गुरू ठेवील तैसे | पंत भजन | दत्त प्रेमलहरी पद ८०१ | datta premlahari pad 801 | guru thevil taise

Ойын-сауық

#pantmaharajbalekundri #pantbalekundri #पंतमहाराजबाळेकुंद्री
गुरू ठेवील तैसें राहावे ।। कैवल्य-सुख भोगावे ।।
अनंत स्त्रिया भोगुनी निशिदिनी ।। ब्रह्मचारी म्हणवावे।।
सर्व जगाची हिंसा करुनी ।। दयाळुत्व मिरवावे ।।
दत्तगुरुसी गिळुनी सहज ।। प्रेमें भजनी नाचावे ।।
मी सांगतो त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करा. त्याचा व्यवहारिक अर्थ लावाल तर फसाल. त्याचा व्यवहारिक अर्थ लावता पण येत नाही. विवेक दृष्टीने पहा. माझे म्हणणे असे आहे की, गुरू म्हणजे परमात्मा. तो ठेवील तसे रहावे. या संसारात अनेक आपत्ती येवोत, सुख प्राप्त होवो की दुःखाचे डोंगर कोसळोत, ते निमुटपणे सहन करून, आपली शांती ढळू देऊ नये. आपणांशी याचा कांहीहि संबंध नाही, याचा देहासी संबंध हे जाणून आपण अलिप्त राहून, स्वस्वरूपाची अखंड भेट हेच कैवल्य आहे. त्याचे सुख भोगीत राहावे. आत्मानंदात अखंड रमत राहाणे. ।।धृ।। मनात अनेक विचार तरंग उठतात. एक विचार उठतो, खेळतो व नाहीसा होतो. याला वृत्ति म्हणतात. अशा अनेक वृत्ति दिवसभरात व रात्री झोपेतही उठतात. तर ह्या अनंत वृत्तिरूपी खिया होत. यांचा रात्रंदिवस भोग घेऊन, आपण साक्षी भावाने अलिप्तच राहावे. या वृत्तिचा माझ्याशी कांहीही संबंध नाही. असे तटस्थेने पहावे. अशा प्रकारे साक्षीत्व साधून, स्वतः ब्रह्मस्वरूपाचे आचरण करावे. त्या ब्रह्मस्वरूपात सदा रमावे. असे आपण ब्रह्मचारी म्हणवून घ्यावे. भोग भोगून अभोक्ता, कर्मे करून अक्रिय या सहज स्थितीत रहावे. ।।१।। त्या प्रमाणे द्वैतरूपी जगताचा भ्रम गुरूच्या ब्रम्होपदेशाने काढून टाकावा. अशा प्रकारे या ज्ञान तलवारीने जगाचा नाश करावा. हीच जग हिंसा आहे. हे जग नसून ब्रह्मच असे स्थापित करून, या जगांतील प्राणिमात्र आपणांसह सर्व ब्रह्मच आहेत. आपल्यांत त्यांच्यात भेद नाही; अशा समतेने जगाकडे दृष्टी ठेवून, सर्वांशी प्रेमाने वागावे, त्यांच्याकडे दयार्द्र अंत:करणाने पाहून, प्रत्येक प्राणीमात्रांवर दया करावी. त्यांचे रक्षण करावे. असे दयाळूत्व गाजवावे. ।।२।। आणि आपला हितकर्ता सद्गुरू दत्त याचेकडे भिन्न भावनेने न पाहता, तो व मी एकरूपच आहोत, असे जाणून, गुरुशिष्य हा भेद काढून टाकून, गुरुस्वरूपी समरस होऊन, सहज स्थितीत प्रेमाने त्या दत्तगुरूच्या भजनांत आनंदाने प्रेमाने नाचावे! ||३||
प.पू. भाऊसाहेब दड्डीकर यांच्यासमोर भजनसेवा सादर करताना बालमुकुंद भांदिगरे आणि सहकारी

Пікірлер: 43

  • @vishnukoli5996
    @vishnukoli59965 жыл бұрын

    आपले प्रत्येक भजन - अभंग मनास पंतचरणास व सेवेस नेतात

  • @user-zo3xp3bh7j
    @user-zo3xp3bh7j Жыл бұрын

    ॐ श्री गुरुदेव दत्त

  • @santoshpavale1810
    @santoshpavale18107 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त

  • @eknathgovekar9125
    @eknathgovekar91258 ай бұрын

    Apratim Anna.. Datt

  • @shubhangipawar2811
    @shubhangipawar2811 Жыл бұрын

    🙏🙏🚩🚩🌹🌹🌷🌷🌹🌹🙏🙏

  • @dhanrajbhavsar1915
    @dhanrajbhavsar1915 Жыл бұрын

    Khupch sundar

  • @sagarmithari5111
    @sagarmithari51112 жыл бұрын

    छान 🙏

  • @wasudeowadikar3796
    @wasudeowadikar37962 жыл бұрын

    व्वा सुंदर

  • @satapparajigare5936
    @satapparajigare59362 жыл бұрын

    Super

  • @vinayakkulkarni8472
    @vinayakkulkarni84728 ай бұрын

    दादा फार छान आवाज आहे सारखं आयकाव वाटतं

  • @avinashparit7354
    @avinashparit73544 жыл бұрын

    हे माझे आवडते पद आहे खूप छान आहे सद्गुरू माझा पाठीराखा

  • @anandakamble9177
    @anandakamble91773 жыл бұрын

    संत अधिकारी पुरुषांच्या वाक्याची एकवाक्यता पहा ठेविले अनंते तैसेचि राहावे संत तुकाराम आणि पंत महाराजांचा हा अभंग धन्य ते गुरू धन्य ते संत कोटी कोटी दंडवत बापूसाहेब असळजकर

  • @digambardesai897
    @digambardesai8973 жыл бұрын

    श्री पंत समर्थ

  • @arvindpatil2563
    @arvindpatil25633 жыл бұрын

    अप्रतिम

  • @prathameshmangalwedhe5574
    @prathameshmangalwedhe55742 жыл бұрын

    जय गिरनारी 🙏🏻

  • @girishdesai2737
    @girishdesai27374 жыл бұрын

    खूप छान. 👌👌👌

  • @avinashparit113
    @avinashparit1134 жыл бұрын

    खूप छान दादा माझं आवडतंय भजनं

  • @lalitawadile9936
    @lalitawadile99362 жыл бұрын

    खूपचं छान आहे भजन मला खूप आवडते

  • @dattatrayamutalik5271
    @dattatrayamutalik52715 жыл бұрын

    Sundar manala khup prassana vatte.

  • @bhagwatchaudhari376

    @bhagwatchaudhari376

    4 жыл бұрын

    Dattatraya Mutalik apratim

  • @arvindpatil2563
    @arvindpatil25633 жыл бұрын

    दत्त अवधूत

  • @mayurtambre8237
    @mayurtambre823711 ай бұрын

    Sorry mi itke divas bhajan aaik toy but like kele nai karan itka mag hotu tumchya bhjnat tya pat karnyatach man ramta, so like atta detoy😅

  • @dattatrayasupermutalik8322
    @dattatrayasupermutalik83224 жыл бұрын

    Man prasann shabd nahit.

  • @pradipghatge1618
    @pradipghatge16185 жыл бұрын

    Vehri naic

  • @BhausahebDaddikar

    @BhausahebDaddikar

    4 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/rIGNrNKRl7KYpag.html नमस्कार गुरुदत्ताला हे पद पाहिले नसेल, तर जरूर पहा आणी ऐका। professional Audio मध्ये रेकॉर्डिंग केले आहे।

  • @nikhilsonawane5444
    @nikhilsonawane54444 жыл бұрын

    आपले हे भजनी मंडळ बघून श्री मिलिद दातार महाराज भडगांव सायांचा कीर्तनाची आठवण झाली

  • @srujansakre9322
    @srujansakre93223 жыл бұрын

    ❤️❤️❤️🙏🙏🙏

  • @sandeepmane6492
    @sandeepmane64922 жыл бұрын

    मला भजन खूप आवडते

  • @babasahebkhot5714
    @babasahebkhot57144 жыл бұрын

    1 number fakt audio neeet nahi

  • @BhausahebDaddikar

    @BhausahebDaddikar

    4 жыл бұрын

    हा विडिओ २००८ साल चा असून, खूप सहज पणे चित्रित केला आहे। आत्ताचे नवीन येणारे व्हिडिओस प्रोफेशनल पद्धतीने काढायचा प्रयत्न चालू आहे।

  • @babasahebkhot5714

    @babasahebkhot5714

    4 жыл бұрын

    Ok sir sorry for disturbance

  • @BhausahebDaddikar

    @BhausahebDaddikar

    4 жыл бұрын

    नाही तसं काही नाही, तुमच्या प्रतिक्रियेची गरज आहेच।

  • @BhausahebDaddikar

    @BhausahebDaddikar

    4 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/rIGNrNKRl7KYpag.html नमस्कार गुरुदत्ताला हे पद पाहिले नसेल, तर जरूर पहा आणी ऐका। professional Audio मध्ये रेकॉर्डिंग केले आहे।

  • @ganeshkamble8759
    @ganeshkamble87593 жыл бұрын

    माझ आवडत भजन आहे

  • @jayeshchunekar6940
    @jayeshchunekar69402 жыл бұрын

    Khup Sundar abhang Abhang lihun milel ka?

  • @BhausahebDaddikar

    @BhausahebDaddikar

    2 жыл бұрын

    Krupaya description madhe check kara.

  • @Iampravingiri
    @Iampravingiri7 ай бұрын

    Apratim.Gayakanch nav ky ahe

  • @shrishdeshpande6948
    @shrishdeshpande69484 жыл бұрын

    खुप सुंदर.लिरिक्स लिखीत स्वरूपात पाठवा ना

  • @BhausahebDaddikar

    @BhausahebDaddikar

    4 жыл бұрын

    दत्त प्रेमलहरी पद क्र ८०1, पान १७५

  • @BhausahebDaddikar

    @BhausahebDaddikar

    4 жыл бұрын

    play.google.com/store/apps/details?id=com.premlahari

  • @BhausahebDaddikar

    @BhausahebDaddikar

    4 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/rIGNrNKRl7KYpag.html नमस्कार गुरुदत्ताला हे पद पाहिले नसेल, तर जरूर पहा आणी ऐका।

  • @BhausahebDaddikar

    @BhausahebDaddikar

    4 жыл бұрын

    Description मध्ये संपूर्ण पद लिहिले आहे। एकदा बघून घ्या।

  • @avinashparit113
    @avinashparit113 Жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त

Келесі