी यांनी 'कदमराव पदमराव' नावाचे काव्य लिहून पद्मराव राजाविषयी माहिती दिली आहे. तर गोव्यांमध्ये कदंबाच्या अगोदर बहामनी सत्तेचे मुख्य सेनापती म्हणून खूप कदम हे मुख्य सेनापती होते. तर विजापूरच्या आदिलशाहीत बंकापूरच्या पर्वतराव कदमांनी आदिलशाही विरोधात केलेले बंड मोठे गाजलेले. छत्रपती शिवरायांच्या कालखंडात अनेक कदमांनी स्वराज्याची सेवा केली. राजांनी काढलेल्या कर्नाटक मोहिमेत तामिळनाडूचा बलगंडापूरमचा किल्ला जिंकल्यानंतर त्याची किल्लेदारी शहाजी कदम यांच्याकडे दिली होती. पुढे शिवरायांच्या निधनासमयी सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. अशावेळी राजगडावर राजांसोबत जी जाणकार मंडळी उपस्थित होती त्यात बाजी कदमांचा समावेश होता. याची बाजीने पुढे छत्रपती राजारामांना सावलीप्रमाणे सोबत राहून मोठी मदत केली. बारामतीची आठ वर्षे जहागिरी ही बाजी कदमांकडे होती. शाहुंनी या घराण्याला विशेष सन्मान देत अमृतरावाचा पुतण्या मल्हाररावांचा विवाह आपली कन्या गजराबाईसोबत केला होता. कदमबांडे घराण्यात अमृतरावासोबत संताजी, रघूजी, कंठाजी, गोजानी यांनी मोठी कामगिरी केली. कंठाजी कदमांची गुजरात प्रांतात मोठी दहशत होती.
या त्रिंबकरावांची मुलगी बडोद्याच्या पहिल्या सयाजीराव गायकवाडांना दिली होती. कदमबांडे घराण्याकडे नंदूरबार, रनाळा, तोरखेड, कोपर्ली, ठाणे, धुळे या ठिकाणची जहागिरी होती. तुळजाभवानीचे मुख्य पुजारी म्हणून कदम कार्यरत असून याच घराण्यातील आनंदरावांची मुलगी महादजी शिंदेंना दिलेली होती. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचा कारभार याच कदमांनी चालविला. आजही तेथे डंकेवाले कदम आणि हत्तीवाले कदम यांच्या नावाने बाजार आहेत.
आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात कदम विखुरलेले असून कर्नाटक, गोवा, ओरिसा या राज्यामध्ये कदम कुलाचा अभ्यास शिकविला जातो. मात्र चालुक्य, पल्लव, वाकाटक यांना अभयदान देणाऱ्या कदंबांचा इतिहास महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात नाही. मल्हारराव होळकरांच्या झंेड्यातील लालरंग त्यांना कदमाप्रती आदरभाव म्हणून ठेवला होता. कर्नाटक सरकार बनवासी येथे दरवर्षी करोडो रूपये खर्चुन कदंब महोत्सव भरविते. २००५ साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एका नौसेनिक तळाचे नाव आय.एन.एस कदंबा ठेवले आहे

Пікірлер: 82

  • @sanjaykadam5373
    @sanjaykadam537310 күн бұрын

    🙏 आम्ही कोकणात देवगड तालुक्यातील कदम. देवगड तालुक्यात हडपिड, ओंबल, आरे, गडीताम्हाणे या ठिकाणी कदम परिवाराचे वास्तव्य आहे.

  • @akshaykadam1742
    @akshaykadam17424 ай бұрын

    महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे ही कदमच व विदर्भतील महान नेते पंजाबराव देशमुख यांचं ही मूळ आडनाव कदमच तसेच आर आर आबा ही

  • @sampatkadam9289
    @sampatkadam92894 ай бұрын

    खूपच छान इतिहास सांगितला 96 कुळी क्षत्रिय कदम घराण्याचा सर

  • @vishnukadam7771
    @vishnukadam77714 ай бұрын

    आम्ही मूळचे तुळजापूर चे पुजारी आहे, पण आता जालना जिल्ह्यात जाफ्राबाद तालुक्यात राहतो. खूप छान माहिती आहे. प्रत्येक कदम घराण्यातील व्यक्तीला ही माहिती असली पाहिजे. आमच्या शेतात आजही फार जुनी कदंब वृक्ष आहे. आजही त्याला तोडायला चालत नाही.

  • @TULJA1919

    @TULJA1919

    4 ай бұрын

    Waaa

  • @srkadam1499
    @srkadam14992 ай бұрын

    आम्ही कदम लग्न सोहळ्यात कळंब वृक्ष देवक समजतो. कदंब वृक्षाला निव सुध्दा म्हणतात. कळंब वृक्ष सुध्दा त्याच वर्गवारीतील झाड आहे.

  • @rajukadam9534
    @rajukadam953412 күн бұрын

    🌹🙏 आम्ही एकविरा देवी ची पूजा करतो.

  • @chandukadam7909
    @chandukadam79092 ай бұрын

    आम्ही पण कदम मूळचे तुळजापूर सध्या रत्नागिरी जिल्हा, संगमेश्वर तालुक्यातील घाटिवळे गावी राहतो. आमचे कुळ कदंब वृक्ष आहे.🙏 आपण सांगितलेली माहिती खूपच छान आहे. खूप खूप धन्यवाद. 🙏

  • @shivajipatil5470
    @shivajipatil54704 ай бұрын

    जय भवानी जय शिवराय

  • @vilaschorghe5013
    @vilaschorghe50132 ай бұрын

    कदंब 🚩🚩

  • @kadamlaxman8047
    @kadamlaxman80474 ай бұрын

    खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद🙏😘💕

  • @user-uf5zt1zc4r
    @user-uf5zt1zc4r2 ай бұрын

    आम्ही पण तुळजापुरचे कदम ब्रह्मवाकडी ता.सेलू जि.परभणी येथे राहतो. आई राजा उदो उदो बोल भवानी की जय🚩🚩

  • @user-ct1zg5tp3j
    @user-ct1zg5tp3jАй бұрын

    सर अतिशय सुंदर माहिती दिली आहे. 🚩जय भवानी जय शिवराय 🚩

  • @shalankadam450
    @shalankadam450Ай бұрын

    धन्यवाद सर कदमाचे कुलदैवत .सांगितल

  • @sambajikadam6371
    @sambajikadam637117 күн бұрын

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @shankarkadam5503
    @shankarkadam55032 ай бұрын

    दादासाहेब, मनापासून धन्यवाद आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. अतिशय सुंदर माहिती आपल्या संपूर्ण समाज बंधनाच्या पर्यंत आणली आहे, " आपणास माझा सोल्ड सॅल्युट " हरहर महादेव, जय माता पार्वती "👏

  • @balajikadam2064
    @balajikadam20644 ай бұрын

    सर तुळजापूर येतून आलो आहोत आता कंधार नांदेड येते रहातो अगदी माहिती बरोबर आहे

  • @tawadep265
    @tawadep2652 ай бұрын

    👌👌छान माहिती. सप्तकोटेश्वर च उल्लेख आला म्हणून विचारात आहे की *एक महत्त्वाचे म्हणजे.*........ पुरातन काळापासून चालत आलेले सातवाहन ..... सातकर्णी.....सप्तपदी.....सप्तशती....सप्तकोटेश्र्वर.....सप्तृषी....सप्तशृंगी...सप्त मात्रुका इत्यादी. हे जे काही सात आकड्या भोवती फिरत आहे यांचा परस्परांशी काही कनेक्शन आहे की फक्त योगायोग आहे.

  • @scholarspoint176
    @scholarspoint1763 ай бұрын

    कदम कुळविषयी खूपच छान माहिती मिळाली आभार सर जी

  • @ajitkadam9643
    @ajitkadam96434 ай бұрын

    कदम ❤

  • @yogitasangekar6015
    @yogitasangekar60152 ай бұрын

    खूपच छान माहिती आहे .

  • @sanjaykadam7516
    @sanjaykadam75163 ай бұрын

    Dhanyawad sir atishay sunder mahiti aapan kadam gharanyachi dilit tyasathi aaplyala manapasun Dhanyawad ashich aankhi chann mahiti aani etihas kadam gharanyacha sagava 🚩jay bhavani jay shivaji 🚩 jay maharastra 🚩

  • @Sanskrutikadam636
    @Sanskrutikadam6364 ай бұрын

    छान माहिती आहे

  • @bhausahebkadam92
    @bhausahebkadam924 ай бұрын

    खुप छान माहीती सांगितली सरजी

  • @user-bv2wr9ug3o
    @user-bv2wr9ug3o4 ай бұрын

    खुप छान माहिती आहे सर

  • @user-le2he8um3c
    @user-le2he8um3c4 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद साहेब माहिती दिल्या बद्दल❤❤❤

  • @kakasahebkanse9680
    @kakasahebkanse96804 ай бұрын

    खूप छान सर

  • @ManoharKadam-gh4we
    @ManoharKadam-gh4we4 ай бұрын

    Aam hi kadam asun ajun sakhol mahiti pathawa aapala krutadnya pimpalgaon mor

  • @harishchandrachorghe2026
    @harishchandrachorghe20264 ай бұрын

    खूप छान माहिती 🙏

  • @dilipbkadam5968
    @dilipbkadam59682 ай бұрын

    आम्ही पण कदम कोराटे तालुका दिंडोरी नासिक

  • @bharatkadam7051
    @bharatkadam70514 ай бұрын

    धन्यवाद सर

  • @yogitakadam8567
    @yogitakadam85673 ай бұрын

    Aamhi pan kadam aahot pan aamhi aaryache kadam/ Devgad aahot

  • @upsumakantkadam5112

    @upsumakantkadam5112

    3 ай бұрын

    कदंम्बा वशंज

  • @prashantkadam9667
    @prashantkadam96674 ай бұрын

    सर, आपण खूप छान माहिती दिली आहे.

  • @RAMsubhashkadam
    @RAMsubhashkadam4 ай бұрын

    🙏

  • @sonawane09
    @sonawane092 ай бұрын

    सोनवणे कुळाचे मुख्य कुळ वंश गोत्र व कोणाचे वंशज आहेत हे सांगा

  • @arunborhade7032
    @arunborhade7032Ай бұрын

    आमचेही देवक कळंब वृक्ष आहे. कदम कुळी आहे. मराठा..

  • @dnyaneshwargavande2745
    @dnyaneshwargavande27454 ай бұрын

    सर आमचे पूर्वीचे कदम आताचे गावंडे गोत्र आगस्त ऋषी लग्नात कळंब चे फुल

  • @kadamvinayak1
    @kadamvinayak12 ай бұрын

    कदम यांचे गोत्र कोणते आहे?

  • @upsumakantkadam5112
    @upsumakantkadam51124 ай бұрын

  • @upsumakantkadam5112
    @upsumakantkadam51123 ай бұрын

    धन्यवाद

  • @CShamikaHKadam
    @CShamikaHKadam8 күн бұрын

    आम्ही पण कदम खेड तालुका जांभगे गाव

  • @TULJA1919

    @TULJA1919

    8 күн бұрын

    रामदास भाईंचे गाव

  • @CShamikaHKadam

    @CShamikaHKadam

    8 күн бұрын

    हो आमचची कुलदेवी तुळजापूर ची तुळजाभवानी आहे का आम्हाला माहित नाही कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻

  • @TULJA1919

    @TULJA1919

    8 күн бұрын

    हो कदम यांची कुलदेवता तुळजाभवानी आहे दरवर्षी कुलाचारासाठी दर्शनाला जात जावे

  • @CShamikaHKadam

    @CShamikaHKadam

    8 күн бұрын

    धन्यवाद sir 🙏🏻

  • @dheerajdayal8995
    @dheerajdayal899526 күн бұрын

    सर, आमचे आडनाव दयाळ ( गोंधळी )आहे. पण आमचे मूळ आडनाव कदम आहे असे ऐकले मी ऐकले आहे. त्या बद्दल अधिक माहिती द्यावी.🙏

  • @madhavghatage8610
    @madhavghatage86104 ай бұрын

    घाटगे घराण्यात ची.माहिती.सागा.सर

  • @jijabraokadam8489
    @jijabraokadam84893 ай бұрын

    अमळनेर तालुक्यातील तापी काठच सावखेडा येथे पण तुळजा भवानी देवीचे भव्य मंदिर आहे ! खानदेशात सावखेडा व नरडाने जवळ धुळे जिल्ह्यात दोन सख्या भावांनी वसविलेली बहुसंख्य असलेली कदमांची गावे आहेत ! 😊

  • @dnyandevborde8686
    @dnyandevborde86864 ай бұрын

    आम्ही पण तुळजापूर येथील कदमच आहोत पण आता छत्रपती संभाजी नगर तालुका गाव दुधड येथे आहे

  • @digambarkadam4521
    @digambarkadam45212 ай бұрын

    Koknatil kadam devache Tak konte

  • @ganpatkadam5714
    @ganpatkadam57143 ай бұрын

    Koknat kadam gharaneche kuldavat poojasathi konte te sangave mahitisathi

  • @amrutapatade3827
    @amrutapatade3827Ай бұрын

    Hi Sir can you tell Patade surname kuldevata

  • @kartikpol.
    @kartikpol.4 ай бұрын

    सर आपण खुप छान कदम घराण्याची माहिती दिली, पण मराठे सोडून इतर समाजाच्या कदम घराण्याची माहिती मिळाली तर बरे होईल

  • @TULJA1919

    @TULJA1919

    4 ай бұрын

    हो वारंवार वेगवेगळे विषय येत असतात माझे पूर्ण चॅनल पहा अनेक नवीन विषय मी मांडत असतो

  • @bhagvanbobhate91
    @bhagvanbobhate914 ай бұрын

    Sir.....Bobhate navachi mahiti milel ka? Amhi koknat ,kudal ,akeri ya gavi rahato amchi jat hindu maratha ahe

  • @bharatbodke2867
    @bharatbodke28674 ай бұрын

    सर खुपच छान माहिती आहे मला एक प्रश्न आहे कदम घराण्यात बोडके आहेत काय

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik17862 ай бұрын

    सर आमचे आडनाव -नाईक असे असून, सिंधुदुर्ग जिल्हा, तालुका -सावंतवाडी, गाव -आरोंदा हे आमची कुलदेवी -तुळजाभवानी, कदम (नाईक )असे आहे अरोंदा येथील भवानी मातेच मंदिर, सावंतवाडी संस्थान यांनी भवानी माता घाटा वरून आणली व त्यात देव पाटेश्वर स्थापित केलेचे पुजारी सांगतात. या विषयी नाईक(96 कुळी -मराठा )आमचे देवक -कळंम, (कदंब ), कुळ -कलम (कदंब )असे पुजारी सांगतात. या विषयी आपण आम्हास मार्गदर्शन करावे.

  • @TULJA1919

    @TULJA1919

    2 ай бұрын

    आपण मूळचे कदम आहात ही नाईक ही पदवी आहे त्यामुळे तुळजाभवानी ही कुलदैवत आणि कदम हे आपले देवक आहे

  • @chandrakantkoparde2615
    @chandrakantkoparde26152 ай бұрын

    कोपर्डे घराण्याची माहीती मीळेल काय

  • @kishormalwadkar1591
    @kishormalwadkar15912 ай бұрын

    माळवदकर कुलदेवता आणि गोत्र कोणते आहे उगम कुठला सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज

  • @user-bv2wr9ug3o
    @user-bv2wr9ug3o2 ай бұрын

    सर आमचे पुर्वी चे आडनाव कदम होते आता शेंडगे झाले आहे. ते कसे

  • @ManoharKadam-gh4we
    @ManoharKadam-gh4we4 ай бұрын

    Me kadam gharanyacha wansha asun krisnaji,kadam va shahaji kadam yancha aahe ,tulajapur che aahe, pimpalgaon mor

  • @vijaykadam5884
    @vijaykadam58844 ай бұрын

    आम्ही तुळजापूर येथील भोपी आहेत तर आमच्या नोंदी मिळतील काय संपर्कासाठी पत्ता द्या आता आम्ही परभणी जिल्हा वास्तव आहे

  • @user-uf5zt1zc4r

    @user-uf5zt1zc4r

    2 ай бұрын

    आम्ही पण तुळजापुरचे कदम ब्रह्मवाकडी ता.सेलू जि.परभणी येथे राहतो. आई राजा उदो उदो बोल भवानी की जय🚩🚩

  • @srkadam1499
    @srkadam14992 ай бұрын

    सर्व पाटील, देशमुख, देसाई वगैरे पदवी वरून आलेली आडनावे आहेत. त्यांनी आपापली मूळ आडनावे/कूळनावे शोधून वापरली पाहिजेत. नाहीतर कालांतराने पुढील पिढ्यांना त्यांचे मूळ, कूळ समजणार नाहीत. सोयरिक करताना अडचण येऊ शकते.

  • @theuniquemsrtc7355

    @theuniquemsrtc7355

    2 ай бұрын

    आमच्या गावात ही सर्व कदम आहेत...फक्त एक घर देसाई आहे पण आडनाव मात्र अजून हि ते घर कदम लावतात कंसात देसाई लिहितात...😊 देसाई ही पदवी आहे ....

  • @pareshghadigavakar6419

    @pareshghadigavakar6419

    2 ай бұрын

    सिंधुदूर्ग जिल्ह्यातील गावऱ्हाटी मधील लोक ही मराठा, भंडारी,ब्राम्हण समाजातील आहे यात गावकर म्हणजे परब घाडी गुरव गावडे इतर देवळी मडवळ चर्मकार इत्यादी यांची कुलाचार मराठा समाज प्रमाणे आहे व त्यांचे देवक मांड कुलदेवता 96 कुळी मराठा समाज प्रमाणे मिळते जुळते आहे पण कोंकण मध्ये नव बौध्द समाज यांची आडनाव ही सुधा मराठा समाज प्रमाणे मिळते जुळते आहे. पण काही ठिकाणी मराठा समाज सारखा कुलाचार पण आहे, कुलाचार पाटा पण आहे व कुलदेवता पण मराठा समाज प्रमाणे मिळते जुळते आहे. मूळ नाव कशी मिळवता येतील काही मार्गदर्शन मिळेल का?

  • @shubhu25252
    @shubhu252523 ай бұрын

    गहालोल कुळ म्हणजे कोणते कुळ आहे plz sanga

  • @ganpatkadam5714
    @ganpatkadam57143 ай бұрын

    Amhi gaditamane deogadche ahot krupaya kuldavat mahiti nahi

  • @chandrakantphatak2244
    @chandrakantphatak22444 ай бұрын

    फाटक घरनी कुळ दवत कोणता आहेदवक आनी गोत्र कोणतं आ ह हे

  • @madhavigilbile8627
    @madhavigilbile86273 ай бұрын

    आमचे आडनाव गिलबिले आहे व आमचे कुळ कदमांचेच आहे असे म्हणतात व लग्नाच्या वेळी सुद्धा कदंब वृक्षाचीच पुजा करतात मग हे असे कसें

  • @TULJA1919

    @TULJA1919

    3 ай бұрын

    वेळ काळ प्रसंगानुसार आडनावात बदल झालेला असतो

  • @keshavkadam2272
    @keshavkadam22724 ай бұрын

    काही जण कळंब म्हणतात सर ..हा कळंब आणि कदंब जवळपास सारखेच असतात..आम्ही कदम लग्नात शमी/ शमदड देवक काढतांना वापरतात...नांदेड मध्ये..

  • @TULJA1919

    @TULJA1919

    4 ай бұрын

    कदम आणि कळंब एकच आहे कुठल्याही परिस्थितीत कदमांचे देवक हे कदमच वापरले पाहिजे

  • @arunkadam185
    @arunkadam185Ай бұрын

    जमदग्नी गोत्र लावतो

  • @ajitkadam6269

    @ajitkadam6269

    7 күн бұрын

    Bhardvaj

  • @madhavghatage8610
    @madhavghatage86104 ай бұрын

    घाटगे घराण्यात ची.. माहिती.सागा..सर

Келесі