Ashtak Sadguru Shri Ramanand Maharaj | अष्टक सद्गुरु श्री रामानंद महाराज | S.Ajinkya

Музыка

Ashtak Sadguru Shri Ramanand Maharaj | अष्टक सद्गुरु श्री रामानंद महाराज | S.Ajinkya
आज साधन द्वादशी निमित्त हे अष्टक सेवा श्री महाराजांच्या कृपा आशीर्वादाने एस.अजिंक्य या अधिकृत चॅनल वर प्रसरीत झाले आहे
सर्व सद्गुरु भक्तांनी श्रवणानंद घ्यावा जय श्रीराम
Singer, Music, Arrangement, Programming Recording Mixing & Mastaring: S.Ajinkya ( Ajinkya R Shrouty)
|| श्री रामानंद महाराज अष्टक ||
निर्गुण गुण नाही ब्रम्ह त्या काय गावे ।
अगम-निगम थकले मूढ मी काय ठावे ।।
निर्गुण तुज सगुणा आणि ते भक्त प्रेम ।
श्रीसद्‌गुरू रामानंद तुम्हा प्रणाम ||१||
सगुण स्वरूप तुझे सद्गुरू राजयाचे ।
सुखवि मनन दूजे ठाई धारा जयाचे ।।
सतत नयन घेवो त्याच पायी विराम ।
श्रीसद्‌गुरू रामानंद तुम्हा प्रणाम ||२||
मुळि नच जाणे मी निर्गुणा वा सगुणा ।
कळत मजसि नाही धारणा ध्येय ध्याना ।।
आठवण तव होता कंठी दाटोच प्रेम ।
श्रीसद्‌गुरू रामानंद तुम्हा प्रणाम ||३||
सद्गुरू तव नामाविण वाचेसि खंड ।
मुळी नच कधी होवो ध्यान राहो अखंड ||
वमनपरि त्यजावा मन्मने क्रोध काम ।
श्रीसद्गुरू रामानंद तुम्हा प्रणाम ।।४।।
धन सुत मम जाया यातुनि लक्ष काढी ।
असुनि सकळ स्वार्थी ना कळे काय गोडी ।।
फुकट गमविले मी आयु घेवोनि जन्म ।
श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम ।।५||
बहुत आयुहि गेले राहिले अल्प जे की ।
उर्वरित नच जावो व्यर्थ वाया तसे की ||
आजवरि जाहले ते जाहले सव्य वाम ।
श्रीसद्‌गुरू रामानंद तुम्हा प्रणाम ।।६।।
सच्चित घन ऐसे ब्रम्ह तू रामराय ।
मदिय हृदयिं रामानंद तूझेचि पाय ।।
सतत मनि राहावे नावडो हेम-धाम ।
श्रीसद्गुरू रामानंद तुम्हा प्रणाम ।।७।।
जरी चरी वनी धेनू आठवी वत्स नित्य ।
जननी करित कामे बालकापाशी चित्त ।।
तदुपरि गुरूमाये लेकुरा ठेवी प्रेम ।
श्रीसद्गुरू रामानंद तुम्हा प्रणाम ।।८।।
|| "अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्रीब्रम्हचैतन्य-रामानंद-प्रल्हाद महाराज की जय" ।।
|| श्रीराम समर्थ ||
"श्री रामानंद महाराज यांचे थोडक्यात सदचरीत्र"
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे थोर शिष्य परंपरेतील श्रीरामानंद महाराज यांचा जन्म दिवस श्री माघ वद्य द्वादशी ला असतो.
वऱ्हाडातील चांदकी या गावी सन १८८६ मध्ये श्रीपांडुरंगबुवांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना भजनकीर्तनाची आवड होती. आठव्या वर्षी त्यांची मुंज झाली. लहानपणी वडील वारले, म्हणून त्यांचे मामांनी त्यांना नागपूर येथे घरी नेले व शाळेत घातले.
पुढे ते काशीला गेले. काशीक्षेत्री चार महिने राहून अनुष्ठान केले. अनुष्ठान समाप्तीचे वेळेस त्यांना समर्थांचा दृष्टांत झाला - गोदातीरी जा, तिथे तुला दीक्षा मिळेल. तेथे लोक त्यांना श्रीपांडुरंगमहाराज म्हणू लागले. काशीहून ते गोदातीरी मंगरूळ क्षेत्री आले. तेथील मठाचे अधिकारी पुरुष श्रीअंबादास यांनी त्यांना रामदासी दीक्षा दिली व रामानंद हे नाव ठेवले. पुढे जालना येथे श्रीआनंदसागर यांचेकडे जाण्यास त्यांना सांगितले. श्रीआनंदसागरांनी त्यांना गोंदवल्यास श्रीमहाराजांकडे नेले.
श्रीमहाराजांनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले व जवळ बसवून अनुग्रह दिला. श्रीमहाराज त्यांना पांडुरंगबुवा म्हणून हाक मारीत . एक वर्षाच्या वास्तव्यानंतर श्रीमहाराजांनी त्यांना आज्ञा केली की, एका वस्त्रानिशी तीर्थाटनास निघावे, जवळ भांडेही ठेवू नये. भिक्षा मागून रामरायास नैवेद्य दाखवून अन्न भक्षण करावे. मौन धरून नामस्मरण करीत जावे. रात्री भजन करावे. याप्रमाणे चातुर्मास करून तीर्थाटन करून परत येऊन भेटावे. याप्रमाणे आज्ञापालन करून परत आल्यावर श्रीमहाराज प्रसन्न झाले.
चातुर्मास मौन आणि निरशन, फक्त द्वादशीस नैवेद्य, तेच भोजन व तीर्थाटन - असे व्रत सांगून, श्रीगुरुपौर्णिमेस गोंदवल्यास यावे अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे रामानंदांनी कित्येक वर्षे बारा ज्योतिर्लिंगे, सप्तपुर्या, चारीधाम, गंगाप्रदक्षिणा अशा तीर्थयात्रा केल्या. बद्रीनारायणास तीन वेळा जाऊन आले. रामनवमी जालना येथे, गुरुपौर्णिमा गोंदवले येथे व दासनवमी मंगरूळ येथे, असे तीन क्षेत्री न चुकता जात असत.
श्रीमहाराजांनी त्यांना अनुग्रहाचा अधिकार देऊन श्रीरामोपासनेचा प्रसार करण्यास सांगितले. श्रीमहाराजांनी त्यांचा विवाह गोंदवले येथे स्वत:च्या समोर श्रीआनंदसागरांच्या कन्येशी करून दिला.
श्रीमहाराजांनी त्यांना उपासनेसाठी गंडकी शिळेवर ओतलेले श्रीराम पंचायतन दिले. परंपरेने प्राप्त झालेले हे पंचायतन आजही साखरखेर्डा येथील मंदिरात पाहावयास मिळते.
श्रीमहाराजांचे आज्ञेप्रमाणे त्यांनी वऱ्हाडात व मराठवाड्यात श्रीरामनामाचा खूप प्रसार केला. परस्त्री मातेसमान मानून सांगितलेला जप जो करील त्याला ते अनुग्रह देत.
खडतर वैराग्य व सदगुरुभक्तीच्या दिव्य तेजाने अल्पावधीतच अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. जालना येथील श्रीआनंदसागरांनी उभे केलेल्या राममंदिरची व्यवस्था त्यांनी सांभाळली. एका सधन भक्ताने सभामंडपाचा सर्व खर्च देऊ केला असता तो नाकारून श्रीरामानंदांनी भिक्षेने पैसे जमा करून मंदिराचा मोठा सभामंडप आपल्या देखरेखीखाली बांधविला. ते अभिजात कवी होते. त्यांची काव्यशक्ती फार मोठी होती. त्यांनी श्रीमहाराजांवर सुंदर कवने केली आहेत. गोंदवले येथील नित्योपासना ग्रंथात त्यांनी केलेली पदे दिली आहेत. त्यांनी महाराजांवर अनेक सुंदर भावपूर्ण कवने केली आहेत. ते भजनेही फार सुंदर म्हणत. एकतारीवर ते भजन म्हणू लागले म्हणजे त्यांचे देहभान हरपून जाई.
गोंदवल्यास देह ठेवण्याचे भाग्य श्रीरामानंदांना मिळाले. त्यांची तशी इच्छा होती, ती श्रीमहाराजांनी पुरविली. रामानंदांची श्रीमहाराजांवर अत्यंत निष्ठा होती. त्यांच्या आज्ञेचे ते तंतोतंत पालन करीत असत.
🌹श्री राम जय राम जय जय राम 🌹
!! श्रीराम समर्थ !! 🙏🙏

Пікірлер: 11

  • @renukashrouty747
    @renukashrouty7473 ай бұрын

    🙏श्रीराम जयराम जय जय राम🙏

  • @hrishikeshmayee9511
    @hrishikeshmayee95113 ай бұрын

    Shri Samartha Sadguru Ramanand Maharaj Ki Jai !!!

  • @SGB6
    @SGB63 ай бұрын

    Khup chan

  • @poojadeshpande-vidolkar8964
    @poojadeshpande-vidolkar89643 ай бұрын

    अप्रतिम जय श्रीराम🙏

  • @ramchandrashrouty4505
    @ramchandrashrouty45053 ай бұрын

    श्री सद्गुरू रामानंद तुम्हा प्रणाम 🙏🙏🙏

  • @anupdeshpande19
    @anupdeshpande193 ай бұрын

    सुंदर

  • @ajinkyashroutys.ajinkya8452

    @ajinkyashroutys.ajinkya8452

    3 ай бұрын

    Jaishriram 🙏

  • @satishdmelodies9293
    @satishdmelodies92933 ай бұрын

    खूप छान. सद्गुरू रामानंद महाराज की जय.

  • @VedantiBhalerao
    @VedantiBhalerao3 ай бұрын

    Maharaj me khup trasani hairan zaliye ho pan tumche hai ashtak aykun purn trass gayab zalyasarkha vatoy bola🙏 shree ram jay ram jay jay ram🙏

  • @ajinkyashroutys.ajinkya8452

    @ajinkyashroutys.ajinkya8452

    3 ай бұрын

    Jaishriram 🙏🙏🙏 Maharaja Saman Nahi Tribhuvani

  • @ramchandrashrouty4505

    @ramchandrashrouty4505

    3 ай бұрын

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏

Келесі