Dattatreya Temple, Basara | Place of 14th chapter of Gurucharitra | Dattadham Basar

श्रीगरुमंदिर नागपूर प्रणित श्रीदत्तक्षेत्र बासर निर्मिती कार्य
#dattatreya #temple #gurucharithra
श्री गुरुचरित्रातील 14 व्या अध्यायाचे दिव्य स्थान बासर येथील दत्त मंदिर
नमस्कार
श्री गुरुचरित्र हे सर्व दत्त उपासना संप्रदायातील आद्य ग्रंथ आहे. या ग्रंथाचे महात्म्य मोठे अलौकिक आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने तात्काळ प्रचीती येते असा हा मोक्षदायी ग्रंथ आहे. संकटनिवारण ग्रंथ आहे.
दत्त संप्रदायातील अनेक मंडळींनी गुरुचरित्राचे सखोल अध्ययन पुरस्कार तर केलेच पण अगदी समर्थ संप्रदायातील मंडळीदेखील गुरु चरित्राचा प्रभावाखाली येऊन कृतार्थता पावली. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य श्री ब्रम्हानंद यांना गुरुचरित्र पारायणातूनच आपल्या सद्गुरू भेटीची प्रेरणा प्रत्यक्ष दत्तगुरूंनी दिली. समर्थांना तर प्रत्यक्ष दत्तगुरूंनी दर्शन देऊन आपल्या पादुका दिल्या.
या गुरुचरित्रातील 14 वा अध्यायाचे सांप्रदायिक विशेष महत्त्व आहे.
याचे कारण सायंदेवावर केलेली श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची पूर्ण कृपा.
अगदी दहा वर्षापूर्वी ही घटना जेथे घडली त्या बासर क्षेत्री असलेली भूमी, ते दत्त मंदिर आणि नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वास्तव्य ज्या ठिकाणी झाले ती पवित्र जागा नागपूर येथील प.पू. श्री सद्गुरूदास महाराज यांनी दृष्टांत होऊन शोधून काढली. एवढेच नव्हे तर त्याचा जीर्णोद्धार करून या 8 जून 2022 रोजी तेथे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, सायंदेव यांच्या श्री मूर्तीची स्थापना केली.दत्त मंदिराला देखील नवीन झळाळी प्राप्त करून दिली.
हा प्रचंड मोठा उत्सव चार दिवस चालला.
हजारो लोकांना अन्नदान झाले. या दिव्य कार्याला चार शंकराचार्य व हिमालयातील एकशे चार वर्षाचे यति उपस्थित होते.
त्या दत्त मंदिरासमोरील औदुंबरा खाली कल्याण पादुकांची स्थापना हम्पी पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते झाली. हे दिव्य स्थान आता सर्व दत्तसंप्रदायातील मंडळींना आणि सर्व साधकांना साधने करता खुले झाले आहे.
येथे यावे अनुष्ठान करावे.
गुरुचरित्र पारायण करावे याकरता अत्यंत पवित्र जाणवणारे पुरातन पण आता जीर्णोद्धार झालेले हे मोठे तीर्थक्षेत्र अगदी आत्ता निर्माण झाले आहे. पण अजूनही बऱ्याच दत्त उपासकांना याची माहिती नाही. कृपया हा संदेश ध्वनिचित्रफीत सर्वानपर्यंत पोहोचवावी.
सर्व आध्यात्मिक ग्रुप मध्ये याचा प्रसार व्हावा ही प्रत्येक साधकाला विनंती.
बासर ला कसे जायचे:
हे मंदिर जवळच्या हैदराबाद शहरापासून सुमारे 210 किलोमीटर (रस्त्याने) स्थित आहे. हे TSRTC द्वारे चालवल्या जाणाऱ्या जिल्हा बसेसद्वारे चांगले जोडलेले आहे. MSRTC बसेस हैदराबाद, नांदेड इ. येथूनही धावतात. बासर येथे आपण मुंबई मनमाड-छत्रपती संभाजी नगर-जालना- परभणी नांदेड मार्गे धावणाऱ्या चेन्नई expess, देवगिरी express ह्यांनी सुद्धाजाऊ शकतो. ज्याकी आपल्याला बसरा अर्थात (बासर) station ला उतरवतात . मंदिराच्या जवळचे रेल्वे स्टेशन बासर स्टेशन आहे, जे सुमारे 2.4 किमी अंतरावर आहे.
पत्ताः श्री दत्तधाम बासर, पापहरेश्वर मंदिराजवळ, श्री क्षेत्र बासर जिल्हा-निर्मल
संपर्क आनंदराव पाटील ट्रस्टचे अध्यक्ष
contact details : .9440152259.
मनोज तळूणीकर ट्रस्टचे कोषाध्यक्ष
नंबर 9422996290.
यांच्याशी आपण फोनवर संपर्क करू शकता. माहिती मिळेल.
अधिक माहिती करता श्री गुरू मंदिर नागपुर येथे संपर्क करावा सोबतच पत्र भेट या मासिका चा बासर दत्तक्षेत्र विशेष अंक नक्की पहावा, मागवावा.
#dattatreya #basara #dattaguru #travel #gurucharithra #temple #famous #travel
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Пікірлер

    Келесі