केशर आंबा विक्री ,१०० टक्के दुप्पट नफा, सघन लागवड ते विक्री संपूर्ण मार्गदर्शन, Mango farming

केशर नर्सरी
मु.पो माळीनगर (तांबवे) ता माळशिरस जि सोलापूर
संस्थापक
कै कृषिभूषण सुरेश वाघधरे
कृषिभूषण पुरस्कार 2002
जगजीवन राम राष्ट्रीय पुरस्कार 2005
वसंतराव नाईक उर्जानिर्मिती पुरस्कार 2007
प्रोप्रायटर
श्री विनय सुरेश वाघधरे
M.Sc. The Netherland
मो.नं. 9922353097
7350504449
केशर आंबा अ्रली हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी, इतरांपेक्षा एक महिना आधी आंब्याची विक्री कशी करावी.
• √साऊथ आफ्रिका तंत्रज्ञ...
केशर आंबा,मियाझाकी,सोनपरी,माया,टोमी एटकिन इतर व्हरायटी समज गैरसमज या विषयातील सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आहे
• कशी करावी सघन आंबा लाग...
शेतकरी मित्रांनो केशर आंबा विक्रीसाठी काढत असताना कोणती काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
केशर आंबा तोडणी कशाप्रकारे करावी ,कोणत्या अवस्थेमधील केशर आंबा विक्रीसाठी योग्य असतो ,केशर आंबा तोडल्यानंतर त्याची पिकवण्याची पद्धत कशी असावी ,आणि सर्वात महत्त्वाचे विक्री करत असताना आंब्याची विक्री कशी करावी. या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
शेतकरी बांधवांनी आंब्याची रोपे खरेदी करताना महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त नर्सरी मधूनच रोपांची खरेदी करावी. नर्सरी मधील रोपे बारा महिने ओपन प्लॉटमध्ये वाढवलेली असावीत. त्या रोपांना उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूंची सवय झालेली असावी.
नवीन व्हरायटी ची लागवड करताना त्या व्हरायटीची संपूर्ण माहिती घेऊनच लागवड करावी
केशर नर्सरी माळीनगर (तांबवे)
शेतकरी मित्रांनो केशर नर्सरी माळीनगर पासून अगदी जवळच मु पो तांबवे ता माळशिरस जि. सोलापूर मध्ये आहे.
तीस वर्षांपासून विश्वास हीच परंपरा कायम ठेवून नैसर्गिक वातावरणात वाढलेली उच्चप्रतीची केशर आंबा रोपे केशर नर्सरी माळीनगर मधून शेतकऱ्यांना पुरवठा केली जातात.
सघन आंबा लागवड
सघन लागवडीमुळे एकरी झाडांची संख्या वाढते. उत्पादनात वाढ होते. कलमांचा सांगाडा तयार झाल्यानंतर तिसऱ्या वर्षांच्या सुरवातीला कलमांची चांगली वाढ होऊन भरपूर मोहोर येतो. व्यापारीदृष्ट्य फळांचे चांगले उत्पादन मिळू शकते.
सघन पद्धतीने आंब्याची लागवड १५×७.५ फुट किंवा १४×७'फुट अंतराने करण्यात येते. त्यामुळे एकरी चार पट झाडांची संख्या वाढते. झाडांची संख्या वाढल्याने ४ ते ५ वर्षांत एकरी १० ते १२ टन उत्पादन घेणे शक्य होऊ लागले. आठ वर्षांच्या बागेपासून हेच उत्पादन १० ते २० टनांपर्यंत पोचले. आपल्याकडे अतिघन पद्धतीने लागवड शक्य आहे. ती लागवड करताना चौरस पद्धतीने न करता आयताकृती पद्धतीनेच करावी. म्हणजे एकीकडून अति कमी अंतर ठेवावे, तर दुसरीकडून सर्वसाधारण अंतर ठेवावे. दक्षिणोत्तर ओळी झाल्यास दिवसभर कलमांना उन्हाचा चांगला फायदा होतो. अतिघन लागवडीमध्ये झाडाचा घेरनियंत्रित ठेवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने छाटणी, तसेच वाढरोधकांचा वापर इ. बाबींचा वापर करावा लागतो.
अतिघन लागवडीचे फायदे - ठराविक क्षेत्रातून अधिक उत्पादन. झाडे लहान असल्याने फळांची विरळणी, फवारणी, छाटणी, आंतरमशागत इ. कामे करणे सोपे होते. - आंबा फळे झेल्याऐवजी हाताने व्यवस्थित काढता येतात. - फळांची निर्यातयोग्य गुणवत्ता येण्यासाठी सहज उपाय करता येतात. - दोन ओळींत अंतर असल्याने फवारणी, खते देणे, आंतरमशागत तसेच फळांची अंतर्गत वाहतूक इ. कामे ट्रॅक्टरने सहज करता येतात.
• कलमांना वळण लागवडीनंतर कलमांना शिफारशीप्रमाणे खत, पाणी द्यावे. प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीड, रोगनियंत्रण करावे. कलम दीड ते दोन फूट उंचीचे होईपर्यंत एकच खोड राहू द्यावे. नंतर शेंडा मारावा. त्या ठिकाणाहून ३ ते ४ फांद्या निघतील. त्यातील चांगल्या व भरघोस वाढलेल्या तीन फांद्या ठेवाव्यात. परत या फांद्यांचा दोन ते तीन पेरानंतर शेंडा मारावा. अशाप्रकारे कलमांचा सांगाडा तयार करून घ्यावा. सांगाडा तयार झाल्यानंतर तिसऱ्या वर्षाच्या सुरवातीला कलमांची चांगली वाढ होऊन भरपूर मोहोर येतो. योग्य खत व पाणी व्यवस्थापन केल्यास तिसऱ्या वर्षी व्यापारीदृष्ट्या फळांचे चांगले उत्पादन मिळू शकते.
#केशरआंबा #मियाझाकी #माया #सोनपरी #टोमएटकिन
#Farming
#Agriculture
#आंबालागवड #Kesarmangofarming
#Natural_farming
#organic
#baliraja_special
#sheti
#shetkari
#sheti_vishyak_mahiti
#Balirajaspecial
#Reels #Shorts
#शेती #शेतकरी #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
#आधुनिक_शेती #यशोगाथा #बळीराजास्पेशल
🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
KZread
/ @balirajaspecial
/ @technicalbaliraja
Facebook page
/ balirajaspecial
Instagram
baliraja_sp...
What's app Chanel
whatsapp.com/channel/0029Va9O...

Пікірлер: 10

  • @sukhichavan8614
    @sukhichavan86142 ай бұрын

    Atishay chan mahiti

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    2 ай бұрын

    धन्यवाद 🙏💐

  • @simongumes1896
    @simongumes18964 ай бұрын

    Nice 💯

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    4 ай бұрын

    Thanks 💯

  • @ravindrachangan6428
    @ravindrachangan64288 ай бұрын

    खूप छान

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    8 ай бұрын

    🙏💐

  • @bhairawnath487
    @bhairawnath4878 ай бұрын

    वाघधरे सर खुप चांगली माहिती मिळाली. केशर नर्सरी ला ३० वर्षे पूर्ण झाली पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    8 ай бұрын

    🙏💐

  • @leelabhele
    @leelabhele6 ай бұрын

    लागवडीनंतर किती वर्षात फळ मिळतं

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    6 ай бұрын

    3 ते 4 वर्षे

Келесі