Jalna मधून बेपत्ता झालेली ३ मुलं २ दिवसांनी Shirdi मध्ये कशी सापडली ? नक्की काय घडलं होतं

#BolBhidu #jalna #jalnamissingkids
१५ ऑगस्ट २०२३ रोजी जालना शहरातून १० वी मध्ये शाळकरी मुलं अचानक गायब झाले. बेपत्ता झालेले तिनही मुलं चांगले मित्र आहेत. मात्र त्यांच्या एकाच वेळी गायब होण्यामुळं जालना शहरात खळबळ उडाली होती. यातील एकाने चिट्ठी लिहून घर सोडलं होतं तर दुसऱ्याने स्नॅपचॅटवर घरच्यांना मॅसेज केला होता. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून कदिम पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूध्द ३६३ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तिघे बेपत्ता असल्याची माहिती फेसबूक, व्हॉटस्ॲप अशा सोशल मीडियावर सगळीकडे पोस्ट करण्यात आली. १५ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट असे तब्बल 48 तास शर्थीचे प्रयत्न सुरु होते. यासाठी कदीम जालना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्या पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे आणि अंमलदार रामेश्वर राऊत यांच्या टीमने तपास केला. अखेर १७ ऑगस्ट रोजी पोलिसांना शिर्डीचं लोकेशन मिळालं. त्याआधारे पोलिसांनी शिर्डी गाठलं...नक्की काय घडलं त्या मुलांसोबत ? ते बेपत्ता तिघेजण सापडले का ? पाहूया या व्हिडीओमधून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 475

  • @krishnanaikwade
    @krishnanaikwade

    माझा मिञ पण असाच पळून गेला होता सापडल्यावर त्याच्या घरच्यांनी लाथांनी तुडवला😂

  • @malikamasala1
    @malikamasala1

    २१ च्या पुढचे मुलं काही मनावर घेईना म्हणून यांनी जास्तच मनावर घेतलं स्वावलंबी होण्याचं 😮

  • @gautamshitole7639
    @gautamshitole7639

    मुलांचे घरचे पोलीस मिडिया वाले असे होते म्हणून इतक्या तत्पर कार्यवाही ने काम झाले नाही तर सर्वसामान्याच्या मुलांच्या तपास देखील लागला नसता. 😢

  • @aamolrpatil7794
    @aamolrpatil7794

    महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातली एक एक बातमी ...!

  • @mohittaur3735
    @mohittaur3735

    ह्यातल्या एका जना चे वडील पोलिस मधे आहे म्हणून शोध इतक्या लवकर लागला.. मागच्या महिना भरात 28 जणांचा शोध मात्र लागू शकला नाही कारण जलसंपदा किंवा पोलिस खात्यात त्यांचे पालक रुजू नसतील..

  • @Blackfish110
    @Blackfish110

    नौकरी आणि पैशाच्या मागे धावण्याच्या नादात कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ..😊

  • @pradumn99
    @pradumn99

    इथ आम्हीं 25 वर्षाचे घोडे झालो. आजुन अक्कल नाही, Settle व्हायची 😢

  • @govindborkar9191
    @govindborkar9191

    गध्यानो ९महीने आईने पोटात वाढविले बापाने उपाशीपोटी राहून काम केले, नालायक मुलांनो त्यांची काळजी घ्या आम्ही ६५वर्षांचेवर आहोत.आई वडील काय चिज आहे तुम्हाला कळणार नाही. म्हणे काही तरी करून दाखवू नंतर घरी येऊ . मला वाटते ह्या मुलांना हे जग किती निष्ठूर आहे ह्याची जाणीव नसावी.अरे बाळांनो हे जग अत्यंत निष्ठुर आहे. जो थोडासा प्रेमळपणाचा कुठेतरी ओलावा दिसतोय तो फक्त आभासी आहे जग अत्यंत निष्ठुर आहे.

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908

    काही जास्तच motivational video बघितला वाटते 😂😂

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187

    चार दिवस राहिले असते फ़क्त 👍🏻नंतर घरीच गेले असते 🤣🤣🤣🤣🤣

  • @shindeb2
    @shindeb2

    बहुतेक mba चायवाला,bsc पाणीपुरी वाली आणि josh tak वाल्यांचे video पाहिले असणार 😂 आणि ते तिसरी का चौथीच शेंबड पोरगं आठवी नववी चा गणित शकवतं असे ते म्हणत की मंजिल तो.......😂 ते असले video पाहुन पुढचा ध्यास घेतला असणार

  • @rishiraul
    @rishiraul

    पोलिसांच्या कार्याला सलाम

  • @jyotsnabande9736
    @jyotsnabande9736

    या वयात आई वडील दुश्मन वाटत असतात पण ती एक फेज असते, असे पळून जाणे त्याला पर्याय नाही,ही वेळ अभ्यास करायची, सावरा टीनेजर्स....आणि धन्यवाद बोल भिडू

  • @Vive.k_11
    @Vive.k_11

    मुलाच शहाणपण

  • @user-wx2yu3dh2b
    @user-wx2yu3dh2b

    माझा एक मित्र असाच निघुन गेला होता तेही ट्रक वाल्यासोबत तेसुद्धा छत्रपति संभाजीनगर ते दिल्ली पंधरा दिवसांनी परत आला घरच्यांचा एकुलता एक होता,घरच्यानी खूप बघितले,परत आल्यानंतर घरच्यानी खुप लाड केले आता देशी पिऊन बोंबलत फिरतोय गावात

  • @pradipkale5479
    @pradipkale5479

    A

  • @ashok_shinde
    @ashok_shinde

    त्यांना पन समजल असेल की शिकून पन काय नोकरी मिळणार नाही म्हणुन आताच पायावर उभे राहून पुढे भविष्य घडवले जाईल 💯..

  • @subodh4892
    @subodh4892

    माझे दोन मित्र असेच पळून गेले होते आठवड्यानंतर पप्पाला रडत फोन केला अन् म्हणे 'पप्पा आम्हाला घ्यायला या आमच्याकडचे पैसे संपले आहे परत यायचे पण पैसे नाहीये😭'

  • @user-pb3cb4th3v
    @user-pb3cb4th3v

    मी पण नाशिक मधे एका रूम वर भाड्याने रहात होतो तर तिथे मी घर मालकाला एव्हड motivation दिलं की तोच आता नाशिक सोडून पुण्याला रहायला गेला आहे. 😂

  • @sahil8201
    @sahil8201

    अरे मुर्खांनो घर काय असत हे शिक्षणा साठी बाहेर राहणाऱ्यांना विचारा

Келесі